- Home

- Marathi India

- RTO Marathi

- भारतात ड्रायव्हिंग लायसन्स
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स
ड्रायव्हिंग लायसन्स हे एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे जे एखाद्या व्यक्तीला भारतामध्ये गाडी चालविण्याची परवानगी देते. भारताच्या वाहन चालक कायद्यानुसार, देशात वैध वाहन चलविण्यासाठी तुमच्या RTO नुसार व्हॅलिड DL असणे आवश्यक आहे. DL ची अॅप्लिकेशन प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येते. खाली भारतामधील ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल अप्लाय कसे करायचे, प्रकार, शुल्क, पात्रता आणि इतर माहिती सोप्या शब्दांत दिली आहे ती पहा.
कम वाचा
भारतातील ड्रायव्हिंग सेल्सचे प्रकार
वाहन धारकाला, तो चालवत असलेल्या मोटार वाहनाच्या प्रकारानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाते. भारताच्या रस्त्यांवर कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी, या विविध प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग, भारतात जारी केल्या जाणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया:
- लर्नर्स लायसन्स: परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळण्यापूर्वी लर्नर्स लायसन्स जारी केले जाते. या लायसन्समुळे वाहनधारकाला वाहन चालविणे, वाहतुकीची चिन्हे, संकेत इत्यादी गोष्टी योग्यरित्या शिकता येतात. हे लायसन्स 6 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते; त्यानंतर वाहनधारक परमनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकतो.
- परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स: ज्या व्यक्तीने RTO ची लेखी आणि वाहन चालवण्याची चाचणी उत्तीर्ण केली आहे, ती व्यक्ती परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकते. हे परमनंट लायसन्स 20 वर्षांसाठी वैध असते आणि ते रिन्यू करता येते. हे लायसन्स या गोष्टीची खात्री देते की, तुम्हाला रस्त्यावर एलएमव्ही चालवण्यात नैपुण्य प्राप्त आहे आणि वाहतुकीच्या सर्व संकेतांचे तुम्हाला सखोल ज्ञान आहे.
- कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स: ज्या व्यक्ती व्यावसायिक उद्देशांसाठी उदा. प्रवासी किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी व्यावसायिक वाहने (जसे की अवजड किंवा मध्यम मोटार वाहने) चालवतात, त्यांना कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. 8 किंवा त्यापेक्षा अधिक आसनक्षमता असलेल्या वाहनांसाठी, अशा प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे.
- इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स: या प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स अशा भारतीयांना दिले जाते, ज्यांना परदेशात वाहन चालवायचे आहे. हे लायसन्स अशा व्यक्तींना जारी केले जाते, ज्यांच्याकडे वैध व परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि जे भारताचे रहिवासी आहेत.
भारतात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याच्या पद्धती
भारतात एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकते. या दोन्ही पद्धतींचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. ते असे आहे:
ऑनलाइन अॅप्लिकेशन
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करू शकता, ते येथे दिले आहे:
- पायरी:1 परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पायरी:2 ऑनलाइन सर्व्हिसेस टॅबमधून, "ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस" या पर्यायावर टॅप करा
- पायरी:3 राज्यांच्या यादीतून, ज्या राज्यात तुम्हाला DLसाठी अर्ज करायचा आहे, ते राज्य निवडा
- पायरी:4 आता "अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स" वर क्लिक करा
- पायरी:5 अर्जदाराचे तपशील अॅड करा
- पायरी:6 आता आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा
- पायरी:7 ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची फि भरा
- पायरी:8 तुमच्या जवळच्या RTO मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी स्लॉट बुक करा
- पायरी:9 नियोजित तारखेनुसार, टेस्टसाठी अर्ज करा
- पायरी:10 एकदा तुम्ही टेस्ट उत्तीर्ण झालात की, तुमचे DL मंजूर केले जाईल
- पायरी:11 ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या निवासी पत्त्यावर पाठवले जाईल.
कम वाचा
ऑफलाइन अॅप्लिकेशन
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करू शकता:
- पायरी:1 तुमच्या जवळच्या RTO कडून फॉर्म 2 मिळवा
- पायरी:2 फॉर्म 2 भरा, कारण तो ड्रायव्हिंग लायसन्सचा अर्ज असेल
- पायरी:3 सर्व आवश्यक कागदपत्रे संकलित करा आणि ही कागदपत्रे फॉर्म 2 सह तुमच्या RTO कार्यालयात सादर करा
- पायरी:4 ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्लॉट आरक्षित करा
- पायरी:5 नेमून दिलेल्या तारखेला टेस्ट द्या
- पायरी:6 तुम्ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.
ड्रायव्हिंग लायसन्स अॅप्लिकेशन स्थिती तपासण्याच्या पायऱ्या
जर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स अॅप्लिकेशनची स्थिती तपासायची असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करू शकता:
- पायरी 1: परिवहन सेवा पोर्टलला भेट द्या
- पायरी 2: "ऑनलाइन सर्व्हिसेस" ड्रॉपडाऊनमधून "ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस" वर क्लिक करा
- पायरी 3: तुमचे राज्य निवडा आणि "अप्लिकेशन स्टेटस" पर्यायावर क्लिक करा
- पायरी 4: अॅप्लिकेशन नंबर आणि अॅप्लिकेशन करणाऱ्याची जन्मतारीख यांसारखे आवश्यक तपशील अॅड करा.
- पायरी 5: कॅप्चा एन्टर करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा
- पायरी 6: तुमच्या वाहन परवान्याची स्थिती पुढील पानावर दिसेल.
भारतातील ड्रायव्हिंग टेस्टची प्रक्रिया
भारतामध्ये विविध वाहनांच्या ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टची प्रक्रिया वेगवेगळी आहे. चला, खाली त्या प्रत्येकाविषयी समजून घेऊया:
कारसाठी ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट
कारच्या ड्रायव्हिंग टेस्टचे आयोजन खालील कौशल्ये तपासण्यासाठी केले जाते:
- मैदान आणि रस्ते नियमांशी संबंधित कौशल्ये
- "U", "H", "T", "8" इ. आकारांमध्ये वाहन चालवण्याची क्षमता
- समांतर पार्किंग करण्याची क्षमता
- S' आकाराच्या मार्गावर पुढे-मागे वाहन चालवण्याची क्षमता
दुचाकी/तीनचाकी वाहनांसाठी ड्रायव्हिंग टेस्ट
दोन आणि तीन चाकी वाहनांसाठी, ड्रायव्हिंग टेस्टचा क्रम खालीलप्रमाणे आहे::
- मैदान आणि रस्ते नियमांशी संबंधित कौशल्ये
- ट्रॅक पूर्ण होईपर्यंत पाय खाली न टेकवता, 'T' आणि '8' सारख्या खुणांवरून वाहन चालवत राहा
जर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट नापास झालात, तर काय?
जर एखादा उमेदवार वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होऊ शकला नाही, तर तो/ती सात दिवसांनंतर पुन्हा ही टेस्ट देऊ शकतो/शकते. या चाचणीचे शुल्क RTO कडे पुन्हा भरावे लागेल.
ड्रायव्हिंग टेस्ट मिळवण्यासाठी पात्रता निकष
भारतातील कोणत्याही राज्यात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार खालील निकषांसाठी पात्र असावा:
- गियरलेस दुचाकी DL साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- एलएमव्ही DL साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक वाहनासाठी DL मिळवण्याकरिता, उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे असावे आणि त्याने 8 वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवाराकडे वैध लर्नर्स लायसन्स असणे आवश्यक आहे.
- DL मिळवण्यासाठी उमेदवाराने ड्रायव्हिंग TEST पास करणे आवश्यक आहे.
भारतातील ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचे शुल्क
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी लागणारे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
| सर्व्हिसचा प्रकार | फी |
| लर्नर्स लायसन्स इशू होणे | रु. 150 |
| ड्रायव्हिंग लायसन्स इशू होणे | रु. 200 |
| इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स इशू होणे | रु. 1,000 |
| ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल | रु. 200 |
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी, अर्जदाराला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
- वयाचा पुरावा (कोणतेही जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र)
- पत्त्याचा पुरावा (मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसी बाँड, राज्य किंवा केंद्र सरकारची पे स्लिप यांपैकी कोणतेही एक)
- फॉर्म 2 मधील अर्ज
- फॉर्म 1A
- पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांच्या 6 प्रती
- फॉर्म 1 (शारीरिक सुदृढता)
- विहित फी
- फॉर्म 5
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या
प्रायव्हेट ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिडिटी 20 वर्षे असते; त्यानंतर पुढील 10 वर्षांसाठी त्याचे रिन्यूअल करणे आवश्यक असते. भारतात ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन रिन्यूअल कसे करावे, याची माहिती येथे दिली आहे:
- सारथी परिवहन पोर्टलला भेट द्या
- तुमच्या DL चे राज्य निवडा
- "ड्रायव्हिंग लायसन्स" मेनूमधून 'ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण' वर क्लिक करा
- अॅप्लिकेशन फॉर्म भरा
- "नेक्स्ट" बटणावर क्लिक करा
- नियोजित तारखेला RTO ला भेट द्या
- एकदा पास झाल्यावर, तुमचे DL इशू केले जाईल.
डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्ही परिवहन सेवा पोर्टलवरून त्याच्या डुप्लीकेटसाठी देखील अर्ज करू शकता. हे कसे करावे, ते खालीलप्रमाणे आहे:
- वाहन सारथी पोर्टलला भेट द्या
- "ड्रायव्हिंग लायसन्स" विभागावर क्लिक करा
- यादीतून राज्य निवडा
- "डुप्लीकेट DLसाठी अर्ज करा" सेवेवर क्लिक करा
- तुमचा DL अर्ज पोर्टलवर सबमीट करा
- तुमच्या सर्वात जवळच्या RTO ला भेट द्या आणि तुमचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे व 'सारथी' पोर्टलवरील पावती सादर करा
- तुमच्या DLची पडताळणी केली जाईल, त्यानंतर एक डुप्लीकेट DL तुमच्या निवासी पत्त्यावर पाठवले जाईल.
भारतात वैध ड्रायव्हिंग लायसन्स असण्याचे महत्त्व
भारतात वाहन वैध रीतीने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. जर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला DL शिवाय वाहन चालवताना पकडले, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल आणि कदाचित तुरुंगवासालाही सामोरे जावे लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे; कारण ते एखाद्या व्यक्तीला भारतीय रस्त्यांवर स्वतःचे वाहन चालवण्याचा कायदेशीर अधिकार प्रदान करते.
शिवाय, वैध DL वापर वैयक्तिक ओळखीचा पुरावा म्हणूनही केला जाऊ शकतो. सरकारी कार्यालये आणि विमानतळांसारख्या ठिकाणी तुम्ही तुमचे DL ओळखपत्र म्हणून सादर करू शकता; कारण DL हे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादींसारख्या इतर वैयक्तिक ओळखपत्रांच्या समतुल्य मानले जाते.
केवळ अनिवार्यच नव्हे, तर तुमच्या व्हेहिकल इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत वैध क्लेम सादर करण्यासाठीही ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही वैध ड्रायव्हिंग लायसन्स सादर केले, तरच तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्या व्हेहिकल इन्शुरन्स क्लेमला मंजुरी देईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
एमपरिवहन हे शासनाच्या मालकीचे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये वाहनाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते. या ॲपवर उपलब्ध असलेले DL वैध मानले जाते आणि ते डाउनलोड देखील करता येते.
एमपरिवहन ॲपवरून तुम्ही तुमचे व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकता. या ॲपला भेट देऊन, तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची पीडीएफ प्रत डिजिलॉकर मध्ये डाउनलोड करू शकता. तसेच, तुम्ही परिवहन पोर्टलला भेट देऊनही, त्या संकेतस्थळावरून तुमचा वाहन चालक परवाना डाउनलोड करू शकता.
तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा:
- ज्या राज्यातून तुम्ही तुमच्या DLची नोंदणी केली आहे, ते राज्य निवडा
- पुढील स्क्रीनवर, "अप्लाय ऑनलाइन" मेनूमधून "अॅप्लिकेशन स्टेटस" पर्याय निवडा
- तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड एन्टर करा
- "सबमीट" वर क्लिक करा
- तुमच्या DL अर्जाचा तपशील प्रदर्शित केला जाईल.
ड्रायव्हिंग लायसन्सच्या अपॉइंटमेंटचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करा:
- सारथी परिवहन वेबसाइटला भेट द्या
- मुख्यपृष्ठावरून, "ड्रायव्हिंग लायसन्स" वर क्लिक करा.
- ज्या राज्यातून सेवा घ्यायची आहे, ते राज्य निवडा
- नमूद केलेल्या सेवांच्या यादीतून "अॅपॉइंटमेंट्स" वर क्लिक करा
- पानाच्या वरच्या बाजूला असलेल्या "स्लॉट बुकिंग" पर्यायावर क्लिक करा
- तुम्हाला कोणत्या DL साठी स्लॉट बुक करायचा आहे, ते निवडा
- अर्ज क्रमांक, डीओबी आणि व्हेरीफिकेशन कॅप्चा प्रविष्ट करा
- इच्छित तारखेला भेटण्याची अॅपॉइंटमेंट निश्चित करा
- निर्धारित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह RTO ला भेट द्या
ज्या अर्जदारांकडे वैध भारतीय DL आहे आणि जे भारताचे रहिवासी आहेत, त्यांना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमीट जारी केले जाऊ शकते. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित RTO कडे 'फॉर्म 4A' द्वारे किंवा लेखी स्वरूपात अर्ज करणे आवश्यक आहे; या अर्जामध्ये भेट द्यावयाच्या देशांची नावे, मुक्कामाचा कालावधी आणि इतर विशिष्ट तपशील नमूद करणे अनिवार्य आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलून घेण्यासाठी:
- सारथी परिवहन वेबसाइटला भेट द्या
- होमपेजवरून "ड्रायव्हिंग लायसन्स" वर क्लिक करा
- तुमच्या DLचे राज्य निवडा
- सेवांच्या यादीतून, "अप्लाय फॉर चेंज ऑफ अॅड्रेस" वर क्लिक करा.
- सूचना वाचा आणि "कंटिन्यू" बटणावर क्लिक करा
- तुमचा DL नंबर, डीओबी आणि कॅप्चा एन्टर करा
- "प्रोसिड" बटणावर क्लिक करा
- नवीन DL मध्ये तुम्हाला जो पत्ता बदलायचा आहे, तो भरा,
- आणि सबमीट करा.
Explore More Under Motor Insurance
- Motor Insurance
- Car Insurance
- Bike Insurance
- Third Party Insurance
- Third Party Bike Insurance
- Car Insurance Calculator
- Car Insurance Companies
- Bike Insurance Companies
- Bike Insurance Calculator
- Commercial Vehicle Insurance
- Tractor Insurance
- Truck Insurance
- Check Car Insurance Status
- New Cars Price
*Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.