*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
Who would you like to insure?
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स ही भारतामधील अग्रगण्य विमा कंपनी असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला सर्वसमावेशक अश्या पॉलिसी मधून आर्थिक संरक्षण देऊ शकता. या विमा योजनेमधून भविष्यात अनपेक्षित पणे उद्भवणारे गंभीर आजार देखील कव्हर केले जातात. विमा धारकाला कॅशलेस सुविधेचा लाभ घेता यावा तसेच पूर्व नियोजित ट्रीटमेंट किंवा आपत्कालिन परिस्थितीत विम्याचा लाभ घेता यावा यासाठी ५००० पेक्षा अधिक हॉस्पिटल्स सोबत रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स जोडले गेलेले आहे. रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स मधून मिळणारा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जगभरातील कुठल्याही हॉस्पिटल मधून या विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनी त्यांचा इन्शुरेंस क्षेत्रातील अनुभव ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यासाठी वापरते. रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स तर्फे गृह, वाहन, व्यवसाय, प्रवास यांकरिता विमा योजना अत्यंत कमी प्रिमियम मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. कॅशलेस क्लेम सेटलमेंट करणारी सुरू करणारी रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स ही पहिली विमा कंपनी आहे. रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्सने हॉस्पिटलसाठी कॅश देण्याची नवीन संकल्पना मार्केट मध्ये रुजू केली तसेच अनेक संस्थासोबत मार्केट रिसर्च करण्यासाठी पुढाकार घेतला. रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीने सुरू केलेल्या विमा योजना सगळ्यांच्या आथिर्क परिस्थितीचा विचार करून तयार केलेल्या आहेत, त्यामुळेच त्या विमाधारकाना त्यांच्या कठीण काळात आर्थिक सहाय्य मिळते. रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार पॉलिसी घेऊ शकता.
महत्त्वाची वैशिष्ट्ये | ठळक मुद्दे |
नेटवर्क हॉस्पिटल्स | ५०००+ |
खर्च केलेल्या दाव्याचे प्रमाण | ६१ |
नूतनीकरणक्षमता | आयुष्यभर |
प्रतीक्षा कालावधी | ३ वर्षे |
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजना खालील समावेशांसह येतात :
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेअंतर्गत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यापूर्वी करण्यात येणारे उपचार, मेडिकल टेस्ट ह्यांचा खर्च दिला जातो तसेच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्या नंतर होणारा औषधांचा खर्च, मेडिकल टेस्ट साठी होणारा खर्च देखील दिला जातो.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनचे शुल्क देखील दिला जातो. विमा धारकाला वैद्यकीय उपचार घरी घेत असताना त्याचा खर्च ह्या पॉलिसी मार्फत दिला जातो.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत अवयव दात्याचा खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कडून रुग्णवाहिकेचा खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत दिला जातो, त्यामुळे विमा धारकाला हॉस्पिटल मधून स्थलांतरित करताना सहाय्य होते.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेमधून पुढील उपचारांसाठी होणारा खर्च दिला जात नाही :
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी सारख्या उपचारांचा खर्च समाविष्ट केला जात नाही परंतु अपघात झाल्यानंतर वैद्यकीय उपचारांचा एक भाग म्हणून केल्या जाणाऱ्या अश्या सर्जरीचा खर्च पॉलिसी द्वारे दिला जातो.
तुम्ही साहसी खेळांमध्ये भाग घेतल्याने तुम्हाला झालेल्या जखमा किंवा इजा आणि त्यांचा उपचार करण्यासाठी होणारा खर्च विमा कंपनी कडून कव्हर केला जात नाही.
वंध्यत्व किंवा गर्भधारणे संबंधित कराव्या लागणाऱ्या उपचारांचा खर्च रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत दिल्या जात नाही.
महत्वाची वैशिष्ट्ये:
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून मिळणाऱ्या विमा योजनेची वैशिष्ट्ये पुढील्प्रमाणे आहेत:
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स द्वारे विमाधारक एकच वेळी कुटुंबातील ६ सदस्यांचा समावेश पॉलिसी मध्ये समावेश करून कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करू शकतात.
रॉयल सुंदरम हेल्थ इनशुरन्स द्वारे दिल्या गेलेल्या विमा योजनेचे नूतनीकरण विमा धारक आयुष्यभर करू शकतो आणि रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्सचे फायदे मिळवू शकतात.
विमा धारकाला किंवा पॉलिसी मध्ये समावेश केलेली सदस्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यापूर्वीच्या उपचारांचा खर्च, वैद्यकीय चाचण्या, औषधे यांचा खर्च रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेतून दिला जातो तसेच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यानंतर होणारा खर्च म्हणजे औषधे, वैद्यकीय चाचण्या डॉक्टरांचा सल्ला यांचा खर्च देखील समाविष्ट केला आहे.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत पूर्व अस्तित्वातील आजार २ ते ४ वर्षांच्या कालावधीनंतर कव्हर केले जातात.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून ग्राहकांना त्यांच्या आरोग्य मुळे उद्भवलेल्या कठीण काळात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता विम कंपनीकडून काही अजून पॉलिसी दिल्या जातात. विमाधारकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार त्यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या विमा योजना पुढलीप्रमाने आहेत :
रॉयल सुंदरम फॅमिली प्लस हेल्थ इन्शुरन्स प्लॅन द्वारे तुम्ही एकाच वेळी कुटुंबातील १९ सदस्यांना सुरक्षित करू शकता. ही सर्वसमावेशक अशी असणारी ही पॉलिसी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये तुम्हाला अर्थिक अडचणींवर मात करण्यास उपयोगी पडू शकते.
रॉयल सुंदरम हॉस्पिटल रोख भत्ता योजना तुम्हाला बेसिक प्लॅन सोबत उपयोगी पडते. ह्या प्लॅन मधून हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या उपचारांच्या खर्चा बरोबरबरच इतर होणारे खर्च जसे की हॉस्पिटल मध्ये येण्यासाठी होणाऱ्या प्रवासाचा खर्च, पेशंट चे डाएट, पेशंट सोबत राहणाऱ्या व्यक्तीचा खर्च यांचा समावेश केला जातो.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॉलिसी घेऊ शकता किंवा कंपनीच्या जवळच्या शाखेत जाऊन तुम्ही पॉलिसी घेण्यासाठी अधिक माहिती मिळवू शकता. पॉलिसी विकत घेण्यासाठी तुम्ही रॉयल सुंदरम च्या एजंटद्वारे देखील पॉलिसी मध्ये गुंतवणूक करू शकता. पॉलिसी विकत घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता म्हणजेच पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी पुढील प्रमाणे पायऱ्या आहेत.
पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.policybazaar.com वर जा.
संकेतस्थळावरील आरोग्य विमा वेबपेज वर जा.
विविध आरोग्य विमा योजनांची तुलना करण्यासाठी इन्शुरन्स कॅल्क्युलटर वापरून तुमच्या गरजेनुसार विमा योजना निवडा.
तुमचे नाव, संपर्क क्रमांक , तुमचे वय, विमा योजनेचा प्रकार इत्यादी बेसिक महिती द्या.
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार इन्शुरन्स कॅल्क्युलटर वेगवेगळ्या विमा योजना सुचवेल.
रॉयल सुंदरम विमा योजने मधील जी विमा योजना तुमच्या आर्थिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल ती विमा योजना तुम्ही निवडा.
ऑनलाईन पॉलिसीचा प्रिमियम भरून तुम्ही तुमच्या पॉलिसीचा लाभ घ्या.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेचा लाभ तुम्हाला घेता यावा या करीता विमा योजना संपण्याच्या तारखेआधी रिन्यू करणे गरजेचे आहे. विमाधारकाने पॉलिसी वेळेवर रिन्यू न केल्यास रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कडून काही वाढीव दिवस अजून दिले जातात ज्यामध्ये पॉलिसीचे नुतनीकरण करता येऊ शकते.
ऑनलाईन पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमच्या आधीच्या पॉलिसीचा तपशील देऊन तुम्ही पॉलिसी सहज रिन्यू करू शकता. तसेच पॉलिसी बाजारच्या माध्यमातून देखील पॉलिसीची नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी पुढीलप्रमणे पायऱ्या आहेत.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी पुढील दोन पैकी एका पर्यायाचा वापर करू शकता.
कॅशलेस सेवेचा लाभ घेण्यासाठी विमा कंपनी ज्या हॉस्पिटल्स सोबत करारबध्द आहे अशाच ठिकाणी तुम्ही उपचार घेऊ शकता. रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनी ५००० हून अधिक हॉस्पिटल्स शी जोडले गेले आहेत त्यामुळे पूर्व नियोजित ट्रीटमेंट साठी किंवा आपत्कालिन परिस्थितीत कॅशलेस सेवा वरदान ठरते. कॅशलेस सेवेमध्ये विमाधारकाला पैशांची चिंता न करता व्यवस्थित उपचार घेता येतात. रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून हॉस्पिटल्सशी थेट संपर्क साधून हॉस्पिटलचा खर्च दिला जातो.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीला संपर्क साधण्यासाठी १८६०२५८००००, १८६०४२५०००० या नंबर वर कॉल करू शकता. तसेच customer.services@royalsundaram.in या ईमेल आयडी वर ईमेल द्वारे संपर्क करू शकता.
कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील पायऱ्या आहेत:
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स तर्फे भारताबाहेर देखील कॅशलेस सुविधेचा उपयोग घेता येतो. भारता बाहेरून क्लेम करण्यासाठी पुढील पायऱ्या आहेत.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स द्वारे क्लेम करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे रिंबर्समेंट. जर तुम्ही नेटवर्क मध्ये नसलेल्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केल्यास हॉस्पिटल चे बिल आणि इतर खर्च तुम्ही रिंबर्समेंट करून पॉलिसी द्वारे खर्च मिळवू शकता. त्यासाठी पुढील प्रोसेस पूर्ण करा.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी पुढील कागदपत्रे जमा करावी लागतात.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेच्या प्रिमियम वर आधारित आहे की त्यामधून विमा धारकांना कोणत्या सुविधा मिळणार आहेत तसेच कोणते फायदे होणार आहेत. विम्याचा लाभ मिळवण्यासाठी पॉलिसीची मुदत संपेपर्यंत ठराविक प्रिमियम विमा धारकाला भरावा लागतो, तरच त्याचा फायदा अडचणीच्या वेळी होतो. रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स मधील विमा योजनेचा प्रिमियम ठरवताना खालील बाबींचा विचार केला जातो :
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करताना किंवा पॉलिसी नुतनीकरण करताना तुम्हाला तुमच्या वयानुसार किती प्रिमियम भरावा लागू शकतो तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींना समाविष्ट करताना त्या व्यक्तीचे वय देखील महत्वाचे ठरते. जर पॉलिसी मध्ये लहान वयात गुंतवणूक केली तर पॉलिसीचा प्रिमियम कमी भरावा लागू शकतो आणि वय वाढत गेले आणि नंतर गुंतवणूक केली तर कदाचित पॉलिसी चा प्रिमियम जास्त भरावा लागू शकतो.
रॉयल सुंदरम पॉलिसी खरेदी करताना काही आजार पूर्वी पासून असतील तर ते तुम्हाला नमूद करावे लागतात. पॉलिसी च्या काही कालावधीनंतर पूर्व अस्तित्वात असणारे काही आजार कव्हर केले जातात. अश्या परिस्थितीत पॉलिसी साठी प्रिमियम जास्त असू शकतो.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स तर्फे वेगवेगळ्या रक्कमेचे पॉलिसी कवच उपलब्ध आहे. जेवढी विम्याची रक्कम जास्त तेवढे त्यामधून मिळणारे फायदे आणि सुविधा देखील जास्त असतात आणि प्रिमियम ही जास्त असू शकतो.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स मध्ये थेट प्रिमियम वर फरक पडेल असा महत्वाचा घटक म्हणजे अस्वास्थ्यकर जीवनशैली. आजच्या जीवनशैलीचा एक भाग असलेले मद्यपाणाचे किंवा धूम्रपानाचे व्यसन ज्यामुळे गंभीर आजार भविष्यात उद्भवू शकतात. म्हणूनच अश्या व्यक्तींना पॉलिसी काढताना जास्त प्रिमियम भरावा लागू शकतो.
रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या पॉलिसी वैयक्तिक तसेच कुटुंबासाठी फ्लोटर पद्धतीत उपलब्ध आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हर करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रिमियम द्यावा लागू शकतो.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा योजनेनुसार विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्येच कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येतो. विमा धारकाला कॅशलेस सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स ५००० अधिक हॉस्पिटल्सशी जोडले गेले आहेत. त्यामूळे विमा धारकाला पूर्व नियोजित किंवा आपत्कालिन परिस्थितीत पैशांची चिंता न करता व्यवस्थित उपचार घेता येतात.
रॉयल सुंदरम आरोग्य विमा कंपनीशी संपर्क करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडी custmer.services@royalsundaram.in वर ईमेलने संपर्क साधू शकता.