भारती AXA आरोग्य विमा

(57 Reviews)
Insurer Highlights

*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply

*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply

Back
Get insured from the comfort of your home
Get insured from the comfort of your home
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Who would you like to insure?

  • Previous step
    Continue
    By clicking on “Continue”, you agree to our Privacy Policy and Terms of use
    Previous step
    Continue

      Popular Cities

      Previous step
      Continue
      Previous step
      Continue

      Do you have an existing illness or medical history?

      This helps us find plans that cover your condition and avoid claim rejection

      Get updates on WhatsApp

      Previous step

      When did you recover from Covid-19?

      Some plans are available only after a certain time

      Previous step
      Advantages of
      entering a valid number
      You save time, money and effort,
      Our experts will help you choose the right plan in less than 20 minutes & save you upto 80% on your premium

      भारती AXA आरोग्य विमा

      सर्व विमा प्रमाणेच आरोग्य विमा देखील एक विमा उत्पादन आहे. आरोग्य विमा मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. आरोग्य विमा मध्ये तुम्ही एक निर्धारित रकमेसाठी विकत घेऊ शकता, ज्याबादल्यात तुम्हाला तुमच्या विमा ची मर्यादा पूर्ण होई पर्यन्त विमा कंपनीला हफ्ते भरावे लागतात. भारती AXA चा आरोग्य विमा तुमच्या सर्व वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन तुम्हाला विविध पप्रकारच्या सेवा पुरवते. यात काशलेस उपचार सुविधा, सर्वभौम विमा, गंभीर आजार विमा, प्रसूतिच्या वेळेला पूर्ण सहयोग आणि इतर प्रकारचे विमा समाविष्ट आहेत. तुम्ही विमा खरेदी करताना तुमच्या सोई प्रमाणे अधिक सोई विम्यात समविष्ठ करून तुमच्या साठी त्याला वैयक्तिक करून घेऊ शकता. ग्राहकांना सर्व सुविधा वेळेवर आणि त्वरित उपलब्ध व्हाव्या यासाठी भारती AXA विविध हॉस्पिटल्स च्या शृंखला सोबत येऊन काम करते

      Read More

      भारती AXA जनरल इन्शुरेंस कंपनीबद्दल माहिती

      भारती AXA इन्शुरेंस कंपनी ही एक प्रायवेट कंपनी असून ती भारती एनटेरपरइसएस या स्वदेशी आणि AXA या परदेशी कंपनी समूह, एकत्र येऊन इच्छुक माणसाना विमा प्रदान करण्याचा काम करते. या कंपनी द्वारे लोकाना आरोग्य ते जीवन विमा पर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होतात. ही कोमापणी भारतासह यूरोप आणि अमेरिका मधील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. सर्वपैलूतरवार कार्यरत असल्यामुळे 2010 साली भारती AXA जगितील सर्वात मोठ्या 10 कंपनी मध्ये समाविष्ट होती. भारती AXA कंपनी सन 2008 मध्ये सुरू झाली आणि त्याच वर्षामध्ये कंपनीला ISO 9001:2008 आणि ISO 27001:2005 ही प्रमाणपत्रे मिळाली. 2012 नंतर या दोन्ही प्रमानपत्रांची वैधयता वाढवण्यात आली.

      एका दृष्टिक्षेपात भारती AXA हेल्थ इन्शुरेंस

      वैशिष्ट्ये तपशील
      नेटवर्क हॉस्पिटल्स 4500+
      इन्शुरेंस दावे 89%
      पूर्ण इन्शुरेंस दावे 18 लाख
      इन्शुरेंस ग्राहक संख्या 1.3 दशलक्ष
      विमा नूतनीकरण आयुष्यभर

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनांतर्गत काय समाविष्ट आहे?

      पुढील गोष्टी भारती ए क्स ए आरोग्य विमा योजने मध्ये समाविष्ट आहेत:

      • डिअलिसीस, केमोथेरेपी, व्यतिरिक्त सर्व सुविधा ज्याना 24 तास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते.
      • असे आजार किंवा जखमा ज्यांच्यावर वैद्यकीय उपचार घरी देखील होऊ शकतात.
      • भारती AXAआरोग्य विमा योजनेअंतर्गत पुढील रोगांवरील उपचार कंपनी द्वारे उचलला जातो.
        • अंतिम आजार
        • कर्करोग
        • हृदयविकार
        • महधमनी वरील शस्त्रक्रिया
        • करोनरी हृदयरोग
        • करोनरी धमनी बायपास सर्जरि
        • स्ट्रोक
        • हृदय झडप शस्त्रक्रिया
        • मूत्रपिंड निकामी होणे
        • अप्लास्टिक अनेमिया
        • अंतिम यकृत निकामी होणे
        • अंतिम फुफुस विकार
        • कोमा
        • मल्टिपल सकलोऱ्ओसईस
        • बर्न्स
        • मोटर न्यूरॉन्स
        • बोन मॅऱ्रो प्रत्यारोपण

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना अंतर्गत काय समाविष्ट नाही?

      पुढील गोष्टीं भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेअंतर्गत वगळण्यात आल्या आहेत:

      • विमा खरेदी केल्यानंतर जर 30 दिवसांत रोगाची लागण झाल्यास त्यावरील उपचार योजनेत समाविष्ट करन्यात नाही येत.
      • योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षांपर्यंत पुढील वैद्यकीय सबबी विमा अंतर्गत समाविष्ट नाहीत.
        • मोतीबिंदू शस्त्रक्रिया
        • बिनपघात सांधे बदल
        • डायालिसीस
        • शस्त्रक्रिया जिच्याशिवाय रुग्ण दगवण्याचे शक्यता नसल्यास
        • लिंग बदल शस्त्रक्रिया
        • हर्निया, मूळव्याध किंवा गुद्दद्वारातील आजार
        • गर्भधारणा व त्यासंबंधी उपचार
        • गॅस्ट्रिक त्रास व अलसर
        • एड्स व त्यासंबंधी आजार
        • डोळे व कानाची नियमित तपासणी
        • कोणतेही घातक नसलेले आजार

      आत्महत्या, किंवा मानसिक आजार योजने मध्ये उपलब्ध नाहीत.

      भारती ए क्स ए आरोग्य विमा महत्त्वाची वैशिष्ट्ये:

      भारती ए क्स ए आरोग्य विमाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:

      • रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 30 दिवस आणि सुटल्यांनातर 60 दिवस झालेल्या खर्चाची भरपाई कंपनी द्वारे केली जाते.
      • खोली भाड्यावर कोणतीही मर्यादा योजने अंतर्गत नाही.
      • योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्यास त्यांना रु 1 कोटी कव्हर दिले जाते.
      • तुम्ही आजीवन विम्याचे नूतनीकरण करू शकता.
      • विमा खरेदी कर्णींपूर्वीचे आजार देखील विम्यात कव्हर केले आहेत. तत्पूर्वी विमाधारकांनी, कंपनीला पूर्वसूचना दिलेली असावी.
      • असे आजार ज्यांच्यावर घरी वैद्यकीय उपचार केले जाऊ शकतात
      • जर तुम्ही विमा खरेदी केल्यापासून 4 वर्ष कोणताही दावा नाही केला तर तुम्हाला १ वैद्यकीय चाचणी मोफत भेटते.
      • तुम्ही भरलेल्या विमा प्रीमियम वर तुम्हाला आयकर कायदा १९६१ मधे रु ५५,००० पर्यन्त सवलतीची तरतूद आहे.

      आरोग्य विमा कंपनी
      Expand

      भारती AXA आरोग्य विमा योजना

      भारतीAXA विमा कंपनी तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ति व सर्व गरज पूर्ण करण्यासाठि विमा प्रदान करते, यातील काही आरोग्य संबंधित योजना ची यादी खाली दिलेली आहे:

      • भारती AXA स्मार्ट हेल्थ अशुएर प्लान

        या विमा योजने मध्ये तुम्हाला रु 4 लाख पर्यन्त चे वैद्यकीय खर्च आणि उपचार करण्याची अनुमति मिळते. या मध्ये तुम्ही नो क्लेम बोनस, मोफत आरोग्य तपासणी आणि आयकर मध्ये बचत अश्या सर्व सुविधा मिळतात.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम 3 लाख ते 4 लाख
        विमा नूतनीकरण आयुष्यभर
        वायाची अट 91 दिवस ते 65 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • 60 दिवस प्री ते 90 दिवस पोस्ट हॉस्पिटल उपचार
        • विम्यात नमूद असलेली पूर्ण रक्कम विमा धारकला मिळते.
        • 130 दिवस डे केअर मधील उपचार समाविष्ट आहेत
        • विम्यात उलब्ध असलेल्या योजना व्यतिरिक्त तुम्ही रुग्णवाहिका कवर, गंभीर आजार कवर, अवयव दान कवर, वार्षिक आरोग्य उपचार कवर आणि आयुष कवर घेऊ शकता.
        • रु 35,000 प्रसूती खर्चासाठी आणि रु 25,000 नवजात शिशु च्या खर्चासाठी दिले जातात.
        • तुम्ही या योजने चे आयुष्यभर नूतनीकरण करू शकता.
      • भारती AXA स्मार्ट सुपर हेल्थ इन्शुरेंस प्लान

        या आरोग्य योजने मध्ये आरोग्य आणि रुग्णालयातील खर्च समविष्ट आहेत.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम 5 लाख ते 7 लाख
        विमा नूतनीकरण आयुष्यभर
        वायाची अट 91 दिवस ते 65 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • या योजने मध्ये रोगाचे निदान होण्यापासून, त्यासंबंधीत चाचण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू चा खर्च, व इतर वैद्यकीय खर्च समाविष्ट आहेत.
        • योजने मध्ये नमूद रकमे पर्यन्त पूर्ण रूम भाडे दिले जाते.
        • 60 दिवस प्री ते 90 दिवस पोस्ट हॉस्पिटल उपचार. जी उपचाराची रक्कम योजने मध्ये नमूद केलेली असेल तिथ पर्यंतच मर्यादित.
        • विम्यात नमूद असलेली पूर्ण रक्कम विमा धारकला मिळते.
        • विमा रक्कम मर्यादेपर्यंत डे केअर मधील उपचार समाविष्ट आहेत
        • विमा रक्कम मर्यादेपर्यंत आयुष केअर मधील उपचार समाविष्ट आहेत
        • विमारक्कम मर्यादेपर्यंत रुग्णालयात उपचार.
        • स्त्री प्रसूती व शिशू साठी कवर
        • कर्करोगशी संबंधित तीव्रता, पहिलं हृदय झटका, स्ट्रोक, ओपेन हार्ट शस्त्रक्रिया, गंभीर आजार, हेपटायटिस, मेंदू विकार, प्राथमिक फुपुस उच्चदाब विकार, नियमित डायालिसीस खर्च, यकृत निकामीपणा, फुपुस आजार, कोमा व मोटर न्यूरॉन आजार.
      • भारती AXA स्मार्ट हेल्थ इन्शुरेंस क्लासिक प्लान

        या योजने मध्ये विमा रक्कम वाढीव देण्याची तरतूद आहे.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम 10 लाख, 15 लाख ते 20 लाख
        विमा नूतनीकरण आयुष्यभर
        वायाची अट 91 दिवस ते 65 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • 10 दिवस रुग्णालयातील रु 10,000 पर्यन्त चा खर्च
        • रु 10,000 पर्यंत चे आपत्कालीन अॅक्सिडेंट कवर
        • रु 2500 पर्यन्त जनावर चवल्यास लसीकरण उपलब्ध
        • वार्षिक आरोग्य चाचणी
        • गंभीर आजाराच्या उपचारासाठी एकरकमी विमा अनुदानाची तरतूद.
        • मूळ योजनेमध्ये नमूद सर्व सुविधा उपलब्ध
      • भारती AXA स्मार्ट हेल्थ इन्शुरेंस उबर प्लान

        या योजने मध्ये उच्चतम विमा रक्कमेचे प्रवाधआन आहे.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम 20 लाख, ते 100 लाख
        विमा नूतनीकरण आयुष्यभर
        वायाची अट 91 दिवस ते 65 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • प्रसूती व नवजात शिशु साठी रु. 50,000.
        • जनावर चावल्यास लासिकर्णकारिता रु 5000
        • जर गंभीर अजरीचा उपचारचा खर्च विम्यात नमूद रकमे पेक्षा अधिक असेल तर एकरकमी पेमेंट
        • रु 500, रु 1000, रु, 2000, ते रु 3000 दैनंदिन रुग्णालय भत्ता 30 दिवसंपर्यंत मर्यादित
        • देशात एयर अॅम्ब्युलेन्स कवर
        • दांतरुग्ण कवर
        • मूळ योजनेमध्ये नमूद सर्व सुविधा उपलब्ध
      • भारती AXA स्मार्ट हेल्थ क्रिटिकल इलनेस इन्शुरेंस प्लान

        ही विमा योजना खासकरून गंभीर अजरांपासून संवरक्षण लाभ देण्याकरता निर्माण करनेत आली आहे. याची वैशिष्ट्ये आणि तरतुदी खालील प्रमाणे आहेत.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम एकरकमी
        वायाची अट 91 दिवस ते 55 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • रुग्णालयातील सर्व वैद्यकीय खर्च
        • रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि आधी चा खर्च
        • गंभीर आजार पुनरप्राप्ती
        • आवायवांचे प्रत्यारोपण
        • घरगुती शुषुश्रा
        • फीसईओथेरपी
        • रुग्णालय भत्ता
        • सोबत येणाऱ्या व्यक्तीचा खर्च
        • आपतकालीन रुग्णवाहिका
        • बाल शिक्षणासाठी अनुदानाची तरतूद
        • नूतरणीकर्णवर 5% लाभ
        • वैद्यकीय तपासणी साठी केलाला खर्च परतफेड
        • विमा योजना एक कंपनी मधून दुसऱ्या कंपनी मध्ये हलवण्याची तरतूद.
        • एकाच कुटुंबातील चार व्यक्तीचा समावेश एकाच योजने मध्ये होऊ शकतो.

        पुढील गंभीर आजार या योजने मध्ये समाविष्ट आहेत:

        • अंतिम आजार
        • कर्करोग
        • हृदयविकार
        • महधमनी वरील शस्त्रक्रिया
        • करोनरी हृदयरोग
        • करोनरी धमनी बायपास सर्जरि
        • स्ट्रोक
        • हृदय झडप शस्त्रक्रिया
        • मूत्रपिंड निकामी होणे
        • अप्लास्टिक अनेमिया
        • अंतिम यकृत निकामी होणे
        • अंतिम फुफुस विकार
        • कोमा
        • मल्टिपल सकलोऱ्ओसईस
        • बर्न्स
        • मोटर न्यूरॉन्स
        • बोन मॅऱ्रो प्रत्यारोपण
      • भारती AXA स्मार्ट इंडिविसुयल पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरेंस प्लान

        या योजनेमध्ये अपघाती मृत्यू किंवा आपघतातील अपांगतत्व यावर उपचार कारण्यासाठी तुम्हाला मदत केली जाईल.

        योजने चा प्रकार वैयक्तिक किवा कौटुंबिक
        विमा रक्कम एकरकमी
        वायाची पात्रता 65 वर्ष

        वैशिष्टय आणि फायदे:

        • तुम्ही विमा योजनेचे नूतनीकरण करू शकता आणि त्यावर तुम्हाला 5% सवलत दिली जाईल.
        • तुम्ही विमा खरेदीकरताना रक्कम निर्धारित करू शकता.
        • या योजने मध्ये पूर्ण अपांगत्वासाठी कवर उपलब्ध आहे.
        • या योजने मध्ये अंशीक अपांगत्वासाठीदेखील कवर उपलब्ध आहे.
        • अपघाती मृत्यूचा समावेश देखील मूळ विमा योजने मध्ये करण्यात आला आहे.
        • पार्थिव शरीर वाहतूक चा खर्च देखील विमा मध्ये समविष्ट आहे.
        • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तुम्हाला दैनंदिन भत्ताची सोय उपलब्ध आहे.
        • कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदीत झालेले खर्च विमा कंपनी द्वारे उचलले जातात.
        • भारती AXAचे 4300 रुग्णालयांसोबत संबंध आहेत.
        • रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च कंपनीद्वारे उचलला जातो.
        • गंभीर रोगांचा समावेश या योजनेत आहे.
        • अवयव प्रतयरोपण
        • रुग्णवाहिकेचा खर्च
        • सोबत येणाऱ्या व्यक्तीचा खर्च
        • पॉलिसीधारकाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च
        • योजनेत नमूद असलेले सर्व खर्च कंपनीद्वारे दिले जातात.
        • तुम्ही विमा एक कंपनीपासून दुसऱ्या कंपनी मध्ये बदल करून घेऊ शकता.
        • जर अपघातात दुहेरी मृत्यू झाला असेल तर विम्याच्या 200% रक्कम ही प्रदान केली जाते.

      पॉलिसीबाजार वरुन भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना कशी खरेदी करावी?

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना, भारती ए क्स ए च्या अधिकृत संकेतस्थाळावरून अधिकारीकरीत्या खरेदी करण्याची तारतूद आहे. तुम्ही विमा कंपनीच्या तुमच्या जवळच्या शाखेत भेट देऊन तेथून थेट खरेदी करू शकता. आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी तुम्ही भारती ए क्स ए अधिकृत एजंटशी देखील संपर्क साधू शकता. परंतु विमा विकत घेण्यासाठी सर्वात सोपं आणि सहज मार्ग म्हणजे पॉलिसीबाजार जेथून तुम्ही काही क्षणातच तुम्हाला हवी ती भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना खरेदी करू शकता. ही विमा योजना खरेदी करण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत.

      • पायरी एक:

      www.policybazaar.com या संकेत स्थाळाला भेट द्या

      • पायरी दोन:

      आरोग्य विमा पृष्ठावर जा

      • पायरी तीन:

      योजनांची तुलना करण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स कॅल्क्युलेटर पेजवर जाऊन तुलना करून तुमच्या साठी योग्य ती विमा योजना विमा रक्कम सोबत खरेदी करू शकता.

      • पायरी चार:

      तुमचे नाव, संपर्क क्रमांक, योजनेचा प्रकार, वय इत्यादी संबंधित मुळभुत माहिती द्या.

      • पायरी पाच:

      तुमच्या माहितीच्या आधारे, कॅल्क्युलेटर वेगवेगळ्या योजना सुचवेल

      पायरी सहा:

      तुम्हाला भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना मधली जी योजना तुमच्या गरजांशी परिपूर्ण जुळणी करत असल्यास ती योजना खरेदी करा.

      • पायरी सात:

      प्रीमियम ऑनलाइन भरा आणि भारती ए क्स ए आरोग्य विम्याकडून सर्वसमावेशक आरोग्य कवच मिळवा

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण कसे करावे?

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना ही इतर विमा योजनांप्रमाणे तुम्हाला योजना कालावधी पर्यंतच त्याचे फायदे प्रदान करते. त्यानंतर तुम्हाला योजनेचे मिळणारे फायदे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला, पॉलिसीचे नूतनीकरण नूतनीकरणाच्या देय तारखेपूर्वी किंवा त्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या सोई साठी नूतनीकरण भारती ए क्स ए ने करणे सोपे केले आहे आणि तुम्ही काही क्षणातच विमा योजना खरेदी करू शकता. भारती ए क्स ए आरोग्य विमा योजना योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी फक्त खालील पायऱ्या फॉलो करा.

      • policybazaar.comला भेट द्या
      • भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेच्या मुख्यपृष्ठावरील 'नूतनीकरण' पर्यायावर जा
      • दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या पूर्व पॉलिसीचा प्रकार निवडा
      • तुमचे तपशील जसे की डीओबी, मोबाईल नंबर इ. प्रविष्ट करा.
      • तुम्हाला नूतनीकरण करायचे असलेली भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनानिवडा.
      • तुमचापूर्व विमा क्रमांक द्या
      • प्रीमियम ऑनलाइन भरा. यासाठी तुम्ही तुमच्या सोईनुसार पैसे हस्तांतरित करण्याची पद्धत निवडू शकता.
      • पैसेयशस्वीरित्या हस्तांतरित झालयावर तुमची नूतनीकरणची प्रक्रिया पूर्ण होईल.
      • योजनेचे कागदपत्र तुम्हाला सॉफ्ट कॉपीरूपात तुमच्या नोंदणीकृत मेल आयडीवर पाठवली जाईल

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेचा दावा कसा दाखल करायचा?

      आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत दावा करण्याचे दोन मार्ग आहेत:

      कॅशलेस आधार

      भारती ए क्स ए च्या शृंखला रुग्णालयामध्येच उपचार करणे आवश्यक आहे. उपचाराचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम निर्धारित प्रक्रियेनुसार अर्ज भरून अधिकृतता घ्यावी लागेल. प्रतिपूर्ती आधारावर दाव्यांच्या बाबतीत, विमा कंपनीला त्यांच्या विहित कार्यपद्धतीनुसार कळवावे लागते. पॉलिसीधारकाने दाव्याचा अर्ज डिस्चार्ज सारांश, प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी सादर करावयाची बिले यांसारखी कागदपत्रे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर मिळतील याची खात्री करून घ्यावी. एकदा डॉक्टरांनी हॉस्पिटलायझेशन किंवा उपचारांचा सल्ला दिला की, तुम्ही तुमचा दावा विमा कंपनी ला कळवा. नियोजित हॉस्पिटलायझेशनच्या ४८ तासांच्या आत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या ४८ तासांच्या आत किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्यापूर्वी यामधील जे आधी असेल ते कॉल सेंटरला १८०० १०३ २२९२ या क्रमांकावर कॉल करून हे पूर्व-अधिकृतीकरण करू शकता. कॅशलेस दावा दाखल करण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे:

      • कोणत्याही भारती ए क्स ए ईच्या शृंखला रुग्णालयात दाखल व्हा
      • टी पी एडेस्कवरील प्रतिनिधीला तुमचे भारती ए क्स ए हेल्थ कार्ड दाखवा
      • हॉस्पिटलच्या विमाडेस्कवर उपलब्ध असलेला 'कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म' पूर्ण करा.
      • तुमची हेल्थ कार्ड कॉपी आणि तुमची फोटो ओळख कॉपीसह तुमचा अधिकृतता फॉर्म सबमिट करा
      • तुम्हाला रुग्णालयाच्यामंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल.
      • कोणत्याही महत्त्वाच्या वैद्यकीय तपशीलांसह पूर्ण केलेला फॉर्म ईमेल टी पी एद्वारे पाठवा
      • सर्व बिलांसह तपशील सत्यापित करा आणि स्वाक्षरी करा
      • तुम्ही तपासणी आणि मूळ डिस्चार्ज लेटर रुग्णालयामध्ये सोडू शकता आणि तुमच्या संदर्भासाठी त्यांची छायाप्रत ठेवू शकता

      काही कारणास्तव जर विमा अर्ज फेटाळला गेल्यास तुम्ही, सुधारित बादलांसाह पुनः अर्ज करू शकता.

      दावा प्रक्रिया - प्रतिपूर्ती सुविधा

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेच्या दावा प्रतिपूर्ति सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील पायऱ्या पूर्ण करा:

      • कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हा
      • हे पूर्व-अधिकृतीकरण कॉल सेंटरला१८०० १०३ २२९२ या क्रमांकावर कॉल करून कळवा. तुम्ही service@bhartiaxa.com वर ईमेल करून किंवा व्हॉटसअप वर या क्रमांकावर ०२२४८८१५७६८ वर संपर्क साधू शकता. नियोजित हॉस्पिटलायझेशनच्या ४८ तासांच्या आत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या ४८ तासांच्या आत किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यापूर्वी यापैकी जे आधी असेल ते.
      • आवश्यकतेनुसार हॉस्पिटलचे बिल पूर्ण भरावे
      • डिस्चार्जच्या वेळी सर्व मूळ बिले, कागदपत्रे आणि अहवाल गोळा करा
      • क्लेम फॉर्म भरून आणि क्लेम फॉर्ममध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे जोडून प्रक्रिया आणि प्रतिपूर्तीसाठी टीपीएकडे दावा नोंदवा. क्लेमची माहिती भारती ए क्स ए हेल्थ इन्शुरन्स टोल फ्री क्रमांक १८०० १०३ २२९२द्वारे दिली जाऊ शकते.

      दावा सेटलमेंटसाठी सबमिट करावयाची कागदपत्रे:

      विमाधारकाच्या रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

      • मूळ स्वरूपात योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म
      • मूळ योजना कागदपत्र
      • दावेदाराचे विधान
      • स्थानिक अधिकाऱ्याने दीलेले मृत्यू प्रमाणपत्र
      • नॉमिनी चे ओळख पत्र वबँक अकाऊंट ची माहिती
      • मेडिको लीगल कॉज ऑफ डेथ ची माहिती व कागदपत्रे (अपघाती मृत्यू असल्यास)
      • रूग्णालय/वैद्यकीय व्यावसायिकाकडून मूळ बिले, पावत्या आणि डिस्चार्ज कार्ड;
      • केमिस्टकडून मिळालेली मूळ बिले;
      • फॅमिली डॉक्टर चा अहवाल (आवश्यक असल्यास)
      • औषधांचा सल्ला देणारे वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रिस्क्रिप्शन, निदान चाचण्या/सल्ला;
      • मूळ पॅथॉलॉजिकल/निदान चाचणी अहवाल/रेडिओलॉजी अहवाल आणि पेमेंट पावत्या;
      • महापालिका अधिकाऱ्यांकडून मृत्यू प्रमाणपत्र(आवशक्य असल्यास)
      • शवविच्छेदन अहवाल, (आवशक्य असल्यास)
      • पंचनामा अहवाल(आवशक्य असल्यास)
      • कोरोनरचा अहवाल(आवशक्य असल्यास)
      • प्रथम माहिती अहवाल, अंतिम पोलिस अहवाल, (आवशक्य असल्यास)
      • शवविच्छेदन अहवाल(आवशक्य असल्यास)
      • हॉस्पिटलच्या अधिकार्‍यांकडून मृत्यूचा सारांश, जर हॉस्पिटलने मृत्यूची पुष्टी केली असेल(आवशक्य असल्यास)
      • भारती ए क्स ए हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या आवश्यकतेनुसार क्लेम ऍक्सेस करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र मागवु शकते.

      भारती ए क्स ए आरोग्य विमा प्रीमियम गणना

      विमा प्रीमियम गणना कारण्यासाठी खालील घटक विचारात घेतले जातात:

      • प्रवेशाचे वय:

      भारती ए क्स ए आरोग्य विमा खरेदी करताना किंवा तिचे नूतनीकरण करताना तुमचे वय तुम्हाला भरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रीमियमवर परिणाम करते. जसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला आरोग्य विम्याचे दावे करण्याची अधिक शक्यता असते.

      • पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अटी:

      पॉलिसी खरेदी करताना किंवा त्यापूर्वी तुम्हाला एखाद्या वैद्यकीय स्थितीचा त्रास होत असल्यास तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल.

      • विम्याची रक्कम:

      भारती ए क्स ए आरोग्य विमा योजनेअंतर्गत तुम्ही निवडलेली विम्याची रक्कम थेट तुमच्या प्रीमियमवर परिणाम करते. विम्याची रक्कम जितकी जास्त असेल तितका जास्त प्रीमियम तुम्हाला तुमच्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत मिळणारे जास्त कव्हरेज लक्षात घेऊन भरावे लागेल.

      • अस्वास्थ्यकर जीवनशैली:

      जे लोक नियमितपणे मद्यपान करतात, धुम्रपान करतात किंवा व्यसनाधीन पदार्थ घेतात ते आजारी पडण्याची अधिक शक्यता असते. आणि त्यामुळे आरोग्य विम्याचे दावे करण्याची अधिक शक्यता असते. अश्या लोकांना निरोगी जीवनशैली असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त आरोग्य विमा प्रीमियम भरावा लागतो.

      • कव्हरेजचा प्रकार:

      भारती ए क्स ए आरोग्य विमा प्लॅनचा जो प्रकार तुम्ही निवडता त्याचा तुम्हाला भरावा लागणार्‍या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरही मोठा प्रभाव पडतो.

      रहेजा क्यूबीई आरोग्य विमाचे शृंखला रुग्णालय

      शृंखला रुग्णालय हे एक रुग्णालय आहे ज्याचा विमा कंपनीशी विमाधारक व्यक्तींना कॅशलेस उपचार देण्यासाठी करार आहे. भारती ए क्स ए आरोग्य विमाची देशभरात ४५०० हून अधिक शृंखला रुग्णालय आहेत जिथे तुम्ही धावपळ न करता आणि पैशाची व्यवस्था न करता कॅशलेस उपचार घेऊ शकता.

      भारती ए क्स ए आरोग्य विमा कंपनीशी संपर्क कसं साधावा?

      भारती ए क्स ए हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या १८०० १०३ २२९२ या क्रमांकावर कॉल करून कळवा. तुम्ही service@bhartiaxa.com वर ईमेल करून किंवा व्हॉटसअप वर या क्रमांकावर ०२२४८८१५७६८ वर संपर्क साधू शकता.

      वारंवार विचारले जाणारे प्रश्न

      • प्रश्न 1: भारती AXA ऑनलाईन खरेदी ची प्रक्रिया काय आहे?

        उत्तर: सर्वप्रथम तुम्ही विमा कंपनी च्या संकेत स्थळावर भेट द्या. तिथे नवीन विमा योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमची वैद्याता तपासून पहा. तुमचे वय व तुम्हाला हव्या असलेल्या रकमे पर्यंत जी योजना तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिची निवड करा. विमा खरेदी करण्यापूर्वी पूर्ण वैद्यकीय चाचणी करून घ्या. जेणेकरून विमा खरेदी करते वेळी तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला नक्की काय हवं आहे तसेच काय तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. एकदा सगळं व्यवस्थित तपासून झाला की तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करा. जी माहिती विचारली आहे ती काळजी पूर्वक व खरी पुरवा. जे कागदपत्र विमा कंपनी ला हवे असतील त्याच्या प्रती त्यांना ऑनलाईन पुरवा. अर्ज पून्हा तपासून पहा आणि भरून टाका. प्रीमियम ची रक्कम तुम्ही ऑनलाईन माध्यमातून भरू शकता. यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंट करू शकता. प्रीमियम किंवा हफ्ता भरल्यानंतर तुमची पॉलिसी कव्हर चालू होईल. विम्याचे कागद तुम्हाला टपाल माध्यमातून घरपोच दिले जातील.
      • प्रश्न 2: विमा सुविधा कशी प्राप्त करावी?

        उत्तर:

        पुढील पायाऱ्याद्वरे तुम्ही विमा सुविधेचा लाभ घेऊ शकता.

        • पॉलिसी धारक रुग्णालयात दाखल होतो.
        • रुग्णालयात उपचार करतो.
        • रुग्णालयाचे बिल भगवतो.
        • सर्व कागदपत्रे रुग्णालयातून मिळवतो.
        • विमा दावा अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत योग्य ती कागदपत्र पुरवून अर्ज योग्य ठिकाणी देऊन येतो.
        • विमा कंपनीने नियुक्त केलेला तिसरा पक्ष सर्व दावे वेवस्थित तपासून पाहतो.
        • सर्व काही सुरळीत असल्यास दाव्याची रक्कम २१ दिवसांच्या आधी अर्जदाराला दिली जाते. जर दावा फेटाळला गेला तर तसे अर्जदाराला पत्राद्वारे कळवले जाते.
      • प्रश्न 3: भारती AXA आरोग्य विमा साठी ची वयमाऱ्यादा काय आहे? आणि योजने मध्ये मुलांचा समावेश केला जातो का?

        उत्तर: एका योजने मध्ये पॉलिसी धारक व्यतिरिक्त तीन व्यक्ती समाविष्ट केल्या जाऊ शकतात. पॉलिसी धारकाचा जोडीदार व त्यांची दोन मुलं इतके लोक एका योजने मध्ये येऊ शकतात. मुलांची वय २ वर्ष ते २३ वर्षं असेल तरच योजना कव्हर त्यांना लाभ देऊ शकते.
      • प्रश्न 4: भारती AXA चे कव्हर परदेशातही लागू होते का?

        उत्तर: नाही. भारती AXA चे सर्व लाभ भारत पर्यंतच मर्यादित आहेत.
      • प्रश्न 5: भारती AXA आरोग्य विमा मध्ये कमाल व किमान विमा रक्कम किती आहे?

        उत्तर: भारती AXA आरोग्य विमा मध्ये कमाल रू ५ लाख व किमान रू २ लाख ची तरतूद आहे.
      • प्रश्न 6: भारती AXA च्या कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया काय आहे?

        उत्तर:

        जर तुम्ही आपातकाळात रुग्णालयात दाखल झालाय तर तुम्ही पुढील प्रकारे कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकता:

        • तुम्ही विमा कंपनीने दिलेल्या हेल्थ कार्ड च वापर करून सूचित असलेल्या रुग्णालयात दाखल व्हा.
        • तुम्हाला रूग्णालया द्वारे कॅशलेस दाव्याचा अर्ज भरून योग्य त्या ठिकाणी द्यावा लागेल.
        • विमा कंपनीने नियुक्त केलेल्या तिसरा पक्ष तुमच्या दाव्याची पूर्ण चाचणी करेल व दव्यासंबधित त्यांचा अहवाल विमा कंपनीकडे व्यक्त करेल.
        • अहवालाची पूर्ण शहानिशा झाल्यानंतर ६ तासाच्या आत तुम्हाला विमा कंपनी द्वारे तुमच्या दव्याबद्दल सूचित केले जाईल.
        • अहवालात फक्त तुमच्या योजनेमध्ये समाविष्ट खर्च मान्य करण्यात येतील. त्याव्यतिरिक्त सर्व खर्च पॉलिसी धरकला भागवावे लागतील.
      • प्रश्न 7: भारती AXA विमा योजनेचे नूतनीकरण कसे करावे?

        उत्तर: भारती AXA चे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला भारती AXA च्या हेल्प डेस्क शी संपर्क साधावा लागेल.
      Policybazaar exclusive benefits
      • 30 minutes claim support*(In 120+ cities)
      • Relationship manager For every customer
      • 24*7 claims assistance In 30 mins. guaranteed*
      • Instant policy issuance No medical tests*
      book-home-visit
      Disclaimer: Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by an insurer.
      top
      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL