• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
रजिस्ट्रेशन नंबरद्वारे PUC ची एक्सपायरी डेट तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      PUC सर्टिफिकेट

      भारतामध्ये वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून, वाहनांतून होणारे उत्सर्जन हे त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, भारत सरकारने प्रदूषण नियंत्रणाचे काही निकष निश्चित केले आहेत; यानुसार, वाहनांतून निघणारा धूर आणि उत्सर्जन विहित मर्यादेच्या आत असणे आवश्यक असते. वाहनांच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने उचललेले 'PUC सर्टिफिकेट' जारी करण्याचे पाऊल हे याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

      PUC सर्टिफिकेट म्हणजे काय?

      पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे असे एक दस्तऐवज आहे, जे तुमचे वाहन प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील शासकीय नियमांचे पालन करत असल्याचे सिद्ध करते. वाहन मालकांनी हा दस्तऐवज सोबत बाळगणे अनिवार्य असते. यामध्ये वाहनाची माहिती, सर्टिफिकेट जारी केल्याची तारीख, मुदत समाप्तीची तारीख आणि उत्सर्जनाच्या चाचण्यांचे निष्कर्ष यांचा उल्लेख केलेला असतो. PUC चाचणी केंद्रे उपलब्ध असतील, चाचणी उपकरणांचा दर्जा राखला जाईल आणि वाहन मालक PUC नियमांचे पालन करतील, याची खात्री संबंधित राज्य सरकारे करतात.

      PUC प्रमाणपत्र महत्त्वाचे का आहे?

      PUCC हा इतका अत्यावश्यक दस्तऐवज असण्याची ही चार कारणे आहेत.

      • कायदेशीर आवश्यकता: भारतामध्ये रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी प्रत्येक वाहनमालकाकडे PUC सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. वाहनाचे पोल्यूशन सर्टिफिकेट नसल्यास दंड आणि शिक्षा होऊ शकते.
      • वाहनाचे आरोग्य: PUC टेस्ट तुमच्या वाहनाच्या उत्सर्जन प्रणालींची तपासणी करते. हे सर्टिफिकेट तुमचे वाहन सुस्थितीत असल्याचेही दर्शवते.
      • वाहन विम्यासाठी आवश्यक: वाहन इन्शुरन्स प्रोव्हायडरना तुमचे वाहन इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी किंवा त्याचे रिन्यूअल करण्यासाठी, तुम्हाला वैध PUCC सादर करणे आवश्यक असते.

      कमी वाचायचे

      PUC सर्टिफिकेट कसे मिळवावे?

      एखाद्या अधिकृत PUC टेस्टिंग सेंटरवर आपल्या वाहनाच्या उत्सर्जनाची चाचणी आणि मोजमाप करून, आपण आपल्या वाहनासाठी PUCC प्राप्त करू शकता.

      PUC सर्टिफिकेट ऑफलाइन मिळविणे

      दस्तऐवज ऑफलाइन मिळवण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करू शकता.

      1. पायरी 1: तुमच्या शहरातील कोणतेही अधिकृत PUC टेस्टिंग सेंटर शोधा.
      2. पायरी 2: तुमचे वाहन टेस्ट सेंटरवर घेऊन जा आणि पोल्यूशन सर्टिफिकेटची विनंती करा.
      3. पायरी 3: अधिकृत कर्मचारी तुमच्या वाहनाचा एक्झॉस्ट तपासून, त्यातून होणाऱ्या पोल्यूशन एमिशन लेव्हल्स तपासतील.
      4. पायरी 4: ते सेंटर टेस्ट रिझल्टनुसार PUC सर्टिफिकेट जारी करेल.

      कमी वाचायचे

      तुमचे PUC सर्टिफिकेट ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

      PUCC हे तुमच्या वाहनासाठी एक अत्यावश्यक कागदपत्र आहे. तुम्ही PUC सर्टिफिकेट ऑनलाइन कसे डाउनलोड करू शकता, ते येथे दिले आहे.

      1. पायरी 1: PUCC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
      2. पायरी 2: 'PUC सर्टिफिकेट' वर क्लिक करा.
      3. पायरी 3: तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर एन्टर करा.
      4. पायरी 4: कॅप्चा कोड टाइप करा आणि तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी 'PUC डिटेल्स' वर क्लिक करा.

      कमी वाचायचे

      वाहनांसाठीच्या एमिशन टेस्टचे प्रकार आणि त्याद्वारे एमिशन मेजर कसे केले जाते

      पोल्यूशन सर्टिफिकेट जारी करण्यापूर्वी वाहनांवर विशिष्ट एमिशन टेस्ट करणे आवश्यक असते. वाहनांच्या प्रत्येक प्रकारासाठी टेस्टचा एक वेगळा सेट आवश्यक असतो.

      वाहनाचा प्रकार आवश्यक असलेल्या एमिशन टेस्टचे प्रकार
      पेट्रोल वाहने आयडलिंग आणि हाय आयडलिंग दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि लॅम्बडाच्या लेव्हलची टेस्ट.
      सीएनजी वाहने आयडलिंग आणि हाय आयडलिंग दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि लॅम्बडाच्या लेव्हलची टेस्ट.
      एलपीजी वाहने आयडलिंग आणि हाय आयडलिंग दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि लॅम्बडाच्या लेव्हलची टेस्ट.
      डिझेल वाहने जास्तीत जास्त धुराच्या घनतेच्या मानकांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी, टर्बो-चार्ज्ड आणि नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनची फ्री अॅक्सीलरेशन टेस्ट.

      PUC सर्टिफिकेटसाठी एमिशन टेस्टची प्रक्रिया काय आहे?

      वाहन एमिशनची टेस्ट करण्यासाठी PUC टेस्ट सेंटर ज्या सविस्तर प्रक्रियेचे पालन करतात, ती येथे दिली आहे.

      1. पायरी 1: अधिकृत टेस्ट सेंटरला भेट द्या आणि तंत्रज्ञाने दिलेल्या निर्देशानुसार तुमचे वाहन उभे करा.
      2. पायरी 2: टेस्टसाठी तुमच्या वाहनाच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये एक डिव्हाईस बसवले जाईल.
      3. पायरी 3: उपकरणाला एक्झॉस्ट एमिशन तपासणी करता यावी, यासाठी तुमचे वाहन सुरू करा आणि इंजिनचे आरपीएम वाढवा.
      4. पायरी 4: यंत्राद्वारे नोंदवली गेलेली रीडिंग्ज संगणकाच्या पडद्यावर डिस्प्ले केली जातील. जर वाहनाचे एमिशन विहित मर्यादेत असतील, तर तंत्रज्ञ तुमच्या वाहनाच्या नंबर पलेटचा फोटो काढेल आणि PUCC तयार करेल.
      5. पायरी 5: टेस्ट सेंटरकडे आवश्यक फी भरा आणि PUC दस्तऐवज प्राप्त करा.

      कमी वाचायचे

      PUC सर्टिफिकेटसाठी पर्मिसीबल एमिशन लेव्हल्स

      शासनाने भारतीय वाहनांसाठी खालीलप्रमाणे पर्मिटेड एमिशन लेव्हल्स निश्चित केल्या आहेत, ज्या प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार भिन्न आहेत:

      नवीन कार्सच्या पोल्यूशन सर्टिफिकेटसाठी एमिशन नॉर्म्स

      भारत स्टेज IV किंवा भारत स्टेज V मानकांनुसार उत्पादित चारचाकी वाहनांनी खालील एमिशन स्टँडर्ड्सचे पालन करणे आवश्यक आहे.

      टेस्टचे प्रकार पेट्रोल गाड्या सीएनजी/एलपीजी गाड्या
      कार्बन मोनॉक्साईड आयडल एमिशन % 0.3 0.3
      कार्बन मोनॉक्साईड हाय आयडल एमिशन % 0.2 एनए
      एचसी (एन-हेक्सेन इक्वीव्हॅलंट पीपीएम) 200 200
      λ (लॅम्डा) 1±0.03 किंवा उत्पादकाद्वारे घोषित 1±0.03 किंवा उत्पादकाद्वारे घोषित

      नवीन दुचाकींच्या पोल्यूशन सर्टिफिकेटसाठीचे एमिशन नॉर्म्स

      31 मार्च 2010 नंतर उत्पादित केलेल्या दुचाकींना खालील एमिशन लिमिट्स लागू होतात:

      वाहनाचा प्रकार CO% एचसी (एन-हेक्सेन इक्वीव्हॅलंट) पीपीम
      2-स्ट्रोक बाईक्स 3 4000
      4-स्ट्रोक बाईक्स 3 3000

      डिझेल वाहनांच्या पोल्यूशन सर्टिफिकेटसाठीचे नॉर्मस

      भारतातील डिझेल वाहनांसाठी स्मोक डेन्सिटीच्या खालील लिमिट विहित करण्यात आल्या आहेत.

      वाहनाचा प्रकार लाइट अॅबसॉर्प्शन कोएफीशिअंट हार्ट्रिज युनिट
      प्री-भारत स्टेज IV नॉर्म्सनुसार उत्पादित 2.45 65
      भारत स्टेज IV मानकांनुसार उत्पादित 1.62 50
      भारत स्टेज VI मानकांनुसार उत्पादित चारचाकी वाहने 0.7 26
      भारत स्टेज VI मानकांनुसार उत्पादित दुचाकी आणि तीनचाकी वाहने 1.5 48

      जुन्या वाहनांसाठी (कार, दुचाकी, तीनचाकी) पोल्यूशन सर्टिफिकेट नॉर्म्स

      जर तुम्ही एखादे जुने वाहन चालवत असाल, तर ते खालील एमिशन स्टँडर्ड्सचे पालन करत असल्याची खात्री करा:

      वाहनाचा प्रकार सीओ% एचसी (एन-हेक्सेन इक्वीव्हॅलंट) पीपीएम
      31 मार्च 2000 रोजी किंवा त्यापूर्वी उत्पादित दुचाकी वाहने 4.5 2000
      31 मार्च 2000 ते 31 मार्च 2010 या कालावधीत उत्पादित 2-स्ट्रोक दुचाकी वाहने 3.5 6000
      31 मार्च 2000 ते 31 मार्च 2010 या कालावधीत उत्पादित 4-स्ट्रोक दुचाकी वाहने 3.5 4500
      31 मार्च 2000 रोजी किंवा त्यापूर्वी उत्पादित तीनचाकी वाहने 4.5 9000

      PUC सर्टिफिकेट मिळवण्याचे इतर काही मार्ग कोणते आहेत?

      संपूर्ण भारतातील अनेक पेट्रोल पंप आणि वर्कशॉप्समध्ये वाहनांच्या एमिशनची लेव्हल तपासण्यासाठी संगणकीकृत सुविधा उपलब्ध आहे. त्यांना PUC सर्टिफिकेट जारी करण्याची अधिकृत परवानगी आहे की नाही, हे टेस्ट करून घ्या आणि या सेंटरवर आपल्या वाहनाची तपासणी करून घ्या.

      PUC सर्टिफिकेटचा व्हॅलिडिटी पिरीअड किती असतो?

      त्यानंतर, तुम्ही दर 6 महिन्यांनी सर्टिफिकेट रिन्यू करणे आवश्यक आहे.

      तथापि, बीएस-IV आणि बीएस-VI नॉर्म्सचे पालन करणाऱ्या वाहनांची PUC सर्टिफिकेट 12 महिन्यांसाठी व्हॅलिड असतील.

      तुम्ही PUC सर्टिफिकेट ऑनलाइन रिन्यू करू शकता का?

      तुम्ही PUC सर्टिफिकेट ऑनलाइन रिन्यू करू शकत नाही. तुम्हाला तुमचे वाहन सोबत घेऊन अधिकृत PUC सेंटरला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल आणि त्याची टेस्ट करून घ्यावी लागेल. तथापि, तुम्ही PUCC परिवहन वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन Testिंग सेंटर शोधू शकता. तसेच, याच पोर्टलद्वारे तुम्ही PUC टेस्टिंग चार्जेस डिजिटल मेथड्सचा वापर करून भरू शकता.

      PUC सर्टिफिकेट सेंटर कसे शोधायचे?

      या पायऱ्यांचे अनुसरण करून तुमच्या जवळचे PUC सेंटर शोधा:

      1. पायरी 1- PUCC च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.
      2. पायरी 2- 'PUC सेंटर लिस्ट' हा पर्याय निवडा.
      3. पायरी 3- ड्रॉप-डाऊन बॉक्समधून राज्य निवडा.
      4. पायरी 4- राज्यातील अॅक्टीव्ह PUC सेंटरची लिस्ट तपासा.

      कमी वाचायचे

      भारतात PUC सर्टिफिकेटसाठी किती चार्जेस आकारले जातात?

      PUC चार्जेस हे परिवर्तनीय असतात. ते जारी करणारे राज्य आणि वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतात.

      उदाहरणार्थ, महाराष्ट्रात खालील चार्जेस लागू आहेत.

      वाहनाचा प्रकार PUC सर्टिफिकेट चार्जेस
      दुचाकी वाहने रु. 50
      पेट्रोलवर चालणारी चारचाकी वाहने रु. 125
      डिझेलवर चालणारी चारचाकी वाहने रु. 150

      एक्सपायर्ड PUC सर्टिफिकेटसाठी काय दंड आहे?

      भारतातील प्रत्येक राज्याचा परिवहन विभाग, वैध PUC सर्टिफिकेट नसल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाची तरतूद निश्चित करतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम 190(2) नुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी हा दंड रु. 10,000 पर्यंत असू शकतो. काही राज्यांमध्ये, पहिल्या गुन्ह्यासाठी 3 महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही दिली जाऊ शकते. त्यानंतरच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी ही शिक्षा 6 महिन्यांपर्यंत असू शकते.

      उदाहरण म्हणून, महाराष्ट्रात मुदत संपलेल्या PUC सर्टिफिकेटसाठीचे दंड येथे दिले आहेत.

      वाहनाचा प्रकार पहिल्या गुन्ह्यासाठी दंड कोणत्याही त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी शिक्षा
      दुचाकी वाहने रु. 1500 रु. 1500
      तीनचाकी वाहने रु. 1500 रु. 2000
      हलकी मोटार वाहने रु. 2000 रु. 3000
      मध्यम मोटार वाहने रु. 3000 रु. 4000
      जड मोटार वाहने रु. 5000 रु. 10,000
      इतर रु. 1500 रु. 2000

      PUC सर्टिफिकेट स्टेटस ऑनलाइन कसे तपासावे?

      जर तुमच्या वाहनाची टेस्ट एखाद्या अधिकृत सेंटरवर झाली असेल, तर तुमचा PUC दर्जा तपासण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करून वेबसाइटला भेट द्या:

      1. पायरी 1: PUCCच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
      2. पायरी 2: तुमच्या PUC अर्जातील अॅप्लिकेशन आयडी एन्टर करा.
      3. पायरी 3: अर्ज तपशील पाहण्यासाठी, तुमचा सिक्युरिटी कोड एन्टर करा आणि 'व्ह्यू अॅप्लिकेशन डिटेल्स' वर क्लिक करा.

      कमी पहायचे

      PUC सर्टिफिकेटबाबत लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

      PUC सर्टिफिकेट मिळवण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे दिल्या आहेत.

      • अधिकृत PUC सेंटरना भेट द्या: PUC संबंधित फसवणूक टाळण्यासाठी, तुमचे वाहन केवळ सरकारने अधिकृत केलेल्या PUC सेंटरवरच घेऊन जा.
      • व्हिडिओ व्हेरीफीकेशन: नवी दिल्लीसारख्या काही प्रदेशांमध्ये, PUC सेंटरनी टेस्टिंग प्रक्रियेचा व्हिडिओ चित्रित करणे आणि तो वाहन पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

      एफएक्यूज

      PUC सर्टिफिकेट हे भारत सरकारने निश्चित केलेल्या, एमिशनच्या परवानगीयोग्य मर्यादांचे पालन होत असल्याची खात्री करते. भारतातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यास यामुळे मदत होते.

      होय, तुमच्या वाहनाच्या रजिस्ट्रेशनला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, PUC सर्टिफिकेट केवळ 6 महिन्यांसाठीच वैध असते. तथापि, बीएस-IV आणि बीएस-VI मानकांचे पालन करणाऱ्या वाहनांचे सर्टिफिकेट 12 महिन्यांसाठी वैध असते.

      नाही, तुम्हाला तुमचे PUC सर्टिफिकेट दर सहा महिन्यांनी रिन्यू करावे लागते.

      PUC सर्टिफिकेटचे शुल्क हे राज्य आणि वाहनाच्या प्रकारानुसार बदलते. नवी दिल्लीमध्ये, वाहनाच्या प्रकारानुसार PUC सर्टिफिकेटसाठी रु. 60 ते रु. 100 या दरम्यान खर्च येतो.

      PUC सर्टिफिकेटसाठी तुमच्या वाहनाचे RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) आवश्यक असते. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      #Rs 2094/- per annum is the price for third-party motor insurance for private cars (non-commercial) of not more than 1000cc

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      +Savings are based on the maximum discount on own damage premium as offered by our insurer partners.

      ^Lowest Price Guaranteed is based on certifications shared by insurers with us. Policybazaar will facilitate price matching subject to the terms and conditions of select insurers.

      ##Claim Assurance Program: Pick-up and drop facility available in 1400+ select network garages. On-ground workshop team available in select workshops. Repair warranty on parts at the sole discretion of insurance companies. Dedicated Claims Manager. 24x7 Claim Assistance.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top