दरवर्षी, भारतातील सर्वोत्तम आरोग्य विमा कंपन्याची यादी जाहिर केली जाते ज्यामुळे योग्य विम्यासंदर्भातील निर्णय घेण्यास मदत होते. इन्शुरन्स कंपनीचे मूल्यांकन करण्यासाठी काही महत्वाच्या वैशिष्ट्यांचा विचार केला जातो म्हणजेच विमा कंपनीचा परफॉर्मन्स, दाव्यांचे प्रमाण आणि विमा कंपनीतर्फे ग्राहकांना दिले जाणारे लाभ. जीवघेण्या आजारांचा धोका आणि वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च ह्यामुळे आरोग्य विमा योजनेत पुरेश्या प्रमाणात गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.
*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply
*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply
My name is
My number is
My name is
My number is
Select Age
City Living in
Popular Cities
Do you have an existing illness or medical history?
This helps us find plans that cover your condition and avoid claim rejection
What is your existing illness?
Select all that apply
When did you recover from Covid-19?
Some plans are available only after a certain time
सध्या आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, अश्या बऱ्याच विमा कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना सर्वात चांगल्या पर्याय किंवा संधी देऊ करतात. असे असले तरीही, एखाद्या आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करताना विमा कंपनीची निवड करणे अवघड वाटू शकते, ज्या विमा कंपनीमधून तुमच्या गरजा आणि आवश्यकता प्रत्यक्षात पूर्ण होतील.
आम्ही खाली काही भारतामधील सर्वोत्तम आरोग्य विम कंपनीची यादी दिली आहे. भारतातील चांगल्या आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यास मदत करण्यासाठी खाली दिलेल्या यादीमधून तुम्ही त्या कंपनीचे दाव्यांचे प्रमाण, नेटवर्क मध्ये असणाऱ्या रुग्णालयांची संख्या तसेच कंपनीची काही वैशिष्ट्ये तपासून पाहू शकतात. विमा कंपन्यामध्ये दिले जाणारे कव्हरेज लाभ आणि त्यांची वैशिष्ट्ये या गोष्टींची तुलना करून तुम्ही योग्य त्या विमा योजनेत गुंतवणूक करू शकता.
English
हिंदी
తెలుగు
भारतामधील सर्वोत्तम आरोग्य विमा कंपनी संदर्भात आपण थोडी आधिक माहिती जाणून घेऊ.
आरोग्य विमा देणाऱ्या कंपनी |
नेटवर्क मध्ये असणाऱ्या रुग्णालयांची संख्या |
दाव्यांचे प्रमाण |
|
आदित्य बिर्ला आरोग्य विमा |
6000+ |
59% |
योजना पहा |
बजाज अलियान्झ आरोग्य विमा |
6500+ |
85% |
योजना पहा |
भारती एक्सा आरोग्य विमा |
4500+ |
89% |
योजना पहा |
केअर आरोग्य विमा |
7400+ |
55% |
योजना पहा |
चोलामंडलम आरोग्य विमा |
7240+ |
35% |
योजना पहा |
डिजिट आरोग्य विमा |
5900+ |
11% |
योजना पहा |
एडेलविस आरोग्य विमा |
2578+ |
11% |
योजना पहा |
फ्युचर जनराली आरोग्य विमा |
5000+ |
73% |
योजना पहा |
इफ्को टोकियो आरोग्य विमा |
5000+ |
102% |
योजना पहा |
कोटक महिंद्रा आरोग्य विमा |
4800+ |
47% |
योजना पहा |
लिबर्टी आरोग्य विमा |
5000+ |
82% |
योजना पहा |
मॅक्स बुपा आरोग्य विमा |
4500+ |
54% |
योजना पहा |
मणिपाल सिग्ना आरोग्य विमा |
6500+ |
62% |
योजना पहा |
नॅशनल आरोग्य विमा |
6000+ |
107.64% |
योजना पहा |
न्यू इंडिया अशुरन्स आरोग्य विमा |
3000+ |
103.74% |
योजना पहा |
ओरिएंटल आरोग्य विमा |
4300+ |
108.80% |
योजना पहा |
रहेजा क्यूब आरोग्य विमा |
5000+ |
33% |
योजना पहा |
रॉयल सुंदरम आरोग्य विमा |
5000+ |
61% |
योजना पहा |
रिलायन्स आरोग्य विमा |
7300+ |
14% |
योजना पहा |
स्टार आरोग्य विमा |
9900+ |
63% |
योजना पहा |
एसबीआय आरोग्य विमा |
6000+ |
52% |
योजना पहा |
टाटा एआयजी आरोग्य विमा |
3000+ |
78% |
योजना पहा |
युनायटेड इंडिया आरोग्य विमा |
7000+ |
110.95% |
योजना पहा |
युनिव्हरसेल सोम्पो आरोग्य विमा |
5000+ |
92% |
योजना पहा |
निवेदन: * पॉलिसीबाजार एखाद्या विमाधारकाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही विशिष्ट विमा उत्पादकास किंवा विमा उत्पादनास मान्यता देत, रेट करत नाही किंवा त्याची शिफारस करत नाही.
आदित्य बिर्ला आरोग्य विमा कंपनी ही आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ह्या कंपनीचीच एक उपकंपनी आहे. या कंपनीची स्थापना सामान्य विमा सर्व्हिसेस सुलभ रित्या ग्राहकांना प्राप्त व्हाव्यात या हेतूने झाली आहे. दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया ह्या जगभरातील असणाऱ्या विमा प्रदात्यांसह ह्या कंपनीची उत्तम प्रतिष्ठा आहे. आदित्य बिर्ला आरोग्य विमा कंपनी कडून मेडिकल इन्शुरन्स घेण्याचे फायदे आणि ह्या वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीची स्वतःची अशी आरोग्य उत्पादने जी त्यांच्या ग्राहकांसाठी विशिष्ट वयोमानाप्रमाणे फायदेशीर आहेत. कॅपटीव्ह TPA सर्विस काही अतिरिक्त फायद्यांसह देणारी पहिली कंपनी बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनी आहे. ह्या कंपनीचे दाव्यांचे प्रमाण आर्थिक वर्ष 2018- 19 मधील 85% आहे. खाली बजाज अलियान्झ मेडिकल इन्शुरन्स प्लॅनची काही वैशिष्ट्ये दिली आहेत:
ऑगस्ट 2008 मध्ये सूरु झालेली ही कंपनी, भारती एंटरप्राइजेस 74% शेअर्ससह आणि एक्सा उरलेल्या 26% शेअर्ससह एकमेकांच्या सहकार्याने काम करतात. भारती एंटरप्राइज ही भारतातील नावाजलेल्या संस्थापैकी एक आहे. तर भारती एक्सा ही जागतिक वित्तीय आणि संपत्ती व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. भारती एक्सा आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत:
भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीचे भारतामध्ये 59 कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. ऑपरेशन्स च्या पहिल्याच वर्षात कंपनीला ISO 9001:2008 सर्टिफिकेट प्राप्त झाले आणि त्यांनंतर ISO 27001:2005 देखील प्राप्त झाले. ही एक विकसनशील आणि विश्वासार्हता जपणाऱ्या विमा कंपनीनपैकी एक इन्शुरन्स कंपनी आहे. भारती एक्सा आरोग्य विमा एक डेडिकेटेड सर्विस, ग्राहकांसोबत चांगले नाते निर्माण करणारी तसेच त्रासमुक्त क्लेम प्रक्रिया असणारी इन्शुरन्स कंपनी आहे. भारती एक्सा आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत:
केअर आरोग्य विमा लिमिटेड (पूर्वी रेलीगेअर आरोग्य विमा कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) ह्या कंपनीने कमी वेळात प्रचंड वाढ केली आहे, त्यामुळे भारताच्या इन्शुरन्स मार्केट मध्ये एक बेंचमार्क निर्माण झाला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ह्या कंपनीचे दाव्यांचे प्रमाण 93% होते. फोर्टिस हॉस्पिटल्सकडून ह्या विमा योजनेचे नियमित कौतुक आणि प्रमोशन केले जाते. केअर हेल्थ प्लॅन्सची (पूर्वी रेलीगेअर आरोग्य विमा म्हणून ओळखली जाणारी) काही महत्वाची वैशिष्ट्येखाली दिलेली आहेत:
3 मोटोस वर (ट्रस्ट, टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपरन्सी) आधारित असलेली चोलामंडलम जीआय कंपनी लिमिटेड 2001 मध्ये स्थापन झाली आहे. अत्यंत कमी कालावधीत ह्या कंपनीचा विस्तार देशभरात झाला असून 109 शाखा पूर्ण देशभरात आहेत. वर्ष 2011 मध्ये , ह्या कंपनीच्या नाविन्यपूर्ण कामासाठी आशियाई इन्शुरन्स कॉंग्रेस मध्ये फायनान्शिअल इंसाईटस इनोव्हेशन अवॉर्डने कंपनीला सन्मानित करण्यात आले. चोलामंडलम आरोग्य विमामध्ये अत्यंत कमी दरात आकर्षक फायदे आणि वैशिष्ट्ये दिली जातात. ह्या कंपनी तर्फे विशाल कव्हरेज तसेच ग्राहकांना अनुकूल असणारे प्लॅन्स दिले जातात. खालील काही कारणांमुळे चोलामंडलम आरोग्य विमा निश्चितच सुरक्षित असा प्लॅन आहे.
डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कमलेश गोयल आहेत. मागील वर्षीच, ह्या विमा कंपनी कडून 10 लाख विमा योजनांची विक्री झाली आहे. इन्शुरन्स देणाऱ्या या कंपनीला 2019 च्या आशियाई जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे गौरविण्यात आले होते. आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी ह्या विम्याचा पर्याय योग्य कसा आहे ते जाणून घेऊया:
एडेलविस जनरल इन्शुरन्स ही भारतामधील लोकप्रिय विमा कंपनीनपैकी एक असणारी विमा कंपनी आहे आणि एडेलविस ग्रुप च्या वारसा प्रदान करण्याच्या कामावर कोट्यवधी लोकांचा विश्वास देखील आहे. ह्या इन्शुरन्स कंपनीला SAP प्रोसेस इनोव्हेशन अवॉर्ड सारखे असंख्य अवॉर्डस मिळाले आहेत. खाली काही महत्त्वाचे फायदे नमूद केले आहेत जे विमा धारकाला एडेलविस आरोग्य विमा योजनेत दिले जातील:
फ्युचर जनराली टोटल इन्शुरन्स सोल्युशन्स हे फ्युचर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि जनराली ग्रुप मधील जॉईंट एंटरप्राइज आहे. फ्युचर जनराली आरोग्य विमा मधील विमा योजना मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या आहेत. खाली फ्युचर जनराली आरोग्य विमा विकत घेण्याचे काही फायदे नमूद केलेले आहेत:
4 डिसेंबर 2000 मध्ये सुरू झालेली इफ्को टोकियो आरोग्य विमा कंपनी, इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को.ऑप.(IFFCO), निचिडो फायर ग्रुप आणि जपानची प्रसिध्द इन्शुरन्स ग्रुप – टोकियो मरिन ह्या कंपनीच्या सहकार्याने कामकाज करत आहेत.
ह्या कंपनीचा दाव्यांचे प्रमाण 102% होते म्हणजेच आर्थिक वर्ष 2018-2019 मध्ये ह्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला होता. विमा कंपनीकडून सेटल केले गेलेले टोटल क्लेम्स आणि त्या वर्षात टोटल हप्त्याची जमा झालेली रक्कम ह्यांचे गुणोत्तर म्हणजेच इन्कर्ड क्लेम रेश्यो. इफ्को टोकियो मधून आरोग्य विमा घेण्याची काही कारणे खाली दिलेली आहेत:
कोटक महिंद्रा जीआय कंपनी ही कोटक महिंद्रा बँकचा उपभाग आहे आणि ह्याची निर्मिती जनरल इन्शुरन्स सेक्टर मध्ये सेवा देण्यासाठी करण्यात आली असून यामधून आरोग्य विमा आणि इतर सेवा दिल्या जातात. पूर्ण भारतात ह्या विमा कंपनीच्या 13 पेक्षा अधिक शाखा आहेत. पॉलिसीच्या खाली दिलेल्या काही वैशिष्ट्यांमुळे आणि लाभामुळे ग्राहकाला मेडिकल पॉलिसी मध्ये बदल करता येतात. वैशिष्ट्ये आणि लाभ खालीलप्रमाणे आहेत:
लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीने त्याचे कामकाज वर्ष 2013 पासून सुरू केले. लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स ग्रुप, डीपी जिंदल ग्रुप, लिबर्टी सिटी स्टेट होल्डिंग्ज पीटीई लि. आणि एनम सिक्युरिटीज ह्यांच्या सहकार्याने कंपनीची निर्मिती झाली आहे. पूर्ण भारतात 23 राज्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. लिबर्टी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
भारतामधील मॅक्स बुपा आरोग्य विमा कंपनीचा, आर्थिक वर्ष 2018-2019 मधील इन्कर्ड क्लेम रेश्यो 54% एवढे होते. ह्या कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या आरोग्य विमा योजना या सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. मॅक्स बुपा आरोग्य विमा तर्फे दिले जाणारे कव्हरेज बेनेफिट्स खालीलप्रमाणे आहेत:
मणिपाल सिग्न आरोग्य विमा कंपनी वर्ष 2014 मध्ये सुरू झालेली असून भारतीय विमा मार्केट मध्ये ती काहीशी नवीन आहे. आर्थिक वर्षे 2018-2019 मधील ह्या कंपनीचा इन्कर्ड क्लेम रेश्यो 62% होता. मणिपाल सिग्ना आरोग्य विमा कंपनीची काही वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत:
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही पूर्णपणे सरकारी संस्था असून शंभर वर्षाहून अधिक कालावधीपासून ग्राहकांना सेवा देत आहे तसेच आरोग्य विमा सुरक्षा देखील प्रदान करत आहे. आर्थिक वर्षे 2018-2019 मधील ह्या कंपनीचा इन्कर्ड क्लेम रेश्यो 107.64% होता. नॅशनल आरोग्य विमा कंपनीची काही वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत:
नॅशनल जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वरिष्ठ मेडिक्लेम ऑफर केले जाते.
न्यू इंडिया अशुरन्स ही पूर्णपणे सरकारी संस्था असून सन 1919 पासून या कंपनीचे कामकाज चालू आहे. मेडिक्लेम पॉलिसी साठी चांगली ओळख असलेली ही कंपनी आहे. ह्या आरोग्य विमा पॉलिसी द्वारे मोठया महानगरांना वेगवेगळे रेटिंग दिले जाते जे ह्या पॉलिसीचे वैशिष्ट्य आहे. आर्थिक वर्षे 2018-2019 मधील ह्या कंपनीचा इन्कर्ड क्लेम रेश्यो 103.74% होता. न्यू इंडिया आरोग्य विमा कंपनीची काही वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत:
ओरिएंटल आरोग्य विमा ही एक सरकारी संस्था असून जनरल इन्शुरन्स कंपनी आहे ज्यामधून भारतात वेगवेगळे आरोग्य विमा पॉलिसीज ऑफर केल्या जातात. ओरिएंटल आरोग्य विमामधील महत्वाचा भाग म्हणजे या पॉलिसी घेताना 60 वर्षे वयापर्यंत कुठलीही पूर्व मेडिकल चेक अप करण्याची आवश्यकता नाही परंतु इतर इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी घेण्यासाठी मेडिकल चेक-अप करणे आवश्यक असते जर त्या व्यक्तीचे वय 45 पेक्षा कमी असेल. ओरिएंटल आरोग्य विमा खरेदी करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही भारतातील अनेक नामवंत कंपनीनपैकी एक कंपनी आहे. ह्या विमा कंपनीचे पूर्ण भारतात 139 ऑफिसेस असून ग्राहकांना अखंड सेवा दिली जाते. भारताबरोबरच परदेशातही ही कंपनी कार्यरत आहे. ह्या विमा कंपनीकडे व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि एसएमइचा मोठा ग्राहकवर्ग आहे. ऑनलाईन खरेदी आणि पॉलिसी नूतनीकरण सेवांसह त्यांच्याशी संपर्क साधने अधिक सोपे आहे.
रजन रहेजा ग्रुप क्यूबीइ इन्शुरन्स जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑस्ट्रेलिया मधील सोबत काम करत आहे आणि अशाच पद्धतीने रहेजा क्यूबीइ निर्माण झाली. सामान्य विमा कंपनीची स्थापना त्यांच्या भागीदारांना आणि ग्राहकांना अखंड सेवा देण्यासाठी करण्यात आलेली आहे. रहेजा क्यूबीइ तर्फे देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेचे लाभ आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
रॉयल सुंदरम आरोग्य विमा कंपनी पूर्वी रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या नावाने ओळखली जायची. ह्या कंपनीच्या क्लेम मॅनेजमेंट सर्विस कंपनीला बरेच अवॉर्डस मिळाले आहेत. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि लाभांसह ही विमा कंपनी सर्वसमावेशक विमा योजना ऑफर करते:
स्टार हेल्थ आणि अलाइड इन्शुरन्स कंपनी सर्वसमावेशक असे हेल्थ प्लॅन्स तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ऑफर करतात. आर्थिक वर्षे 2018-2019 मधील ह्या कंपनीचा इन्कर्ड क्लेम रेश्यो 63% होता. स्टार आरोग्य विमा द्वारे दिलव जाणारे कव्हरेज बेनेफिट्स खालीलप्रमाणे आहेत:
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि ऑस्ट्रेलिया इन्शुरन्स ग्रुप यांच्या सहकार्याने स्थापन झालेली एसबीआय आरोग्य विमा कंपनी लिमिटेड ही संयुक्त संस्था आहे. एसबीआय चा 74% भाग असून 26% भाग हा ऑस्ट्रेलिया इन्शुरन्स ग्रुप चा आहे. जगातील 14,000 अधिकृत शाखांमध्ये कंपनीचे कामकाज चालते. आर्थिक वर्षे 2018-2019 मधील ह्या कंपनीचा इन्कर्ड क्लेम रेश्यो 52% होता. एसबीआय आरोग्य विमा कंपनीकडून 198876 पॉलिसीज खरेदी केल्या गेल्या आहेत. एसबीआय आरोग्य विमा ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
टाटा एआयजी जीआय कंपनी, अमेरिकन इंटरनेशनल आणि टाटा ग्रुप च्या सहकार्याने काम करते. सन 2001 पासून ही कंपनी कार्यरत आहे. तेव्हापासून, ही कंपनी इन्शुरन्स इंडस्ट्री मध्ये प्रसिद्ध आहे. टाटा एआयजी चे टाय-अप्स भारतातील बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये असून भारतातील 4000 पेक्षा अधिक रुग्णालयात कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा दिली जाते. टाटा एआयजी आरोग्य विमा खालील लाभ देते:
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे 22 कंपन्यांच्या विलीनीकरणातून तयार झाली असून त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय जनरल इन्शुरन्स देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ह्या विमा कंपनीद्वारे दिले जाणारे हेल्थ प्लॅन्स परवडणारे आणि विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार दिले जातात. युनायटेड इंडिया ला उच्च सोलव्हन्सी मार्जिन रेश्यो साठी क्लेम देण्याच्या क्षमतेसाठी ICRA ची मान्यता प्राप्त झाली आहे. कंपनीकडून हेल्थ प्लॅन्स साठी दिले जाणारे बेनेफिट्स पाहुयात:
युनिव्हर्सल सोम्पो जनरल विमा कंपनीची स्थापना सार्वजनिक-खासगी उपक्रम म्हणून 2007 मध्ये केली गेली. डाबर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, सोम्पो जपान आणि कर्नाटक बँक, अलाहाब यांच्या एकत्रित येण्याने ही विमा कंपनी निर्माण झाली आहे. युनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमाची काही वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहेत-
निर्णय तुमचा!
या लेखामधून, भारतातील आरोग्य विमा कंपनी संदर्भातील माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. भारतामधील जनरल इन्शुरन्स कंपन्या कडून विस्तृत हेल्थ प्लॅन्स मधून तुम्ही पॉलिसी निवडू शकता. ह्या इन्शुरन्स कंपन्या फॅमिली फ्लोटर प्लॅन साठी प्रसिद्ध आहेत. आता! वेगवेगळ्या इन्शुरन्स प्लॅन्स ची ऑनलाईन तुलना करून तुम्ही चांगली पॉलिसी खरेदी करू शकता.
उत्तर: काही इन्शुरन्स कंपन्या मधुमेहासाठी आरोग्य प्लॅन्स देतात. स्टार हेल्थ डायबिटीस सेफ इन्शुरन्स प्लॅन, नॅशनल वरीष्ठ मेडिक्लेम प्लॅन, वैगरे काही इन्शुरन्स कंपनी आहेत ज्या इन्सुलिनचा खर्च कव्हर करतात. तुम्ही इतरही प्लॅन्स चेक करून पाहू शकता.
उत्तर: तुम्ही तुमची आरोग्य विमा योजना एक कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करू शकता आणि तेही जमा झालेल्या फायद्यांसाह. IRDA च्या नियमानुसार पॉलिसी धारकाला एका विमा कंपनी मधून दुसऱ्या विमा कंपनी मध्ये पॉलिसी ट्रान्सफर करण्याचा अधिकार आहे.
उत्तर: काही आरोग्य विमा कंपन्या दातांच्या उपचारांचे खर्च कव्हर करतात. बजाज हेल्थ गार्ड विमा योजना, चोलामंडलम हेल्थलाईन विमा योजना, स्टार कॉम्प्रेहेनसीव आरोग्य विमा इत्यादी इन्शुरन्स कंपनीमधून दातांच्या उपचारांचा खर्च कव्हर केला जातो. आपण इतरही इन्शुरन्स प्लॅन्स तपासून पाहू शकता.
उत्तर: भरपूर इन्शुरन्स कंपन्या कॅन्सर ट्रीटमेंट साठी आलेला खर्च कव्हर करतात. फ्युचर जनराली कॅन्सर प्रोटेक्ट प्लॅन, बजाज अलियान्झ क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स, आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह सिक्युअर-कॅन्सर सेक्युअर, डिजिट कॅन्सर आरोग्य विमा, चोला एमएस क्रिटिकल हेल्थलाईन प्लॅन, एडलवाईस प्लॅटिनम प्लॅन, रहेजा कॅन्सर इन्शुरन्स, केअर हेल्थ कॅन्सर इन्शुरन्स पॉलिसी, स्टार कॅन्सर केअर गोल्ड इन्शुरन्स प्लॅन इत्यादी भारतातील काही विमा कंपनीद्वारे कॅन्सर इन्शुरन्स ऑफर केला जातो. इतरही विमा कंपन्या तुम्ही चेक करू शकता आणि ऑनलाईन त्यांची तुलना करून पाहू शकता.
उत्तर: मूत्राशय प्रत्यारोपण किंवा मूत्रपिंड निकामी होणे हा एक गंभीर आजार असल्यामुळे क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कव्हर केला जातो. बजाज अलियान्झ आरोग्य विमा कंपनीतर्फे किडनी निकामी झाल्यास उपचारांचा खर्च बजाज अलियान्झ क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कव्हर केला जातो, अर्गो हेल्थ ऑप्टिमल वायटल इन्शुरन्स प्लॅन मध्ये देखील हा खर्च कव्हर केला जातो. तसेच नॅशनल क्रिटिकल इलनेस मेडिकल इन्शुरन्स प्लॅन, एसबीआय क्रिटिकल इलनेस प्लॅन, टाटा एआयजी आरोग्य विमा आणि युनिव्हर्सल सॉम्पो क्रिटिकल इलनेस पॉलिसी मध्ये देखील उपचारांचा खर्च कव्हर केला जातो.