• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
रस्ते कराचे शुल्क ऑनलाइन तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      भारतातील रोड टॅक्स

      रोड टॅक्स हा भारतात चालवल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर आकारला जाणारा एक अनिवार्य टॅक्स आहे. मग ती कार असो, ट्रक, बाईक किंवा अन्य कोणतेही वाहन; सार्वजनिक रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक नवीन वाहनावर हा टॅक्स लागू होतो. राज्य सरकार हा रोड टॅक्स रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी आकारते. या करातून जमा झालेला निधी रस्ते आणि महामार्गांचे जाळे विस्तारण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. भारतातील रोड टॅक्सविषयी अधिक माहिती, त्याची गणना पद्धत, रोड टॅक्स ऑनलाइन कसा भरावा आणि रोड टॅक्सचा रिफंड यांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

      कमी वाचा

      रोड टॅक्स कसा मोजला जातो?

      भारतामध्ये ज्यांच्याकडे वाहन आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला रोड टॅक्स भरणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे खाजगी असो किंवा व्यावसायिक वाहन, मोटार कायद्यांनुसार रोड टॅक्स भरणे सक्तीचे आहे. या टॅक्सची गणना वाहनाच्या 'एक्स-शोरूम किमती'वर केली जाते.

      तीन घटकांवर आधारित, प्रत्येक राज्य आपला स्वतःचा रोड टॅक्स आकारते. या घटकांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

      • वाहनाचे वय
      • वाहनाचे वजन आणि
      • वाहनाची इंजिन क्षमता

      साधारणपणे, वाहनाचा मालक हा टॅक्स वाहन खरेदीच्या वेळीच भरतो. जेव्हा एखादा डीलर तुम्हाला वाहन विकतो, तेव्हा तो या टॅक्सची रक्कम एक्स-शोरूम किमतीमध्ये केवळ तेव्हाच समाविष्ट करतो, जेव्हा तो स्वतःच त्या वाहनाची नोंदणी करून देत असतो. तथापि, जर तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी स्वतःच करून घेत असाल, तर तुम्ही तुमच्या राज्याच्या नियमांनुसार, थेट RTO मध्येच रोड टॅक्स भरू शकता.

      शिवाय, जर तुम्ही तुमचे वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, उदाहरणार्थ, दिल्लीहून मुंबईला स्थानांतरित केले, तर तुम्हाला त्या दुसऱ्या राज्यातही रोड टॅक्स भरावा लागेल.

      रोड टॅक्स ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया

      एखाद्या राज्यातील रोड टॅक्स ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे भरता येतो. खाली आम्ही या दोन्ही पद्धती विशद केल्या आहेत:

      ऑफलाइन पेमेंट

      सरकारी पोर्टल परिवहन सेवा द्वारे तुम्ही दिल्लीमधील वाहनांची माहिती किंवा वाहनांच्या मालकांची माहिती जाणून घेऊ शकता. यासाठीच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

      1. तुमच्या नवीन वाहनाची RTOमध्ये नोंदणी करताना, तुम्ही रोड टॅक्स ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.
      2. जर तुमचा वाहन डिलर तुमच्या वतीने वाहनाची नोंदणी करत असेल, तर तो देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
      3. शिवाय, जर तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी आधीच केली असेल, परंतु ड्यू टॅक्स भरला नसेल, तर तुम्ही प्रत्यक्ष RTOला भेट देऊन ड्यू असलेला टॅक्स भरू शकता.

      ऑनलाइन पेमेंट

      जर तुम्हाला RTOला प्रत्यक्ष भेट देऊन रोड टॅक्स भरायचा नसेल, तर तुम्ही परिवहन सेवा पोर्टलद्वारे तो ऑनलाइन भरू शकता. हे पोर्टल तुम्हाला तुमच्या राज्यातील रोड टॅक्स ऑनलाइन भरण्याची सुविधा देते. रोड टॅक्स ऑनलाइन भरण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:

      1. वाहतूक सेवेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या
      2. होमपेजवरून, "ऑनलाइन सर्वहीसेस" या मेनूवर क्लिक करा
      3. या ड्रॉपडाऊनमधून, "व्हेहिकल रिलेटेड सर्व्हिसेस" हा पर्याय निवडा
      4. ज्या राज्यात तुमचे वाहन रजिस्टर्ड आहे, ते राज्य निवडा
      5. आता RTO सिलेक्ट करा
      6. "प्रोसिड" वर क्लिक करा
      7. सेवांच्या यादीमधून, "पे रोड टॅक्स" वर क्लिक करा
      8. आता तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर (शेवटची 5 अक्षरे/अंक) एन्टर करा
      9. "व्हेरिफाय डिटेल्स" वर क्लिक करा आणि तुमचा टॅक्स भरा

      कमी वाचा

      *नोट: वर नमूद केलेली रोड टॅक्स ऑनलाइन भरण्याची सुविधा केवळ व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध आहे.

      याशिवाय, रोड टॅक्स ऑनलाइन भरण्यासाठी तुम्ही संबंधित राज्याच्या परिवहन विभागाच्या वेबसाइटलाही भेट देऊ शकता. जवळपास प्रत्येक राज्याकडे टॅक्स भरण्यासाठी त्यांचे स्वतःचे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध आहे आणि तुम्ही रोड टॅक्सचे ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय निवडू शकता.

      रोड टॅक्सच्या लेट पेमेंटसाठी दंड

      1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, रस्ते कर वेळेवर भरणे अनिवार्य आहे. जर टॅक्स भरण्यास विलंब झाला, तर तुमचे राज्य शासन त्यावर दंड आकारेल; हा दंड तुम्हाला थकीत रोड टॅक्ससह भरावा लागेल. सामान्यतः, रोड टॅक्स भरण्यासाठी राज्य सरकार 15 दिवसांचा ग्रेस पिरीअड देते.

      जर निर्धारित वेळेत टॅक्स भरला गेला नाही, तर दंडाची रक्कम ही थकीत रोड टॅक्सच्या 50% ते 100% इतकी असू शकते.

      त्यामुळे, तुमच्या वाहनाचा रोड टॅक्स वेळेवर भरण्याची खात्री करा; अन्यथा, तुम्हाला तुमच्या खिशातून मोठा दंड भरावा लागेल.

      रोड टॅक्स वरील रिफंड

      रोड टॅक्सचा रिफंड दोन परिस्थितींमध्ये मिळवता येतो.

      सर्वप्रथम, जेव्हा तुमचे वाहन दुरुस्तीच्या पलीकडे जाते, म्हणजेच, जेव्हा त्याचे टोटल लॉस होते, तेव्हा. अशा परिस्थितीत, उर्वरित वर्षांसाठी भरलेला टॅक्स तुम्ही तुमच्या राज्याच्या RTOकडून परत मिळवू शकता. उदाहरणार्थ, समजा तुम्ही राज्याकडे 15 वर्षांसाठीचा टॅक्स वन टाइम भरला आहे; परंतु 10 वर्षांच्या आतच तुमच्या वाहनाचे पूर्ण नुकसान झाले आणि ते दुरुस्त करणे अशक्य झाले.

      अशा परिस्थितीत, तुमची गाडी ज्या RTOमध्ये नोंदणीकृत आहे, त्या ठिकाणी तुम्ही उर्वरित 5 वर्षांच्या रोड टॅक्स रिफंडसाठी अर्ज करू शकता.

      टॅक्स रिफंड मिळवण्याची दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही एका नवीन राज्यात स्थलांतर करता. अशा वेळी, तुम्हाला तुमच्या नवीन वाहनाची नोंदणी त्या नवीन राज्याच्या RTO अंतर्गत पुन्हा करावी लागते. यासाठी, तुम्हाला तुमच्या जुन्या RTO कडून एनओसी मिळवणे आवश्यक असते.

      त्यामुळे, कराच्या उर्वरित रकमेसाठी तुम्ही मूळ RTOकडे टॅक्स रिफंडसाठी अर्ज करू शकता; आणि नवीन राज्यात, तेथील स्लॅब नुसार पुन्हा रोड टॅक्स भरू शकता.

      रोड टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

      आपल्या सध्याच्या RTOकडून रोड टॅक्सचा रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करण्याकरिता, तुम्हाला खालील कागदपत्रांसह RTOला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल:

      1. टॅक्स रिफंडसाठी विनंती पत्र
      2. चेसिस नंबरचे इम्प्रेशन
      3. व्हेहिकल इन्शुरन्स सर्टिफिकेटची प्रत
      4. नवीन आणि ओरिजिनल RCची प्रत
      5. आपल्या मागील RTOकडील एनओसी
      6. नवीन राज्यात भरलेल्या रोड टॅक्स रिसीटची प्रत
      7. जुन्या रोड टॅक्सच्या रिसीटची प्रत
      8. सध्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत
      9. वाहन मालकाच्या बँक खात्याचा तपशील, तसेच चेक पाठवण्याचा पत्ता.

      भारतातील प्रमुख राज्यांमधील रोड टॅक्स

      खाली, आम्ही भारतातील काही प्रमुख राज्यांच्या रोड टॅक्सचा उल्लेख केला आहे. एक नजर टाका:

      दिल्लीमधील रोड टॅक्स:

      एक्स-शोरूम प्राइस दिल्लीमधील रोड टॅक्स
      रु. 6 लाख पर्यंत पेट्रोल: 4%, डिझेल: 5%
      6 लाख ते 10 लाख पेट्रोल: 7%, डिझेल: 8.75%
      रु. 10 लाख पेक्षा जास्त पेट्रोल: 10%, डिझेल: 12.5%
      इलेक्ट्रिक कार शून्य रोड टॅक्स
      टू-व्हीलर < 50 cc रु. 650
      टू-व्हीलर्स > 50 cc रु. 1,220

      महाराष्ट्रातील रोड टॅक्स:

      कारची किंमत नवीन कारच्या रजिस्ट्रेशनवरील रोड टॅक्स
      किंमत < 10 लाख CNG: 7%
      पेट्रोल: 11%
      डिझेल: 13%
      10 लाख - 20 लाख पेट्रोल: 12%
      डिझेल: 14%
      20 लाख पेक्षा जास्त पेट्रोल: 13%
      डिझेल: 14%
      टू-व्हीलर्स रोड टॅक्स
      99 cc पर्यंत 10%
      100 cc ते 299 cc 11%

      उत्तर प्रदेशमधील रोड टॅक्स

      वाहनाचा प्रकार रक्कम (रुपयांमध्ये) प्रति वर्ष
      रु. 20,000 ते रु. 60,000 मधील टू-व्हीलर्स 4%
      रु. 60,000 ते रु. 2 लाख मधील टू-व्हीलर्स 6%
      रु. 6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार मूल्याच्या 3%
      रु. 6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार मूल्याच्या 3%
      रु. 6 आणि 10 लाख मधील कार मूल्याच्या 6%
      रु. 10 आणि 20 लाख मधील कार मूल्याच्या 8%
      रु. 20 लाख पेक्षा जास्तच्या कार मूल्याच्या 9%

      कर्नाटकमधील रोड टॅक्स

      वाहनाची किंमत रोड टॅक्स
      नवीन टू-व्हीलर्स
      रु. 50,000 पेक्षा कमी
      10%
      नवीन टू-व्हीलर्स
      रु. 50,000 पेक्षा जास्त
      12%
      रु. 5 ते रु. 10 लाख मधील फोर-व्हीलर्स 14%
      रु. 10 ते रु. 20 लाख मधील फोर-व्हीलर्स 17%
      रु. 20 लाख पेक्षा जास्तच्या फोर-व्हीलर्स 18%

      भारतातील रोड टॅक्सवरील सामान्य प्रश्न

      प्रत्येक राज्यामध्ये विविध प्रकारच्या वाहनांसाठी रोड टॅक्स वेगवेगळा असतो. वाहनाचे वय, एक्स-शोरूम किंमत, वजन आणि इंजिनची क्षमता (CC) या घटकांच्या आधारे हा कर निश्चित केला जातो.

      होय, ज्या भारतीय नागरिकांकडे स्वतःचे वाहन आहे, त्या प्रत्येकासाठी—ज्या राज्यामध्ये त्यांनी आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन केले आहे, त्या राज्याला रोड टॅक्स भरणे अनिवार्य आहे.

      होय, मोटार वाहन कायदा 1988 (मोटर व्हेहिकल्स अॅक्ट, 1988) अन्वये, प्रत्येक नवीन वाहन मालकाने आपल्या संबंधित राज्यामध्ये रोड टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

      नाही. रोड टॅक्स म्हणजे सार्वजनिक रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक नवीन वाहनासाठी राज्य सरकारकडे भरला जाणारा टॅक्स होय. याउलट, GST किंवा गुड्सअँड सर्व्हिस टॅक्सहा एक असा टॅक्स आहे जो सर्व प्रकारच्या वाहनांवर 18% दराने आकारला जातो.

      रोड टॅक्स हा एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये नोंदणी केल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन वाहनावर लागू केला जातो. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, हा एक अनिवार्य मोटर टॅक्स आहे.

      दुसरीकडे, विशिष्ट टोल आकारल्या जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करताना टोल टॅक्स आकारला जातो. हा टॅक्स भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top