*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
Who would you like to insure?
आपत्कालीन स्थितीत आरोग्य विमा पॉलिसी योग्य सुरक्षा देऊ करते म्हणूनच तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची आरोग्य विमा पॉलिसी उतरवून तुम्ही चिंतामुक्त राहू शकता. ५००० पेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल सोबत संलग्न असलेली फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी विविध प्रकारचे आरोग्य विमा पॉलिसी त्यांच्या कस्टमरला ऑफर करते. ग्राहक पॉलिसी खरेदी करण्यास इच्छुक असेल तर तो त्याच्या पसंतीने त्याला सोयीची वाटणारी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. त्यासाठी तो कंपनीच्या शाखेस भेट देऊ शकतो किंवा ऑनलाइन सर्च करून फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॉलिसीबद्दल योग्य ती अधिक माहिती मिळवू शकतो. ही कंपनी फ्युचर हेल्थ सुरक्षा फॅमिली प्लॅन, फ्युचर हॉस्पीकॅश हॉस्पिटल कॅश इन्शुरन्स प्लॅन, फ्युचर जनरली हेल्थ सरप्लस टॉप-अप प्लॅन, फ्युचर हेल्थ सुरक्षा वैयक्तिक अपघात विमा योजना, फ्युचर क्रिटीकेयर क्रिटिकल इलनेस विमा योजना, इत्यादी पॉलिसी वेगवेगळ्या कव्हरेज सुविधांसह ग्राहकांना ऑफर करते. यांपैकी कोणतीही पॉलिसी तुम्ही खरेदी करून कंपनीच्या काही नियम आणि अटींच्या पूर्तीनंतर विमालाभास पात्र होऊ शकता.
फ्युचर जनरली इंडिया विमा कंपनी त्यांच्या विमाधारकांना विविध प्रकारचे विमा पॉलिसी ऑफर करते. जसे फ्युचर जनरली आरोग्य विमा, फ्युचर जनरली गृह विमा, फ्युचर जनरली मोटार विमा, फ्युचर जनरली प्रवास विमा, इत्यादी होय. ही कंपनी भारतातील फ्युचर ग्रुप इंडस्ट्री आणि जनरली ग्रुप या इटालियन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चालते. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर कंपनीच्या शाखा विविध भागांत आहेत. इच्छुक ग्राहक कंपनीच्या जवळच्या शाखेत भेट देऊन किंवा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन चौकशी करू शकता आणि अधिक माहिती जाणून घेऊन तुमच्या सोयीची तसेच पसंतीची विमा पॉलिसी खरेदी करून सुरक्षा मिळवू शकता.
महत्वाची वैशिष्ट्ये | ठळक मुद्दे |
नेटवर्क हॉस्पिटल | 5000 + |
खर्च केलेला दावा गुणोत्तर | 87.42 |
नूतनीकरण | आजीवन |
प्रतीक्षा कालावधी | -- |
फ्युचर जनरली आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत खाली नमूद केलेल्या बाबींचा समावेश होतो,
दैनंदिन उपचार खर्च :
हॉस्पिटलायझेशन दरम्यान पेशंटवर होणारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा खर्च कंपनीच्या आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत कव्हर होतो. यासाठी कंपनी ग्राहकांना काही रक्कम दैनिक भत्ता म्हणून देते. ही रक्कम पॉलिसीपरत्वे वेगळी असू शकते.
पूर्व हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च :
पूर्व हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च कव्हर फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकाला देऊ करते. 90 दिवसांचा पूर्व हॉस्पिटलायझेशन तर 180 दिवसांपर्यंतचे हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च कंपनी कव्हर करते. दिवसांची मर्यादा तुम्ही निवडलेल्या पॉलिसी परत्वे वेगवेगळी असू शकते.
रुग्णवाहिकेचे कव्हरेज :
कंपनी तुमच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हांला आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेच्या खर्चाचे कव्हरेज देते. रुग्णवाहिकेची सुविधा पेशंटला पोहोचवण्यासाठी महत्वाची आरोग्य सेवा मानली जाते. तिचे महत्त्व लक्षात घेऊन कंपनी संबंधित पेशंटला उत्तम रुग्णवाहिका सेवेचे कव्हरेज देते.
घरगुती हॉस्पिटलायझेशन उपचार खर्च कव्हर :
तसेच, फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी घरगुती हॉस्पिटलायझेशन उपचार खर्च कव्हर म्हणून कंपनी तीच्या विमाधारकास देते. त्याचा कालावधी दहा दिवस इतके असतो. तुमच्या पॉलिसी परत्वे या कव्हरचे स्वरूप वेगळे असू शकते.
बाळंतपण आणि नवजात शिशु उपचार खर्च कव्हर :
तुम्ही निवडलेल्या पॉलिसी प्रकरावरून बाळंतपण आणि नवजात शिशु उपचार खर्च कव्हर लाभ विमा कंपनी तुम्हांला देऊ करते. दरम्यानच्या हॉस्पिटल खर्चाचा कव्हरेज तुमची पात्रता सिद्ध झाल्यास तुम्हांला कंपनीकडून प्राप्त होतो.
अवयवदात्याचा खर्च कव्हर :
जर एखाद्या विमा लाभार्थी पेशंटला अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टर देत असतील तर काही औपचारिक अटींची पूर्ती झाल्यानंतर तुम्हांला कंपनी मार्फत त्याचा खर्च कव्हर प्राप्त होतो. तो कव्हरेज तुम्ही निवडलेल्या पॉलिसी प्रकारावरून ठरतो.
फ्युचर जनरली आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत खाली नमूद केलेल्या बाबींचा समावेश होत नाही,
पूर्व अस्तित्वातील आरोग्य स्थिती :
संबंधित विमाधारक पॉलिसी खरेदी करताना किंवा त्याच्या आधी एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजाराच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या उपचाराला कंपनी कव्हर करत नाही. पॉलिसी खरेदीवेळी विमाधारकाच्या पूर्व अस्तित्वातील आरोग्य स्थिती कंपनीकडून विचारात घेतली जाते.
अमली पदार्थांचे सेवन :
अमली पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त केल्याने जर संबंधित विमा लाभार्थी एखाद्या आजाराने ग्रस्त असेल किंवा अशा पदार्थांच्या अति सेवनामुळे त्याला दुखापत झाली असेल तर विमा कंपनी त्याच्या वरील उपचाराचा खर्च कव्हर त्या व्यक्तीला देऊ करत नाही.
एड्स संबंधी उपचार :
एड्स संबंधी किंवा इतर लैंगिक आजारावारील उपचार कव्हर होत नाहीत. तसेच त्याच्या संबंधीत आजार किंवा त्यामुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या आजारावरील हॉस्पिटल उपचार खर्चाचा कव्हरेज कंपनी देत नाही.
महत्वाची वैशिष्ट्ये :
फ्युचर जनरली आरोग्य विमा योजनेची काही महत्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे,
कोणताही दावा न केल्याचा बोनस :
जर तुम्ही संपूर्ण पॉलिसी वर्षांत एकही दावा दाखल केला नाही तर फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी तुम्हांला कोणताही दावा दाखल न केल्याचा बोनस देऊ करते, याचा लाभ तुम्ही तुमच्या पॉलिसी अंतर्गत नूतणीकरणाच्या वेळी मिळवू शकता.
आजीवन नूतनीकरण :
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी तुम्हांला तुमच्या पॉलिसीच्या आजीवन नूतनीकरणाची सुविधा देऊ करते. पॉलिसीची अंतिम मुदत संपण्याच्या आत तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करून तुम्ही आपत्कालीन स्थितीत मिळणाऱ्या लाभास पात्र होऊ शकता.
वार्षिक आरोग्य चाचणी :
कंपनी विमाधारकांना वार्षिक फ्री हेल्थ चेक अपची सुविधा ऑफर करते. ही सुविधेचा लाभ तुम्हांला तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसी परत्वे मिळतो.
पर्यायी उपचार पद्धती कव्हर :
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी तुम्हांला पर्यायी उपचार पद्धती कव्हर देऊ करते. जर एखादा लाभार्थी विमाधारक त्याच्या आजारावर किंवा दुखापतीवर आयुष उपचार पद्धतीचा अवलंब करत असेल त्याचा खर्च देखील कंपनी देते.
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या विविध आरोग्य विमा योजनांची सूची आणि त्यांची काही वैशिष्ट्ये यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
फ्युचर हेल्थ सुरक्षा फॅमिली प्लॅन कुटुंबातील सर्व लाभार्थी व्यक्तींना आपत्कालीन स्थितीत सुरक्षा देते, या पॉलिसीची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी फ्युचर हेल्थ सुरक्षा योजना ही चार पर्यायांत ऑफर करते. ही योजना वैयक्तिक आणि कुटुंबासाठी तुम्ही खरेदी करू शकता. या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे,
फ्युचर हॉस्पीकॅश हॉस्पिटल कॅश इन्शुरन्स प्लॅन ही पॉलिसी तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ति हॉस्पिटलमध्ये भरती झाले असतील तर त्याचा उपचार खर्च कव्हर करते. या योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीची फ्युचर जनरली हेल्थ सुरप्लस टॉप-अप प्लॅन अपघात किंवा आजारावरील उपचारासाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर करते. या योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या फ्युचर हेल्थ सुरक्षा वैयक्तिक अपघात विमा योजना ही अपघात दरम्यान उद्भवलेल्या अपंगत्वास किंवा मृत्यूस विमालाभ मिळवून देतो. या योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीची फ्युचर क्रिटीकेयर क्रिटिकल इलनेस विमा योजना ही गंभीर व्याधीवर होणारे वैद्यकीय उपचार कव्हर करते. जर विमा लाभार्थी एखाद्या आजारावर उपचार घेत असेल तर त्याला या पॉलिसी अंतर्गत हॉस्पिटल खर्चाचा कव्हरेज प्राप्त होतो. या योजनेची काही वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
फ्युचर जनरली वैयक्तिक हेल्थ सुरक्षा योजना या योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा योजना खरेदी करायची असल्यास तुम्ही या विमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन याबाबत अधिक माहिती मिळवू शकता तसेच पॉलिसीबाजार वरून तुम्ही सोप्या मार्गाने ही पॉलिसी खरेदी करू शकता. खालील पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही पॉलिसीबाजार वरून फ्युचर जनरली आरोग्य विमा पॉलिसी तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी खरेदी करू शकता.
पायरी एक :
सर्वांत आधी पॉलिसीबाजारच्या www.policybazaar.com अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आरोग्य विमा पॉलिसीच्या पेजवर जावे.
पायरी दोन :
तिथे तुमची मूलभूत माहिती विचारली जाते जसे तुमचे नाव, वय, संपर्क क्रमांक, ई मेल आय डी, पॉलिसीचा प्रकार, इत्यादी.
पायरी तीन :
यानंतर पुढे ऑफर होणाऱ्या फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या सर्व पॉलिसींची तुलना करून प्रीमियम गुणक पेजच्या मदतीने तुमच्या सोयीची पॉलिसी तुम्ही निवडू शकता.
पायरी चार :
तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी जी पॉलिसी निवडली असेल त्याचा प्रीमियम तुम्हांला भरावा लागतो.
पायरी पाच :
पॉलिसी प्रीमियम तुम्ही तुमच्या सोयीने ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. ऑनलाइन भरायचे असल्यास कार्ड अथवा नेट बँकिंगच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता.
पायरी सहा :
तुम्ही केलेल्या प्रीमियम पेमेंटनंतर कंपनीकडून मिळालेले पॉलिसी प्रमाणपत्र आणि पावती जतन करून ठेवावी.
कोणत्याही विमा पॉलिसीचे तिची अंतिम मुदत संपण्याच्या आत नूतनीकरण करणे आवश्यक असते जेणेकरून तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या पॉलिसीचा लाभ घेण्यास पात्र राहता. फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया तुम्ही खालील सर्व पायऱ्यांचा अवलंब करून पूर्ण करू शकता आणि विमालाभ मिळवू शकता.
पायरी एक :
सर्वांत आधी फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
पायरी दोन :
तिथे तुमचा पॉलिसी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
पायरी तीन :
समोर दिसणाऱ्या पर्यायांपैकी पॉलिसी रीन्यू यावर क्लिक करा.
पायरी चार :
तुम्ही तुमच्या पसंतीनुसार आणि सोयीनुसार तुम्ही पॉलिसी गुणक पेजच्या साहाय्याने अॅड ऑन खरेदी करू शकता.
पायरी पाच :
पुढे नूतनीकरणाच्या प्रक्रियेत तुम्हांला पॉलिसीचे प्रीमियम भरावे लागते.
पायरी सहा :
ऑनलाइन पद्धतीने प्रीमियम भरायचे असल्यास कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे तुम्ही पे करू शकता.
पायरी सात :
तुम्हांला प्राप्त झालेली प्रीमियम भरलेली आणि पॉलिसी नूतनीकरणाची पावती सेव्ह करून ठेवावी.
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी तुम्हांला दावा दाखल करण्यासाठी दोन पर्याय देते जसे कॅशलेस दावा आणि प्रतिपूर्ति दावा हे होय.
फ्युचर जनरली आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत जर तुम्हांला कॅशलेस दावा दाखल करायचा असेल तर खालील पायऱ्यांचा पाठपुरावा करावा लागतो,
पायरी एक :
कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेला कॅशलेस दावा फॉर्म रीतसर भरून कंपनीला सबमिट करणे.
पायरी दोन :
दाव्याचा फॉर्म सबमिट करताना काही आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, अहवाल सोबत जोडणे बंधनकारक असते. कंपनी त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तुमची दावा दाखल प्रक्रियेची दखल घेते.
पायरी तीन :
काही नियम आणि अटींच्या अंतर्गत कंपनी तुमच्या पॉलिसीची दावा दाखल प्रक्रियेची पुष्टी करते. सर्व संबंधित घटकांचे सर्वेक्षण आणि तुलना करून विमालाभासाठी तुम्ही पात्र सिद्ध झाल्यास तुमचा दावा मान्य होतो.
पायरी चार :
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी त्या नेटवर्क हॉस्पिटलला याबाबत कळवून कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमांतून तुमच्या विमा पॉलिसीचे कव्हरेज देते.
फ्युचर जनरली आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत जर तुम्हांला प्रतिपूर्ति दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला खालील पायऱ्यांचा पाठपुरावा करावा लागतो,
पायरी एक :
आपत्कालीन परिस्थितीत किंवा नियोजन करून तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असताल तर सर्वांत आधी हॉस्पिटल भरती बाबत विमा कळविणे आवश्यक असते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मिळणारे तुमच्या आजार किंवा दुखापतीवरील उपचार घ्यावे.
पायरी दोन :
उपचार दरम्यान जे काही वैद्यकीय चाचण्या, अहवाल, बिले झाली असतील त्या सगळ्यांची प्रमाणपत्रे व पावत्या जमा करणे. ऑपरेशन साहित्य, औषध बिल, डॉक्टर फी, डिस्चार्ज अहवाल, इत्यादी.
पायरी तीन :
डिस्चार्ज घेताना जे काही हॉस्पिटलचे बिल झाले असेल ते आधी भरावे नंतर प्रतिपूर्तिचा दावा विमा कंपनीकडे दाखल करावा. त्यासाठीचा रीतसर फॉर्म भरून तुम्ही दावा दाखल करू शकता.
पायरी चार :
तुमच्या सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करून कंपनी तुमच्या पॉलिसी अंतर्गत तुम्ही केलेल्या प्रतिपूर्तिचा दावा मान्य करून तुम्हांला कव्हरेज लाभ मिळवून देते.
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी पॉलिसी अंतर्गत दावा करताना काही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. तसेच, ती सर्व कागदपत्रे आणि अहवाल अधिकृतही असावी लागतात मगच तुमची दावा दाखल प्रक्रिया पुढे सरकते तर खाली आवश्यक कागदपत्रांची सूची दिलेली आहे,
दावा दाखल करताना सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे,
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या पॉलिसीचे प्रीमियम जाणून घ्यायचे असेल गुणक पेजवरून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. कंपनीच्या पॉलिसीचे प्रीमियम हे खाली नमूद केलेल्या बाबी ठरवत असतात. याबाबतची विस्ताराने माहिती पुढीलप्रमाणे,
5000 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स सोबत संलग्न असलेली फ्युचर जनरली आरोग्य विमा सर्वोत्तम सेवेस प्राधान्य देते. या हॉस्पिटल्समध्ये दाखल होऊन तुम्ही कंपनीकडून कॅशलेस उपचाराचा कव्हर लाभ मिळवू शकता. कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी उतरवताना जवळपास नेटवर्क हॉस्पिटल असल्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्हांला सोयीच्या उपचार घेता येईल. तसेच, फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनी तुम्ही दावा दाखल केल्यानंतर तुमच्या फॉर्मची आणि संबंधित कागदपत्रांची दखल घेऊन ते अधिकृत आढळल्यास हॉस्पिटलला याबाबत कळवते आणि उपचार खर्च कॅशलेस पद्धतीने कव्हर करते. अशाप्रकारे, नेटवर्क हॉस्पिटल्सची भूमिका आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महत्वाची सिद्ध होते.
फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही सविस्तर घेऊ शकता. कंपनीच्या 1800 220233 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची शंका किंवा प्रश्न विचारू शकता. तसेच, फ्युचर जनरली आरोग्य विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत जाऊन आणि कंपनीच्या एखाद्या पॉलिसी एजंटला भेटून देखील तुम्ही कंपनीशी संपर्क साधू शकता.