• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
नोंदणी क्रमांकाद्वारे वाहन तपशील तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट

      महाराष्ट्रामध्ये सर्व वाहनांसाठी HSRP क्रमांक प्लेट असणे अनिवार्य आहे. भारतीय मोटार कायद्यांनुसार, या आधुनिक नंबर प्लेट्स असणे सक्तीचे आहे; कारण वाहनांशी संबंधित बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्ह्यांना आळा घालण्यास त्या मदत करतात. महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे फायदे, त्यासाठी येणारा खर्च आणि नोंदणी प्रक्रिया यांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

      Read more

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

      HSRP प्लेट ही एक हाय सिक्युरिटी प्लेट असते, जिच्यामध्ये क्रोमियम होलोग्राम, पुन्हा वापरता न येणारे स्नॅप लॉक्स आणि एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर यांसारख्या विविध सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असतो. या वैशिष्ट्यांमुळे HSRP नंबर प्लेटची नक्कल करणे किंवा ती काढून टाकणे अत्यंत कठीण होते. महाराष्ट्रातील सर्व वाहनांना, ज्यामध्ये 2019 पूर्वी खरेदी करून नोंदणी केलेल्या वाहनांचाही समावेश आहे, HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील नवीन वाहन मालकांना HSRP नंबर प्लेटसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची आवश्यकता नसते; कारण ती वाहनाच्या OEM/उत्पादकाकडून वाहनावर आधीच बसवलेली असते.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट वापरण्याचे फायदे

      HSRP नंबर प्लेट्सचे काही फायदे खाली दिले आहेत:

      • जलद ओळख: सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे, HSRP नंबर प्लेट्स सहजपणे स्कॅन करून ओळखता येतात. अपघात घडल्यास किंवा गाडीचा वापर बेकायदेशीररीत्या केला गेल्यास, संबंधित अधिकारी अवघ्या काही मिनिटांतच गाडीच्या मालकांना सहजपणे ओळखू शकतात.
      • वाहन चोरी कमी करते: HSRP नंबर प्लेट्सवरील स्नॅप-लॉक्समुळे या प्लेट्स काढून दुसऱ्या वाहनावर पुन्हा बसवणे शक्य होत नाही. यामुळे वाहनांची चोरी रोखली जाते आणि सुरक्षितता वाढते.
      • बनावट रजिस्ट्रेशन कमी करते: या फलकावर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि होलोग्रॅम असल्याने, या नंबरची नक्कल करणे शक्य नाही.

      महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वेबसाईटद्वारे HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करा

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. खालील पायऱ्यांचा वापर करून महाराष्ट्रात तुमच्या HSRP नंबर प्लेट्स मिळवा:

      • पायरी 1: महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. वेबपेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील 'HSRP' वर क्लिक करा. नवीन पेजवर 'HSRP ऑनलाइन बुकिंग' वर क्लिक करा. आता, ड्रॉपडाऊनमधून तुमचे RTO ऑफिस निवडा आणि 'सबमिट' वर क्लिक करा.
      • पायरी 2: तुम्हाला राज्याच्या अधिकृत HSRP वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाईल. होमपेजवर 'अप्लाय HSRP' वर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर आणि वाहन रजिस्ट्रेशन नंबरसह, तुमच्या इंजिन व चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक प्रविष्ट करा.
      • पायरी 3: जवळच्या HSRP फिटमेंट केंद्रावर तुम्हाला सोयीस्कर अशी वेळ आणि तारीख निश्चित करा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
      • पायरी 4: HSRP शुल्क ऑनलाइन भरा आणि पेमेंटची रिसीट डाउनलोड करा. HSRP नंबर प्लेट्स लावून घेण्यासाठी, तुमच्या नियोजित भेटीच्या दिवशी केंद्राला भेट द्या.

      बुक-माय-HSRP संकेतस्थळाद्वारे HSRP नंबर प्लेटसाठी रजिस्टर करा

      बुक-माय-HSRP च्या माध्यमातून महाराष्ट्रात तुमची HSRP नंबर प्लेट मिळवण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा:

      • पायरी 1: बुक-माय-HSRP वेबसाईटला भेट द्या, 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टीकर' या आयकॉनकडे जा आणि 'अप्लाय' वर क्लिक करा.
      • पायरी 2: तपशील भरा आणि राज्य म्हणून 'महाराष्ट्र' निवडा. तुमचा वाहन रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. तुमच्या इंजिन आणि चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक टाईप करा. कॅप्चा प्रविष्ट करा आणि 'व्हेरीफाय विथ वाहन' वर क्लिक करा.
      • पायरी 3: भेटीची तारीख निश्चित करा; तुमच्या सर्वात जवळचे HSRP फिटमेंट सेंटर निवडा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
      • पायरी 4: तुमच्या बुकिंगच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर, आवश्यक असलेले शुल्क ऑनलाइन भरा. शुल्काच्या रिसीटची प्रत डाउनलोड करा. भेटीच्या दिवशी, HSRP नंबर प्लेट वाहनावर बसवून घेण्यासाठी संबंधित केंद्राला भेट द्या.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर आवश्यक आहे. या तपशीलांसाठी तुमचे आरसी जवळ ठेवा.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटची किंमत

      खालील तक्ता महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटच्या किमती दर्शवतो:

      वाहन प्रकार HSRP फी
      2 व्हीलर्स ₹531
      3 व्हीलर्स ₹590
      4 व्हीलर्स ₹879.10

      महाराष्ट्रामध्ये तुमच्या HSRP चे स्टेट्स कसे तपासावे?

      महाराष्ट्रामध्ये तुमच्या HSRP नंबर प्लेटचे स्टेट्स तपासण्यासाठी, खालील पायऱ्यांचे पालन करा:

      • पायरी 1: बुक-माय-HSRP वेबसाइटला भेट द्या.
      • पायरी 2: 'ट्रॅक युअर ऑर्डर' वर क्लिक करा.
      • पायरी 3: तुमचा ऑर्डर नंबर आणि वाहन रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा.
      • पायरी 4: कॅप्चा टाइप केल्यानंतर, 'सर्च' वर क्लिक करा.

      तुमचे HSRP स्टेट्स डिस्प्ले होईल.

      महाराष्ट्रामध्ये डुप्लीकेट HSRP नंबर प्लेटसाठी अॅप्लिकेशन कसे करावे?

      तुमची HSRP नंबर प्लेट हरवली असो किंवा खराब झाली असो, खालील पायऱ्यांचे पालन करून तुम्ही महाराष्ट्रात डुप्लीकेट HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकता:

      • पायरी 1: MHHSRP वेबपेजला भेट द्या आणि MHHSRP वेबसाइट उघडा. 'रिप्लेसमेंट बुकिंग' या आयकॉनवर जा आणि 'बुक' वर क्लिक करा.
      • पायरी 2: आवश्यक तपशील प्रदान करा; यामध्ये तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन (RC) नंबर आणि फोन नंबर एंटर करा. तुमच्या वाहनाच्या चेसिस आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक भरा. कॅप्चा एंटर केल्यानंतर, 'व्हेरिफाय विथ वाहन' वर क्लिक करा.
      • पायरी 3: तुम्हाला सोयीस्कर ठरेल असे HSRP फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा आणि अपॉइंटमेंट शेड्यूल करा.
      • पायरी 4: तुमच्या बुकिंगच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, आवश्यक असलेले शुल्क ऑनलाइन भरा. HSRP शुल्क भरल्याच्या रिसीटची एक प्रत डाउनलोड करून घ्या.
      • पायरी 5: अपॉइंटमेंटच्या दिवशी, महाराष्ट्रात तुमची डुप्लीकेट HSRP नंबर प्लेट मिळवण्यासाठी फिटमेंट सेंटरला भेट द्या. जर तुमची HSRP प्लेट खराब झाली असेल, तर तुम्हाला जुन्या प्लेट्स संबंधित सेंटरवर सरेंडर करणे अनिवार्य आहे.

      महाराष्ट्रामधील HSRP नंबर प्लेट वि. नॉर्मल नंबर प्लेट

      HSRP नंबर प्लेट आणि नॉर्मल नंबर प्लेट यांच्यातील काही मुख्य फरक खालील तक्त्यात दिले आहेत:

      वैशिष्ट्य HSRP नंबर प्लेट नॉर्मल नंबर प्लेट
      अशोक चक्र उपलब्ध उपलब्ध नाही
      पुनर्वापरक्षमता पुन्हा वापरता येत नाही पुन्हा वापरता येते
      सुरक्षा वैशिष्ट्ये UIN, होलोग्राम, टँपर-प्रूफ इ. कोणतीही अॅडव्हांस्ड सुरक्षा वैशिष्ट्ये नाहीत
      ऑथेंटीकेशन जलद पडताळणी शक्य जलद पडताळणीची वैशिष्ट्ये नाहीत
      कलर कोडेड स्टिकर्स उपलब्ध उपलब्ध नाही

      HSRP कलर कोडेड स्टिकर म्हणजे काय?

      HSRP कलर कोडेड स्टिकर हे एक असे लेबल आहे, जे वाहनाच्या इंधनाचा प्रकार दर्शवते आणि ते वाहनाच्या विंडशील्डवर (पुढच्या काचेवर) लावले जाते. या स्टिकरला वाहनाची तिसरी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणूनही ओळखले जाते. HSRP कलर कोडेड स्टिकर्स हे कोणत्याही प्रकारच्या टँपर प्रूफ राहतील अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत; आणि त्यांचे रंग खालीलप्रमाणे माहिती दर्शवतात:

      • फिकट निळा: पेट्रोल/CNG
      • केशरी: डिझेल
      • राखाडी: इतर इंधनाचे प्रकार

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर नसलेल्या वाहनांसाठी दंड

      महाराष्ट्रामध्ये, ज्या वाहन मालकांकडे HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नाही, त्यांना भारतीय मोटार कायद्यांतर्गत वाहतुकीचे कठोर दंड भोगावे लागू शकतात.

      • पहिल्या गुन्ह्यासाठी ₹5,000 पर्यंतचा वाहतूक दंड आकारला जाईल.
      • त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी ₹10,000 पर्यंतचा दंड लागू होईल.
      • प्रशासनाकडून तुमचे वाहन जप्तही केले जाऊ शकते.

      FAQs

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटची किंमत वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, टू व्हीलरसाठी ही किंमत ₹531 आणि फॉर व्हीलरसाठी ₹879.10 इतकी आहे.

      होय, महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करताना जर तुम्ही होम इन्स्टॉलेशन पर्याय निवडला असेल, तरच तुम्ही HSRP रजिस्ट्रेशन प्लेट तुमच्या घरी बसवून घेऊ शकता.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटशिवाय वाहन चालवताना पकडले गेल्यास, पहिल्या गुन्ह्यासाठी तुम्हाला ₹5,000 पर्यंत दंड होऊ शकतो; तर हा गुन्हा पुन्हा करणाऱ्यांना ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

      होय, तुम्ही एखाद्या अधिकृत HSRP डीलरमार्फत HSRP नंबर प्लेटसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त संबंधित फॉर्म भरणे, वाहनाच्या नोंदणीचे तपशील देणे आणि शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क भरण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, अपॉइंटमेंटची तारीख निश्चित करा आणि तुमची HSRP नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी अधिकृत HSRP केंद्राला भेट द्या.

      HSRP नंबर प्लेटचा नियम भारतात 2019 मध्ये लागू करण्यात आला.

      नाही, महाराष्ट्रात तुम्हाला HSRP नंबर प्लेट कोणत्याही स्थानिक दुकानातून मिळणार नाही. HSRP मिळवण्यासाठी तुम्हाला बुक-माय-HSRP या संकेतस्थळावर किंवा राज्य-अधिकृत HSRP डिलरकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे.

      होय, महाराष्ट्रात जुन्या असोत किंवा नवीन, सर्वच वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट असणे सक्तीचे आहे. जर तुमच्या वाहनाची नोंदणी 2019 पूर्वी झाली असेल, तर वाहतुकीशी संबंधित कोणत्याही दंडापासून वाचण्यासाठी तुम्ही HSRP साठी अर्ज करणे आवश्यक आहे.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करताना सामान्यतः वाहन रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबरची माहिती आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ओळख/पत्ता पुरावा आणि वैध इन्शुरन्स तपशील मागितले जाऊ शकतात.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top