*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
Who would you like to insure?
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना अनेकविध प्रकारच्या सुविधांसह काही विशेष लाभ मिळवून देणारे आरोग्य विमा पर्याय ऑफर करते. कंपनी तुम्हांला तीन प्लॅन पर्याय देते नावी सिल्वर प्लॅन, गोल्ड प्लॅन आणि प्लॅटिनम प्लॅन. एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी आरोग्य विम्याचे तीनही प्लॅन ही आजीवन नूतनीकरणासह आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलचा उपचार खर्च कव्हर करतात.
एडेलवाइस जनरल विमा कंपनी अनेक प्रकारच्या विमा योजना त्यांच्या कस्टमरला ऑफर करते. जसे होम इन्शुरन्स पॉलिसी, कार इन्शुरन्स पॉलिसी, दुचाकी इन्शुरन्स पॉलिसी, फायर इन्शुरन्स पॉलिसी, लोन प्रोटेक्शन कव्हर, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, कमर्शियल इन्शुरन्स पॉलिसी, इत्यादी. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून देशभरात अनेक शाखा आहेत. तसेच, एडेलवाइस जनरल विमा कंपनी विमा कंपनीची नोंद ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एमसीएक्स स्टॉक एक्सचेंज आदींसोबत झाली आहे.
महत्वाची वैशिष्ट्ये | ठळक मुद्दे |
नेटवर्क हॉस्पिटल्स | २५०० + |
खर्च केलेला दावा गुणोत्तर | ७०.०१% |
नूतनीकरण क्षमता | आजीवन |
प्रतीक्षा कालावधी | ४ वर्षे |
एडेलवाइस आरोग्य विमा योजना अंतर्गत खालील बाबी समाविष्ट होतात,
पूर्व हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च कंपनी कव्हर करते. तुम्ही जो पॉलिसी प्लॅन खरेदी केलेला असेल त्यावरून दिवसांची मर्यादा वेगवेगळी असते. यामध्ये हॉस्पिटलच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी तसेच डिस्चार्ज मिळाल्यानंतर सर्व सेवा खर्च विमा कंपनीकडून कव्हर होतो. जसे पॉलिसीच्या सिल्वर प्लॅनमध्ये याची मर्यादा ३० दिवस पूर्व हॉस्पिटलायझेशनसाठी आहे तर ६० दिवस हॉस्पिटलायझेशन नंतर आहे. कंपनीच्या गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅनमध्ये याची दिवस मर्यादा पेशंटला अजून वाढवून मिळते.
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी इन पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर देऊ करते. यामध्ये हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या उपचार खर्चाचा अंतर्भाव होतो. जसे; नर्सिंग, बोर्डिंग चार्ज, आयसीयू सुविधा, विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, मेडिकल औषधे आणि इतर ऑपरेशन साहित्य खर्च, डॉक्टर समुपदेशन फी, इत्यादी.
घरगुती हॉस्पिटलायझेशन खर्च कंपनी कव्हर करते. तुम्ही निवडलेल्या पॉलिसी प्लॅन वरुन त्याची मर्यादा ठरत असते. तुमच्या एकंदर विमाच्या रकमेवरून कंपनी तुमचा घरगुती हॉस्पिटलायझेशन उपचार खर्च देऊ करते. हा लाभ फक्त निर्दिष्ट कालावधीच्या उपचारांसाठीच लागू होतो.
जर एखाद्या केसमध्ये रुग्णाला डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असेल तर अवयवदात्याचा खर्च कंपनी कव्हर करते. या विमालाभाचा कव्हर तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अनुसार वेगवेगळा असतो. गोल्ड प्लॅनमध्ये एक लाख पर्यन्त अवयवदात्याचा खर्च कंपनी कव्हर करते तर प्लॅटिनम प्लॅन मध्ये हा कव्हर दोन लाख इतका असतो. सिल्वर प्लॅनमध्ये अवयवदात्याचा खर्च कव्हर होत नाही.
या कंपनीच्या आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत आयुष उपचार कव्हर होतात. एखादा लाभार्थी विमाधारक जर आयुष पद्धतीचा त्याच्या आजाराच्या उपचारासाठी अवलंब करत असेल तर कंपनी तो खर्च त्याच्या आरोग्य विमा अंतर्गत कव्हर करते. यात आयुर्वेदिक उपचार पद्धती देखील समाविष्ट आहे.
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत रुग्णवाहिकेचा खर्च कव्हर होतो. हॉस्पिटलमधील रुग्णांना सुखरूप पोहोचवण्यासाठी उपयोगात येणारी महत्वाच्या सेवांपैकी एक म्हणजे रुग्णवाहिका सेवा होय. संबंधित पेशंटसाठी कंपनी त्याच्या आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत या सेवेचा खर्च कव्हर करते. कंपनी ऑफर करत असलेल्या तीनही पॉलिसी पर्यायांत रुग्णवाहिकेचा खर्च कव्हर होतो.
तुमच्या पॉलिसी अंतर्गत संबंधित व्यक्तीवर होणारे हॉस्पिटलमधील दैनंदिन उपचार कव्हर होतात. पेशंटच्या आजाराशी संबंधित सर्व प्रकारचे सेवा दैनंदिन उपचार या कव्हरच्या अंतर्गत येतात. विविध चाचण्या आणि औषधे आदि गोष्टींचा यांत समावेश होतो.
एडेलवाइस आरोग्य विमा योजना अंतर्गत खालील बाबी समाविष्ट होत नाहीत,
जर संबंधित लाभार्थी विमाधारकाने जाणूनबुजून स्वत:ला इजा करून घेतली असल्यास किंवा होणाऱ्या दुखापतीची त्याला पूर्व कल्पना असून अशा मुद्दाम घडवून आणलेल्या घटनांमुळे झालेल्या आरोग्य हानीवर एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी त्या विमाधारकाला उपचार खर्चाचा कव्हरेज देत नाही. उदाहरणार्थ; आत्मघातचा प्रयत्न, इत्यादी.
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी, जर त्यांचा ग्राहक साहसी खेळात भाग घेतल्याने दुखपतीस बळी पडला असेल किंवा त्याची आरोग्य हानी झाली असेल तर त्याच्या उपचारासाठी करण्यात आलेला हॉस्पिटलचा खर्च कव्हर करत नाही.
कंपनीचा विमाधारक जर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे घेऊन आरोग्य नुकसानास बळी पडला असेल तर तो बरा व्हावा म्हणून करण्यात आलेले हॉस्पिटलमधील सगळे उपचार त्याच्या पॉलिसी अंतर्गत कव्हर होत नाहीत.
अमली किंवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने संबंधित व्यक्तीचे आरोग्य नुकसान झाले असेल तर अशा परिस्थितीत कंपनी त्या विमाधारकाला कव्हरेज देऊ करत नाही. उदाहरणार्थ; दारूचे अतिसेवन, ड्रग्सचे सेवन, इत्यादी.
वैयक्तिक किंवा गट पातळीवर गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असलेल्या संबंधित लाभार्थीस कंपनी विमालाभ देत नाही. गुन्हेगारी कृत्यांत सहभागी झाल्याने उद्भवलेले कोणत्याही प्रकारच्या दुखापतीवर होणाऱ्या उपचाराचा हॉस्पिटल खर्च विमा कंपनी कव्हर करत नाही.
एडेलवाइस आरोग्य विमा योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत,
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीच्या पॉलिसी अंतर्गत गंभीर आजार कव्हर होतात, जसे कॅन्सर उपचार, हार्ट अटॅक, शरीराचा एखादा अवयव पॅरालायसिस झाल्यास त्याचा उपचार खर्च कंपनी कव्हर करून विमाधारकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
जर वर्षभरात कंपनीच्या विमाधारकाने कोणताही दावा न केल्यास एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी त्याला कोणताही दावा न केल्याचा कव्हर देते. या फायद्याचा लाभ विमाधारक विमा नूतणीकरणाच्या वेळेस घेऊ शकतो.
तुमच्या पॉलिसी परत्वे मोफत आरोग्य चाचणी केली जाते. ही चाचणी सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅनच्या अनुसार वर्गीकृत केली जाते. सिल्वर प्लॅनच्या अंतर्गत काही रक्ताच्या आणि युरिनची चाचणी केली जाते तर गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅनमध्ये या चाचण्यांसोबत एक्स-रे आणि काही आणखी चाचण्यांचा समावेश होतो.
गोल्ड प्लॅन आणि प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत कंपनी संबंधित लाभार्थीचा बाळंतपण खर्च कव्हर करते. गोल्ड प्लॅन अंतर्गत ५० हजार पर्यन्त तर प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत २ लाख इतका हॉस्पिटल खर्च कव्हर प्राप्त होते.
कंपनी पेशंटला रिकव्हरी खर्च कव्हर प्रदान करते. गोल्ड प्लॅन अंतर्गत १००० रुपये इतकी असते तर प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत १५०० रुपये असते. सिल्वर प्लॅन अंतर्गत रिकव्हरी खर्च लाभ मिळत नाही.
संबंधित विमाधारक इतर पर्यायी फायद्यांचा लाभ या एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीची पॉलिसी खरेदी करून मिळवू शकतो. जसे; हॉस्पिटल कॅश फायदे, बॅरीएट्रिक शस्त्रक्रिया खर्च कव्हर, इत्यादी. हे सर्व फायदे वेगवेगळ्या कव्हरेजच्या स्वरूपात तुम्ही निवडलेल्या प्लॅन परत्वे तुम्हांस कंपनीकडून मिळू शकतात.
एडेलवाइस सिल्वर आरोग्य विमा योजना ही वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर या दोन्ही रूपात उपलब्ध आहे. या पॉलिसी अंतर्गत आजीवन नूतनीकरणाची सुविधा कंपनी त्यांच्या ग्राहकांना देते. ही विमा पॉलिसी खरेदी करण्याची वय मर्यादा १८ वर्षे ते ६५ वर्षे इतकी आहे.
एडेलवाइस सिल्वर आरोग्य विमा योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
एडेलवाइस गोल्ड आरोग्य विमा योजना वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर या दोन्ही करीता उपलब्ध आहे. या पॉलिसी अंतर्गत आजीवन नूतनीकरणाची सुविधा कंपनी त्यांच्या ग्राहकांना देते. ही विमा पॉलिसी खरेदी करण्याची वय मर्यादा १८ वर्षे ते ६५ वर्षे इतकी आहे.
एडेलवाइस गोल्ड आरोग्य विमा योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
एडेलवाइस प्लॅटिनम आरोग्य विमा योजना वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर या दोन्ही करीता उपलब्ध आहे. या पॉलिसी अंतर्गत आजीवन नूतनीकरणाची सुविधा कंपनी त्यांच्या ग्राहकांना देते. ही विमा पॉलिसी खरेदी करण्याची वय मर्यादा १८ वर्षे ते ६५ वर्षे इतकी आहे.
एडेलवाइस प्लॅटिनम आरोग्य विमा योजनेची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करायची असेल तर तुम्ही एडेलवाइस जनरल विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्या आरोग्य विमा योजनेविषयी योग्य माहिती प्राप्त करून घेतली पाहिजे. तसेच, पॉलिसीबाजारच्या माध्यमांतूही सोप्या पद्धतीने तुम्ही तुम्हांला हवी असलेली एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीची पॉलिसी खरेदी करू शकता. पॉलिसीबाजार वरुन पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रक्रियेत तुम्हांला पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागते,
सर्वांत आधी तुम्ही www.policybazaar.com पॉलिसीबाजारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तेथील आरोग्य विमा पेजवर जा.
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसीच्या पर्यायांपैकी तुम्हांला सोयीची असलेली योजना निवडा त्यासाठी इन्शुरन्स गणक पेजवर जाऊन तुलना करा.
पॉलिसी खरेदी करण्याच्या पुढच्या पायरीत तुम्हांला तुमच्याविषयीची मूलभूत माहिती नमूद करावी लागते जसे तुमचे नाव, वय, संपर्क क्रमांक, ई-मेल आय डी, तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी निवडलेल्या योजनेचा प्रकार, इत्यादी.
पुढे तुम्ही निवडलेल्या त्या आरोग्य पॉलिसी अंतर्गत सर्व नियम व अटींची पूर्ती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन प्रीमियम पेमेंट करू शकता.
प्रीमियम पेमेंटनंतर एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीकडून प्राप्त झालेले पॉलिसी खरेदीचे प्रमाणपत्र आणि पावती जतन करुन ठेवावी.
पॉलिसीची प्रत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर कंपनीतर्फे पाठवण्यात येईल.
तुम्ही खरेदी केलेल्या कोणत्याही विम्याचे नूतनीकरण करून घेणे तिची सेवा अखंडित ठेवण्यासाठी अति आवश्यक असते. प्रत्येक विम्याची एक ठराविक मुदत असते ती अंतिम मुदत संपण्याच्या आत तिचे नूतनीकरण करून आपत्कालीन स्थितीत लाभास पात्र होता येते. म्हणून, पॉलिसी खरेदी करण्याइतकेच तिच्या नूतनीकरणालाही तितकेच महत्त्व आहे. एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी विमाधारकाला खालील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागते,
www.policybazaar.com या संकेत स्थळावार जाऊन भेट द्या.
पॉलिसी बाजारच्या आरोग्य विमा नूतनीकरण टॅब वर क्लिक करा
तुमचा मूलभूत तपशील पुरवा. त्यावर आधारित कंपनी तुम्हाला काही योजना पर्याय दाखवेल.
त्यांपैकी सर्व पर्यायांची तुलना करून तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या फायद्याची पॉलिसी निवडू शकता.
तुमच्या सोयीनुसार प्लॅनमध्ये चेंज तुम्ही करून तुमच्या आरोग्य पॉलिसीचे नूतनीकरण करू शकता.
पॉलिसी सिलेक्शन झाल्यानंतर त्याला अनुसरून तुम्हांला प्रीमियम पेमेंट करावे लागते.
तुमच्या सोयीच्या पेमेंट पद्धतीचा अवलंब करून तुम्ही पॉलिसीचा प्रीमियम पे करू शकता जसे ऑनलाइन पेमेंट करायचे झाल्यास तुम्ही कार्ड किंवा नेट बँकिंगच्या द्वारे करू शकता.
प्रीमियम पेमेंट केल्यानंतर कंपनीकडून तुम्हांला मिळालेली पावती सेव्ह करून ठेवावी.
एडेलवाइस आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत तुम्ही कॅशलेस दावा व प्रतिपूर्ति दावा असे दोन प्रकारचे दावे कंपनीकडे दाखल करू शकता, त्याबद्दलच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत कॅशलेस दावा करताना खालील बाबींची पुष्टी करावी लागते,
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत प्रतिपूर्ति दावा करताना खालील बाबींची पुष्टी करावी लागते,
एडेलवाइस आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत जर तुम्ही कंपनीकडे दावा दाखल करण्याच्या विचारात असताल तर तुम्हांला खालील सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करणे बंधनकारक असते. ती सगळी कागदपत्रे अधिकृत असावी लागतात अन्यथा कंपनीकडून तुमचा दावा मंजूर केला जात नाही.
दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे,
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीची पॉलिसी खरेदी करताना तुम्हांला तुमचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्हांला आधी पॉलिसी प्रीमियम कॅल्क्युलेटर पेजवर जावे लागते. तिथे काही मूलभूत माहिती नमूद करून तुम्ही प्रीमियम बद्दलची माहिती मिळवू शकता. वय, विम्याची एकूण रक्कम, विमालाभासाठीची सदस्यसंख्या, निर्दिष्ट सीमा किंवा नोंद केलेले भौगोलिक क्षेत्र, इत्यादी बाबी एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीच्या पॉलिसी प्रीमियमसाठी विचारात घेतल्या जातात. याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे,
वय हा प्रीमियम ठरवताना एक महत्वाचा घटक मानला जातो. वय जास्त असल्यास प्रीमियम जास्त भरावे लागण्याची शक्यता असते कारण वृद्ध लोक तरुणांच्या तुलनेत जास्त आजारी पडतात. परिणामी, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. तेव्हा आपत्कालीन स्थितीत त्यांच्या आरोग्य हानीवरील हॉस्पिटल सेवांचा खर्च कव्हरेज विमा कंपनी देऊ करते.
तुमच्या एकूण विम्याच्या रकमेवरून तुमचा प्रीमियम ठरतो. तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी कंपनीचा कोणता पॉलिसी प्लॅन खरेदी करता त्याच्या अनुसार विम्याची रक्कम विचारात घेतली जाते आणि त्यावरून गणक पेज तुमचा प्रीमियम सांगतो.
तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही किती सदस्य त्या पॉलिसीच्या लाभाकरीता जोडता याच्यावरूनही पॉलिसी प्रीमियम ठरत असतो. कंपनी आठ सदस्यांपर्यन्त विमालाभ देऊ करते. प्रत्येक प्लॅन परत्वे ही मर्यादा आणि कव्हरेज वेगवेगळी असू शकते.
विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्हांला एक ठराविक सीमा निर्दिष्ट करावी लागते. त्यावरून तितक्या भौगोलिक क्षेत्राच्या मर्यादेपर्यन्त तुम्हांला आरोग्य हानी उपचाराचा खर्च कव्हर कंपनी देते. म्हणून, भौगोलिक क्षेत्रावरून प्रीमियम ठरत असतो.
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी २५०० पेक्षा जास्त हॉस्पिटल्स सोबत संलग्न आहे. तेथील व्यवहार कॅशलेस पद्धतीने केला जातो. आपत्कालीन स्थितीत नेटवर्क हॉस्पिटल्स महत्वाची कामगिरी बजावतात. विमाधारकाने कंपनीची पॉलिसी खरेदी करताना जवळपास नेटवर्क हॉस्पिटल असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून, सोयीस्कर सेवा उपलब्ध होईल. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल्सची लिस्ट पाहू शकता. एडेलवाइस आरोग्य विमा कंपनी दर्जेदार उपचारास प्राधान्य देते. संलग्नित हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन, उपचार पद्धती, आदि बाबी विचारात घेऊन कंपनी हॉस्पिटल्सचे नूतनीकरण करत असते. त्यामागे कंपनीचा सर्वोत्तम सेवा हाच हेतु असतो.
एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीशी संपर्क साधायचे असल्यास तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तिथे उपलब्ध माहितीच्या साहाय्याने चौकशी करू शकता. जसे, तुम्ही १८०० १२००० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा मेलद्वारे संपर्क साधू शकता तसेच संबंधित शाखेस प्रत्यक्ष जाऊन आणि कंपनीच्या एखाद्या एजंटची भेट घेऊन या आरोग्य कंपनीशी संपर्क साधू शकता व तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता. एडेलवाइस आरोग्य विमा कंपनीची ग्राहक सेवा तुम्हांला ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून प्रतिसाद देते.