रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही, भारतातील एक आघाडीची आरोग्य विमा प्रदाती आहे. कंपनीद्वारे खिश्याला परवडणाऱ्या किमतींमध्ये विविध आरोग्य विमा योजना देऊ केल्या जातात.
Read More
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सचा आढावा
महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, "स्वास्थ्य हीच खरी संपत्ती आहे, सोन्या-चांदीचे तुकडे नव्हेत."रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या शब्दांवर विश्वास ठेवते आणि प्रत्येकाकडे वैद्यकीय विमा पॉलिसी असावी अशी तिची इच्छा आहे. रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सचे ध्येय हे, लोकांच्या आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करणे, सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देऊ करणे, वेळोवेळी त्यांच्या उत्पादनांमध्ये नाविन्य आणणे आणि देशभरात चांगली पोहोच देऊ करणे आहे. रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स योजना परवडण्याजोग्या आहेत, प्रवेशयोग्य आहेत आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची रचना केली गेली आहे आणि पॉलिसीधारकांच्या हितांचे संरक्षण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी प्लॅन्सवर कोविड लसीची सवलत
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे कोविड-19 विरुद्ध लसीकरण केलेल्या ग्राहकांना प्रीमियमवर 5% पर्यंत बचत देऊ करत आहे. नवीन पॉलिसी खरेदी करणार्या किंवा त्यांच्या विद्यमान पॉलिसीचे नूतनीकरण करणार्या सर्व ग्राहकांना रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी प्लॅनवर ही कोविड लस सवलत उपलब्ध आहे. ज्या पॉलिसीधारकांना कोविड-19 लसीचा एक किंवा दोन्ही डोस मिळाले आहेत, ते या प्रीमियम बचत पर्यायासाठी पात्र असतील. ही सवलत फक्त एकदाच लागू होईल आणि पॉलिसीधारकाला उपलब्ध असलेल्या बचतीच्या इतर पर्यायांव्यतिरिक्त असेल.
Reliance Health Insurance at a Glance
महत्वाची वैशिष्टे |
हायलाईट्स |
विम्याची रक्कम |
रु. 50,000 ते रु. 1 कोटी |
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर |
पात्रतेचा निकष |
प्रौढ - 18 वर्षे ते 65 वर्षे मूल – 91 दिवस ते 25 वर्षे |
पॉलिसीचा कार्यकाळ |
1 / 2 / 3 वर्षे |
नेटवर्क हॉस्पिटल्स |
7300+ |
खर्च केलेल्या दाव्याचा रेश्यो* |
89.36% |
कोविड-19 कव्हर |
उपलब्ध |
संचयी बोनस |
100% पर्यंत |
नूतनीकरणयोग्यता |
आयुष्यभर |
प्रारंभिक प्रतिक्षा कालावधी |
15 दिवस / 30 दिवस (प्लॅनवर अवलंबून) |
अगोदर अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी |
2 / 3 / 4 वर्षे(योजनेवर अवलंबून) |
क्लेम सेटलमेंट रेशो* |
98% |
ऐच्छिक को-पेमेंट |
उपलब्ध |
पेपरवर्क |
झीरो पेपरवर्क |
ईएमआय सुविधा |
उपलब्ध |
कर लाभ |
आयकर कायदा, 1961 च्या कलम 80डी अंतर्गत 1,00,000 रुपयांपर्यंत बचत |
*आर्थिक वर्ष 2019-20 नुसार
तुमच्या आवडीचे रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज निवडा
₹1करोड़
रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स का खरेदी करायचा?
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सद्वारे व्यक्ती आणि कुटुंबांसाठी निवडण्यासाठी विमा रकमेच्या विस्तृत पर्यायांसह स्वस्त वैद्यकीय विमा योजना देऊ केली जातो. तिच्या आरोग्य विमा योजना 91 दिवस ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खरेदी केल्या जाऊ शकतात. कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधांचा लाभ घेण्यासाठी कंपनीचे भारतभरात 7300 हून अधिक हॉस्पिटलचे विस्तृत नेटवर्क आहे. याशिवाय, हे रूम कॅपिंगशिवाय उपलब्ध आहे आणि अशा प्रकारे, विमाधारक त्याच्या / तिच्या आवडीच्या कोणत्याही खोलीत प्रवेश घेऊ शकतो / शकते.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारक प्लॅनवर अवलंबून ठराविक दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि नंतरच्या दोन्ही खर्चांसाठी प्रतिपूर्ती मिळवू शकतो / शकते. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे दाव्यांच्या जलद आणि कार्यक्षमतेने निपटारा करण्याचे आश्वासन देण्यात येते. प्रत्येक दावा-मुक्त वर्षाच्या शेवटी, मूळ विम्याच्या रकमेवर शून्य अतिरिक्त खर्चावर संचयी बोनस देऊ केला जातो. याद्वारे काही योजनांतर्गत मोफत वार्षिक आरोग्य तपासणी सुविधा देखील देऊ केली जाते. शिवाय, पॉलिसीधारकाला प्रीमियमवर बचत करण्यात मदत करण्यासाठी त्याद्वारे विविध सवलती देऊ केल्या जातात.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे तिच्या ग्राहकांना आठ प्रकारच्या आरोग्य विमा योजना देऊ केल्या जातात. त्यांच्यावर खाली एक दृष्टीक्षेप टाका:
-
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी ही एक लोकप्रिय आरोग्य योजना आहे, जी हॉस्पिटलायझेशन खर्च, रोबोटिक शस्त्रक्रिया, मानसिक आजार, आयुष उपचार, आपत्कालीन रुग्णवाहिका शुल्क, डे केअर उपचार इ. देऊ करते.व्यक्ती आणि कुटुंब दोघेही, ही पॉलिसी खरेदी करू शकतात, जी अधिक पर्यायांच्या लाभासह उपलब्ध आहे. खाली रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायद्यांवर एक दृष्टीक्षेप टाका:
- यामध्ये रु. 3,00,000 ते रु. 1,00,00,000 पर्यंतच्या विम्याची रक्कम आहे.
- तिच्याद्वारे अनुक्रमे 90 दिवस आणि 180 दिवसांपर्यंत हॉस्पिटलाइजेशनच्या ओगोदरच्या आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरच्या खर्चास कव्हर केले जाते.
- जर पॉलिसीधारकाने कोविड-19 साठी लसीकरण केले असेल, तर तिच्याद्वारे प्रीमियमवर 5% बचत देऊ केली जाते.
- ती जागतिक कव्हरेजच्या वैकल्पिक लाभासह उपलब्ध आहे.
- ती खोलीच्या भाड्यासाठी कोणत्याही उप-मर्यादेसह उपलब्ध नाही.
- तिच्याद्वारे ऑनलाइन सवलत, विद्यमान ग्राहक सवलत, कौटुंबिक सवलत आणि दीर्घकालीन पॉलिसी सवलत देखील देऊ केली जाते.
- ती 10% च्या ऐच्छिक को-पेमेंट पर्यायासह उपलब्ध आहे.
-
रिलायन्स हेल्थ गेन इन्शुरन्स प्लॅन द्वारे व्यक्तींना तसेच कुटुंबांना फ्लोटर आधारावर कव्हरेज देऊ केले जाते.हा दोन प्लॅन प्रकारात उपलब्ध आहे – प्लॅन अ आणि प्लॅन ब. याद्वारे हॉस्पिटलायझेशनचा खर्च, अवयव दात्याचा खर्च, आयुष उपचार,रोड अॅम्ब्युलन्स, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, आधुनिक उपचार, डे केअर उपचार इत्यादींसाठी कव्हरेज देऊ केले जाते. रिलायन्स हेल्थ गेन पॉलिसीची विविध वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- तिच्याद्वारे रु. 3,00,000 ते रु. 18,00,000 पर्यंतची विम्याची रक्कम देऊ केली जाते.प्लॅन अ अंतर्गत विम्याची रक्कम रु. 3,00,000 ते रु. 9,00,000 आणि प्लॅन ब च्या विम्याची रक्कम रु. 12,00,000 ते रु. 18,00,000 आहे.
- तिच्याद्वारे एकट्या स्वतंत्र स्त्री किंवा मुलीसाठी 5% विशेष सवलत देऊ केली जाते.
- 1,00,000 रुपयांचे नो क्लेम रिन्युअलसाठी अपघाती मृत्यू कव्हर, फक्त प्लॅन ब अंतर्गत उपलब्ध आहे.
- जर पॉलिसीधारकाने विम्याची रक्कम पूर्णपणे संपविली असेल, तर तिच्याद्वारे मूळ विम्याची रक्कम 100% पुनर्स्थापित (रीइन्स्टेट) केली जाते.
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 3,00,000 रुपयांच्या विम्याचे कव्हर मिळू शकते.
- विमाधारकास नावाच्या गंभीर आजाराचे निदान झाल्यास, योजना आपोआप एक वर्षाने मोफत वाढविली जाते.
- अगदी जवळच्या आणि विस्तारित कुटुंबाच्या सदस्यांना पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाऊ शकते
- तिच्याद्वारे सध्याच्या ग्राहकांना सवलत आणि दीर्घकालीन पॉलिसी सूट देखील देऊ केली जाते.
- ती ईएमआय प्रीमियम पेमेंटच्या पर्यायासह उपलब्ध आहे.
- तिच्याद्वारे पॉलिसीचे आयुष्यभराचे नूतनीकरण देऊ केले जाते.
-
रिलायन्स आरोग्य संजीवनी पॉलिसी ही, व्यक्ती आणि कुटुंबांना IRDAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार देऊ केलेली एक मानक आरोग्य योजना आहे. या स्वस्त आरोग्य पॉलिसीद्वारे डे केअर प्रक्रिया, हॉस्पिटलायझेशन खर्च, आधुनिक उपचार, आयुष उपचार, मोतीबिंदू उपचार इत्यादींसाठी कव्हरेज देऊ केले जाते. खाली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे तपासा:
- ही रु. 1,00,000 ते रु. 10,00,000 पर्यंतच्या विम्याच्या रक्कमेसह उपलब्ध आहे.
- तिच्याद्वारे 30 दिवस आणि 60 दिवसांपर्यंत हॉस्पिटलायझेशनच्या अगोदरचा आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरचा खर्च समाविष्ट आहे
- तिच्याद्वारे प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी 50% पर्यंत 5% संचयी बोनस देऊ केले जाते.
- 50 वर्षांपर्यंतच्या अर्जदारांसाठी पॉलिसीपूर्व कोणतीही वैद्यकीय तपासणी नाही
- तिच्याद्वारे विद्यमान ग्राहकांना सवलत, कौटुंबिक सवलत आणि स्थायी सूचना सवलत देऊ केली जाते.
-
रिलायन्स कोरोना कवच पॉलिसी ही एक परवडणारी नुकसानभरपाई पॉलिसी आहे, जी कोविड-19 च्या हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हरेज देऊ करते.तिच्याद्वारे इन्डिव्हिज्युअल आणि फ्लोटर कव्हरेज देऊ केले जाते आणि होम केअर उपचार आणि आयुष उपचारांचा खर्च देखील कव्हर केला जातो.रिलायन्स कोरोना कवच पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- ती रु. 50,000 ते रु. 5,00,000 पर्यंतच्या विम्याच्या रकमेसाठी उपलब्ध आहे.
- तिच्याद्वारे 1 दिवस ते 25 वर्षांपर्यंतच्या मुलांना कव्हर केले जाते.
- 15 दिवस आणि 30 दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशनच्या अगोदरच्या आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरच्या खर्चास कव्हर केले जाते
- तिच्याद्वारे पीपीई किट, हातमोजे, मास्क इत्यादी उपभोग्य वस्तूंवरील खर्चास कव्हर केले जाते.
- तिच्याद्वारे विम्याच्या रकमेच्या 0.5% च्या उप-मर्यादेसह अॅड-ऑन कव्हर म्हणून, हॉस्पिटल डेली कॅश देऊ केला जातो.
- पॉलिसीपूर्व कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही
- ही पॉलिसी 3.5 महिने, 6.5 महिने आणि 5 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.
-
रिलायन्स कोरोना रक्षक पॉलिसी ही एक सानुकूलित पॉलिसी आहे, जी कोविड-19 च्या उपचारांमुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाची भरपाई करण्यासाठी एकरकमी लाभ देऊ करते. ही योजना वैयक्तिक आधारावर उपलब्ध आहे आणि त्यासाठी सरकारी-अधिकृत रुग्णालयात किमान 72 तास सतत हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे.खाली रिलायन्स कोरोना रक्षक पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे पहा:
- तिच्याद्वारे रु. 50,000 ते रु. 2,50,000 पर्यंतची विमा रक्कम देऊ केली जाते.
- ती 5 महिने, 6.5 महिने आणि 9.5 महिन्यांच्या पॉलिसी कालावधीसाठी उपलब्ध आहे.
- पॉलिसीपूर्व कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही
-
रिलायन्स पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे विमाधारकास अपघात झाल्यास भरपाई देऊ केली जाते. तिच्याद्वारे विमाधारकास अपघाती मृत्यू, कायमचे संपूर्ण अपंगत्व यापासून कव्हर देऊ केले जाते आणि बालशिक्षण लाभ देखील देऊ केला जातो. खाली रिलायन्स वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे तपासा:
- ही रु. 5,00,000 ते रु. 20,00,000 पर्यंतच्या विम्याच्या रक्कमेसह उपलब्ध आहे.
- या पॉलिसीद्वारे वैयक्तिक आधारावर संपूर्ण कुटुंबाला कव्हर केले जाऊ शकते.
- तिच्याद्वारे जगभरातील कव्हरेज देऊ केले जाते.
- ही वैद्यकीय खर्च कव्हर मिळविण्याच्या पर्यायासह उपलब्ध आहे.
- तिच्याद्वारे प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी 50% पर्यंत संचयी बोनस देऊ केला जातो.
-
रिलायन्स हेल्थवाइज पॉलिसी ही, एक सर्वसमावेशक पॉलिसी आहे, जी संपूर्ण कुटुंबाला परवडणाऱ्या प्रीमियममध्ये कव्हरेज देऊ करते. तिच्याद्वारे हॉस्पिटलायझेशनचा खर्च, डे केअर उपचार, अवयव दात्याचा खर्च,डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन इत्यादींसाठी कव्हरेज देऊ केले जाते.खाली रिलायन्स हेल्थवाइज पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे पहा:
- तिच्याद्वारे रु. 1,00,000 ते रु 5,00,000 च्या दरम्यानची विम्याची रक्कम देऊ केली जाते.
- तिच्याद्वारे हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वीचा आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरचा अनुक्रमे 60 दिवस आणि 90 दिवसांच्या खर्चास कव्हर केले जाते.
- तिच्याद्वारे गंभीर आजार आणि आधुनिक उपचारांसाठी कव्हरेज देखील देऊ केले जाते.
- ती स्थानिक दैनंदिन हॉस्पिटलायझेशन भत्ता, रोड अॅम्ब्युलन्स सेवा, पुनर्प्राप्ती लाभ इत्यादींसह मानार्थ फायद्यांसह उपलब्ध आहे.
- तिच्याद्वारे मुलीसाठी प्रीमियमवर 7% बचत देऊ केली जाते.
-
रिलायन्स क्रिटिकल इलनेस पॉलिसीद्वारे गंभीर आजाराच्या उपचार खर्चाला सामोरे जाण्यासाठी आर्थिक कव्हरेज देऊ केले जाते. कॅन्सर, किडनी फेल्युअर, थर्ड डिग्री बर्न्स इ. सारख्या 10 गंभीर आणि जीवनशैली रोगांपासून विमाधारकास कव्हर करण्यासाठी या पॉलिसीद्वारे एकरकमी लाभ प्रदान देऊ केला जातो. रिलायन्स क्रिटिकल इलनेस पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- ती रु. 5,00,000 ते रु. 10,00,000 पर्यंतच्या विम्याच्या रक्कमेसह उपलब्ध आहे.
- विम्याची रक्कम वैयक्तिक आधारावर उपलब्ध आहे.
- तिच्यासाठी 45 वर्षांपर्यंतच्या अर्जदारांसाठी पॉलिसीपूर्व कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
- तिच्याद्वारे प्रत्येक दावा-मुक्त पॉलिसी नूतनीकरणासाठी कमाल 50% चा नो क्लेम बोनस देऊ केला जातो.
*सर्व बचत, IRDAIद्वारे मंजूर विमा योजनेनुसार विमा कंपनीद्वारे देऊ केली जाते. मानक नियम आणि अटी लागू.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कव्हरेज:
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅनद्वारे देऊ केलेल्या विविध कव्हरेजवर खाली एक झटपट दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे:
- हॉस्पिटलायझेशनचा खर्च- रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे रुग्ण सलग 24 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास हॉस्पिटलायझेशनच्या खर्चास कव्हर केले जाते.
- डे केअर ट्रीटमेंट- ते शस्त्रक्रिया / प्रक्रियेसाठी अशा डे केअर उपचारांचा खर्च कव्हर करतात, जेथे प्रगत तंत्रज्ञानामुळे विमाधारकाला 24 तासांपेक्षा कमी रुग्णालयात दाखल करावे लागते.
- हॉस्पिटलाइजेशनच्या पूर्वीचा खर्च- हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या खर्चाचे कव्हरेज, या योजनांमध्ये निर्दिष्ट दिवसांच्या संख्येपर्यंत हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वी झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी देखील दिले जाते.
- हॉस्पिटलाइजेशनच्या नंतरचा खर्च- बहुतेक रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे निर्दिष्ट दिवसांपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झालेला वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
- अवयव दात्याचा खर्च- यापैकी बहुतेक योजनांमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत अवयव दात्याच्या खर्चाला कव्हर केले जाते.
- निवासी हॉस्पिटलायझेशन- विमाधारकाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठराविक संख्येपेक्षा जास्त दिवस उपचारांची आवश्यकता असल्यास, या योजनेद्वारे डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरेज देखील देऊ केले जाते.
- आयुष उपचार – योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी यासह आयुष स्कूल ऑफ मेडिसिनद्वारे उपचार घेण्याच्या खर्चास कव्हर केले जाते.
- रोड अॅम्ब्युलन्स शुल्क- ते वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी अॅम्ब्युलन्स सेवा वापरण्यासाठी विमाधारकासा लागलेल्या शुल्कासाठी पैसे देतात.
- आधुनिक उपचार- अनेक रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे आधुनिक उपचारांचा खर्च कव्हर केला जातो जसे की, स्टेम सेल थेरपी, ओरल केमोथेरपी, रोबोटिक शस्त्रक्रिया इ.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अंतर्गत वगळण्यात येणाऱ्या बाबी
खाली रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या वगळण्यात येणाऱ्या बाबींवर एक दृष्टीक्षेप टाका:
- प्लॅन सुरू होण्याच्या दिवसाच्या पहिल्या 30 दिवसांच्या आत कोणत्याही वैद्यकीय खर्चासाठी केलेले कोणतेही दावे अपघातामुळे उद्भवले नसल्यास, त्यांना कव्हर केले जाणार नाहीत.
- काही विशिष्ट आजार किंवा शस्त्रक्रियांसाठी पॉलिसी सुरू होण्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो, जसे की संधिवात (गैर-संसर्गजन्य), ऑस्टियोआर्थरायटिस सर्व कशेरुकाचे विकार, संयुक्त बदली शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, अंतर्गत ट्यूमर, किडनी स्टोन / युरेटरिक स्टोन / लिथोट्रिप्सी / गॉल मूत्राशय दगड इ.
- जाणूनबुजून स्वत: ची दुखापत
- अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली झालेली जखम
- HIV/AIDSकिंवा एसटीडी
- जन्मजात रोग
- मातृत्व किंवा प्रजनन क्षमते-संबंधित परिस्थिती
- चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स आणि श्रवणयंत्रांवरील खर्च
- दंत उपचार किंवा शस्त्रक्रिया
- कॉस्मेटिक किंवा सौंदर्याचा उपचार
- नॉन-अॅलोपॅथी उपचार
- स्वयं-औषोधोपचार
- अप्रमाणित उपचार
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स क्लेम फाइल करण्यासाठीच्या पायऱ्या
डॉक्टरांनी हॉस्पिटलायझेशनचा सल्ला देताच, पॉलिसीधारकाने त्याबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला कळवले पाहिजे. पॉलिसीधारक एकतर विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलना भेट देऊन कॅशलेस क्लेम करू शकतो / शकते किंवा नॉन-नेटवर्क हॉस्पिटलला भेट देऊन प्रतिपूर्तीचा दावा करू शकतो / शकते.रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत दावा दाखल करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
दाव्याची सूचना:
विमा कंपनीला दाव्याची माहिती देताना तयार ठेवायची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- पॉलिसी क्रमांक
- विमाधारक / दावेदाराचा संपर्क तपशील (फोन क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता, )
- ज्यास / जिला रुग्णालयात दाखल केले गेले आहे, त्या विमाधारक / दावेदाराचे नाव
- ज्यास / जिला रुग्णालयात दाखल केले गेले आहे, त्याच्याशी / तिच्याशी विमाधारकाचे नाते
- रुग्णालयाचे नाव
- आजाराचे स्वरूप
- अपघाताचे स्वरूप (अपघाताच्या प्रकरणांसाठी)
- अपघाताचा दिनांक आणि वेळ (अपघाताच्या प्रकरणांसाठी)
- अपघाताचे ठिकाण (अपघाताच्या प्रकरणांसाठी)
- आजाराच्या लक्षणांच्या सुरुवातीचा दिनांक
कॅशलेस सुविधेसाठी दावयाची प्रक्रिया:
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अंतर्गत कॅशलेस क्लेम दाखल करण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा
- रुग्णालयामध्ये रिलायन्स हेल्थ कार्ड दाखवा
- हॉस्पिटलमधील थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर (टीपीए) डेस्कवर उपलब्ध असलेला "कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म" भरा
- हॉस्पिटलमध्ये जाताना रिलायन्स हेल्थ कार्डच्या प्रतीसह भरलेला प्री-ऑथरायझेशन फॉर्म टीपीएकडे सादर करा (फोटो आयडी कार्ड जवळ बाळगण्याचे लक्षात ठेवा)
- रुग्णालयाद्वारे आरकेअर हेल्थला प्री-ऑथोरायझेशन फॉर्म पाठवला जातो आणि त्यांच्या अधिकृततेची प्रतीक्षा केली जाते.
- अधिकृतता मिळाल्यानंतर रुग्णालयात उपचार घ्या
- विमाधारकाने / दावेदाराने डिस्चार्ज घेताना सर्व बिलांची पडताळणी करून त्यावर स्वाक्षरी करावी.
- या कागदपत्रांची प्रत रेकॉर्डसाठी ठेवल्यानंतर, मूळ हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश, तपास अहवाल आणि इतर कागदपत्रे हॉस्पिटलमध्ये राहू द्या
प्रतिपूर्तीच्या सुविधेसह रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सची दावा प्रक्रिया:
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत प्रतिपूर्ती दावा दाखल करण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत:
- हॉस्पिटलायझेशनबद्दल आरकेअरहेल्थला सूचना द्या
- नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा आणि उपचार घ्या
- रुग्णालयाच्या बिलाची संपूर्ण रक्कम भरा
- रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना सर्व मूळ रुग्णालयाची बिले, वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासणी अहवाल गोळा करा
- रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत दाव्यांची प्रक्रिया करण्यासाठी ट्रायकेअर हेल्थ क्लेम फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे सादर करा.
- टीमद्वारे कागदपत्रांची पाहणी केली जाईल आणि दावा निकाली काढला जाईल.
रिलायन्स जनरल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्ससाठी अर्ज कसा करावा?
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे देऊ केलेल्या आरोग्य विमा योजना अनेक माध्यमातून लागू केल्या जाऊ शकतात. रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याच्या पायऱ्यांवर एक दृष्टीक्षेप टाका:
ऑनलाइन प्रक्रिया:
पॉलिसीबाजार डॉट कॉमवर लोक रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकतात. पॉलिसी खरेदी करण्यासाठी ते कंपनीच्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात. रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- पॉलिसीबाजार इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटला भेट द्या
- 'हेल्थ इन्श्युरन्स'च्या चिन्हावर जा
- विमा उतरवल्या जाणार्या लोकांशी संबंधित तपशील भरा, जसे की वय, वैद्यकीय इतिहास इ.
- संपर्काचा तपशील पुरवा
- खरेदी करावयाचा रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडा
- निवडलेल्या योजनेसाठी प्रीमियम भरा
- यशस्वीरित्या पेमेंट झाल्यावर पॉलिसी जारी केली जाईल.
पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने वेगवेगळ्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स ची तुलना करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, ते care@policybazaar.com ला लिहू शकतात.
ऑफलाइन प्रक्रिया:
एखादी व्यक्ती खालील पद्धती वापरून रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकते:
- व्यक्ती, पॉलिसीबाझार इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्री हेल्पलाइन नंबर 1800-208-8787 वर कॉल करू शकतात आणि पॉलिसी खरेदी करण्यासाठी ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलू शकतात.
- ते वेबसाइटवर त्यांचे नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाकू शकतात आणि कॉलबॅकची विनंती करू शकतात.
- ग्राहक रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या शाखेला भेट देऊ शकतात किंवा योजना खरेदी करण्यासाठी विमा एजंटशी संपर्क साधू शकतात.
*सर्व बचत, IRDAIद्वारे मंजूर विमा योजनेनुसार विमा कंपनीद्वारे देऊ केली जाते. मानक नियम आणि अटी लागू.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स - वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
उत्तर: रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम खालील पद्धतींद्वारे भरला जाऊ शकतो:
- क्रेडीट कार्ड
- डेबिट कार्ड
- नेट बँकिंग
-
उत्तर: तुम्ही ज्या वेबसाइटवरून पॉलिसी खरेदी केली आहे त्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही पॉलिसीचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. तुमच्या वापरकर्तानाव आणि पासवर्डने लॉग इन करा आणि तुमच्या रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स योजनेचे स्टेटस तपासा.
-
उत्तर: पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण अगदी सोपे आहे. पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण करण्याच्या पर्यायावर जा आणि तुमचा वर्तमान पॉलिसी क्रमांक ई-मेल पत्ता किंवा संपर्क तपशील पुरवा. तुमच्या योजनेच्या तपशीलाचा आढावा घ्या आणि तुम्हाला पॉलिसीचे नूतनीकरण करायचे असल्यास प्रीमियमची रक्कम भरा.तुम्ही प्रीमियम भरताच, तुमच्या पॉलिसीचे नूतनीकरण केले जाईल.
-
उत्तर: पॉलिसीधारकाद्वारे आरकेअर हेल्थला खालील कागदपत्रे सादर करून रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स प्रतिपूर्तीचा दावा केला जाऊ शकतो:
- रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सचा रीतसर भरलेला क्लेम फॉर्म
- हेल्थ कार्डची प्रत
- विमाधारकाच्या ओळखपत्राची आणि पॉलिसीधारकाच्या पॅन कार्डची प्रत
- डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि उपचाराची कागदपत्रे
- तपास अहवाल
- एफआयआरची प्रत (अपघाताच्या प्रकरणांसाठी)
- रूग्णालयाचे मूळ डिस्चार्ज कार्ड
- रुग्णालयाची मुळे बिले आणि पेमेंटच्या पावत्या
- कँसल्ड चेक
- रूग्णालयात दाखल होण्यास प्रतिबंध करणारी रुग्णाची स्थिती सांगणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्र
-
उत्तर: रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी रद्द करण्यासाठी, भरलेल्या सरेंडर फॉर्मसह पॉलिसीची कागदपत्रे विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत सादर करा. तुम्ही विमा प्रदात्याला पॉलिसी रद्द करण्याची विनंती करणारा ईमेल देखील लिहू शकता. प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर केल्यावर, प्रीमियम परतावा थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल आणि पॉलिसी रद्द केली जाईल.रद्दीकरण शुल्क भरणे टाळण्यासाठी तुमची पॉलिसी फ्री-लूक कालावधीत रद्द करण्याचा प्रयत्न करा.