आयकर कायद्यामधील कलम 80D काय आहे?
आयकर कायदा, 1961 च्या कलम 80D मध्ये आर्थिक वर्षात भरलेल्या हेल्थ विम्याच्या प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत कर कपात मिळते. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मर्यादा प्रति आर्थिक वर्ष 50,000 रुपयांपर्यंत वाढते. व्यक्ती स्वत:साठी, त्यांच्या जोडीदारासाठी, त्याच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी खरेदी केलेल्या हेल्थ विमा पॉलिसीवर कलम 80D अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकतात.
कलम 80D अंतर्गत उपलब्ध कर कपात ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत दाखल केलेल्या दाव्यांपेक्षा जास्त असते.
कलम 80D अंतर्गत होणारी कर कपात
आर्थिक वर्ष 2023-24 नुसार आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत एखाद्या व्यक्तीसाठी उपलब्ध असलेली कर कपात बघुया:
कलम 80D अंतर्गत होणारी कपात
*वरील कर सूट मर्यादा भारतात कर भरणाऱ्या अनिवासी भारतीयांना देखील लागू होते.
कलम 80D मध्ये मिळणार्या कर कपातीसाठी कोण पात्र आहे?
आयकर कायदा, 1961 च्या कलम 80D अंतर्गत केवळ व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) कर कपातीसाठी पात्र आहेत. भारतात कर भरणारे NRI देखील आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत भारतातील विमा कंपनीमध्ये भरलेल्या हेल्थ विमा प्रीमियमवर कर कपातीचा दावा करू शकतात.
इतर कोणतीही संस्था, जसे की संघटन किंवा फर्म, कलम 80D अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकत नाही.
कलम 80D अंतर्गत कोणत्या कपातीला परवानगी आहे?
कलम 80D अंतर्गत, एखादी व्यक्ती किंवा HUF खालील गोष्टींसाठी कर कपातीचा दावा करू शकते:
- स्वत:साठी, जोडीदार, मुले आणि पालकांसाठी भरलेल्या हेल्थ विमा प्रीमियमवर
- प्रतिबंधात्मक हेल्थ चेकपअसाठी दिलेली देयके
- कोणत्याही मेडिकल विम्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सांभाळताना होणार्या मेडिकल खर्चावर
- कोणत्याही सरकारी हेल्थ विमा योजनेत दिलेल्या योगदानावर
कलम 80D अंतर्गत किती कर कपातीची मंजुरी आहे?
कलम 80D प्रौढ नागरिकांना मेडीकल विम्याच्या प्रीमियमवर प्रति आर्थिक वर्ष 25,000 रुपयांपर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंत कर कपात करण्याची मंजुरी देते. या मर्यादेमध्ये प्रतिबंधात्मक हेल्थ चेकअपच्या कोणत्याही खर्चाची 5,000 रुपयांची कपात देखील समाविष्ट आहे.
चला एका उदाहरणाच्या मदतीने कलम 80D कर सूट मर्यादा समजून घेऊ.
समजा 40 वर्षीय दिनेशनी 35,000 रुपयांच्या प्रीमियमचा हेल्थ विमा खरेदी केला आहे. कलम 80D नुसार, तो 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यामुळे तो 25,000 रुपयांच्या कर कपातीचा दावा दाखल करू शकतो. पण दिनेशच्या, 65 वर्षांच्या वडिलांनी, त्यांच्या मेडिकल विम्याच्या प्रीमियम पोटी 55,000 रुपये भरले. तर अशा परिस्थितीत, दिनेशचे वडील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे 50,000 रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकतात.
भारतीय नागरिकांप्रमाणेच, 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे NRI देखिल एका आर्थिक वर्षात भरलेल्या हेल्थ विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा दावा दाखल करू शकतात. आणि जर NRIचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर कर कपातीची मर्यादा प्रति आर्थिक वर्ष 50,000 रुपयां पर्यंत वाढते.
पालकांसाठी भरलेल्या हेल्थ विमा प्रीमियमसाठी कलम 80D कर कपात:
पालकांच्या हेल्थ विम्याचे भरलेले हप्ते देखील कलम 80D अंतर्गत प्रति आर्थिक वर्षाधील 25,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र असतात. एक किंवा दोन्ही पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास, कलम 80D अंतर्गत चालु आर्थिक वर्षात कर कपातीच्या 50,000 रुपयांपर्यंतच्या दावा केला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ, समजा जितेंद्रने त्यांच्या 62 आणि 58 वर्षांच्या वृद्ध पालकांसाठी 53,000 रुपयांची हेल्थ विमा पॉलिसी खरेदी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये, जितेंद्र त्याच्या पालकांसाठी भरलेल्या हेल्थ विम्याच्या प्रीमियमवर 50,000 रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकतो.
HUF साठी कलम 80D कर कपात:
आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत, HUF च्या कोणत्याही सदस्यासाठी हेल्थ विमा प्रीमियमवरील कर कपात उपलब्ध आहे. वैयक्तिक करदात्याप्रमाणेच, HUF चे सदस्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास 25,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. आणि जर HUF सदस्य ज्येष्ठ नागरिक असतील, तर 50,000 रुपयाची कर कपात उपलब्ध आहे.
उदाहरणार्थ, HUF चा सदस्य असलेल्या 30 वर्षीय अक्षयने 28,000 रुपयांच्या प्रीमियमचा मेडिकल विमा खरेदी केला आहे. अक्षय ज्येष्ठ नागरिक नसल्यामुळे, तो HUF चा भाग म्हणून 25,000 रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकतो. परंतु, अक्षयने HUF चा भाग असलेल्या त्याच्या 61 वर्षीय वडिलांकरिता 55,000 रुपयांच्या मेडिक्लेम पॉलिसी प्रीमियम देखील भरले होते. अशा वेळी, अक्षय त्याच्या वृध्द वडिलांसाठी भरलेल्या हेल्थ विम्याच्या प्रीमियमसाठी 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कर कपातीचा दावा करू शकतो.
कलम 80D अंतर्गत प्रतिबंधात्मक हेल्थ चेकअप कसे असतात?
प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अप म्हणजे आजारपणाला सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळखण्यासाठी आणि जोखीम घटक कमी करण्यासाठी केली जाणारी वारंवारची मेडिकल तपासणी असते. सरकारने आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अपवर कर कपात सुरू केली, जेणेकरून लोकांना त्यांच्या आरोग्यावर सक्रियपणे लक्ष ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल. व्यक्ती स्वतःसाठी, त्याच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी आणि पालकांसाठी केलेल्या प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अपसाठी केलेल्या पेमेंटवर ही कर सूट घेऊ शकतात.
कलम 80D नुसार, प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अपसाठी प्रति आर्थिक वर्ष 5,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. तसेच, प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अपवरील कलम 80D मर्यादेमधील ही कपात 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी 25,000 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपये आहे.
खालील उदाहरणाच्या मदतीने विभाग 80D वजावट मर्यादा समजून घेऊया:
समजा प्रशांतचे कुटुंब सहा सदस्यांचे आहे, ज्यात तो स्वत: (35), पत्नी (34), दोन मुले (11 आणि 7), वडील (63) आणि आई (59) आहे. त्याने एक फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी केला आहे, ज्यामध्ये त्याला, त्याच्या पत्नी आणि त्याच्या मुलांना 30,000 ₹ च्या वार्षिक प्रीमियममध्ये कव्हर केले जाते. त्याने त्याच्या पालकांच्या मेडिकल विम्यासाठी 47,000 रुपये देखील भरले आहेत. शिवाय, प्रशांतने त्याच्या हेल्थ चेकअपसाठी 15,000 रुपये आणि त्याच्या पालकांच्या हेल्थ चेकअपसाठी 10,000 रुपये दिले आहेत.
आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत प्रशांतला मिळू शकणारी एकूण कर कपात समजून घेण्यासाठी पुढील टेबल पहा:
खर्च |
वास्तविक खर्च |
कलम 80D अंतर्गत कमाल कपात |
एकूण लागू कपात |
स्वत:, जोडीदार आणि मुलांसाठी हेल्थ विमा प्रीमियम |
₹30,000 |
₹25,000 |
₹25,000 |
स्वत:, जोडीदार आणि मुलांचे प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अप |
₹15,000 |
₹5,000 |
₹5,000 |
स्वत:, जोडीदार आणि मुलांचा एकूण खर्च |
₹45,000 |
₹25,000 |
₹25,000 |
ज्येष्ठ नागरिक पालकांच्या हेल्थ विम्याचा प्रीमियम |
₹47,000 |
₹50,000 |
₹47,000 |
पालकांसाठी (ज्येष्ठ नागरिक) प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अप |
₹10,000 |
₹5,000 |
₹3,000 |
पालकांचा एकूण खर्च (ज्येष्ठ नागरिक) |
₹57,000 |
₹50,000 |
₹50,000 |
आर्थिक वर्षासाठी उपलब्ध एकूण कपात
|
₹75,000 |
म्हणजे, प्रशांतने हेल्थ विम्याच्या प्रीमियम्सवर तसेच त्याच्या कुटुंबाच्या आणि पालकांच्या प्रतिबंधात्मक हेल्थ चेकअपवर एकूण ₹1,02,000 खर्च केला असेल, तर तो एका आर्थिक वर्षात प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर कपात म्हणून फक्त ₹75000 चा दावा दाखल करू शकतो.
कलम 80Dच्या कपातीसाठी पात्र असणारी पेमेंट पद्धती
कलम 80D अंतर्गत कर कपातीचा लाभ घेण्यासाठी खालील पेमेंट पद्धती मंजुर केल्या गेल्या आहेत:
खर्च |
मंजुर पेमेंट पद्धती |
हेल्थ विमा प्रीमियम |
कॅश सोडुन सर्व पेमेंट पद्धती |
प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अप |
पेमेंटच्या सर्व पद्धती (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि चेक इ.) |
एकरकमी भरलेल्या बहु-वर्षीय हेल्थ विमा प्रीमियमची कलम 80D कपात
भारतातील विमा कंपन्यांनी ऑफर केलेल्या दीर्घकालीन पॉलिसी सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक बहु-वर्षीय हेल्थ विमा खरेदी करतात. पॉलिसी खरेदीच्या वेळी बहु-वर्षीय हेल्थ विम्याचे प्रीमियम एकरकमी भरले गेले असल्यास, पॉलिसीधारक आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अनुसार कर कपातीचा लाभ घेऊ शकतात.
याशिवाय, एक वर्षीय हेल्थ विमा पॉलिसींप्रमाणेच, बहु-वर्षीय हेल्थ विमा प्रीमियमवरील कलम 80D च्या मर्यादेच्या अधीन असलेली एकुण कर कपात 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी ₹25,000 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹50,000 आहे.
उदाहरणार्थ, मोहितने 3 वर्षांची हेल्थ विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी ₹45,000 दिले. अशा परिस्थितीत, तो कलम 80D अंतर्गत प्रति आर्थिक वर्ष ₹15,000 च्या कर कपातीचा दावा करू शकतो.
कलम 80D मधील ज्येष्ठ नागरिकांच्या मेडिकल खर्चाची कपात
कलम 80D अंतर्गत कपात
कलम 80D नुसार, कोणत्याही हेल्थ विम्याशिवाय ज्येष्ठ नागरिकाच्या आरोग्यावर झालेला मेडीकल खर्च प्रति आर्थिक वर्ष ₹50,000 पर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र आहे. तसेच, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाकडे आधीच मेडिकल विमा असल्यास, ते या कलम 80D कपातीसाठी पात्र असणार नाहीत.
उदाहरणार्थ, समजा राजने त्याच्या हेल्थ विमा पॉलिसी नसणार्या वृध्द पालकांच्या मेडिकल खर्चावर ₹60000 खर्च केले आहेत. या केसमध्ये, तो कलम 80D नुसार मेडिकल खर्चावर ₹50,000 च्या कर कपातीचा दावा करू शकतो.
कलम 80DD अंतर्गत कर कपात (दिव्यांग असलेल्या अवलंबित सदस्यांवरिल उपचार)
आयकर कायद्याच्या कलम 80DD अंतर्गत, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या उपचारांवर झालेल्या मेडिकल खर्चावर प्रति आर्थिक वर्ष ₹75,000 पर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. एखाद्या 80% किंवा त्याहून अधिक गंभीर दिव्यांगत्वाच्या बाबतीत, कलम 80DD कपात मर्यादा ₹1,25,000 प्रति आर्थिक वर्ष अनुमत आहे. अवलंबित सदस्य हे पती-पत्नी, मुले, पालक किंवा भावंड असू शकतात.
शिवाय, एखाद्या व्यक्तीने LIC किंवा कोणत्याही विमा कंपनीच्या कोणत्याही योजनेसाठी दिव्यांग असलेल्या अवलंबित व्यक्तीचे आरोग्य सांभाळण्यासाठी वार्षिक किंवा एकरकमी पेमेंट केले असल्यास , तो कलम 80DD अंतर्गत कर कपातीचा दावा करु जाऊ शकतो.
दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या पुनर्वसनावर मेडिकल उपचार, नर्सिंग, प्रशिक्षण या सारख्या झालेल्या वैद्यकीय खर्चावर कलम 80DD कपात मंजुर केलेली आहे. या कर लाभाचा फायदा घेण्यासाठी, केंद्र किंवा राज्य सरकारच्या वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आयकर विवरणपत्र भरताना सादर करणे आवश्यक आहे.
कलम 80DDB कपात (विशिष्ट आजारांवर उपचार)
आयकर कायद्याच्या कलम 80DDB नुसार, घातक कर्करोग, एड्स, दीर्घकालीन निकामी मूत्रपिंड, स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन रोगासारख्या सुचीबद्ध रोगांच्या उपचारांवर झालेल्या मेडिकल खर्चावर प्रति आर्थिक वर्ष ₹40,000 पर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी, कलम 80DDB मेडीकल खर्चाची कर कपात मर्यादा प्रति आर्थिक वर्ष ₹1 लाखांपर्यंत वाढिव असते.
परंतु, यासाठी आयकर विवरणपत्र भरताना विशिष्ट आजारावर उपचार घेतल्याचा पुरावा जोडावा लागतो. याशिवाय, व्यक्ती स्वतःच्या, त्यांच्या जोडीदाराच्या, पालकांच्या, मुलांच्या आणि भावंडांच्या उपचारांवर झालेल्या मेडिकल खर्चावर कलम 80DDB कपातीचा दावा करू शकतो.
कलम 80D विरुद्ध 80C
आयकर कायदा, 1961 च्या कलम 80D आणि कलम 80C मध्ये बर्याच लोकांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी, कलम 80D आणि कलम 80C मधील मूलभूत फरक तपासुन घेउया:
कॅटेगिरिज |
कलम 80D |
कलम 80C |
व्याख्या |
सेक्शन 80D मध्ये स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि पालकांसाठी भरलेल्या हेल्थ विम्याच्या प्रीमियमवर आणि प्रतिबंधात्मक हेल्थ चेकअपवरील खर्चावर कर सवलत मिळते. |
कलम 80C मध्ये ULIP, PPF, ELSS, EPF, LIC प्रीमियम इ. सारख्या विविध प्रकारच्या कर-बचत गुंतवणुकीवर कर कपात मिळते, |
कमाल कर कपात मर्यादा |
₹1 लाखापर्यंत |
₹1.5 लाखापर्यंत |
कर लाभांची व्याप्ती |
कमी कर लाभ |
जास्त कर लाभ |
कलम 80D कपातीचा लाभ घेताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
कलम 80D अंतर्गत कर कपातीचा लाभ घेताना तुम्ही पुढिल गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे:
- कॅशने भरलेले हेल्थ विमा प्रीमियम कलम 80D कपातीसाठी पात्र नसतात.
- जर एखाद्या व्यक्तीने आणि पालकांनी मेडिकल विमा प्रीमियमचा अंशतः भरणा केला असेल, तर दोघेही कलम 80D अंतर्गत त्यांच्या देय रकमेसाठी कर कपातीचा दावा करू शकतात.
- चुलत भावंड, आजी-आजोबा, काका आणि काकूंसाठी भरलेले प्रीमियम कर कपातीसाठी पात्र नसतात.
- काम करणाऱ्या मुलांनी भरलेले प्रीमियम कलम 80D कपातीसाठी पात्र नाहीत.
- एम्प्लोयरने भरलेले समूह हेल्थ विमा प्रीमियम कलम 80D कपातीसाठी पात्र नसतात.
- हेल्थ विमा प्रीमियममध्ये असलेल्या सेवा कर आणि उपकर रकमेवर कोणतीही कपात दिली जात नाही.
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
-
उत्तर: आयकर कायद्याचे कलम 80D खालील गोष्टींवर कर कपात मिळते:
- स्वत:च्या, जोडीदार, मुले आणि पालकांसाठी भरलेल्या हेल्थ विम्याच्या प्रीमियमवर
- कोणत्याही सरकारी हेल्थ विमा योजनेत केलेल्या योगदानावर
- प्रतिबंधात्मक चेकअपच्या खर्चावर
- मेडिकल विम्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होणारा वैद्यकीय खर्च
-
उत्तर: तुम्ही आयकर कायदा, 1961 च्या कलम 80D अंतर्गत हेल्थ विमा प्रीमियम आणि प्रतिबंधात्मक चेक अपवर आर्थिक वर्षात ₹25,000 पर्यंत कर सूट मिळवू शकता. तसेच, जर तुम्ही, तुमचा जोडीदार किंवा तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्ही प्रति आर्थिक वर्षात ₹50,000 पर्यंत कर सवलत मिळवू शकता.
-
उत्तर: होय. तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C आणि कलम 80D या दोन्ही अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकता.
-
उत्तर: होय. तुम्ही तुमच्या पालकांसाठी कलम 80D अंतर्गत मेडिकल बिलांशिवायही कर कपातीचा दावा करू शकता. परंतु, सर्व बिले सांभाळून ठेवणे कधी ही उत्तम असते.
-
उत्तर: होय. तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80D आणि कलम 80Dडी या दोन्ही अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकता.
-
उत्तर: होय. तुम्ही कलम 80D अंतर्गत पालकांच्या प्रतिबंधात्मक चेक अपच्या खर्चावर ₹5,000 पर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. तसेच, तो प्रति आर्थिक वर्ष ₹25,000 (ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹50,000) च्या एकूण कलम 80D कपात मर्यादेचा एक भाग आहे.
-
उत्तर: भारतात कर भरणाऱ्या व्यक्ती, HUF आणि NRI आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकतात.
-
उत्तर: होय. तुम्ही कलम 80D अंतर्गत तुमच्या हेल्थ विमा नसलेल्या ज्येष्ठ नागरिक पालकांच्या मेडिकल बिलांवर दावा करू शकता.
-
उत्तर: होय. HUF चे सदस्य आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात ₹25,000 पर्यंत कर सूट घेऊ शकतात. तथापि, HUF सदस्य ज्येष्ठ नागरिक असल्यास एकूण कलम 80 डी सूट मर्यादा प्रति आर्थिक वर्षात ₹50,000 पर्यंत वाढते.
-
उत्तर: नाही, पेमेंट कॅशने केले असल्यास तुम्ही तुमच्या हेल्थ विमा प्रीमियमवरील कलम 80D कपात घेऊ शकत नाही.
-
उत्तर: नाही, तुम्ही ग्रुप हेल्थ विमा पॉलिसींसाठी कलम 80D अंतर्गत कर लाभ घेऊ शकत नाही.
-
उत्तर: होय, तुम्ही तुमच्या जागतिक हेल्थ विमा पॉलिसी अंतर्गत देशाबाहेर मिळणाऱ्या उपचारांसाठी कर सवलत मिळवू शकता. परंतु, तुमची विमा कंपनी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
-
उत्तर: नाही, जर तुमची मुले तुमच्यावर अवलंबून नसतील, तर तुम्ही सेक्शन 80D अंतर्गत त्यांच्या हेल्थ विमा प्रीमियम आणि प्रतिबंधात्मक हेल्थ चेक अपसाठी कर लाभ घेऊ शकत नाही. परंतु, तुमची मुले त्यांच्या एकूण उत्पन्नावर कलम 80D अंतर्गत कर कपातीचा लाभ घेऊ शकतात.
-
उत्तर: उत्तर: होय, तुमचे पालक तुमच्यावर अवलंबून नसले तरीही तुम्ही त्यांच्यासाठी भरलेल्या हेल्थ विमा प्रीमियमसाठी कर लाभ घेऊ शकता.
-
उत्तर: होय, तुम्ही कलम 80D अंतर्गत एकापेक्षा जास्त हेल्थ विमा पॉलिसींसाठी कर सवलत घेऊ शकता. परंतु, एकूण सवलत मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी ₹25,000 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹50,000 प्रति आर्थिक वर्ष राहील.
-
उत्तर: होय. तुम्ही आणि तुमचे वडील दोघेही तुमच्या वडिलांच्या हेल्थ विमा पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमसाठी कर सवलतघेऊ शकता.