एखाद्या व्यक्तीस जीवन विमा योजना निवडण्यापूर्वी विम्याची रक्कम म्हणजेच सम इंश्युअर्ड आणि विमाराशी म्हणजेच सम अॅश्युअर्ड या मूलभूत घटकांची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही योजनेचे मूल्यांकन या दोन घटकांवर अवलंबून असते. या दोन्ही घटकांचे वास्तविक अर्थ तसे लक्षणीय भिन्न आहेत, तरीही एखाद्या नवशिक्यास सम अॅश्युअर्डचा आणि विमा उतरलेल्या रक्कमेचा म्हणजेच सम इंश्युअर्डचा अर्थ सामान वाटू शकतो. सम अॅश्युअर्ड हा लाभ संबोधतो तर विम्याची रक्कम किंवा सम इंश्युअर्ड म्हणजे विमा नुकसानाची भरपाई होय.
#All savings and online discounts are provided by insurers as per IRDAI approved insurance plans | Standard Terms and Conditions Apply
By clicking on "View plans" you agree to our Privacy Policy and Terms of use
~Source - Google Review Rating available on:- http://bit.ly/3J20bXZ
जीवनरहित किंवा अजीवन विमा योजना जसे कि मोटर विमा, गृह विमा आणि आरोग्य विमा, जे नुकसानभरपाईच्या तत्त्वावर कार्य करतात त्यांना विम्याची रक्कम किंवा सम इंश्युअर्ड असे म्हणतात. यामध्ये नुकसानभरपाई संदर्भित विमाधारकाने कोणत्याही तोटा, नुकसान किंवा दुखापतीसाठी भरपाई दिलेली असते. या योजना फक्त नुकसान झालेल्या वस्तूंचीच भरपाई देतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती १ लाख विमा रकमेची आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करते आणि जर विमाधारकाच्या रुग्णालयाचा खर्च १ लाख पेक्षा कमी असेल तर ती किंमत पूर्णपणे विमा कंपनीद्वारे फेडली जाते. परंतु, जर रुग्णालयाचा खर्च १ लाख रुपयांपेक्षा पेक्षा जास्त झाला असेल तर विमा कंपनी फक्त १ लाख रुपये देण्यास जबाबदार असेल आणि उर्वरित रक्कम पॉलिसीधारकाला घ्यावी लागेल. या संकल्पनेमागील कल्पना अशी आहे की विमाधारकाला भरपाईमुळे आर्थिक लाभ होऊ नये तसेच झालेल्या नुकसानीची समान रक्कम त्याला द्यावी लागेल. त्यामुळेच जीवनरहित किंवा अजीवन विमा योजनांच्या कव्हरला सम इंश्युअर्ड म्हंटले जाते.
सम अॅश्युअर्ड किंवा विमाराशी हि पॉलिसीधारकास विमा कंपनीने विमा उतरवताना देय केलेली एक पूर्वनिर्धारित रक्कम असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण जीवन विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा विमा कंपनी हि विमाधारक विमाधारकाच्या निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला विमा रक्कम देण्याची हमी देते. हि रक्कमच विमाधारकास विमाकंपनीस किती प्रीमियम रक्कम द्यावयाची आहे हे ठरवते.
सामान्यत: जीवन विमा योजनांमध्ये विमा रक्कम म्हणजेच सम अॅश्युअर्डची आणि अजीवन-विम्याच्या योजनांमध्ये विमाराशी म्हणजेच इंश्युअर्डची ऑफर असते. आजकाल विमा कंपनी अश्या योजना देऊ करतात ज्यामध्ये वैद्यकीय बिलांच्या भरपाई सहित कोणत्याही परिस्थितीत अपरिभाषित किंवा अचानक उदभवलेल्या वैद्यकीय घटना घडल्यास सुद्धा तुम्हाला योजनेतून लाभ मिळतो. या प्रकारच्या ड्युअल-फायद्याच्या योजना नॉन-लाइफ तसेच लाइफ इन्शुरन्स कंपन्यांद्वारे दिल्या जातात. या प्रकारचे एक सामान्य उदाहरण म्हणजे गंभीर आजार योजना, या योजनेअंतर्गत पॉलिसी मध्ये निर्दिष्ट केलेल्या पॅरालिसिस, हृदयविकाराचा झटका, कर्करोगाचा त्रास यांसारख्या गंभीर आजारांसाठी रक्कम देऊ केली जाते व हि योजना विमाधारकास लाभदायक ठरते. अजून एक उदाहरण म्हणजे, हॉस्पिटलची कॅश पॉलिसी, जी पूर्ण कालावधीसाठी पूर्व अपरिभाषित मर्यादेपर्यंत दैनंदिन रोख लाभ देते. त्याचप्रमाणे, सर्जिकल बेनिफिट योजना हि पॉलिसीधारकास एखाद्या शस्त्रक्रियेच्या बाबतीत पूर्व-परिभाषित रक्कम देऊ करते.
जर एखादा एजंट तुम्हाला विकत घेतलेल्या आरोग्य विमा पॉलिसीवर सम अॅश्युअर्डराशी देत असेल तर तुम्हाला तो नक्कीच एक लाभदायक योजना देत आहे. परंतु सरतेशेवटी एक मूलभूत आरोग्य योजना जी तुमच्या वैद्यकीय खर्चाची परतफेड करेल ती नक्कीच प्रत्येकासाठी एक प्राथमिक गरज असते.