• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
रजिस्ट्रेशन नंबरद्वारे RC चे स्टेट्स तपासा
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      तपशील पहा
      Please wait..
      By clicking on “तपशील पहा”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      Select Make
      Select Model
      Fuel Type
      Select variant
      Registration year
      Registration month
      Save & update
      Please wait..
      Search with another car number?

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      Please wait ...

      महाराष्ट्रामध्ये RC स्टेट्स तपासा

      भारतीय रस्त्यांवर वाहन चालवण्यासाठी 'व्हेहीकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट' (RC) हे एक कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य दस्तऐवज आहे. जर तुम्ही अलीकडेच नवीन किंवा डुप्लीकेट RC साठी अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमच्या वाहनाच्या RC चे स्टेट्स ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नक्की तपासळे पाहिजे. महाराष्ट्रात, तुम्ही परिवहन सेवा वेबसाइटवर जाऊन वाहनाच्या क्रमांकाद्वारे RC चे स्टेट्स तपासू शकता. वाहनाच्या RC मध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असतो आणि महाराष्ट्रात RC चे स्टेट्स तपासण्याचे विविध मार्ग कोणते आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

      Read more

      महाराष्ट्रामध्ये वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)

      वाहन RC हे एक असे दस्तऐवज आहे, जे वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि मालकीची पुष्टी करते. महाराष्ट्रात, ज्या वाहन मालकांकडे वैध RC उपलब्ध नाही, त्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी ₹2,000 आणि पुन्हा तोच गुन्हा केल्यास ₹5,000 इतका वाहतूक दंड आकारला जाऊ शकतो. महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) प्राप्त करण्यासाठी, वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) करणे आवश्यक असते.

      महाराष्ट्रातील वाहन RC बाबतची प्रमुख माहिती

      महाराष्ट्राच्या वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर तुम्हाला पाहायला मिळणारे काही तपशील खालीलप्रमाणे आहेत:

      • वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
      • रजिस्ट्रेशनची तारीख आणि वैधता कालावधी
      • चेसिस नंबर
      • इंजिन नंबर
      • मालकाचे नाव आणि पत्ता
      • कराचा वैधता कालावधी
      • इंधनाचा प्रकार आणि एमिशन नॉर्म्स (प्रकार)
      • वाहनाचा क्लास
      • उत्पादकाचे नाव
      • अर्थपुरवठादाराचे नाव (लागू असल्यास)
      • मॉडेल नाव
      • बॉडीचा प्रकार आणि सिटिंग कपॅसिटी
      • उत्पादनाचा महिना आणि वर्ष
      • वाहन तपशील - क्युबिक कपॅसिटी, व्हीलबेस, वजन, सिलेंडर्सची संख्या, इ.

      महाराष्ट्रामध्ये RC जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

      महाराष्ट्राचे वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

      • फॉर्म 20 - RC अॅप्लीकेशन फॉर्म
      • फॉर्म 21 - विक्रेत्याने जारी केलेले सेल्स सर्टिफिकेट
      • फॉर्म 22 आणि 22A - रोडवर्दीनेस सर्टिफिकेट
      • वैध वय, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा
      • वाहन खरेदीचे इंव्हॉईस
      • वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीची प्रत
      • मालकाच्या PAN कार्डची प्रत
      • विक्रेत्याद्वारे जारी केलेले टेंपररी RC
      • रजिस्ट्रेशन फी भरल्याची पावती
      • फॉर्म 34 - RC वर भाडे-खरेदी, हायपोथिकेशन किंवा लीज अॅग्रीमेंट नोंदवण्यासाठी

      महाराष्ट्रामध्ये वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) कसे मिळवावे?

      महाराष्ट्रामध्ये वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, तुम्हाला खालील पायऱ्यांचे पालन करावे लागेल:

      • स्टेप 1: तुमचे वाहन खरेदी केल्यानंतर, तुमच्या विक्रेत्याकडून पावती घ्या.
      • स्टेप 2: तुमचे वाहन नोंदवण्यासाठी तुम्ही RTO (ऑफलाइन) कडे जाऊ शकता किंवा परिवहन सेवा पोर्टलचा (ऑनलाइन) वापर करू शकता.
      • स्टेप 3: अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करा.
      • स्टेप 4: तुमचे महाराष्ट्राचे वाहन RC मिळवण्यासाठी, तुमच्या वाहनाची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरा.

      टीप: RC अर्जाचे शुल्क वाहनाच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकते. साधारणपणे, हे शुल्क ₹50 ते ₹5,000 च्या दरम्यान असते.

      महाराष्ट्रामध्ये RC स्टेट्स ऑनलाईन कसे तपासावे?

      खाली दिलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून, तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील वाहनाच्या RC चे स्टेट्स ऑनलाइन तपासू शकता:

      • परिवहन सेवा पोर्टलद्वारे महाराष्ट्र वाहन RC स्टेट्स तपासा
      • नेक्स्टजेन एमपरिवहन ॲपद्वारे महाराष्ट्र वाहन RC स्टेट्स तपासा
      • Policybazaar.com द्वारे महाराष्ट्र वाहन RC स्टेट्स तपासा

      महाराष्ट्रामध्ये RC कसे डाउनलोड करावे?

      महाराष्ट्रा वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड करण्याच्या पायऱ्या आहेत:

      • परिवहन सेवा होमपेज उघडा, 'व्हेहिकल रिलेटेड सर्व्हिसेस' वर क्लिक करा आणि यादीमधून 'महाराष्ट्र' निवडा.
      • तुमचे RTO निवडा आणि 'प्रोसिड' वर टॅप करा.
      • RC स्टेट्स पेजवरील 'डाउनलोड डॉक्युमेंट' वर क्लिक करा आणि वाहनाचे आवश्यक तपशील प्रदान करा.
      • OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
      • तुमच्या वाहनाचे RC तपशील डिस्प्ले झाल्यानंतर, वेबसाईटवरून त्याची एक प्रत डाउनलोड करा.

      महाराष्ट्रामध्ये वाहनाचे डुप्लीकेट वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे मिळवावे?

      खाली दिलेल्या पायऱ्या तुम्हाला महाराष्ट्रात वाहनाचे डुप्लीकेट RC ऑनलाइन मिळवण्यास मदत करतील:

      • स्टेप 1: परिवहन सेवा वेबसाइट उघडा.
      • स्टेप 2: 'ऑनलाइन सेवा' विभागावर जा.
      • स्टेप 3: 'व्हेहीकल रिलेटेड सर्व्हिसेस' वर क्लिक करा आणि 'महाराष्ट्र' निवडा.
      • स्टेप 4: तुमचा 'रजिस्ट्रेशन नंबर' प्रविष्ट केल्यानंतर आणि तुमचे 'RTO' निवडल्यानंतर, 'प्रोसिड' वर क्लिक करा.
      • स्टेप 5: 'अॅप्लीकेशन फॉर डुप्लीकेट RC' वर क्लिक करा.
      • स्टेप 6: वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि वाहनाच्या चेसिस क्रमांकाचे (Chassis Number) शेवटचे पाच अंक यांसारखी आवश्यक माहिती भरा.
      • स्टेप 7: 'व्हेरिफाय डिटेल्स' वर क्लिक करा.
      • स्टेप 8: OTP किंवा आधार तपशीलांच्या माध्यमातून माहितीची पडताळणी करा.
      • स्टेप 9: डुप्लीकेट RC साठी अर्ज करण्याचे कारण निवडा.
      • स्टेप 10: महाराष्ट्रामध्ये डुप्लीकेट RC मिळवण्यासाठीची अॅप्लीकेशन फी भरा.
      • स्टेप 11: आवश्यक कागदपत्रे सबमीट करा आणि वाहनाच्या तपासणीसाठी RTO कडे अपॉइंटमेंट निश्चित करा.

      तुम्हाला तुमचे महाराष्ट्रातील वाहनाचे डुप्लीकेट RC प्राप्त होईल.

      महाराष्ट्रामध्ये वाहनाच्या RC ट्रान्सफरचे स्टेट्स कसे तपासावे?

      महाराष्ट्रातील वाहनाच्या RC ट्रान्सफरचे स्टेट्स ऑनलाइन तपासण्यासाठीच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

      • परिवहन सेवा वरील 'नो युअर अॅप्लीकेशन स्टेट्स' हे पेज उघडा.
      • त्या पृष्ठावर 'रजिस्ट्रेशन नंबर' किंवा 'अॅप्लीकेशन नंबर' टाइप करा.
      • 'सबमिट' वर क्लिक करा.
      • महाराष्ट्रातील तुमच्या वाहनाच्या RC ट्रान्सफरचे स्टेट्स स्क्रीनवर डिस्प्ले होईल.

      Frequently asked question

      हो, महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या वाहनाचे RC 15 वर्षांनंतर रिन्यू करू शकता. भारतात, वाहनांचे RC साधारणपणे 15 वर्षांच्या मुदतीसाठी दिली जातात. तुमच्या RC ची मुदत संपण्यापूर्वीच तुम्ही ते रिन्यू करणे आवश्यक आहे.

      महाराष्ट्रामध्ये RC ट्रान्सफरचा खर्च वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो. RC ओनरशिप ट्रान्सफर फी ही साधारणपणे नोंदणी शुल्काच्या निम्म्याइतकी असते आणि ती ₹25 ते ₹2,500 च्या दरम्यान असते.

      महाराष्ट्रामध्ये वाहन रजिस्ट्रेशनच्या नवीन नियमानुसार, नवीन वाहन मालकांना त्यांचे RC मिळवण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून वाटप करण्यात आलेल्या पार्किंग जागेचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.

      होय, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात वाहने चालवण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असणे सर्व वाहनांसाठी अनिवार्य आहे.

      महाराष्ट्रामध्ये, वाहनाच्या प्रकारानुसार HSRP ची किंमत ₹531 ते ₹879 च्या दरम्यान असते.

      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top