*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
Who would you like to insure?
आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या दृषटीकोनातून आता प्रत्येकजण आरोग्य विम्यामध्ये गुंतवणूक करत आहे. आरोग्य विमा योजनेअंतर्गत अचानक उद्भवणाऱ्या गंभीर आजारांवर उपचार घेताना आपली सर्व सेव्हिंग्ज खर्च होऊ नये याकरिता आपण आरोग्य विम्याचा लाभ घेऊ शकतो. प्रत्येकाच्या गरजा, आर्थिक परिस्थिती या गोष्टींचा विचार करूनच कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजना तुम्हाला अनेक प्रकारच्या विमा योजना प्रदान करून मदत करते.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा हा कोटक महिंद्रा ग्रुपचा एक भाग असून त्या अंतर्गत मोटर विमा सारख्या बऱ्याच विमा योजना उपलब्ध आहेत. कोटक महिंद्रा ग्रुप ला या क्षेत्रातील कामासाठी बरेच अवॉर्ड देखील मिळाले आहेत. कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करून तुम्ही देखील आजारपणात निश्चिंत राहून उपचार घेऊ शकता. कोटक महिंद्रा आरोग्य विमा ४००० पेक्षा अधिक रुग्णालयाशी संलग्न आहेत. कोटक महिंद्रा आरोग्य विमा तुम्ही कुटुंबासाठी फ्लोटर प्लॅन मध्ये गुंतवणूक करून कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच विमा योजनेमध्ये सुरक्षित करू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार, आर्थिक परिस्थिती नुसार कोटक च्या विविध योजनांमधील एक विमा योजना निवडू शकता.
महत्त्वाची वैशिष्ट्ये | ठळक मुद्दे |
नेटवर्क हॉस्पिटल्स | ४०००+ |
खर्च केलेल्या दाव्याचे प्रमाण | ४८.२१ |
नूतनीकरणक्षमता | आयुष्यभर |
प्रतीक्षा कालावधी | ४ वर्षे |
कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश केला जातो:
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स च्या विमा योजनेनुसार हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांचा, डॉक्टरांची फी यांचा खर्च तसेच डिस्चार्ज मिळाल्यानंतर देखील काही दिवसांच्या औषांधांचा, उपचारांचा खर्च दिला जातो. हा खर्च हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतर एका ठराविक कालावधीसाठी दिल जातो.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स मधून २४ तासांच्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान झालेला खर्च पॉलिसी तर्फे दिला जातो. यात रूमचे भाडे, डॉक्टरांची फी, आयसीयू चा खर्च, रक्त ह्यांचा खर्च समाविष्ट आहे.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स मधील योजनांमध्ये घरी घेतल्या जाणाऱ्या उपचारांचा खर्च देखील दिला जातो. विमा धारकाला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करणे शक्य नसल्यास किंवा हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नसल्यास घरी उपचार घेतले जाऊ शकतात आणि त्याचा खर्च देखील पॉलिसीमधून क्लेम केला जाऊ शकतो.
कोटक हेल्थ इन्शुरन्स मध्ये विमा धारकाला लागणाऱ्या अवयव दात्याच्या अवयव प्रत्यारोपणसाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास होणाऱ्या खर्चाचा देखील समावेश केलेला आहे.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स मध्ये विमा धारकांना रुग्णालयातून शिफ्ट करताना अँब्युलन्सचा उपयोग झाल्यास तो खर्च देखील कंपनीकडून दिला जातो.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून मिळणाऱ्या विमा योजनेची वैशिष्ट्ये पुढील्प्रमाणे आहेत:
कोटक महिंद्रा इन्शुरन्स मध्ये तुम्ही एकाच वेळी ४ प्रौढ आणि ४ मुले ह्याचा एकत्रित विमा तुम्ही काढू शकता. जर तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन निवडलात तर तुम्ही एकाच प्रिमियम मध्ये २ प्रौढ आणि ३ मुले ह्यांचा समावेश करू शकता.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स मार्फत दिल्या जाणाऱ्या पॉलिसी मधून तुम्हाला तुमची पॉलिसी आयुष्यभरासाठी रिन्यू करण्याचा पर्याय मिळतो. पॉलिसी रिन्यु करून तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे त्यामध्ये अॅड ऑन कव्हर जोडून किंवा कमी करून बदल करून घेऊ शकता.
ह्या विमा योजनेतून तुम्हाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्या पूर्वी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च आणि ऍडमिट असताना आणि डिस्चार्ज नंतरच्या करण्यात येणाऱ्या उपचारांचा खर्च दिला जातो.
कोटक महिंद्रा इन्शुरन्स मध्ये पूर्वी पासून अस्तित्वात असणाऱ्या आजारांना ४ वर्षाच्या नियमित पॉलिसी रिन्युअल नंतर पॉलिसी मध्ये कव्हर केले जाते.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर विमा धारकाला बेसिक कव्हरेज व्यतिरिक्त देखील इतर ऍड ऑन सुविधा पॉलिसी मध्ये दिल्या जातात. विमाधारक दावा वठवण्याच्या वेळेस जर त्यांना हवे असेल तर थोडी रक्कम स्वत: देखील भरू शकतात.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजना कडून पुढील विमा योजना तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच वैयक्तिक किंवा फ्लोटर प्लॅन तुम्ही निवडू शकता.
कोटक सिक्युर शिल्ड विमा योजनेत विमा धारकाला विम्याची रक्कम एकत्रित विमा कंपनीतर्फे दिली जाते.
कोटक हेल्थ केअर योजनेत गुंतवणूक केल्यानंतर विमा धारकाला आजारपणात पैशांची चिंता न करता नीट उपचार घेऊन सहज बाहेर पडता येते.
कोटक अँक्सिडंट केअर पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. विमाधारकांना ह्या पॉलिसी मधून अपघातामुळे येणारे अपंगत्व किंवा आजारपण यामधून बाहेर पडण्यास मदत होते.
कोटक हेल्थ सुपर टॉप अप पॉलिसी मध्ये पॉलिसीचा प्रीमियम अत्यंत कमी असून त्या द्वारे तुम्ही कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करू शकता.
कोटक हेल्थ प्रीमियर ह्या पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला संपूर्ण रित्या सुरक्षित करू शकता. वैयक्तिक आणि फ्लोटर असे दोन पर्याय ह्या पॉलिसी मध्ये दिले जातात.
कोटक आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॉलिसी घेऊ शकता किंवा कंपनीच्या जवळच्या शाखेत जाऊन तुम्ही पॉलिसी घेण्यासाठी अधिक माहिती मिळवू शकता. पॉलिसी विकत घेण्यासाठी तुम्ही कोटक महिंद्राच्या एजंटद्वारे देखील पॉलिसी मध्ये गुंतवणूक करू शकता. पॉलिसी विकत घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता म्हणजेच पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी पुढील प्रमाणे पायऱ्या आहेत.
पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.policybazaar.com वर जा.
संकेतस्थळावरील आरोग्य विमा वेबपेज वर जा.
विविध आरोग्य विमा योजनांची तुलना करण्यासाठी इन्शुरन्स गुणक वापरून तुमच्या गरजेनुसार विमा योजना निवडा.
तुमचे नाव, संपर्क क्रमांक, तुमचे वय, विमा योजनेचा प्रकार इत्यादी बेसिक महिती द्या.
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार इन्शुरन्स गुणक तुम्हाला वेगवेगळ्या विमा योजना सुचवेल.
कोटक महिंद्रा विमा योजने मधील जी विमा योजना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल ती विमा योजना तुम्ही निवडा.
ऑनलाईन पॉलिसीचा प्रिमियम भरून तुम्ही तुमच्या पॉलिसीचा लाभ घ्या.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स ची सुविधा पॉलिसी च्या मर्यादित कालावधीपर्यंत ग्राहकाला वापरता येते परंतु त्या नंतर पॉलिसी रिन्यू करणे गरजेचे असते. असे न केल्यास तुम्ही विमा योजना लाभापासून वंचित राहता. ऑनलाईन पद्धतीने कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स तुम्ही खूप सहज रीन्यू करून घेऊ शकता. कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स ची विमा योजना खालील स्टेप्स वापरून पॉलिसी रिन्यू करू शकता.
कोटक महिंद्रा हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी दोन पर्याय आहेत.
कोटक आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक केल्यानंतर विमा धारकाला आपत्कालिन स्थितीत हॉस्पिटलचा खर्च विमा कंपनीकडून रिंबर्स करता येतो त्यासाठी पुढील पायऱ्या पूर्ण करा:
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या ३० दिवसांमध्ये विमाधारकाला पॉलिसी क्लेम करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा घेतल्यानंतर एका मर्यादित कालावधीपर्यंत विमा धारकाला प्रिमियम भरावा लागतो आणि त्यानंतर उपचारांसाठी आपण पॉलिसी क्लेम करू शकतो. विमाधारकाला भरावा लागणारा प्रिमियम खालील गोष्टीवर आधारित असतो.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करताना किंवा पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुमच्या वयानुसार प्रिमियम कमी जास्त होऊ शकतो. जर कमी वयात पॉलिसी घेत असाल तर प्रिमियम कमी भरावा लागतो पण तेच जर तुम्ही उतार वयात पॉलिसी घेत असाल तर प्रिमियम जास्त भरावा लागू शकतो कारण तेव्हा वयानुसार काही आजारपण येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच उतार वयात आरोग्य विम्याचे दावे करण्याची ही शक्यता जास्त असते.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा काढताना विमा धारकाला पूर्वी पासूनच कुठला आजार असल्यास भविष्यात त्या आजारांची ट्रिटमेंट विचारात घेता विमा धारकाला जास्त प्रिमियम भरावा लागु शकता.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजनेत विमाधारक त्याच्या आर्थिक परिस्थिती नुसार आणि गरजेनुसार विम्याची रक्कम निवडू शकतो आणि पॉलिसी रिन्यू करतेवेळी त्यामध्ये बदल करू शकतो. विमाच्या रक्केमेवर पॉलिसीचा प्रिमियम अवलंबून असतो.
सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता बऱ्याच लोकांना स्मोकिंगची सवय असते आणि त्यामुळे होणारे कॅन्सर सारखे आजार ह्याचे देखील प्रमाण वाढलेले दिसते, म्हणूनच कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजनेत धुम्रपानाची सवय असणाऱ्या विमा धारकाला इतरांच्या तुलनेत अधिक प्रीमियम भरावा लागतो.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा योजना बेसिक कव्हरेज तर मिळतेच पण त्याशिवाय ऍडऑन कव्हर्स देखील उपलब्ध आहेत जे विमा धारकाला आधिक सुरक्षितता मिळवून देऊ शकतात. या विमा योजने अंतर्गत एकाच प्रिमियम मध्ये पूर्ण कुटुंबालाही कव्हरेज मिळवू देऊ शकता येते.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा कंपनी पूर्ण भारतातील ४००० पेक्षा अधिक रुग्णालयांशी करारबद्ध असून आपत्कालिन परिस्थितीत किंवा पूर्वनियोजित ट्रीटमेंटसाठी विमाधारक अश्या रुग्णालयात पैशांची चिंता न करता उपचार घेऊ शकतात. विमाधारक अश्या हॉस्पिटल्स मधून कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा कंपनीशी संपर्क साधण्यासाठी कंपनीच्या टोल फ्री नंबर वर १८००-२६६४-५४५ वर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कॉल करू शकता किंवा care@kotak.com वर ईमेलने संपर्क साधू शकता.
कोटक महिंद्रा आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॉलिसी डिटेल्स टाकून पॉलिसीची सध्याची स्थिती जाणून घेऊ शकता.