• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
रजिस्ट्रेशन नंबरद्वारे RC चे स्टेट्स तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      वाहनाच्या RCचे स्टेटस ऑनलाइन तपासा

      RC हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे, जे भारताच्या रस्त्यांवर वाहन चालवताना सोबत बाळगणे अनिवार्य असते. केवळ मोटार कायद्यांनुसार ते कायदेशीररित्या बंधनकारकच नाही, तर त्यामध्ये तुमच्या वाहनाविषयीची महत्त्वाची माहिती देखील समाविष्ट असते. वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि RCची स्थिती ऑनलाइन कशी तपासावी हे समजून घेण्यासाठी पुढे वाचा.

      कमी वाचा

      वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) म्हणजे काय?

      वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) हे एखाद्या विशिष्ट राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे जारी केले जाणारे एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे. हे वाहनाची नोंदणी आणि मालकी दर्शवणारा एक वैध पुरावा आहे.

      1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालवण्यासाठी वाहनाचे RC सोबत असणे अनिवार्य आहे. यामध्ये वाहन चालवणे, वाहतुकीची चिन्हे, संकेत इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. अशा प्रकारचे DL 6 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते; त्यानंतर वाहन मालक परमनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकतो.

      तुमच्याकडे कार, बाईक किंवा व्यावसायिक वाहन, यांपैकी काहीही असले, तरी ज्या राज्यात तुम्हाला तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्या राज्यात तुम्हाला RC मिळवण्यासाठी अर्ज करणे अनिवार्य असते. एकदा का RC तयार झाले, की ते या गोष्टीचा ठोस पुरावा ठरते की, तुम्ही त्या विशिष्ट वाहनाचे कायदेशीर मालक आहात आणि तुम्ही तुमच्या राज्यातील RTOच्या नियमांचे पालन करत आहात.

      रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे (RC) मुख्य तपशील

      RC किंवा वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे कोणत्याही वाहनासाठी एक ओळखपत्र म्हणून कार्य करते. यामध्ये वाहनाशी संबंधित अनेक तपशील समाविष्ट असतात. या तपशीलांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

      • वाहनाचा प्रकार आणि मॉडेल
      • वाहनाचा इंधनाचा प्रकार
      • वाहनाच्या मालकाचे नाव आणि पत्ता
      • वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर
      • इंजिन आणि चेसिस नंबर
      • वाहनाचा प्रकार (टू-व्हीलर, एलएमव्ही किंवा हेवी गुड्स, इ.)
      • सिटिंग कपॅसिटी
      • वाहनाचे वजन
      • वाहनाचे इन्शुरन्स तपशील
      • इन्शुरन्स कंपनीचा तपशील
      • RCची मुदत संपण्याची तारीख
      • हायपोथीकेशन तपशील

      वर नमूद केलेले वाहनाचे सर्व तपशील तुम्ही तुमच्या RCवरून, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तपासू शकता.

      RC स्टेटस ऑनलाइन तपासण्याच्या पद्धती

      एकदा का तुम्ही तुमच्या संबंधित RTOकडे RCसाठी अर्ज केला, की तुम्ही त्या अर्जाचे स्टेटस RTOला ऑफलाइन भेट देऊन किंवा खाली नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करून तपासू शकता. खाली पहा:

      1. 1. परिवहन RC स्टेटस
      2. 2. पॉलिसीबझार RC स्टेटस

      परिवहन पोर्टलद्वारे RC स्टेटस तपासा

      परिवहन सेवा पोर्टलवरून वाहनाच्या RCचे स्टेटस ऑनलाइन तपासण्यासाठी, खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.

      1. पायरी 1: परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://parivahan.gov.in/parivahan/)
      2. पायरी 2: पानाच्या वरच्या बाजूस असलेल्या "ऑनलाइन सर्व्हिसेस" ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
      3. पायरी 3: ड्रॉप-डाऊन मेनूमधून, "व्हेहिकल रिलेटेड सर्व्हिसेस" हा पर्याय निवडा
      4. पायरी 4: राज्यांच्या यादीतून, ज्या राज्यात तुमचे वाहन रजिस्टर्ड आहे, ते राज्य निवडा
      5. पायरी 5: आता तुमच्या वाहनाचे RTO निवडा आणि "प्रोसिड" बटणावर क्लिक करा
      6. पायरी 6: सेवांच्या यादीतून, "नो युअर अॅप्लीकेशन स्टेटस" या पर्यायावर क्लिक करा
      7. पायरी 7: तुमचा RC अर्ज क्रमांक एन्टर करा आणि "सबमिट" वर क्लिक करा
      8. पायरी 8: माहिती सादर केल्यानंतर, तुमच्या वाहनाचे RC तपशील लवकरच प्रदर्शित केले जातील.

      पॉलिसीबझारद्वारे RC स्टेटस तपासा

      खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून, तुम्ही पॉलिसीबाजार इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तुमच्या वाहनाच्या RCचे स्टेटस देखील तपासू शकता:

      1. Policybazaar.com वरील "चेक व्हेहिकल RC स्टेटस" पेजला भेट द्या
      2. दिलेल्या फॉर्मवर, तुमचा वाहन रजिस्ट्रेशन नंबर एन्टर करा.
      3. "सबमिट" बटणावर क्लिक करा
      4. तुमचा वाहन क्रमांक सबमिट केल्यानंतर, तुमच्या RCचे सर्व तपशील प्रदर्शित केले जातील.

      RCचे स्टेटस ऑनलाइन तपासणे आवश्यक आहे

      अशा अनेक परिस्थिती असू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला वाहन RCचे स्टेटस तपासणे आवश्यक असते. वाहनाच्या RC तपशीलांची तपासणी करण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

      कायद्याचे पालन:

      भारतात वाहन चालवण्यासाठी वैध RC असणे ही एक अनिवार्य अट आहे. वाहतूक पोलीस तुम्हाला नियमित तपासणीसाठी थांबवू शकतात आणि त्यावेळी तुम्हाला तुमचे अपडेटेड RC त्यांना दाखवणे आवश्यक असू शकते. त्यामुळे, तुमचे RC वैध आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे, हे देशातील वाहन कायद्यांचे पालन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

      वाहनाच्या मालकीचा पुरावा

      RC हा वाहनाच्या मालकीचा पुरावा असतो. वाहनाचे मालक म्हणून ओळखले जाण्यासाठी, तुमच्या नावावर RC असणे अनिवार्य आहे. RC वरील तपशील तपासून, तुम्ही वाहनाच्या मालकाची माहिती पडताळून पाहू शकता. सेकंड-हँड वाहनाची खरेदी किंवा विक्री करताना ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

      इन्शुरन्स / RC / PUC स्टेट्स

      इन्शुरन्सपासून ते PUC वैधतेपर्यंत, तुमच्या वाहनाच्या RCमध्ये अनेक महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट असते. काही वेळा तुमच्या वाहनाचे RC, PUCC किंवा इन्शुरन्स रिन्युअलसाठी पात्र असूनही, तुम्हाला त्यांच्या मुदतसमाप्तीची तारीख माहित नसते. अशा परिस्थितीत, RC चेक करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते; कारण यामुळे तुमचे संबंधित दस्तऐवज मुदत संपण्यापूर्वीच रिन्यू करण्यास तुम्हाला मदत मिळते.

      कमी वाचा

      हायपोथीकेशन तपशील

      वाहन हायपोथीकेशनवर खरेदी केले गेले आहे की नाही, हे तपासताना वाहन RCचे तपशील तपासणे देखील अत्यंत आवश्यक असते. याशिवाय, जेव्हा वाहनावरील कर्ज पूर्णपणे फेडले जाते, तेव्हा तुम्हाला ते हायपोथीकेशन संपुष्टात आणण्याची देखील आवश्यकता भासू शकते. यासाठी वाहनाची मालकी कर्जदात्याकडून प्रत्यक्ष मालकाकडे हस्तांतरित करणे गरजेचे असते. अशा प्रसंगी, तुम्हाला RC चे तपशील आधीच तपासून पाहण्याची आवश्यकता भासू शकते.

      एफएक्यूज

      तुम्ही तुमच्या RCची प्रत एमपरिवहन ॲपवरून किंवा परिवहन सेवा पोर्टलवरून डाउनलोड करू शकता.

      भारतात डिजिटल RC हा वाहनाच्या ओळखीचा एक वैध पुरावा मानला जातो. तुमचे RC डिजीलॉकर ॲपमध्ये सुरक्षितपणे साठवून ठेवा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते सादर करा.

      तुमचे कायमस्वरूपी RC 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत तुमच्या निवासी पत्त्यावर पाठवले जाईल.

      RC म्हणजे वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होय.

      हे एक प्लास्टिकचे कार्ड आहे, जे वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे एक मूर्त स्वरूप आहे. यामध्ये तुमच्या वाहनाचे ते सर्व तपशील समाविष्ट असतात, जे एका सामान्य RC पुस्तकात असतात. संपूर्ण RC पुस्तक सोबत बाळगण्यापेक्षा, RC कार्ड सोबत बाळगणे अधिक सोयीचे असते.

      तुम्ही परिवहन सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन, किंवा तुमच्या जवळच्या RTO कार्यालयाला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने तुमच्या RC अर्जाचे स्टेटस तपासू शकता.

      तुम्ही परिवहन सेवा संकेतस्थळावरील ऑनलाइन सर्व्हिसेस विभागात जाऊन, तुमच्या वाहनाच्या RC हस्तांतरणाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top