डिजिट आरोग्य विमा
आरोग्य समस्या फक्त जीवाचे नाहीत तर आर्थिक संकट देखील तुमच्यासमोर उभे करतात.
Read More
डिजिट कंपनी बद्दल माहिती
डिजिट जनरल इन्शुरेंस कंपनी ही भरतातील पहिली पूर्णपणे डिजिटली काम करणारी कंपनी आहे. या कंपनी ची सुरवात श्री. कमलेश गोयल यांनी २०१६ मध्ये बॅंग्लोर येथे केली. २०१७ मध्ये या कंपनी ने आय आर डी ए ची संमती मिळवली. डिजिट ही पूर्णपणे खाजगी कंपनी असून ही तुम्हाला आरोग्य विमा, मोटर विमा तसेच इतर ही अनेक सुविधा पुरवते.
तुमच्या आवडीचे डिजिट आरोग्य विमा कव्हरेज निवडा
डिजिट आरोग्य विम्याची वैशिष्ट्ये एका दृष्टीक्षेपात:
वैशिष्ट्ये |
तपशील |
रुग्णालाय शृंखला |
१०५००+ |
क्लेम सेटलमेंट रेशो |
८३.०८ % |
पॉलिसी नूतनीकरणक्षमता |
आजीवन नूतनीकरण |
डिजिट आरोग्य प्लस विम्याची प्रमुख वैशिष्ट्ये
डिजिट च्या आरोग्य विमा मध्ये भरपूर सोई आणि सवलती तुम्हाला भेटतात. यापैकी काही संक्षिप्त रुपतात पुढे दिल्या आहेत:
मोफत आरोग्य तपासणी सुविधा:
तुम्हाला रु. ५००० किंवा तुमच्या निर्धारित विमा रककमेच्या ०.२५% रक्कम ही आरोग्य तपासणी साठी देण्यात येते. ही रक्कम तपासणीच्या वेळेस किंवा तपासणी नंतर प्रदान करण्यात येते.
विम्याची रक्कम पुनर्संचयित करणे:
विम्याची रक्कमेची संपल्यावर पुन्हा भर केली जाते. फॅमिली फ्लोटर पॉलिसीच्या बाबतीत, विम्याची रक्कम पुनर्संचयित केली जाते. उदाहरणार्थ, जर विम्याची रक्कम ३ लाख रुपये असेल, आणि ३ सदस्य असतील, आणि जर दावा केल्यावर विमा रक्कम पूर्णपणे संपली असेल, तर प्रत्येक सदस्याला त्यांच्या विम्याची रक्कम म्हणून 3 लाखांची परतफेड मिळेल. ही सवलत फक्त प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ असंबंधित रोगांसाठी उपलब्ध आहे.
संचयी बोनस:
जर तुम्ही आजाराशी संबंधित हॉस्पिटलायझेशन, अपघाती हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजाराच्या हॉस्पिटलायझेशनसाठी किंवा कोणतेही प्रकारचे दावे विमा काळात दाखल केले नसतील तर तुमच्या पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुम्हाला संचयी बोनस मिळेल. या बोनस अंतर्गत तुमची विमा रक्कम वाढवली जाईल, तुमच्या विमा प्रीमियम मध्ये कोणतीही वाढ न करता.
पेपरलेस:
डिजिट पूर्णपणे आधुनिकिकरणांतर्गत काम करतो. त्यामुळे तुम्हाला विमा खरेदी करताना किंवा दावा करत्नाना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची परत द्यावी लागत नाही. तुम्ही सॉफ्ट कॉपी मधील कागदपत्र देखील सबमिट करू शकता.
डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी अंतर्गत काय समाविष्ट आहे?
या योजनेत रुग्णालय दाखल होण्याशी संबंधित सर्व खर्चाचा समावेश आहे:
- खोलीचे भाडे, डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च आणि वैद्यकीय चाचण्या
- दुसरे वैद्यकीय मत घेताना होणारा खर्च
- हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि हॉस्पिटलायझेशननंतरचा खर्च
- डे केअर प्रक्रिया
- अपघातानंतर दंत उपचार आवश्यक असल्यास
- रस्ता रुग्णवाहिका खर्च
- याव्यतिरिक्त इतर विशेष फायदे पुढे नमूद केल्याप्रमाणे आहेत:
- लठ्ठपणामुळे उद्भवणारे हृदयरोग आणि श्वसन समस्या यासाठी आवश्यक असलेल्या बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया चा खर्च विमा अंतर्गत कव्हर केला जातो.
- नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर यांच्याशी संबंधित काही प्रकरणांमध्ये मानसोपचार कव्हर प्रदान केले जाते.
- तुम्ही दाव्याच्या रकमेच्या १.५% एवढ्या रकमेसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चाच्या एकरकमी पेमेंटची निवड देखील करू शकता.
- रास्ता अपघात कव्हर देखील दिले जाते
- अवयव प्रत्यारोपण शुल्क, अवयव दात्याच्या हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि नंतरचा खर्च विमा रक्कममध्ये समाविष्ट आहे. या साठी दावा केलेल्या रकमेच्या 5% मर्यादा आहे.
- आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा सिद्ध उपचारांसह रूग्णांतर्गत उपचार खर्च.
- जीवघेणी वैद्यकीय परिस्थिती ज्यासाठी जवळच्या रुग्णालयात त्वरित वाहतूक आवश्यक आहे अशा परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका कव्हर प्रदान केले जाते.
- हे नवजात बाळाच्या संरक्षणासह मातृत्व खर्चाची काळजी घेते. यात गर्भधारणा संबंधित गुंतागुंत आणि वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक समाप्ती देखील समाविष्ट आहे. या सोयीवर काही अटी आणि शर्तीं लागू असतात, विमा खरेदी करताना संबीत अधिकारींशी बोलून तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करून घ्या.
- द्वितीय बलांतपण देखील विमा कव्हर करते आणि कव्हरेज मूळ कव्हरेज रकमेच्या 200% पर्यंत वाढवले जाते.
- इतर गैर-रुग्णालयातील खर्च जसे की डॉक्टरांची सल्ला फी, दंत विकार उपचार, आरोग्य तपासणी, निदान चाचण्या, फार्मसी बिले इत्यादींचा समावेश केला जातो.
- डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन साठी कव्हर प्रदान केले आहे
- गंभीर आजाराच्या हॉस्पिटलायझेशन कव्हरेजमध्ये औषधांचा खर्च, आयसीयू, निदान, डॉक्टरांची फी इ.
डिजिट आरोग्य विमा मध्ये कव्हर केलेल्या गंभीर आजारांची यादी पुढीलप्रमाणे:
खालील गंभीर आजारांवर झालेला खर्च विमा कंपनी कव्हर करेल:
- निर्दिष्ट तीव्रतेचा कर्करोग (घातक ट्यूमर). कॅन्सर मध्ये लिम्फोमा, ल्युकेमिया आणि सारकोमा (या वर अटी आणि शर्तीं लागू आहेत) यांचा समावेश होतो.
- छाती CABG सीएबीजी उघडा
- ऍपॅलिक सिंड्रोम
- मायोकार्डियल इन्फेक्शन ( विशिष्ट तीव्रतेचा पहिला हृदयविकाराचा झटका )
- ओपन हार्ट सर्जरी
- महाधमनीची शस्त्रक्रिया
- फुफ्फुस निकामी (शेवटचा टप्पा)
- यकृत निकामी (अंतिम टप्पा)
- मूत्रपिंड निकामी (नियमित डायलिसिस)
- बोन मॅरो/मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट
- सौम्य ब्रेन ट्यूमर
- प्रमुख डोक्याला आघात
- अंगांचा अर्धांगवायू (कायमचा)
- निर्दिष्ट तीव्रतेचा कोमा
- स्ट्रोक (कायमची लक्षणे)
- मोटर न्यूरॉन रोग (कायमची लक्षणे)
- ऍप्लास्टिक अॅनिमिया
- मल्टिपल स्क्लेरोसिस (लक्षणे कायम राहणे)
- स्वतंत्र अस्तित्व गमावणे
डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी अंतर्गत काय समाविष्ट नाही?
जर तुम्ही बाह्यरुग्ण विभागातील फायद्यांची निवड केली असेल, तर विमा कंपनी हॉस्पिटलायझेशन दरम्यान पुढील गोष्टींसाठी झालेला खर्च कव्हर करणार नाही:
- हॉस्पिटलायझेशनसाठीचा किमान कालावधी २४ तास असणे आवश्यक आहे
- गैर-वैद्यकीय खर्च जसे की उपचार न करण्याच्या हेतूने खरेदी केलेली उपकरणे, रुग्णालयात भेटीला आलेल्यांनी खाल्लेल्या अन्नाचा खर्च इ.
- हा विमा होम केअर नर्सिंग कव्हर करत नाही
- परदेशातील उपचार देखील समाविष्ट नाहीत
- कृत्रिम जीवन देखभाल
- ड्रग्ज किंवा अल्कोहोलच्या सेवन/अति सेवन प्रमाणामुळे उद्भवणारी कोणतीही दुर्घटना/आजार
- हॉस्पिटलायझेशन, बाह्यरुग्ण विभागातील वैद्यकीय खर्च आणि डेकेअर प्रक्रियेवर आलेला पर्यायी उपचार खर्च
- कोणत्याही प्रकारचे कायाकल्प आणि प्रतिबंधात्मक उपचार
- मातृत्व संरक्षणामध्ये फक्त दोन प्रसूतींचा समावेश होतो आणि २४ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होतो. हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असल्याशिवाय ते प्रसूतीपूर्व आणि प्रसवोत्तर खर्च कव्हर करत नाही.
- स्टेम सेल हार्वेस्टिंग आणि स्टोरेजवर झालेला खर्च विमा कंपनी भागवत नाही.
- आत्महत्येचे प्रयत्न आणि स्वत: ची दुखापत या विमा मधून वगळण्यात आली आहे
- घातक उपक्रम
- व्यावसायिक खेळ
- लैंगिक संक्रमित रोग
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कव्हर मिळविण्यासाठी विमाधारकाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आणि उपचाराचे कारण हार्मोनल असंतुलन, खाणे विकार किंवा मानसिक विकार असू नये.
फक्त हॉस्पिटलायझेशनची गरज असेल तरच मानसिक आजाराचे कव्हर प्रदान केले जाते
डिजिट आरोग्य विमा योजना सूची
-
ही योजना वैयक्तिक आधारावर आणि कौटुंबिक फ्लोटर आधारावर येते. त्यामुळे डिजिट आरोग्य विमा, त्यालोकांसाठी सोयीस्कर आहे जे एका पॉलिसीच्या अंतर्गत संपूर्ण कुटुंबाला कव्हर करणारी पॉलिसी शोधत असतात. ही योजना विकत घेतल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक काळजी करण्याची गरज नाही. डिजिट आरोग्य विमा स्मार्ट आणि कम्फर्ट या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला या एकाच योजनेमध्ये भरपूर फायदे मिळतात, त्यातील काही महत्वाचे फायदे खाली नमूद केले आहेत:
महत्वाची वैशिष्टे
- या योजनेत अपघात, आजारपण आणि करोना वायरसमुळे झालेल्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च समाविष्ट
- जर विम्याची रक्कम दाव्यांमुळे संपुष्टात आली तर ही योजना ती रक्कम पुन्हा भरून देते.
- या योजनेमध्ये तुम्हाला अतिरिक्त कव्हर घेता येतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचे संरक्षण कव्हर वाढवता येते. अतिरिक्त कव्हरमध्ये नवजात बाळाच्या संरक्षणासह मातृत्व लाभ, आयुष सारखे पर्यायी उपचार व झोन अपग्रेड समाविष्ट आहेत.
-
डिजिट सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स हा नियमित आरोग्य विमा पॉलिसीचा विस्तार आहे जो दाव्यांमुळे तुमचे विम्यामध्ये नमूद कव्हर संपल्यावर तुम्हाला रक्कम वाढवण्याची संधी देतो. ही योजना आपातकाळात तुम्हाला खूप उपयोगाची ठरते. टॉप उप योजने अंतर्गत तुम्ही एकापेक्षा आधीक दावे करू शकता. या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
महत्वाची वैशिष्टे
- या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकांना त्यांची वजावटीची रक्कम फक्त एकदाच भरावी लागते आणि त्यानंतर ते अनेक दावे करू शकतात.
- तुम्ही ही योजना रु. १ लाख, २ लाख, ३ लाख, ५ लाख, १० लाख आणि २० लाख विममा रक्कम पर्यंत खरेदी करू शकता.
-
ओपीडी - बाह्यरुग्ण विभाग, ज्यामध्ये कोणत्याही आजार किंवा जखमांसाठी वैद्यकीय सल्ला , निदान आणि उपचारांचा खर्च समाविष्ट आहे, ज्याना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते.
महत्वाची वैशिष्टे
- या योजनेत सर्व वैद्यकीय व्यावसायिक शुल्क, निदान शुल्क, सर्जिकल उपचार, औषध बिले आणि दंत उपचार यांसारख्या ओपीडी खर्चाचा समावेश होतो.
- ही योजना पॉलिसीधारकांना मोफत आरोग्य तपासणीची ऑफर देते. यामुळे विमाधारकना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही वार्षिक वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्यांसाठी मुभा मिळते. या वैद्यकिया चाचणीचा खर्च डिजिट कव्हर करते.
- योजनेअंतर्गत तुम्हाला अतिरिक्त दोन कव्हर मिळतात. यात मातृत्व लाभासोबत नवजात शिशु कव्हर आणि झोन अपग्रेडस समाविष्ट.
-
डिजीट कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्समध्ये एकाच संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांच्या गटाचा समावेश होतो. या विम्याचा खर्च कर्मचाऱ्यांची कंपनी उचलते. कर्मचाऱ्याना एकही प्रीमियम भरावा लागत नाही त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
महत्वाची वैशिष्टे
- वैद्यकीय आपातकाळाच्या परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याची विम्याची रक्कम संपली असेल, तर योजना कोणत्याही आजारासाठी विम्याची रक्कम पुन्हा संचयित करते. यावर कोणतीही मर्यादा लावली जात नाही.
- कंपनीच्या कर्मचारी क्रमांकावर कोणतीही मर्यादा या योजनेअंतर्गत लावली जात नाही. फक्त १० कर्मचाऱ्यांसह स्टार्ट-अप असो किंवा १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह एमएनसी असो. सर्व या योजनेचा लाभ उचलू शकतात.
- या योजनेअंतर्गत मूलभूत गंभीर आजार कव्हर होतात.
- याव्यतिरिक्त हा विमा विविध रूपांमध्ये देखील डिजिट सोबत उपलब्ध आहे. ही रुपे पुढे नमूद केल्याप्रमाणे आहेत:
-
कॉर्पोरेट कर्मचार्यांना हॉस्पिटलायझेशनच्या वेळी दैनंदिन पैश्यांची आवश्यकता पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी हे धोरण खास तयार केले आहे.
महत्वाची वैशिष्टे
- दैनंदिन रुग्णालयात रोख लाभ, यात अपघाती आणि गंभीर आजार हॉस्पिटलायझेशन समाविष्ट
- सोबतीला लाभ
- पालक निवास लाभ
- डेकेअर उपचारांचा फायदा
- मातृत्व लाभ
-
ही पॉलिसी विशेषत: अपघातांमुळे रुग्णालयात दाखल झाल्यावर कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू (बेपत्ता होण्यासह)
- कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्व
-
या विमा योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:
महत्वाची वैशिष्टे
- हॉस्पिटलायझेशन कव्हर, यात हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरचे खर्च देखील कव्हर होतात.
- रस्ता रुग्णवाहिका खर्च
- दुसरे वैद्यकीय मत
-
ही डिजिट आरोग्य विमा योजणांसाह खाली दर्शविलेल्या असंख्य कव्हरेजसह येते.
महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू (बेपत्ता होणे आणि बुडणे यासह)
- कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्व. यासाठी लागणारी बाह्य सहाय्य आणि उपकरणे खर्च देखील कव्हर होतो.
- उत्पन्नाच्या लाभ, जर विमा धारकाने उत्पन्न गमावले तर
- मुलांच्या शिक्षणाचा फायदा
- मुलांसाठी वैवाहिक खर्चात फायदा होईल
- मुलांसाठी अनाथ लाभ
- अंत्यसंस्काराचा खर्च
- हॉस्पिटलायझेशन कव्हर, यात हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरचे खर्च देखील कव्हर होतात. शिवाय दैनंदिन भत्ता देखील दिल जातो.
- डेकेअर उपचार
- दंत उपचार
- दुसरे वैद्यकीय मत
- रस्ता रुग्णवाहिका खर्च
- डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन
- बाह्यरुग्ण कव्हर
- आपत्कालीन एअर अॅम्ब्युलन्स कव्हर
- फ्रॅक्चर व बर्न्स कव्हर
- अपघाती इजा गर्भपात
-
डिजिट द्वारे ऑफर केलेली आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स ही एक मानक आरोग्य विमा पॉलिसी आहे जी तुमच्या खिशावर अधिक भार न टाकता तुमच्या ५ लाखांपर्यंत आरोग्य सेवा खर्च कव्हर करते. या विम्याची वैशिष्ट्ये पुशील प्रमाणे आहेत.
महत्वाची वैशिष्टे
- ही योजना आजीवन नूतनीकरणाच्या पर्यायासह येते, याचा अर्थ तुम्ही तुमचे प्रीमियम वेळेवर भरत असल्यास कोणत्याही वयात योजनेचे नूतनीकरण करू शकता.
- योजना ५% च्या कमी सह-भुगतानसह येते याचा अर्थ असा की दाव्यांच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त ५% खर्च करावा लागेल.
- ही योजना दोन प्रकरांमध्ये उपलब्ध आहे: एक वैयक्तिक आरोग्य पॉलिसी आणि फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स
-
कोविड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विशेषत: एखाद्या व्यक्तीला प्राणघातक कोरोनाव्हायरसचे निदान झाल्यावर उद्भवणारे खर्च आणि इतर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हि योजना दोन मुख्य रूपांमध्ये उपलब्ध आहे.
कोरोना कवच धोरण
ही पॉलिसी संपूर्ण कोविड उपचारांसाठी आवश्यक असलेले कव्हरेज विमाधारकांना प्रदान करते.
महत्वाची वैशिष्टे
- कोविड हॉस्पिटलायझेशन कव्हर, यात हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरचे खर्च देखील कव्हर होतात
- घरगुती उपचाराचा खर्च कव्हर करतो
- आयुष थेरपी
- रुग्णालयात दैनंदिन भत्ता लाभ
कोरोना रक्षक धोरण
ही पॉलिसी कोविडच्या उपचारादरम्यान विमाधारकांना आवश्यक असलेले बेस कव्हरेज देते.
महत्वाची वैशिष्टे
-
हि योजना तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाना अपघातात किंवा आपघातामुळे होणाऱ्या रुग्णालयाच्या खर्च भरपाई साठी कव्हर प्रदान करते. यामध्ये जखम, गंभीर आजार किंवा मृत्यू ही कव्हर होतो. ही योजना विविध रूपांमध्ये उपलब्ध आहे, ते पुढे नमूद केल्याप्रमाणे:
डिजिट वैयक्तिक अपघात विमा
ही योजना तीनप्रकारचे कव्हरेज पर्याय प्रदान करते ज्यातून तुमच्या गरजांवर आधारित पर्यायाची निवड करू शकता.
मूलभूत पर्याय
नावाप्रमाणेच, हे मूलभूत अपघाती विमा संरक्षण देते.
महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू
- एकूण कायमचे अपंगत्व किंवा आंशिक कायमस्वरूपी अक्षमता
- वाहतूक आणि अंत्यसंस्कार खर्च
समर्थन पर्याय
आधार पर्याय मूलभूत योजनेवर अनेक अतिरिक्त फायदे प्रदान करतो.
- महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू
- एकूण कायमचे अपंगत्व किंवा आंशिक कायमस्वरूपी अक्षमता
- हॉस्पिटलायझेशन खर्च, यात हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरचे खर्च देखील कव्हर होतात. शिवाय दैनंदिन भत्ता देखील दिल जातो.
- डेकेअर उपचार
- संचयी बोनस
- रस्ता रुग्णवाहिका खर्च
अष्टपैलू पर्याय
ही योजना सर्वसमावेशक अपघाती विमा योजना आहे जी मूलभूत आणि समर्थन पर्यायांच्या सर्व पैलूंचा समावेश करते.
महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू
- एकूण कायमचे अपंगत्व
- हॉस्पिटलायझेशन खर्च यात हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरचे खर्च देखील कव्हर होतात. शिवाय दैनंदिन भत्ता देखील दिल जातो.
- डेकेअर उपचार
- संचयी बोनस
- रस्ता रुग्णवाहिका खर्च
- घरच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च
- वाहतूक आणि अंत्यसंस्कार खर्च
-
ही योजना सर्वसमावेशक अपघाती विमा संरक्षण देते.
महत्वाची वैशिष्टे
- अपघाती मृत्यू
- कायमचे संपूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व
- पर्यायी कव्हरेज:
- तात्पुरती आंशिक अक्षमता
- शिक्षण अनुदान
पॉलिसीबाजार वरून डिजिट आरोग्य विमा कसं खरेदी करावा?
तुम्ही डिजिट आरोग्य विमाची कोणतीही योजना, ऑनलाइन पद्धतीने डिजिटच्या अधिकृत संकेतस्थाळाला भेट देऊन अगदी सहजरित्या खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही डिजिटच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा हेल्प डेस्क ल ईमेल करून तुम्हाला हवी ती मदत मिळवू शकता. तुम्हाला जर विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सोयीस्कर अशी योजना पडताळून पाहायची असेल तर तुम्ही पॉलिसीबाजारची निवड करू शकता. पॉलिसीबाजार तुम्हाला अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये विमा योजना उपलब्ध करून देते:
www.policybazaar.com ला भेट द्या.
होम पेज वरील आरोग्य विमा पृष्ठ निवडा.
विमा गुणक वर, तुम्हाला विविध योजनांची तुलना करता येईल. त्यातील जी योजना तुमच्या आर्थिक परिस्थिति आणि तुमच्या गरजेस पूरक असेल त्या योजनेची निवड करा.
तुमची मूलभूत माहिती पुरवा, जसे की तुमचे नाव, संपर्क क्रमांक, योजनेचा प्रकार, वय इत्यादी.
तुमच्या माहितीच्या आधारे, तुम्हाला वेगवेगळ्या योजना सुचवल्या जातील.
डिजिट ची तुम्हाला हवी असलेली योजना निवडा.
प्रीमियम ऑनलाइन भरल्यावर तुम्हाला डिजिट चे संरक्षण प्राप्त होईल.
डिजिट आरोग्य विमा चे नूतनीकरण कसे करावे?
विमा योजनेचे फायदे हे विमा अवधि पर्यंतच लागू असतात. विमा अवधि संपल्यानंतर देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला विमा नूतनीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. डिजिटचे विमा नूतनीकरण ऑनलाइन केल्यास तुम्हाला संचयी बोनस किंवा नो क्लेम बोनस सारखे अनेक फायदे उपभोगता येतात. पॉलिसीबाजार तुम्हाला विमा खरेदीप्रमानेच, विमा नूतनीकरण देखील सहज आणि सोप्या पद्धतीने करण्याची मुभा देते. तुम्ही पुढील पायऱ्यांद्वारे विमा नूतनीकरण करू शकता.
- पॉलिसीबाजार वरून www.policybazaar.com आरोग्य विमा नूतनीकरण पृष्ठाला भेट द्या.
- आरोग्य नूतनीकरण बटणावर क्लिक करा
- तुमची जन्मतारीख, आणि पॉलिसी क्रमांक टाका
- पुरवलेली माहिती एकदा तपासून पहा.
- तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून प्रीमियम ऑनलाइन भरू शकता
- नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळवले जाईल.
डिजिट आरोग्य प्लस विमासाठी कॅशलेस क्लेम प्रक्रिया
कॅशलेस क्लेम प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी विमा कंपनी मेडी अस्सीस्ट सोबत येऊन काम करते. येते तुमच्या विमा संबंधित सगळ्या अडी अडचणी क्षणात निवरल्या जातात:
- कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा ६४०० हून अधिक संपर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. संपर्क रुग्णालयांची सूची ऑनलाइन उपलब्ध आहे जी तुम्ही तुमचे मेडी अस्सीस्ट खाते वापरून तपासू शकता
- तुम्ही विमा/टीपीए हेल्पडेस्कवर प्री-ऑथोरायझेशन अर्ज सहज मिळवू शकता
- फॉर्म भरल्यानंतर आणि त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला हेल्पडेस्कवर सबमिट करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते हा फॉर्म मेडी अस्सीस्ट सोबत शेअर करतील
- मेडी अस्सीस्ट नंतर आवश्यक/शिफारस केलेल्या उपचारांसाठी तुमच्या कागदपत्रांचे मूल्यांकन करेल
- एकदा मान्यता मिळाल्यावर, तुम्ही उपचार सुरू ठेवू शकता
- कॅशलेस दाव्यांची पुर्तता/सुरुवात करण्यासाठी तुम्ही १८००-१०३-४४४८ वर विमा कंपनीला कळवू शकता.
डिजिट आरोग्य प्लस पॉलिसीसाठी प्रतिपूर्ती प्रक्रिया
- नेटवर्क नसलेल्या हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या उपचारांसाठी प्रतिपूर्ती दिली जाते. सर्व संबंधित कागदपत्रे सबमिट करून तुम्ही हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची भरपाई मिळवू शकता. तुम्ही तुमचा दावा ऑनलाइन देखील करू शकता. तुमच्याकडून विमा कंपनीला खालील माहिती आवश्यक आहे:
- एकदा तुम्ही कॉलवर विमा कंपनीला सूचित केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा फोन नंबरवर एक लिंक मिळेल जिथे तुम्ही सर्व मूळ दस्तऐवज जसे की अहवाल, बिले आणि इत्यादी तुमच्या बँक तपशीलांसह सबमिट करू शकता जिथे पैसे हस्तांतरित केले जातील.
- सर्व कागदपत्रे तुमच्या स्वाक्षरी आणि तारखेसह स्व-प्रमाणित असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला मूळ कागदपत्रे (काही प्रकरणांमध्ये) सबमिट करणे आवश्यक आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तुम्हाला ३० दिवसांच्या आत कागदपत्रे संकेत स्थळावार अपलोड करावी लागतील.
- कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या दाव्यावर प्रक्रिया केली जाईल आणि तुम्हाला ३० दिवसांच्या आत रकमेची भरपाई मिळेल.
विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
दावा दाखल करणे कधीकधी एक कठीण प्रक्रिया असू शकते, परंतु आपण आधी सर्व तपशील प्रदान करून ती तुमच्यासाठी व विमा कंपनी साठी सोपी करू शकता. आवश्यक कागदपत्रे प्रत्येक दाव्यानुसार भिन्न असू शकतात. डिजिट हेल्थ प्लस पॉलिसीसाठी दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला खालील दस्तऐवज सबमिट करावे लागतील, जसे की परिस्थिती असू शकते:
- रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला डिजिट आरोग्य विमा दावा अर्ज
- डिस्चार्ज सारांश
- डिजिट हेल्थ प्लस पॉलिसी पेपर्स
- वैद्यकीय नोंदी (इनडोअर केस पेपर्स, ओटी नोट्स, पीएसी नोट्स इ.)
- रुग्णालयाच्या मुख्य बिलाची मूळ प्रत
- फार्मसी बिलांची मूळ प्रत
- हॉस्पिटलच्या बिलाच्या ब्रेकअपची मूळ प्रत
- वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन
- तपास अहवाल/स्कॅन
- सल्लापत्रे
- केवायसी (फोटो आयडी कार्ड, लागू असल्यास)
- एफआयआर/एमएलसी अहवाल
- मूळ स्टिकर/ बीजक
- शवविच्छेदन अहवाल (लागू असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र
- उपस्थित डॉक्टरांचे प्रमाणपत्र
- जन्मपूर्व रेकॉर्ड
- रद्द केलेल्या चेकसह बँक तपशील (लागू असल्यास)
- जन्म प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
डिजिट आरोग्य विमा प्रीमियम गणना कशी करावी?
डिजिट आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर तुम्हाला विमा कालावधी पर्यंत प्रीमियम भरावा लागतो. प्रीमियम हा विमा खरेदी करते वेळेसच ठरवला जातो. विमादाता विविध घटक विचारात घेऊन प्रीमियम ची रक्कम ठरवतो. तुम्ही विमा खरेदी पूर्व ऑनलाइन गुणक वापरुन प्रीमियम बद्दल एक अंदाज बंधु शकता. हे घटक पुढील प्रमाणे आहेत.
- विमा धारकाचे वय
- जीवनशैली
- विमा रक्कम
- आधी अस्तित्वात असलेले आजार
- कव्हर प्रकार
- तुमचा व्यवसाय
डिजिट शृंखला रुग्णालय
शृंखला रुग्णालय हे विमा कंपनीच्या सेवेचाच एक भाग आहे. येथे तुम्ही आपातकाळात कॅशलेस उपचार करून घेऊ शकता. या रुग्णालयांमध्ये उपचार झाल्यानंतर दावा थेट रुग्णालयासोबत विमा कंपनी वाटवते. डिजिटचे देशभरातील सर्वोत्तम श्रेणींमधील १०५०० पेक्षा ही आधी रुग्णालयांसोबत करार आहेत. ही रुग्णालये तुम्हाला नेहमी उत्तम दर्जाची सेवा प्रदान करतात.
डिजिट आरोग्य विमाशी संपर्क कसं साधावा?
गो डिजिट आरोग्य विमा कंपनीची प्रमुख शाखा बॅंग्लोर येथे आहे. याव्यतिरीक देशभरात अनेक ठिकाणी तुम्हाला गो डिजिटच्या शाखा भेटतील. तुम्ही तुमच्या शंका निवरण्यासाठी जवळच्या शाखेला भेट देऊ शकता. तुम्हाला डिजिटच्या अधिकृत संकेत स्थळावर तुमच्या राज्यातील सर्व शाखांचे पत्ते व संपर्क तपशील भेटतील. आरोग्य विमाच्या दाव्यासाठी तुम्ही healthclaims@godigit.com वर ईमेल द्वारे किंवा १८०० २५८ ४२४२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून कळवू शकता.
डिजिट आरोग्य विमा: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
उत्तर: तुम्ही पॉलिसी वर्षभर तुम्हाला हवे तितके आरोग्य विमा दावे दाखल करू शकता, जोपर्यंत वैयक्तिक दाव्यांची एकूण रक्कम पॉलिसीच्या एकूण विम्याच्या रकमेपेक्षा जास्त होत नाही.
-
उत्तर: तुमच्या डिजिट फॅमिली मेडिकल इन्शुरन्सवरील विम्याच्या रकमेबद्दल तुम्ही असमाधानी असल्यास, तुम्ही त्यात सुधारणा करू शकता. तुमच्या विम्याचे नूतनीकरण करताना देखील तुम्हाला ही संधी मिळते.
-
उत्तर: होय, जर तुम्ही कंपनीसोबत तुमच्या विम्याचे नूतनीकरण केले तर तुम्हाला आरोग्य सेवा तपासणी मिळेल. तुमच्या विमा कागदपत्रांमध्ये दर्शविलेल्या रकमेपर्यंत वैद्यकीय तपासणी खर्च विमाप्रदाता कव्हर करतो.
-
उत्तर: होय, चुकीचे सादरीकरण, फसवणूक किंवा संबंधित माहिती उघड करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या शेवटच्या रेकॉर्ड केलेल्या पत्त्यावर/ई-मेल आयडीवर नोंदणीकृत वितरणाद्वारे प्रीमियम परत न करता १५ दिवसांची नोटीस जारी करून डिजिट पॉलिसी रद्द करू शकते.