बजाज अलियान्झ मेडिकल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हा, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि अलियान्झ एसई यांच्या दरम्यानचा एक संयुक्त उपक्रम आहे. जागतिक दर्जाची उत्पादने, कार्यक्षम सेवा आणि विक्री-पश्चात ससहाय्याच्या माध्यमातून ही कंपनी विमा बाजारपेठेत आघाडीवर आहे. तिच्याकडे जीवन विमा आणि सामान्य विमा या श्रेणींमध्ये विमा उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे. आरोग्य विम्याच्या बाबतीतही, कंपनीद्वारे व्यक्तीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या उत्पादनांची श्रेणी देऊ केली जाते. बजाज अलियान्झ मेडिकल इन्शुरन्सद्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही आरोग्य विमा योजना देऊ केल्या जातात.
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स का खरेदी करावेत?
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा आणि वैद्यकीय उपचार देऊ करते, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता. या आरोग्य विमा पॉलिसीद्वारे ही बाब सुनिश्चित केली जाते की तुमचे कुटुंब आणि तुम्हाला, तुम्ही निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळेल. या विमा कंपनीचे देशभरात 5000+ रुग्णालयांचे विस्तृत नेटवर्क आहे. बजाज अलियान्झच्या आरोग्य विमा योजनांच्या विस्तृत श्रेणीद्वारे आधुनिक युगात औषधांच्या वाढत्या किंमतीपासून तुमचे संरक्षण केले जाते.
त्यांच्या परवडणाऱ्या आरोग्य योजना आणि 98% च्या उच्च बजाज अलियान्झ हेल्थ क्लेम सेटलमेंट रेशोमुळे, कमी किमतीत सर्वाधिक कव्हरेज शोधणाऱ्या प्रत्येकासाठी या योजना सर्वात स्पष्ट पर्याय आहेत. या पॉलिसींद्वारे, कलम 80डी अंतर्गत कर लाभासह व्यक्ती, कुटुंब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज देऊ केले जाते.
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी ला आरोग्य विमा उद्योगातील अग्रेसर म्हटले जाते, कारण ती त्यांच्या ग्राहकांना कंपनीकडून विमा योजना खरेदी करताना थोडासा अतिरिक्त लाभ देते. खाली बजाज अलियान्झ आरोग्य विमा योजना खरेदी करण्याचे फायदे नमूद केलेले आहेत:
कॅशलेस दाव्यांच्या बाबतीत, कंपनीला सादर केलेले दावे 1 तासाच्या आत मंजूर केले जातात.
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने देशभरात 4000+ रुग्णालये आणि 1200+ डायग्नोस्टिक क्लिनिकशी करार केला आहे.
दावे निकाली काढण्यासाठी 24*7 कॉल सहाय्याची सुविधा आहे.
बजाज अलियान्झद्वारे ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देऊ केली जाते, ज्यामुळे औषधे, ओपीडी खर्च इत्यादींवर 30% पर्यंत बचत होते. मूल्यवर्धित सेवांच्या यादीमध्ये निवडक आउटलेटवर ओपीडी सवलत, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, वेलनेस चाचण्या, फार्मसी आणि काही निवडक आउटलेटवर आकर्षक आरोग्याशी संबंधित ऑफर यांचा समावेश आहे.
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्स - पुरस्कार आणि मान्यता:
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्सने गेल्या काही वर्षांत काही पुरस्कार पटकावले आहेत.
2019
आशिया इन्श्युरन्स टेक्नोलॉजी अवार्ड
विमा आढावा आणि सीलेंट
पीपल मॅटर्स बेस्ट रिक्रूटमेंट टेक्नॉलॉजी अँड अॅनालिटिक्स अवॉर्ड
पीपल मॅटर्स टॅलेंट एॅक्विझीशन
मार्केटर ऑफ द इयर
Tइन्शुरन्स इंडिया समिट अँड अवॉर्ड्स 2019
मनी टुडे अवॉर्ड्
N/A
2018
फिनोविटी अवॉर्ड्
बँकिंग फ्रंटियर्स
डेल कार्नेगी ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड
डेल कार्नेगी अँड असोसिएट्स
डेल कार्नेगी ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड
एशिया इन्श्युरन्स इंडस्ट्री अवार्ड्स 2018
मोस्ट ट्रस्टेड ग्लोबल ब्रँड 2018
हेराल्ड ग्लोबल अँड बीएआरसी एशिया
डिस्ट्रीब्यूटर ऑफ द यीअर
ईटी नाऊ
जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ द इयर
सिनेक्स ग्रुप
2017
नॉन-लाइफ इन्शुरर ऑफ द इयर अवॉर्ड
आउटलुक मनी अवॉर्ड्स 2017
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्सद्वारे देऊ करण्यात येणाऱ्या पॉलिसींची यादी:
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही योजना देऊ केल्या जातात.
बजाज हेल्थ गार्ड फॅमिली फ्लोटर ऑप्शन प्लॅन, जो संपूर्ण कुटुंबाच्या कव्हरेजसाठी स्वतःला, पती/पत्नी, मुले आणि आश्रित पालकांच्या संरक्षणासाठी घेतला जाऊ शकतो.
योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
अनुक्रमे 60 आणि 90 दिवसांसाठी रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च समाविष्ट आहे.
आपत्कालीन अॅम्ब्युलन्सचे शुल्क समाविष्ट आहे.
इन-हाउस हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीमची उपलब्धता.
4 दावा-मुक्त वर्षांच्या ब्लॉकनंतर प्रस्तावक आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय तपासणी.
बजाज अलियान्झ एक्स्ट्रा केअर हेल्थ प्लॅन, जो सध्याच्या आरोग्य योजनेमध्ये कमी किमतीत प्रदान केलेल्या कव्हरेजच्या पलीकडे कव्हरेज वाढवण्यासाठी खरेदी केली जाऊ शकतो.
वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:
या बजाज अलियान्झ हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनद्वारे कमी प्रीमियमवर कव्हरेज रकमेच्या विस्ताराची तरतूद केली जाते.
हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
अनुक्रमे 60 आणि 90 दिवसांसाठी रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च समाविष्ट आहे.
आपत्कालीन अॅम्ब्युलन्सचे शुल्क समाविष्ट आहे.
वयाच्या 55 वर्षापर्यंत कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची गरज नाही.
दाव्यांच्या बाबतीत, योजनेमध्ये विहित केलेल्या वजावटीच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम, बजाज हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे भरली जाते.
पात्रता
18-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहेत. जर दोन्ही पालकांनी कव्हर केले असेल किंवा 6-18 वर्षे दोन्ही पालक कंपनीत समाविष्ट असतील, तर मुलांच्या बाबतीत, वयोमर्यादा 3 महिने ते 5 वर्षे आहे. 18-25 वर्षे वयोगटातील मुले प्रस्तावक किंवा आश्रित म्हणून काम करू शकतात.
बजाज अलियान्झ प्रीमियम पर्सनल गार्ड पॉलिसी, जी त्याच्या विमा उतरवलेल्या कुटुंबाच्या प्रस्तावकाला झालेल्या कोणत्याही अपघातामुळे उद्भवलेल्या खर्चाचा समावेश करते.
वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:
बजाज अलियान्झ प्रीमियम पर्सनल गार्ड पॉलिसीमध्ये कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमचे आंशिक अपंगत्व, तात्पुरते एकूण अपंगत्व आणि अपघातामुळे मृत्यू यांना कव्हर केले जाते.
बजाज हेल्थ प्लॅनमध्ये हॉस्पिटलमधील मुक्कामासाठी भत्ता आणि अपघाती हॉस्पिटलायझेशन खर्चाची तरतूद आहे.
कंपनीचे संपूर्ण भारतातील 4000 हून अधिक रुग्णालये आणि 1200 डायग्नोस्टिक क्लिनिकशी टाय-अप आहे आणि ती मूल्यवर्धित सेवा देखील प्रदान करते.
इन-हाउस हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीमची उपलब्धता.
कमाल 50% पर्यंत, 10% संचयी नो क्लेम बोनस.
पात्रता
18-65 वर्षे वयोगटातील प्रस्तावक किंवा जोडीदार आणि 5 ते 21 वर्षे वयोगटातील आश्रित मुले यांना या योजनेत कव्हर केले जाऊ शकते.
बजाज अलियान्झचा क्रिटिकल इलनेस हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन पूर्व-निर्धारित गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी विशेषत: निर्माण केलेला आहे, जिथे प्रस्तावकर्त्याला योजनेच्या कक्षेत समाविष्ट असलेल्या आजाराचे निदान झाल्यास त्वरित एकरकमी रक्कम दिली जाते.
या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
जेव्हा विमाधारकाचे या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या गंभीर आजाराचे निदान होते आणि निदानानंतर तो / ती किमान 30 दिवस जिवंत राहतो / राहते, तेव्हा त्याला / तिला एकरकमी रक्कम दिली जाते
दात्याचा खर्च देखील कव्हर केला जातो.
विम्याची रक्कम 1 लाख ते 50 लाखांपर्यंत असते.
योजनेंतर्गत समाविष्ट आजारांमध्ये कर्करोग, कोरोनरी धमनी बायपास शस्त्रक्रिया, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा पहिला झटका, मुख्य अवयव प्रत्यारोपण, स्ट्रोक, महाधमनी कलम शस्त्रक्रिया, प्राथमिक फुफ्फुसाचा धमनी उच्च रक्तदाब, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि अंगांचा कायमचा अर्धांगवायू यांचा समावेश आहे.
इन-हाउस हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीमची उपलब्धता.
पात्रता
6-65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात
बजाज अलियान्झ हॉस्पिटल कॅश डेली अलाऊन्स प्लॅन, ज्याद्वारे कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी, जितके दिवस विमाधारक रुग्णालयात दाखल होतो / होते तितके दिवस, दररोज विशिष्ट रकमेची तरतूद केली जाते.
या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
प्रस्तावकांनी निवडल्यानुसार प्रतिदिन कव्हरेज रक्कम रु. 500 ते रु. 2500 पर्यंत असते.
कव्हरेज 30 दिवस किंवा 60 दिवसांसाठी घेतले जाऊ शकते.
या योजनेत स्वत:, जोडीदार आणि अवलंबून असलेल्या मुलांचा समावेश आहे.
बजाज अलियान्झ स्टार पॅकेज हेल्थ प्लॅन, ज्यामध्ये वैद्यकीय आकस्मिकता आणि इतर आकस्मिकता या सर्व बाबींचा समावेश आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
बजाज अलियान्झ स्टार हेल्थ योजनेस, एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी म्हणून जारी केली जाते
या योजनेत संपूर्ण कव्हरेजच्या 8 विभागांची तरतूद आहे, ज्यात खालील विभाग समाविष्ट आहेत:
1) हेल्थ गार्ड, जे गंभीर अपघात आणि आजारांपासून कुटुंबाला कव्हर देते. 2) हॉस्पिटल कॅश, जे भरती झाल्यास दैनंदिन रोख रक्कम उपलब्ध करून देते. 3) क्रिटीकल इलनेस, जे गंभीर आजाराचे निदान झाल्यास एकरकमी रक्कम देते. 4) पर्सनल अॅक्सिडेंट, जे अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी कव्हर देते. 5) एज्युकेशन ग्रांट, जे विमाधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास, मुलाच्या शिक्षणासाठी एकरकमी रक्कम देते. 6) हाउसहोल्ड कंटेंट, जे चोरी किंवा दरोडे विरुद्ध घरगुती वस्तू कव्हर देते. 7) ट्रॅव्हलिंग बॅगेज, जे प्रवास करताना, सामानास कव्हर करते. 8) पब्लिक लायबिलीटी, जे शारीरिक दुखापत किंवा मृत्यू विरुद्ध तृतीय पक्षाची कायदेशीर जबाबदारी कव्हर करते.
पात्रता
जर दोन्ही पालक कंपनीच्या अंतर्गत समाविष्ट असतील, तर 18-45 वर्षे वयोगटातील स्व-प्रस्तावकांना कव्हर केले जाते आणि 3 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश केला जाऊ शकतो किंवा जर एक पालक समाविष्ट असेल, तर 6 वर्षे ते 25 वर्षे वयोगटातील मुलांना बजाज स्टार पॅकेज हेल्थ पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाऊ शकते.
या बजाज हेल्थ इन्श्युरन्स विम्याद्वारे 8 महिला विशिष्ट गंभीर आजार विम्यासाठी कव्हर दिले जाते, ज्यात गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, योनिमार्गाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा / एंडोमेट्रियल कर्करोग, बर्न्स, फॅलोपियन ट्यूब कर्करोग आणि अर्धांगवायू किंवा मल्टी-ट्रॉमा यांचा समावेश आहे.
या योजनेद्वारे जन्मजात अपंगत्वाच्या बाबतीत, विम्याच्या रक्कमेच्या 50% लाभाची तरतूद आहे
मुलांच्या शिक्षणासाठी बोनस आणि नोकरीच्या नुकसानीसाठी कव्हरेज देखील या योजनेद्वारे प्रदान केले जाते.
बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून, प्रीमियमची ऑनलाइन गणना करणे सोपे आहे. ऑनलाइन कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला फक्त अर्जदाराचे वय, पॉलिसीचा प्रकार, कव्हरेज, कार्यकाळ, विमा रक्कम इ.माहिती प्रविष्ट करावी लागते. विमा कंपनीच्या साइटवर तसेच पॉलिसीबाजार डॉट कॉम वर प्रीमियमची गणना करणे शक्य आहे. हे तुमचा वेळ, प्रयत्न वाचवते आणि तुमच्या प्रीमियम गणनेत अचूकता आणते.
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे कंपनीच्या आरोग्य विमा योजना खरेदी करू इच्छिणाऱ्या संभाव्य व्यक्तींना आरोग्य विमा प्रीमियम मोजण्याची सुविधा देऊ केली जाते. कंपनीच्या कॅल्क्युलेटरचा वापर करून प्रीमियमची गणना केल्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
‘अ’ ला स्वतःसाठी 4 लाख रुपयांच्या हेल्थ गार्ड इन्डिव्हिज्यूअल पॉलिसीसाठी अर्ज करायचा आहे. त्याचे वय 30 वर्षआहे आणि नमूद केलेल्या कव्हरेजसाठी, वार्षिक प्रीमियमची रक्कम रु. 5130 आहे.
‘ब’ ला स्वतःसाठी आणि नवविवाहित पत्नीसाठी एक योजना खरेदी करायची आहे. तो स्वत:ला आणि त्याच्या जोडीदाराला 5 लाख रुपयांमध्ये कव्हर करण्याचा प्रस्ताव घेऊन बजाज अलियान्झकडे जातो. ‘ब’ चे वय 32 वर्षे आहे आणि त्याच्या पत्नीचे वय 30 वर्षे आहे. त्यांच्या आरोग्य विमा योजनांचा प्रीमियम रु. 9234 इतका येतो
40 वर्षांच्या ‘क’ या व्यक्तीला त्याच्या कुटुंबासाठी आरोग्य योजनेची आवश्यकता आहे, ज्यामध्ये तो स्वतः, त्याची 38 वर्षे वयाची पत्नी आणि त्याची अनुक्रमे 7 आणि 12 वर्षे वयाची 2 मुले यांचा समावेश आहे. मागितलेले कव्हरेज रु. 10 लाख आहे ज्यासाठी प्रीमियम आकारला जातो रु. 21,826
टेबल, तात्काळ संदर्भासाठी, वरील डेटा सारणीबद्ध करतो:
उत्तर: सूचीबद्ध वापरकर्ते, त्यांच्या पॉलिसीच्या स्टेटसची ऑनलाइन पुष्टी करू शकतात. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या युनिक युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. अन्यथा, तुम्ही बजाज अलियान्झच्या वेबसाइटवरून ‘कस्टमर पोर्टल’ नावाचे विमा कंपनीचे मोबाइल अॅप डाउनलोड करू शकता आणि पॉलिसीचे तपशील टाकून, पॉलिसीचे स्टेटस तपासू शकता.
उत्तर: फक्त बजाज अलियान्झच्या वेबसाइटवर लॉग इन करा आणि आरोग्य विमा टॅबवर क्लिक करा. या टॅबमधील आरोग्य साधनांच्या पर्यायांतर्गत, तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल्सचा पर्याय मिळेल, जिथे तुम्ही सर्व सूचीबद्ध हॉस्पिटल्स पाहू शकता आणि तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता.
उत्तर: बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्सच्या ऑनलाइन नूतनीकरणासाठी खालील पायऱ्यांचे पालन केले पाहिजे:
पायरी 1: तुमच्या वापरकर्ता नाव आणि पासवर्डच्या मदतीने विमा कंपनीच्या ई-पोर्टलवर लॉग इन करा
पायरी 2: दिलेल्या तपशिलांच्या आधारे तुम्हाला नूतनीकरण करायची असलेली पॉलिसी निवडा आणि नूतनीकरण शुल्क भरण्यासाठी पेमेंटची पद्धत निवडा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग या पेमेंटच्या पद्धती उपलब्ध आहेत.
पायरी 3: रेकॉर्डसाठी प्रीमियमच्या पेमेंटचे किंवा नूतनीकरण पावतीचे प्रिंटआउट जतन करा किंवा जवळ ठेवा.
उत्तर: तुम्हाला तुमच्या पॉलिसी दस्तऐवजाची मूळ प्रत विमा, कंपनीच्या शाखा कार्यालयात योग्यरित्या भरलेल्या सरेंडर फॉर्मसह सादर करणे आवश्यक आहे. काही वेळात, पॉलिसी रद्द करणे पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या पॉलिसी प्रीमियमचा परतावा सुरू केला जाईल.
उत्तर: बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे बजाज अलियान्झ हेल्थ इन्शुरन्सच्या हॉस्पिटल नेटवर्कचा भाग असलेल्या हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देऊ केली जाते.
उत्तर: या कालावधीत हॉस्पिटलायझेशन झाल्यास, तुम्हाला फक्त त्याबद्दल विमा कंपनीला कळवावे लागेल आणि त्यांना तपशील द्यावा लागेल, जसे की तुमची मेंबरशिप आयडी, तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहात, त्याचे नाव, इ. पुढे, विमा कंपनी, हॉस्पिटलला कॅशलेस उपचार सुरू करण्यासाठी सूचना देईल.
उत्तर: तुमचे सदस्यत्व कार्ड हरवले असल्यास, तुम्हाला विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-5858 वर कॉल करणे आणि नुकसानाबद्दल त्वरित माहिती देणेआवश्यक आहे. सूचना दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत विमा कंपनी डुप्लिकेट मेंबरशिप कार्ड जारी करेल. तथापि, ते अतिरिक्त शुल्काच्या अधीन असेल.
6 जानेवारी, 2016: बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स नियमितपणे विमाला सोप्या शब्दांत स्पष्ट करण्यासाठी, गुगल+ वर सत्र आयोजित करत आहे. शसीकुमार आदिदामू, मुख्य तांत्रिक अधिकारी, नॉन-मोटर यांच्या मते, या गुगल+ हँगआऊट्सचे उद्दिष्ट हे, विम्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्रेक्षक / ग्राहक आणि उच्च व्यवस्थापन यांच्यातील निरोगी चर्चांना प्रोत्साहन देणे आहे. आतापर्यंत, विमा कंपनीने विविध विमा पॉलिसींचे महत्त्वाचे मुद्दे आणि स्थिर संरक्षणासाठी त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, हे स्पष्ट करण्यासाठी गुगल+ हँगआऊट्सवर 8 सत्रे आयोजित केली आहेत.
शशीकुमार पुढे म्हणाले की, कंपनीद्वारे ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसीधारकांना मोटर, प्रवास, आरोग्य आणि गृह विमा यासारख्या विमा उत्पादनांबद्दल शिक्षित करण्यासाठी मोहिमा आणि स्पर्धा चालविल्या जातात. कंपनीने विमा जागरुकता वाढवण्यासाठी 1 मिनिटांच्या विविध चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.