• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
रजिस्ट्रेशन नंबरद्वारे PUC ची एक्सपायरी डेट तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      महाराष्ट्रामध्ये PUC सर्टिफिकेट

      महाराष्ट्रामध्ये, व्हेहीकल इमिशन विहित मर्यादेतच राहील याची खात्री करण्यासाठी, प्रत्येक वाहनाकडे पोल्युशन अंडर कंट्रोल (PUC) असणे अनिवार्य आहे. या नियमाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी, राज्य सरकार 'PUC नाही, तर इंधन नाही' हा नियम लागू करण्याच्या विचारात आहे. वाहन आणि पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन आपल्याकडून योग्यरित्या व्हावे यासाठी, महाराष्ट्रात PUC सर्टिफिकेट कसे मिळवावे याविषयीच्या या मार्गदर्शिकेचा संदर्भ घ्या.

      Read more

      PUC सर्टिफिकेट म्हणजे काय?

      PUCC (पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) हे 'मोटार वाहन कायदा 1988' अंतर्गत एक अनिवार्य दस्तऐवज आहे. या कायद्यानुसार, प्रत्येक वाहनाने सरकारने निर्धारित केलेल्या एमीशन लिमिटची पूर्तता करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हे सर्टिफिकेट महाराष्ट्रात प्राप्त केले, तर ते संपूर्ण भारतात वैध ठरते. BS-IV आणि BS-VI स्टँडर्डची पूर्तता करणाऱ्या वाहनांसाठी या सर्टिफिकेटचा वैधता कालावधी 12 महिने असतो; तर इतर प्रकारच्या वाहनांसाठी हा कालावधी सहा महिने असतो.

      महाराष्ट्रामध्ये ऑफ़लाइन PUC सर्टिफ़िकेट मिळवण्याच्या पायऱ्या

      PUCC हे तुमच्या वाहनाच्या कॅरॅक्टर सर्टिफिकेटसारखे असते; ते वाहनाचा फिटनेस सिद्ध करते आणि निर्धारित पर्यावरणीय मानकांनुसार वाहन चालवणे सुरक्षित असल्याचा दुजोरा देते.

      • पायरी 1: PUCC परिवहन पोर्टलच्या होम पेजवर जा.
      • पायरी 2: राज्यांचा एक ड्रॉपडाऊन मेनू दिसेल. राज्यातील सर्व चाचणी केंद्रे पाहण्यासाठी 'महाराष्ट्र' निवडा.
      • पायरी 3: तुमचे वाहन तुमच्या पसंतीच्या कोणत्याही केंद्रावर घेऊन या. केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार तुमचे वाहन उभे करा.
      • पायरी 4: ते तुमच्या वाहनाची तपासणी करतील आणि त्याच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये एक चाचणी उपकरण घालतील. या उपकरणाकडून प्राप्त झालेली माहिती स्क्रीनवर दिसेल.
      • पायरी 5: पोल्युटंट एमीशनचे प्रमाण मर्यादेत असल्यास, ऑपरेटर चाचणीच्या निकालांचा फोटो काढतो आणि सर्टिफिकेट सुपूर्द करतो.

      महाराष्ट्रामध्ये ऑनलाइन PUC सर्टिफिकेट कसे प्राप्त करता येईल?

      वाहनाची फिजिकल एमीशन टेस्ट केल्यानंतर 'PUC' प्रमाणपत्रे जारी केली जातात. यासाठी तुम्हाला एका अधिकृत केंद्राला भेट देऊन तुमच्या वाहनाची चाचणी करून घेणे आवश्यक असते. चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, PUCC सर्टिफिकेट परिवहन PUC वेबसाइटवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते.

      महाराष्ट्र व्हेईकल PUC सर्टिफिकेट ऑनलाइन कसे डाउनलोड करता येईल?

      तुम्ही तुमचे मूळ PUCC गमावले आहे का? काळजी करू नका! खाली दिलेल्या सोप्या प्रक्रियेचा वापर करून, PUCC परिवहन वेबसाइटद्वारे तुमचे महाराष्ट्राचे PUC सर्टिफिकेट डाउनलोड करा.

      • पायरी 1: संकेतस्थळाचे होम पेज उघडा आणि 'PUC सर्टिफिकेट' पर्यायावर क्लिक करा.
      • पायरी 2: चेसिस नंबर आणि वाहन रजिस्ट्रेशन नंबर संबंधित रकान्यांमध्ये एंटर करा.
      • पायरी 3: वेबसाइटवर डिस्प्ले झालेला कॅप्चा कोड एंटर करा.
      • पायरी 4: दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी 'PUC डिटेल्स' वर क्लिक करा.

      महाराष्ट्रातील वाहनांवर केल्या जाणाऱ्या एमीशन चाचण्यांचे प्रकार

      महाराष्ट्रातील प्रत्येक वाहनावर केल्या जाणाऱ्या एमीशन चाचण्यांचा संक्षिप्त आढावा खाली दिला आहे. वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रकारानुसार, विविध चाचण्या विहित करण्यात आल्या आहेत.

      पेट्रोल

      • आयडलिंगच्या वेळी कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्सच्या एमीशनची तपासणी करण्यासाठी एक चाचणी घेतली जाते.

      डिझेल

      • वाहनातील धुराचे प्रमाण तपासण्यासाठी 'फ्री ॲक्सिलरेशन टेस्ट' घेतली जाते.

      LPG/CNG

      • वाहन आयडल स्थितीत असताना, नॉन-मिथेन हायड्रोकार्बन उत्सर्जनाची चाचणी केली जाते.
      • वाहनाच्या एक्झॉस्ट प्रणालीची हानी किंवा गळतीसाठी तपासणी केली जाते.

      PUC सर्टिफिकेटची एक्सपायरी ऑनलाइन कशी तपासता येईल?

      तुम्ही 'PUCC परिवहन' पोर्टलद्वारे तुमच्या PUC चे स्टेट्स ऑनलाइन तपासू शकता. होमपेजवरील 'PUC सर्टिफिकेट' या पर्यायावर जा; तिथे वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर प्रविष्ट करा; त्यानंतर PUC चे तपशील पाहून, ते सर्टिफिकेट वैध आहे की नाही, हे तुम्ही तपासू शकता.

      वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

      तुम्ही 'PUCC परिवहन' पोर्टलद्वारे तुमच्या PUC चे स्टेट्स ऑनलाइन तपासू शकता. होमपेजवरील 'PUC सर्टिफिकेट' या पर्यायावर जा; तिथे वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर प्रविष्ट करा; त्यानंतर PUC चे तपशील पाहून, ते सर्टिफिकेट वैध आहे की नाही, हे तुम्ही तपासू शकता.

      नाही, भारतामध्ये PUCC ऑनलाइन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध नाही. तथापि, तुमच्याकडे आधीपासूनच असलेल्या PUCC ची सॉफ्ट कॉपी तुम्ही 'परिवहन PUC' वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

      महाराष्ट्रामध्ये नवीन पेट्रोल कार्ससाठी, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एका वर्षानंतर PUC आवश्यक असते.

      होय, जुन्या वाहनांमधून होणारे पोल्युटंट एमीशन विहित मर्यादेतच आहे, याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्रात त्यांनाही PUC आवश्यक असते.

      होय, ओरिजिनल डॉक्युमेंटची मुदत संपल्यानंतर नवीन PUC सर्टिफिकेट मिळवता येते. साधारणपणे, PUC सर्टिफिकेटची मुदत संपल्यानंतर, वाहनाची पुन्हा तपासणी करून घेण्यासाठी 7 दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो.

      वैध PUCC बाळगल्यामुळे तुम्हाला भारतातील पोल्युशन कंट्रोल कायद्यांचे पालन करणे शक्य होते. वाहनाच्या इन्शुरन्स रिन्यूअलसाठीही हे सर्टिफिकेट आवश्यक असते; शिवाय, भारतातील वायू प्रदूषण नियंत्रणात योगदान देण्याची संधीही यामुळे तुम्हाला मिळते.

      होय, पोल्युशन सर्टिफिकेट आणि एमीशन सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी एकच आहेत; कारण तुमच्या वाहनातून होणाऱ्या एमीशन लेव्हल्स या पोल्युशन सर्टिफिकेटवरच नमूद केलेली असते.

      होय, BS-VI मानकांशी सुसंगत इंजिन असलेल्या वाहनांनाही PUC सर्टिफिकेट मिळवण्यासाठी दर 12 महिन्यांनी एमीशन टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

      होय, महाराष्ट्रात वाहतूक पोलीस PUC ची मागणी करू शकतात. तथापि, राज्य सरकारने मुंबईतील वाहतूक पोलिसांना वाहन मालकांच्या PUC कागदपत्रांची तपासणी करणे थांबवण्याचे आणि त्याऐवजी ई-चलान प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

      महाराष्ट्रामध्ये दुचाकी वाहनांच्या PUC चाचणीसाठी रु. 50 शुल्क आकारले जाते. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठी हे दर रु. 100, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी रु. 150 इतके आहेत.

      PUC संदर्भातील नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास, दुचाकी वाहनांसाठी रु. 1,000 आणि चारचाकी व अवजड वाहनांसाठी रु. 2,000 दंड आकारला जातो. त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी, चारचाकी वाहनांना रु. 5,000 आणि दुचाकी वाहनांना रु. 3000 दंड भरावा लागतो.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      #Rs 2094/- per annum is the price for third-party motor insurance for private cars (non-commercial) of not more than 1000cc

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      +Savings are based on the maximum discount on own damage premium as offered by our insurer partners.

      ^Lowest Price Guaranteed is based on certifications shared by insurers with us. Policybazaar will facilitate price matching subject to the terms and conditions of select insurers.

      ##Claim Assurance Program: Pick-up and drop facility available in 1400+ select network garages. On-ground workshop team available in select workshops. Repair warranty on parts at the sole discretion of insurance companies. Dedicated Claims Manager. 24x7 Claim Assistance.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top