सध्याच्या काळात, जीवन विमा योजनेचा विचार आर्थिक नियोजनामधील एक महत्त्वाचा भाग म्हणून केला जात आहे. जीवन विमा योजनेद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेऊ शकता तसेच भविष्यातील महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दीर्घ कालीन गुंतवणुकीचा हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या मार्केट मध्ये भरपूर विमा योजना उपलब्ध आहेत आणि त्यामधून आपल्या गरजेनुसार पॉलिसी निवडणे कधी कधी अवघड वाटू शकते. म्हणूनच, पॉलिसी निवडताना उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच विमा योजनांची ऑनलाईन पध्दतीने तुलना करून जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहणे आवश्यक असते.
तुम्हाला चांगली विमा योजना निवडण्यामध्ये मदत होण्यासाठी आम्ही सध्याच्या आघाडीवर असणाऱ्या विमा योजनांबद्दल खाली माहिती दिली आहे.
मुदत योजना |
प्लॅन घेण्यासाठी वय |
पॉलिसि ची मुदत |
विमा रक्कम |
प्रीमियम पेमेंट पर्याय |
कर सवलत |
आदित्य बिर्ला सन लाइफ प्रोटेक्शर प्लस प्लॅन |
18 वर्षे - 65 वर्षे |
70 वर्षे |
कमीतकमी – 30 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
रेग्युलर पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
इगोन लाइफ आय-टर्म प्लॅन |
18 वर्षे - 65 वर्षे |
80 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
अविवा आय-लाइफ |
18 वर्षे - 55 वर्षे |
75 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
बजाज अलयांझ लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट गोल |
18 वर्षे - 65 वर्षे |
गुंतवणुकीवरील परताव्यासह 75 वर्षे गुंतवणुकीवरील परताव्याविना 80 वर्षे |
कमीतकमी – 50 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
सिंगल पे, लिमिटेड पे आणि रेग्युलर पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C आणि 10(10D) अंर्तगत कर सवलत |
भारती एक्सा लाइफ मंथली एडवांटेज प्लॅन |
6 वर्षे – 12 वर्षे पॉलिसी कालावधी 2 वर्षे – 16 वर्षे पॉलिसी कालावधी पॉलिसी कालावधी चे 91 दिवस – 24 वर्षे जास्तीत जास्त 65 वर्षे – 12 व 16 वर्षे पॉलिसी कालावधी 60 वर्षे – 24 वर्षे पॉलिसी कालावधी |
77 वर्षे, 81 वर्षे आणि 84 वर्षे |
कमीतकमी – 50,000 जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
6 वर्षे, 8 वर्षे आणि 12 वर्षे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
कॅनरा एचएसबीसी इन्व्हेस्टमेंट शिल्ड प्लॅन |
18वर्षे – 50 वर्षे |
65 वर्षे |
लिमिटेड आणि रेग्युलर पे – 10 पट वार्षिक हप्त्याच्या सिंगल पे – कमीतकमी - 1.25 पट सिंगल हप्त्याच्या जास्तीत जास्त – 10 पट सिंगल हप्त्याच्या |
सिंगल पे, लिमिटेड पे आणि रेग्युलर पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
एडलवाईस टोकियो लाइफ सिम्पली प्रोटेक्ट प्लॅन |
18 वर्षे - 65 वर्षे |
80 वर्षे |
कमीतकमी – 25,00,000 रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
सिंगल पे, लिमिटेड पे आणि रेग्युलर पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
एक्साईड लाइफ इनकम एडवांटेज प्लॅन |
10 वर्षे – 55 वर्षे पॉलिसी कालावधी 16 वर्षे असल्यास 6 वर्षे – 55 वर्षे पॉलिसी कालावधी 24 वर्षे असल्यास 3 वर्षे – 50 वर्षे पॉलिसी कालावधी 30 वर्षे असल्यास |
72 वर्षे, 79 वर्षे व 80 वर्षे |
उपलब्ध नाही |
8 वर्षे, 12 वर्षे आणि 15 वर्षे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
फ्युचर जनराली केअर प्लस प्लॅन |
18 वर्षे - 60 वर्षे |
65 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
एचडीएफसी लाइफ 3डी प्लस लाइफ ऑप्शन |
18 वर्षे - 65 वर्षे |
23 वर्षे -85 वर्षे |
कमीतकमी – 50 लाख रुपये हप्त्यामधील परताव्यासाठी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
सिंगल पे, रेग्युलर पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
आयसीआयसीआय पृडेनशील आयप्रोटेक्ट स्मार्ट |
18 वर्षे – 65 वर्षे |
70 वर्षे |
कमीतकमी भरलेल्या हप्त्यावर अवलंबून आहे |
सिंगल पे, रेग्युलर पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
आयडीबीआय आयसुरन्स फ्लेक्सी लॅम्प-संप प्लॅन |
18 वर्षे – 60 वर्षे |
80 वर्षे |
कमीतकमी – 50 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
रेग्युलर पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
इंडिया फर्स्ट स्मार्ट सेव्ह प्लॅन |
5 वर्षे - 65 वर्षे |
75 वर्षे |
उपलब्ध नाही |
सिंगल पे, रेग्युलर पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
कोटक ई-टर्म प्लॅन |
18वर्षे - 65 वर्षे |
75 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये |
सिंगल पे, रेग्युलर पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C आणि 10(10D) अंर्तगत कर सवलत |
मॅक्स लाइफ ऑनलाईन टर्म प्लॅन प्लस |
18 वर्षे - 60 वर्षे |
85 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – 1 करोड रुपये |
रेग्युलर पे किंवा 60 वर्षेपर्यंत पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C 10(10D) अंर्तगत कर सवलत |
पीएनबी मेटलाइफ मेरा टर्म प्लॅन |
18 वर्षे – 65 वर्षे |
75 वर्षे, 99 वर्षे |
कमीतकमी – 10 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
प्रमेरिका स्मार्ट वेल्थ लाइफ इन्शुरन्स प्लॅन |
8 वर्षे – 55 वर्षे |
75 वर्षे |
उपलब्ध नाही |
5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
रिलायन्स निप्पोन लाइफ ऑनलाईन इनकम प्रोटेक्ट प्लॅन |
18 वर्षे – 55 वर्षे |
75 वर्षे |
कमीतकमी – 35 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
सहारा संचित जीवन बिमा प्लॅन |
18 वर्षे – 65 वर्षे |
75 वर्षे |
45 वयापर्यंत – भरलेल्या सिंगल प्रीमियम च्या 125% 45 वयात आणि त्यांनंतर – भरलेल्या सिंगल प्रीमियम च्या 110% |
सिंगल पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
एसबीआय लाइफ ईशिल्ड प्लॅन |
18 वर्षे – 65 वर्षे (लेव्हल कव्हर) 60 वर्षे (वाढणारे लेव्हल कव्हर) |
लेव्हल कव्हर 80 – वर्षे वाढणारे लेव्हल कव्हर - 75 वर्षे |
कमीतकमी – 35 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C आणि 10(10D) अंर्तगत कर सवलत |
एसबीआय स्मार्ट शिल्ड |
18 वर्षे – 60 वर्षे |
80 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
रेग्युलर पे आणि सिंगल पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
श्रीराम न्यू श्री विद्या प्लॅन |
18 वर्षे – 50 वर्षे |
70 वर्षे |
कमीतकमी – 1 लाख रुपये जास्तीत जास्त – मर्यादा नाही |
रेग्युलर पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
स्टार्ट युनियन दाई-ईची प्रीमियर प्रोटेक्शन प्लॅन |
18 वर्षे - 60 वर्षे |
70 वर्षे |
कमीतकमी – 25 लाख रुपये जास्तीत जास्त – 1 करोड |
पॉलिसी कालावधी प्रमाणे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
टाटा एआयए फॉर्च्युन मॅक्सिमा प्लॅन |
0 वर्षे - 60 वर्षे |
100 वर्षे |
सिंगल पे सिंगल पेच्या 1.25 पट लिमिटेड पे- वार्षिक हप्त्याच्या 10 पटीपेक्षा जास्त किंवा 0.5 पट पॉलिसी टर्मच्या * ऍप |
सिंगल पे आणि लिमिटेड पे |
आयकर कायद्याच्या U/S 80C अंर्तगत कर सवलत |
निवेदन: "पॉलिसीबाजार कोणत्याही विमा उत्पादकाने दिलेला विमा उत्पादन ,विशिष्ट विमा कंपनीस मान्यता देत नाही, रेट करीत नाही किंवा शिफारस करत नाही किंवा
विमा योजनेची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.
सर्वसमावेशक असणारी ही विमा योजना, विमा धारकाच्या कुटुंबाला भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटात मदत करते. विम्याच्या फायद्यांसोबतच ह्या प्लॅन मधून तुम्हाला दीर्घ कालीन आर्थिक तजवीज करता येते. आदित्य बिर्ला सन लाइफ प्रोटेक्टर प्लस प्लॅन ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:
ही विमा योजना अत्यंत स्वस्त किंमतीत ऑनलाईन खरेदी करता येत असून ह्या विमा योजनेत सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. ह्या विमा योजनेत विमा धारकाला अपघाती मृत्यू आल्यास किंवा त्याचा गंभीर आजाराने मृत्यू झाल्यास देखील ह्या पॉलिसीचे फायदे मिळतात. इगोन लाइफ आय टर्म प्लस प्लॅनची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
अविवा आय-लाइफ ही विमा धारकाला भरपूर कव्हरेज ऑपशन्स देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीन पैकी एक आहे. सर्वसमावेशक असणारी ही विमा योजना विमा धारकाच्या कुटुंबाला भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक परिस्थितीत काही अंशी संरक्षण देते. ह्या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
अनेक नामांकित विमा योजनांनपैकी एक असणारी बजाज अलयांझ लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट गोल विमा धारकाच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करते तसेच विमा धारकाला त्यांच्या भविष्यातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास देखील सहाय्य करते.
ही एक खूप जुनी आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट असणारी विमा योजना आहे ज्या मध्ये विमा धारकाला पॉलिसी मॅच्युरिटी होई पर्यंत दर महिन्याला उत्पन्नाची हमी दिली जाते. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आर्थिक परतावा मिळण्याची हमी तसेच विमा धारकाच्या कुटुंबाला विमा कवच देखील ह्या योजनेमधून मिळते. ह्या योजनेची वैशिष्ट्ये आता आपण पाहूया.
ही एक युनिट लिंक्ड, नॉन पार्टीसिपेंटिंग एडोंव्हमेंट लाइफ विमा योजना असून ह्या मध्ये इन्शुरन्स कव्हरेज बरोबरच गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर रिटर्न्स देखील मिळतात. ह्या पॉलिसी ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
ही विमा योजना नॉन पार्टीसिपेंटिंग नॉन लिंक्ड असून ह्या मध्ये विमा धारकाला त्याच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिक अडीअडचणी मध्ये सुरक्षित करता येते. ही विमा योजना ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येत असून त्याची प्रक्रिया साधी आणि सरळ आहे. ह्या पॉलिसीची वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत.
ही एक नॉन पार्टीसिपेंटिंग जीवन विमा बचत योजना असून ह्यामधून इन्शुरन्स असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते तसेच रेग्युलर इनकम मिळत राहण्याची हमी देखील मिळते. ही पॉलिसी विमा धारकाच्या मागे त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करते तसेच विमा धारकाच्या पश्चात कुटूंबाची जीवनशैली चांगली ठेवण्यास सहाय्य करते. ह्या पॉलिसी ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
ही पुर्णपणे मुदत विमा योजना असून ह्या मधून विमा धारकाच्या कुटुंबाला सर्वसमावेशक असे विमा संरक्षण अत्यंत कमी हप्त्यामध्ये मिळते. विमा धारकांच्या गरजांचा विचार करूनच ही योजना बनविण्यात आलेली आहे. ह्या पॉलिसीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
भारतातील जीवन विमा योजनांपैकी एक असलेली, एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट 3D प्लस सर्वसमावेशक मुदत विमा योजना ऑनलाईन खरेदी करता येते. प्लॅन मध्ये असलेले 3D म्हणजे वेगवेगळ्या आणि अनपेक्षित रित्या निर्माण होणाऱ्या परिस्थिती ज्यामध्ये आजारपण, निधन आणि अपंगत्व ह्या बाबींचा समावेश होतो. ह्या योजनेत विमा धारकाच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करता येते. खाली ह्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत.
ही एक नव्याने तयार केलेली विमा योजना सर्वसमावेशक असून ह्या मधून विमा धारकाला कुटुंबाचे भवितव्य आर्थिक अडचणीत सुरक्षित करता येते. ह्या प्लॅन मध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे पेआऊट ऑप्शन उपलब्ध आहेत. ह्या पॉलिसी मधील वैशिष्ट्ये तपशीलवार पाहू.
ही एक सर्वसमावेशक अशी विमा योजना आहे ज्यामध्ये विमा धारकाला त्याच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करता येते तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या देखील पार पाडता येतात. ह्या पॉलिसीची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
भारतातील विमा योजनांपैकी एक असणारी ही विमा योजना नॉन पार्टीसिपेंटिंग युनिट लिंक्ड बचत विमा योजना आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला जास्त काळासाठी निधी जमा करता येऊ शकतो. हया विमा योजनेत विमा धारकाला त्याच्या आवडीनुसार आणि रिस्क घेण्याच्या इच्छेनुसार गुंतवणूक करण्याचे 4 वेगवेगळे मजेशीर पर्याय उपलब्ध आहेत तसेच ह्या प्लॅन मूळे पद्धतशीर बचती सोबतच संपत्ती वाढविण्याच्या हेतुमध्ये विमा धारकाची मदत होते. पॉलिसीची वैशिष्ट्ये पाहुयात.
कोटक लाइफ इन्शुरन्स द्वारे ही मुदत विमा योजना ऑनलाईन दिली जाते. ह्या प्लॅन मधून मिळणारे कव्हरेज व्यापक असून, विमा धारकाला त्याच्या मागे कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करता येते. ह्या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पाहूया.
ही जीवन विमा योजना ऑनलाईन असून विमा धारकाला अत्यंत कमी दरात विमा धारकाच्या कुटुंबाला विम्याचे व्यापक कव्हरेज प्राप्त होते. ही पूर्ण मुदत विमा योजना असून त्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. या विमा योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये पाहुयात.
ही पूर्ण सुरक्षितता देणारी मुदत योजना असून विमा धारकाच्या कुटुंबाला सर्वसमावेशक असे विमा कव्हर प्राप्त होते. मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक विमा योजनांपैकी एक असलेली ही पॉलिसी कमी प्रीमियम दरात मिळत असून विमा धारकाला त्याच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करता येते. ह्या पॉलिसीची महत्वाची वैशिष्ट्ये पाहुयात.
ही एक नॉन पार्टीसिपेंटिंग युनिट लिंक्ड विमा योजना असून विमा धारकाच्या कुटुंबाला इन्शुरन्स कव्हरेज मिळते तसेच दीर्घ मुदतीच्या कालावधीत गुंतवणुकीवर रिटर्न्सचा फायदा देखिल मिळतो. हया विमा योजनेत विमा धारकाला त्याच्या आवडीनुसार आणि रिस्क घेण्याच्या इच्छेनुसार गुंतवणूक करण्याचे 5 वेगवेगळे मजेशीर पर्याय उपलब्ध आहेत तसेच ह्या प्लॅन मूळे पद्धतशीर बचती सोबतच संपत्ती वाढविण्याच्या हेतुमध्ये विमा धारकाची मदत होते. पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केलेली आहेत.
ही एक नॉन पार्टीसिपेंटिंग आणि नॉन लिंक्ड मुदत विमा योजना असून कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा धारकाच्या पश्चात देखील पार पाडता येतात. या योजनेत कुटुंबाला नियमित मासिक उत्पन्न मिळते त्यामुळे कुटुंबाच्या जीवनशैलीमध्ये विमा धारकाच्या अनुपस्थित कुठलाही बदल होत नाही. खाली काही महत्वाची वैशिष्ट्ये ह्या योजनेच्या संदर्भातील दिलेली आहेत.
ही युनिट-लिंक्ड वन-टाईम पे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असून विमा धारका कडून प्राप्त झालेला प्रीमियम भांडवली बाजारात गुंतवला जातो जेणेकरून दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करता येते आणि जास्तीत जास्त परतावा गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर मिळविता येतो. इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स च्या फायद्यांसोबतच विमा धारकाच्या कुटुंबाला इन्शुरन्स कव्हरेज देखील मिळते. ह्या विमा योजनेची वैशिष्ट्ये पाहुयात.
एसबीआय लाइफ शील्ड योजना ही अनेक विमा योजनांच्या पर्यायांपैकी एक आहे. पूर्ण सुरक्षा देणारी ही योजना असून, विमा धारकाच्या आवश्यकतेनुसार मिळणारे लाभ देते तसेच विमा धारकाच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत सहाय्य करते. ह्या पॉलिसी ची वैशिष्ट्ये पाहूयात.
ही एक नॉन पार्टीसिपेंटिंग मुदत योजना असून हया योजनेद्वारे विमा धारकाच्या बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षा मिळते. एसबीआय लाइफ स्मार्ट शिल्ड ही एक व्यापक मुदत विमा योजना आहे ज्यामध्ये इन्शुरन्स कव्हरेज अत्यंत कमी हप्त्यामध्ये प्राप्त करता येते. या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
ही एक पार्टीसिपेंटिंग आणि खूप जुनी मुलांसाठी बनवलेली विमा योजना असून ह्यामध्ये मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करता येत तसेच कोणत्याही अडचणीत त्यांना सुरक्षा देण्यात येते. मुलांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या गरजा भागविण्यासाठी तयार केलेली ही विशेष योजना आहे. ह्या पॉलिसी ची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
ही एक सर्वसमावेशक मुदत योजना असून ह्यामध्ये विमा असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या विमा धारकाच्या पश्चात सुरक्षितता मिळते. ह्या विम्याचे हप्ता अगदी कमी असून या योजनेतून कुटुंबाला इन्शुरन्स कव्हरेज प्राप्त होते. खाली या योजनेची वैशिष्ट्ये दिलेली आहेत.
ही एक युनिट-लिंक्ड नॉन पार्टीसिपेंटिंग संपूर्ण जीवन विमा योजना असून याद्वारे विमा धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. विमा धारक या पॉलिसीमधून मार्केट-लिंक्ड सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करून संपूर्ण आयुष्याची सुरक्षितता वाढवू शकतो. ह्या प्लॅन मधील गुंतवणुकीमुळे संपूर्ण लाइफ कव्हरेज मिळते सोबतच अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची ध्येय साधता येतात. खाली पॉलिसीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
थोडक्यात !
जीवन विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या या आघाडीच्या विमा योजना विमा धारकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत. शिवाय या पॉलिसी तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडून त्याची खरेदी ऑनलाईन करू शकता, पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्याची प्रक्रिया साधी आणि विना त्रास पार पूर्ण होणारी आहे.
वरती दिल्या गेलेल्या पॉलिसी शिवाय मार्केटमध्ये अजून बऱ्याच विमा योजना आहेत. चांगल्या विमा कंपनीची निवड करून तुम्ही आवडीप्रमाणे चांगल्या योजनेत गुंतवणूक करू शकता.