भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपन्या
-
मुख्यपृष्ठ
-
मोटर विमा
-
कार विमा
- भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपन्या
भारतातील कार विमा पॉलिसीजचे प्रकार
भारतात, कार मालक दोन प्रकारच्या कार पॉलिसीज खरेदी करू शकतात. त्या म्हणजे :
व्यापक कार विमा
व्यापक कार विमा पॉलिसी विमित कार संपूर्णपणे संरक्षित करते. आग, अपघात, चोरी, तोडफोड, नैसर्गिक आपत्तीं, मानवनिर्मित आपत्तींमुळे उद्भवणार्या सर्व प्रकारच्या अनपेक्षित जोखमींपासून ही पॉलिसी कारचं संरक्षण करते. कुठलंही तृतीय पक्ष अपघाती दायित्व जे पॉलिसीधारकाला कायदेशीररित्या देणं भाग आहे ते सुद्धा ही पॉलिसी कव्हर करते. शिवाय, ह्या प्रकारचा विमा विमित कारच्या मालक-चालकाला वैयक्तिक अपघात कव्हरही प्रदान करतो.
तृतीय पक्ष दायित्व कार विमा
तृतीय पक्ष दायित्व कार विमा तृतीय पक्षाला अपघाती शारीरिक जखमा, मृत्यू किंवा मालमत्तेची हानी झाल्यामुळे उद्भवणार्या पॉलिसीधारकाच्या कुठल्याही तृतीय पक्ष दायित्वांसाठी संरक्षण देतो. विमित कारला किंवा तिच्या ड्रायव्हरला झालेली कुठलीही हानी किंवा नुकसान ह्या प्रकारचा विमा कव्हर करत नाही.
मूल्य दावा प्रमाण आणि नेटवर्क गॅरेजेस असलेल्या भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपन्या
भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपन्या त्यांच्या मूल्य दावा प्रमाण (आयसीआर) आणि विना रोकड दुरुस्तीची सुविधा मिळू शकणार्या नेटवर्क गॅरेजेसच्या संख्यांसह खाली दिलेल्या आहेत त्या पहा:
कार विमा कंपन्या |
कॅशलेस गॅरेजेस |
इनकर्ड क्लेम रेशो (2018-2019) |
बजाज अलायंज कार विमा |
4000+ |
62% |
भारती आक्सा कार विमा |
5200+ |
75% |
चोला एमएस कार विमा |
6900+ |
84% |
डिजिट कार विमा |
1400+ |
76% |
एडेलविस कार विमा |
1000+ |
145% |
फ्युचर जनरली कार विमा |
2500+ |
69% |
एचडीएफसी अर्गो कार विमा |
6800+ |
82% |
इफ्को टोकियो कार विमा |
4300+ |
87% |
कोटक महिंद्रा कार विमा |
1000+ |
74% |
लिबर्टी कार विमा |
4300+ |
70% |
नॅशनल कार विमा |
एनए |
127.50% |
न्यू इंडिया अॅश्युरन्स कार विमा |
1100+ |
87.54% |
ओरिएंटल कार विमा |
एनए |
112.62% |
रहेजा क्यूबीई कार विमा |
1100+ |
102% |
रिलायन्स कार विमा |
3700+ |
85% |
रॉयल सुंदरम कार विमा |
4600+ |
89% |
एसबीआय कार विमा |
5400+ |
87% |
श्रीराम कार विमा |
1500+ |
69% |
टाटा एआयजी कार विमा |
एनए |
70% |
यूनायटेड इंडिया कार विमा |
700+ |
120.79% |
यूनिवर्सल सोम्पो कार विमा |
एनए |
88% |
अस्वीकृती: * पॉलिसीबाजार एखाद्या विमाकर्त्याने ऑफर केलेल्या कोणत्याही विशिष्ट विमाकर्त्याला किंवा विमा उत्पादनाला समर्थन, रेटिंग देत नाही किंवा त्याची शिफारस करत नाही. आयसीआर आयआरडीए वार्षिक अहवाल 2018-19 मधून घेतला आहे.
भारतातील सर्वोत्कृष्ट कार विमा कंपन्यांचा आढावा
तुमची कार सुरक्षित करण्यासाठी तुम्ही विचारात घेऊ शकाल अशा सर्वोत्तम विमा कंपन्यांचा हा एक धावता आढावा आहे:
बजाज अलायंज कार इन्शुरन्स
बजाज अलायंज जनरल इन्शुरन्स कं. लिमि. ही आघाडीच्या कार विमा कंपन्यांपैकी एक आहे जिला मनी टूडेने 2020 मध्ये सर्वोत्तम मोटार विमा म्हणून सन्मानित केलं. ही कंपनी व्यापक विमा पॉलिसी तशीच केवळ- दायित्व पॉलिसी देते. ह्यांच्या योजना स्वस्त, लवचिक आणि अंतर किंवा दिवसाप्रमाणे स्वतःला अनुकूल केल्या जाऊ शकतात.
बजाज अलयांज कार विमा तृतीय पक्ष कायदेशीर दायित्वासाठी तसंच नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीं किंवा चोरी ह्यामुळे झालेल्या तुमच्या कारच्या हानी किंवा नुकसानासाठी कव्हरेज देते. ह्यात मालक-चालकासाठी 15 लाखाचं वैयक्तिक अपघात (पीए) कव्हरही मिळतं. तुम्ही सीएनजी किट कव्हरेज, एनसीबी सूट, अॅक्सेसरीज कव्हर आणि सहप्रवासी/ पेड चालकासाठी पीए कव्हर देखील निवडू शकता.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● ऑनलाइन पॉलिसी देणं आणि नूतनीकरण ● शून्य घसारा कव्हर उपलब्ध ● 24x7 स्पॉट असिस्टंस उपलब्ध ● स्व-वाहन सर्वेक्षण आणि मोटार-ऑन-द-स्पॉट सहित त्वरित क्लेम सेटलमेंट ● ऐच्छिक जादा सवलत ● चोरी-विरोधी उपकरण लावण्यासाठी सूट ● स्वीकृत ऑटोमोबाइल संघटना सदस्यता सवलत. |
● डेप्रिसिएशन शिल्ड ● की अँड लोक रिप्लेसमेंट ● इंजिन संरक्षक ● वैयक्तिक सामान ● कन्व्हेयन्स बेनिफिट ● कन्झ्युमेबल एक्स्पेन्सेस |
भारती आक्सा कार विमा
भारती आक्सा जनरल इन्शुरन्स कं. लिमि. भारतातील एक लोकप्रिय कार विमा प्रदाता आहे. ही कंपनी चोरी, अपघात, नैसर्गिक आपत्तीं आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे तुमच्या कारला झालेल्या हानी/ नुकसानासाठी कव्हरेज देते. त्याचबरोबर, ती तृतीय-पक्ष दायित्वे कव्हर करते आणि मालक-चालकाला 15 लाख रुपयांचं वैयक्तिक अपघाताचं कव्हर देते.
भारती आक्सा कार विमा तीन प्रकारच्या विमा योजना प्रदान करते –
- व्यापक कार विमा
- तृतीय पक्ष दायित्व योजना
- स्वतंत्र नुकसान योजना
भारती आक्सा कार विम्याकडे भारतातील सर्वात मोठं विनारोकड गॅरेजचं जाळं आहे. अतिरिक्त प्रिमियम भरल्यावर पेड क्लीनर्स/ चालकांप्रतीची कायदेशीर दायित्वे किंवा अॅक्सेसरीजचं नुकसान ह्यांसाठी कव्हरेज निवडण्याचा पर्याय ही योजना तुम्हाला देते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● जलद ऑनलाइन पॉलिसी खरेदी ● दाव्यांसाठी 24x7 सहाय्य ● नेटवर्क गॅरेजेसवर विना रोकड क्लेम सेटलमेट |
● अवमूल्यन कव्हर ● उपभोग्य कव्हर ● रोडसाईड अपघात ● की रिप्लेसमेंट कव्हर ● इंजिन अँड गियर बॉक्स कव्हर ● सहप्रवाशासाठी वैयक्तिक अपघाताचं कव्हर ● रुग्णवाहिका शुल्क ● इनवॉइस प्राइस कव्हर ● हॉस्पिटल रोकड ● वैद्यकीय खर्च |
चोलामंडलम कार विमा
चोला एमएस जनरल विमा कं. लिमि. ही आपल्या देशातील एक नामांकित कार विमा प्रदाता आहे. त्यांची कार विमा पॉलिसी तृतीय-पक्ष वैयक्तिक दायित्वे आणि तृतीय-पक्ष मालमत्ता नुकसानापासून रक्षण करते. ही कंपनी नैसर्गिक/ मानवनिर्मित आपत्तीं किंवा चोरीमुळे स्वतःचं नुकसानदेखील कव्हर करते आणि मालक-चालकाला 15 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघाताचं कव्हर देते. ही भारतात तीन प्रकारच्या कार विमा योजना प्रदान करते –
- तृतीय पक्ष कार विमा
- शून्य घसारा कार विमा
- व्यापक कार विमा
चोला एमएस कार विम्याकडे भारतात कॅशलेस गॅरेजचं सर्वात मोठं जाळं आहे. ही 3000 हजार रुपयांपर्यंत टोविंग चार्जेसची भरपाई करेल. ही प्रवाशांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघाताचं कव्हर निवडण्याची देखील परवानगी तुम्हाला देतो.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● 24x7 सहाय्य ● ऑनलाइन पॉलिसी नूतनी करण ● व्हिंटेज कार डिसकाऊंट ● स्वीकृत ऑटोमोबाईल संघटना सदस्यत्व सवलत ● चोरी प्रतिबंधक उपकरण स्थापना सवलत ● विशेष डिझाईन केलेल्या/ सुधारित वाहनासाठी सवलत ● ऐच्छिक वजावटयोग्य सवलत ● साइटवर किरकोळ दुरूस्ती ● पसंतीच्या कार्यशाळेत दुरूस्ती सवलत |
● अवमूल्यन माफी ● रोडसाईड इमर्जन्सी असिस्टंस ● रिप्लेसमेंट कीज ● निश्चित दैनिक भत्ता ● वैयक्तिक सामान कव्हर ● पुनर्स्थापना मूल्य ● वाहन भत्ता ● मासिक हफ्ता कव्हर ● नो क्लेम बोनस संरक्षण ● डिसेबल्ड वेहिकल कव्हरेज ● विमा खर्च कव्हर ● नोंदणी प्रमाणपत्र गमावल्यास कव्हर ● कंझ्युमेबल्स कव्हर ● फ्रेंचाईज बेनिफिट ● पॉलिसीची स्वयं वृद्धी ● परवाना गहाळ झाल्यास कव्हर ● चावी गहाळ झाल्यास कव्हर ● इएमआय कव्हर ● वाहन बदलाचे फायदे देणारं कव्हर ● चोला मूल्यवर्धित सेवा |
डिजिट कार विमा
डिजिट कार विमा ही एक प्रमुख स्टार्ट-अप कंपनी आहे जी विमित कारला व्यापक संरक्षण देते. ह्यात तृतीय-पक्ष नुकसानाबरोबर अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्तीं ह्यांच्यामुळे झालेलं तुमच्या कारचं कुठलंही नुकसान/हानी कव्हर होतं. ही कंपनी मालक-चालकाला वैयक्तिक अपघातासाठीही कव्हर देते. डिजिट कार विमा तुमच्यासाठी दोन प्रकारच्या कार विमा योजना देऊ करते –
- तृतीय पक्ष कार विमा
- व्यापक कार विमा कव्हर
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● सहजपणे ऑनलाइन पॉलिसी देणे ● नो क्लेम बोनस ● 24x7 सहाय्य ● दरवाजावर येऊन वाहन नेणे व त्याची दुरूस्ती ● विना-रोकड दुरूस्ती ● स्मार्टफोनच्या सहाय्याने स्व-तपासणी ● अतिवेगवान दावे |
● शून्य घसारा कव्हर ● ब्रेकडाऊन असिस्टंस ● प्रवासी कव्हर ● कंझ्युमेबल कव्हर ● रिटर्न टु इनवॉइस कव्हर ● टायर संरक्षण कव्हर ● इंजिन अँड गियर बॉक्स कव्हर |
एडेलविस कार विमा
एडेलविस कार विमा ही भारतातील आणखी एक खाजगी विमा कंपनी आहे जी मोटार विमा सोल्यूशन्स प्रदान करते. ही कंपनी तृतीय पक्ष उत्तरदायित्वे तसंच तुमच्या कारला होणारी कुठलीही हानी/ नुकसान कव्हर करते. ही मालक-चालकाला 15 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात कव्हरदेखील प्रदान करते. तुम्ही दोन प्रकारच्या एडेलविस विमा योजना खरेदी करू शकता –
- खाजगी कार व्यापक विमा
- खाजगी कार केवळ दायित्व विमा
एडेलविस कार विमा प्रवाशांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर आणि पेड ड्राइव्हर्ससाठी कायदेशीर दायित्व कव्हरची निवड करून तुमचं कव्हरेज वाढवायचा तुम्हाला पर्याय देते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● विनारोकड गॅरेजेसमध्ये अग्रक्रम सेवा ● दाव्यांची वेगवान फेड. |
● घसारा संरक्षण ● रोडसाईड असिस्टंस ● इंजिन संरक्षण ● कंझ्युमेबल एक्सपेन्सेस संरक्षण ● अनिवार्य कपात संरक्षण ● इनवॉइस मूल्य संरक्षण ● एनसीबी संरक्षण ● वैयक्तिक वस्तु संरक्षण ● कीज अँड लॉक्स संरक्षण |
फ्युचर जनरली कार विमा
फ्युचर जनरली इंडिया कार विमा कं. लिमि. ही भारतातील एक लोकप्रिय कार विमा कंपनी आहे. ही कंपनी मालक-चालकाला 15 लाख रुपयांच्या वैयक्तिक अपघात कव्हरबरोबर तृतीय पक्ष दयित्वे आणि कारच्या नुकसानासाठी व्यापक कव्हरेज देते. तुम्ही अतिरिक्त प्रिमियम भरून पेड ड्रायव्हर, क्लीनर किंवा प्रवाश्यांबाबतच्या अधिक कायदेशीर दायित्वांच्या कव्हरेजचीही निवड करू शकता.
फ्युचर जनरली कार विमा तुम्हाला प्रवाशांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात कव्हर निवडण्याची परवानगीही देते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस (एनसीबी) ● विनारोकड गॅरेजेसमध्ये अग्रक्रम सेवा ● दाव्यांची वेगवान फेड. |
● घसारा संरक्षण ● रोडसाईड असिस्टंस ● इंजिन संरक्षण ● कंझ्युमेबल एक्सपेन्सेस संरक्षण ● अनिवार्य कपात संरक्षण ● इनवॉइस मूल्य संरक्षण ● एनसीबी संरक्षण ● वैयक्तिक वस्तु संरक्षण ● कीज अँड लॉक्स संरक्षण |
एचडीएफसी अर्गो कार विमा
एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लिमि. ही भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपन्यांपैकी एक आहे. ह्या कंपनीची कार विमा पॉलिसी तृतीय-पक्ष दायित्वें तसंच अपघात, चोरी, आग आणि स्फोट, नैसर्गिक आपत्तीं हयांमुळे तुमच्या वाहनाच्या होणार्या हानी/ नुकसानाचंही कव्हर देते. ह्याशिवाय, ही मालक-चालकाला वैयक्तिक अपघाताचे कव्हरही देते. ही तुमच्या कारसाठी तीन प्रकारच्या विमा योजना देते –
- तृतीय-पक्ष दायित्व योजना
- व्यापक कार विमा योजना
- स्वतंत्र कार विमा योजना
एचडीएफसी अर्गो कार विम्याकडे गॅरेजेसचं सर्वात मोठं जाळं आहे. हिच्या मोटर पॉलिसीमध्ये 1500 रुपयांपर्यंत टोविंग शुल्काचीही भरपाई केली जाते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● नेटवर्क गॅरेजेसवर विनारोकड दावे ● दिवसरात्र कार दुरूस्ती सेवा ● दाव्यांना 30 मिनिटात मंजूरी ● अमर्यादित दाव्यांची सुविधा |
● शून्य घसारा कव्हर ● नो क्लेम बोनस संरक्षण ● आपत्कालीन सहाय्य कव्हर ● रिटर्न टु इनवॉइस ● की रिप्लेसमेंट कव्हर ● इंजिन अँड गियर बॉक्स कव्हर ● वापराचं नुकसान - डाउनटाइम संरक्षण ● कन्झ्युमेबल आयटम्सची किंमत |
इफ्फ्को टोकियो कार विमा
इफ्फ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कं. लिमि. ही देशातील अग्रगण्य कार विमा प्रदात्यांपैकी एक आहे जी विमित कारला विस्तृत संरक्षण प्रदान करते. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्तीनंतरची कारची हानी/नुकसान तसंच तृतीय-पक्ष कायदेशीर दायित्वे ह्यांच्यासाठी ही कंपनी कव्हरेज देईल. ही मालक-चालकाला वैयक्तिक अपघाताचं कव्हरही देते जे अतिरिक्त प्रिमियम भरल्यावर प्रवाशांना कव्हर करण्यासाठीही वाढवलं जाऊ शकतं.
इफ्फ्को टोकियो कार विमा दोन प्रकारात उपलब्ध आहे –
- व्यापक कार विमा
- तृतीय-पक्ष कार विमा
तुम्ही अतिरिक्त प्रिमियम भरून सीएनजी/ एलपीजी इंधन किट कव्हर आणि अॅक्ससरीजचं नुकसान/हानी कव्हरही निवडू शकता.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● 24x7 रोडसाईड असिस्टंस ● नो क्लेम बोनस ● नेटवर्क गॅरेजेसवर विनारोकड दावे |
● शून्य घसारा कव्हर ● इंजिन संरक्षण ● नो क्लेम बोनस संरक्षण ● रोडसाईड असिस्टंस ● रिटर्न टु इनवॉइस |
कोटक महिंद्र कार विमा
कोटक महिंद्र जनरल विमा कं. लिमि. ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार विमा प्रदात्यांपैकी एक आहे. ही तिच्या व्यापक खाजगी कार विमा योजनेने तुमच्या कारला चौफेर संरक्षण प्रदान करते. ही तृतीय-पक्ष कायदेशीर दायित्वे, द्वि-इंधन प्रणाली, आणि विद्युत/ विनाविद्युत उपकरणांबरोबर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपतींमुळे होणार्या तुमच्या कारच्या हानी/ नुकसानीसाठी कव्हरेज प्रदान करते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नेटवर्क गॅरेजेसवर विनारोकड दावे ● नो क्लेम बोनस लाभ ● स्वीकृत एएआय सदस्यता सवलत ● ऐच्छिक वाजवटयोग्य सवलत |
● रोडसाईड असिस्टंस ● कन्झ्युमेबल्स कव्हर ● घसारा कव्हर ● इंजिन संरक्षण ● टायर कव्हर ● रिटर्न टु इनवॉइस ● दैनिक कार भत्ता ● वैयक्तिक सामानाचं नुकसान ● एनसीबी संरक्षण ● की रिप्लसमेंट |
लिबर्टी कार विमा
लिबर्टी कार विमा ही आणखी एक मोटार विमा कंपनी आहे जी तुम्ही तुमच्या कारचा विमा खरेदी करताना विचारात घेऊ शकता. ही विमित कारला अपघातासाठीची कव्हर्स, तृतीय-पक्ष कव्हर्स, चोरी, नैसर्गिक/मानवनिर्मित आपत्तींसाठी डॅमेज कव्हर्स आणि वैयक्तिक अपघात कव्हर प्रदान करते. ही दोन प्रकारच्या विमा योजना देते –
- व्यापक पॉलिसी
- केवळ दायित्व पॉलिसी
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● सध्याच्या विमाकर्त्याकडून नो क्लेम बोनसचं हस्तांतरण ● नेटवर्क गॅरेजेसवर विनारोकड दाव्यांसाठी सेवा ● दूरध्वनी सहाय्य ● 7 दिवसात दाव्यांची फेड ● नूतनीकरण सवलत |
● घसारा कव्हर ● गॅप वॅल्यू कव्हर ● कन्झ्युमेबल्स कव्हर ● रोडसाईड असिस्टंस ● की लॉस कव्हर ● प्रवासी सहाय्य कव्हर ● इंजिन सुरक्षित कव्हर |
नॅशनल कार विमा
रतानॅशनल विमा कं. लिमि. ही भातील आघाडीच्या कार विमा प्रदात्यांपैकी एक आहे. ही कंपनी तृतीय-पक्ष दायित्वे, नैसर्गिक आपत्तीं, चोरी आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारी कारची हानी/ नुकसान यापासून संरक्षण प्रदान करते. ही 1500 रुपयांपर्यंत टोविंगचं शुल्कही कव्हर करते. तुमच्या निवडीसाठी नॅशनल कार विम्याकडे दोन प्रकारच्या कार विमा योजना आहेत –
- वार्षिक दायित्व-केवळ पॉलिसी
- वार्षिक व्यापक पॉलिसी
भारतातील कार विमाकर्त्यांमध्ये नॅशनल कार विम्याचे इन्कर्ड क्लेम रेशोज सर्वात जास्त आहेत.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● टोविंगला सहाय्य ● नो क्लेम सवलत ● जलद नूतनीकारण |
● शून्य घसारा ● इनवॉइस संरक्षण ● नील डेप्रिसिएशन प्लस ● एनसीबी संरक्षण ● इंजिन संरक्षण |
न्यू इंडिया अश्युरन्स कार विमा
न्यू इंडिया अश्युरन्स कं. लिमि. ही एक सर्वोत्तम विमा कंपनी आहे जिची जगभरातील सुमारे 28 देशात उपस्थिती आहे. ही कंपनी एक प्रख्यात कार विमा प्रदाता आहे जी दायित्व-केवळ पॉलिसी आणि व्यापक पॉलिसीदेखील देते. मालक-चालकाचा वैयक्तिक अपघात, तृतीय पक्ष दायित्वें तसंच चोरी, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपतीं ह्यांमुळे होणारं तुमच्या कारचं कुठलंही हानी/ नुकसान ह्यांच्यासाठी ही कंपनी कव्हरेज प्रदान करते.
न्यू इंडिया अश्युरन्स कार विमा जास्तीत जास्त 1500 रुपयांपर्यंत टोविंग शुल्कदेखील कव्हर करते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम्स सवलत ● टोविंग सहाय्य उपलब्ध ● स्वीकृत गॅरेजेसवर विनारोकड दावे |
● लॉस ऑफ अॅक्ससरीज ● पेड चालक आणि प्रवाशांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर ● कर्मचार्यांप्रती कायदेशीर दायित्व |
ओरिएंटल कार विमा
ओरिएंटल कार वीमा ही एक पब्लिक विमा कंपनी आहे जी तुमच्या खाजगी कारला व्यापक संरक्षण प्रदान करते. तिच्या खाजगी कार विमा पॉलिसीची अश्याप्रकारे रचना केली जाते की वाहनाचे अपघाती नुकसान/हानी, तृतीय पक्ष दायित्वें तसंच चोरी, नैसर्गिक आपत्तीं, आग/ स्फोट/ वीज पडणे/ स्व-प्रज्वलन किंवा वहातुकीदरम्यान होणारं नुकसान/ हानी कव्हर होईल. शिवाय, ही मालक-चालकाला वैयक्तिक अपघातासाठीही कव्हर देते.
अनेक सवलती आणि अॅड-ऑन कव्हर्स देण्याव्यतिरिक्त, ओरिएंटल कार विमा तुम्हाला अतिरिक्त प्रिमियम भरल्यावर सीएनजी/ एलपीजी इंधन कव्हरेज आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स कव्हरेज निवडण्याचीही परवानगी देते.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● चोरी-विरोधी उपकरण सवलत ● ऐच्छिक वजावटयोग्य सवलत ● नो क्लेम बोनस (एनसीबी) ● ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● पॉलिसीचं ऑनलाइन नूतनीकरण |
● शून्य घसारा कव्हर ● पर्यायी कार लाभ ● वैयक्तिक वस्तूंचं नुकसान ● टीव्हीएसद्वारे मोफत आपत्कालीन सेवेचा लाभ |
रहेजा क्यूबीई कार विमा
रहेजा क्यूबीई कार विमा कार विमा योजना देणारी भारतातील एक विश्वासार्ह मोटार विमा प्रदाता आहे. तृतीय पक्ष कायदेशीर दायित्वांबरोबर अपघात, नैसर्गिक आपत्तीं किंवा चोरीनंतर तुमच्या कारला झालेल्या कुठल्याही हानी/ नुकसानापासून ती संपूर्ण संरक्षण देते. या व्यतिरिक्त, ती मालक- चालकाला वैयक्तिक अपघाताचं कव्हरसुद्धा देते.
रहेजा क्यूबीई कार विमा तुम्हाला निवड करण्यासाठी चार प्रकारच्या कार विमा योजना देते -
- खाजगी कार व्यापक पॉलिसी
- केवळ दायित्व – खाजगी कार पॉलिसी
- स्वतंत्र ओन डॅमेज पॉलिसी – खाजगी कार
- खाजगी कार पॉलिसी – एकत्रित
तुम्ही विद्युत/विना-विद्युत उपकरणांसाठीचं कव्हर, कारमधल्या उपस्थितांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर (पीए) आणि क्लीनर्स/ पेड चालकांप्रती कायदेशीर दायित्व, अशी अतिरिक्त कव्हर्सही खरेदी करू शकता.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● जास्त ऐच्छिक जादा सवलत ● ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● स्वीकृत चोरी-विरोधी उपकरण सवलत |
● शून्य घसारा ● कन्झ्युमेबल एक्स्पेन्सेस ● इंजिन संरक्षक ● की प्रोटेक्ट कव्हर ● दैनिक वाहन भत्ता ● रिटर्न टु इनवॉइस ● वैयक्तिक वस्तूंचं नुकसान ● एनसीबी रीटेंशन कव्हर ● टायर आणि रिम संरक्षक |
रिलायन्स कार विमा
रिलायन्स जनरल विमा कं. लिमि. ही तुमच्या चार चाकी वाहनासाठी त्वरित विमा उपाय देणारी आणखी एक अत्यंत लोकप्रिय कार विमा कंपनी आहे. ती व्यापक पॉलिसी प्रदान करते जी तृतीय पक्ष दायित्वें तसंच अपघात, मानवनिर्मित/ नैसर्गिक आपत्तीं किंवा चोरी ह्यांच्यामुळे झालेल्या कुठल्याही हानी किंवा नुकसानांपासून तुमच्या कारचं संरक्षण करेल. ती मालक-चालकाला 15 लाख रुपयांचं वैयक्तिक अपघाताचं कव्हरही देते.
रिलायन्स जनरल कार विमा दोन प्रकारच्या योजना देते –
- तृतीय-पक्ष दायित्व कार विमा पॉलिसी
- व्यापक कार विमा पॉलिसी
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● ऐच्छिक वजावटयोग्य सवलत ● भारतीय ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● सुरक्षा उपकरण स्थापना सवलत ● कागदपत्रांशिवाय त्वरित नूतनीकरण |
● शून्य घसारा ● कन्झ्युमेबल्स कव्हर ● एनसीबी रीटेंशन कव्हर ● इंजिन संरक्षक कव्हर ● दैनिक भत्ता लाभ ● की प्रोटेक्ट कव्हर ● ईएमआय संरक्षण |
रॉयल सुंदरम कार विमा
रॉयल सुंदरम कार विमा कुठल्याही अनपेक्षित दुर्घटनांपासून तुमच्या कारला संपूर्ण संरक्षण देते. त्यांची कार शिल्ड विमा पॉलिसी व्यापक कार विमा कव्हरेज देते ज्यात मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघाताचं कव्हर, तृतीय पक्ष मालमत्तेसाठी नुकसानभरपाई आणि अमर्यादित तृतीय पक्ष दायित्वें समाविष्ट आहेत. अपघाती आणि बाह्य नुकसान, नैसर्गिक आपत्तीं, आग आणि स्फोट, घरफोडी आणि चोरी, द्वेषपूर्ण कृत्य आणि मानवनिर्मित आपत्तीं ह्यांच्यापासून उद्भवणार्या हानी किंवा नुकसानापासून ही पॉलिसी संरक्षण देते.
रॉयल सुंदरम कार विमा तुम्हाला आणखी कव्हर निवडण्याची सुविधाही देते ज्यात पेड ड्राइव्हर्स आणि अज्ञात प्रवासी ह्यांच्यासाठी वैयक्तिक अपघाताचं कव्हर, सीएनजी किट/ द्वि-इंधन प्रणालीचं कव्हर, पेड ड्राइव्हर्स आणि कर्मचार्यांप्रती कायदेशीर दायित्वं आणि विद्युत आणि विनाविद्युत फिटिंग्जही समाविष्ट असतात.
त्याशिवाय, रॉयल सुंदरम कार विम्याचा इन्कर्ड क्लेम रेशो (आयसीआर) भारतातील खाजगी कार विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● विनामूल्य रोडसाईड असिस्टंस ● भारतीय ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● ऐच्छिक वजावटयोग्य सवलत |
● पूर्ण इनवॉइस मूल्य कव्हर ● नो क्लेम बोनस (एनसीबी) संरक्षक ● टायर कव्हर ● की प्रोटेक्टर ● घसारा माफी कव्हर ● लॉस ऑफ बॅगेज कव्हर ● विंडशिल्ड ग्लास कव्हर ● अतिरिक्त कारचं कलम ● ऐच्छिक वजावटयोग्य कव्हर ● इंजिन (बिघाड) संरक्षक कव्हर ● आजीवन रोड टॅक्स कलम |
एसबीआय कार विमा
SBI कार विमा तुमच्या कारचं रक्षण करण्यासाठी व्यापक पॉलिसीज प्रदान करणारी एक लोकप्रिय मोटार विमा कंपनी आहे. वाहनाचं अपघाती नुकसान, मालक-चालकाला 15 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात आणि तृतीय पक्ष दायित्वं ह्यांसाठी ती कव्हरेज देते. आग, नैसर्गिक आपत्तीं, स्व-प्रज्वलन, स्फोट आणि अपघात ह्यांच्यापासून विमित वाहनाच्या नुकसान किंवा हानीसाठी कव्हर उपलब्ध आहे.
तुम्ही तुमच्या एसबीआय मोटार खाजगी कार विमा पॉलिसीअंतर्गत द्वि-इंधन किट कव्हर, कर्मचारी आणि पेड ड्रायव्हरांसाठी कायदेशीर दायित्वं आणि प्रवाशांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर देखील निवडू शकता.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● ऐच्छिक जादा सवलत ● जलद दावा सेटलमेंट प्रक्रिया |
● रिटर्न टु इनवॉइस ● इंजिन गार्ड ● घसारा परतफेड ● रोडसाईड असिस्टंस ● की रीप्लेसमेंट ● बचाव कव्हर ● आपल्या माणसांचे नुकसान ● एनसीबी संरक्षण ● गैरसोय भत्ता ● हॉस्पिटल डेली कॅश कव्हर ● टायर आणि रीम गार्ड ● ईएमआय संरक्षक |
श्रीराम कार विमा
श्रीराम कार विमा तुमच्या कारसाठी सुरक्षा उपाय प्रदान करणारी एक सुप्रसिद्ध मोटार विमा कंपनी आहे. त्यांची व्यापक कार विमा पॉलिसी तृतीय पक्ष मालमत्ता नुकसान, तृतीय पक्ष दायित्वं, आणि नैसर्गिक आपतीं, अपघात, चोरी, द्वेषपूर्ण कृत्यं, आग, मानवनिर्मित आपत्तीं आणि स्फोट ह्यांच्यापासून संरक्षण देते.
याशिवाय, श्रीरामच्या तुमच्या कार विमा पॉलिसी अंतर्गत तुम्ही अतिरिक्त कव्हरेजही निवडू शकता, जसं की मालक-चालकाला 15 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघाताचं कव्हर, द्वि-इंधन प्रणाली, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अॅक्ससरीज आणि पेड ड्रायव्हर्स अज्ञात प्रवाशांसाठी पीए कव्हर.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● त्वरित पॉलिसी देणं ● रोडसाईड असिस्टंस ● विना रोकड दुरूस्ती ● नो क्लेम बोनस ● ऐच्छिक वाजवटयोग्य सवलत ● चोरीविरोधी उपकरण सवलत ● ऑटोमोबाईल असोसिएशन सूट |
● शून्य घसारा कव्हर ● रिटर्न टु इनवॉइस ● दैनिक परतफेड ● वैयक्तिक सामानाचं कव्हर ● की रीप्लेसमेंट ● एनसीबी संरक्षण कव्हर ● आपत्कालीन परिवहन आणि हॉटेलवरील खर्चाची भरपाई ● अनेक कारची सूट |
टाटा एआयजी कार विमा
टाटा एआयजी कार विमा ही देशातील सर्वाधिक पसंतीच्या मोटार विमा प्रदात्यांपैकी एक आहे. तुमच्या कारला आवश्यक अशी संपूर्ण काळजी घेण्याचं वचन ही कंपनी देते. त्यांची ऑटो सिक्युअर-खाजगी पॅकेज पॉलिसी चोरी, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे उद्भवणार्या कुठल्याही बाह्य हानी/ नुकसानापासून कारचं रक्षण करतं. ही तृतीय-पक्षाकडून उद्भवणारी कुठलीही दायित्वंसुद्धा कव्हर करते आणि मालक-चालकाला 15 लाख रुपयांचं वैयक्तिक अपघात कव्हर देते.
पॉलिसीधारकाला पेड ड्रायव्हर्ससाठी वैयक्तिक अपघाताचं कव्हर आणि अतिरिक्त प्रिमियम भरल्यावर प्रवासी तसंच इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक फिटिंग्ज कव्हर मिळू शकतं.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस (एनसीबी) संरक्षण उपलब्ध ● आपत्कालीन रोडसाईड असिस्टंस ● स्वीकृत ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● चोरीविरोधी उपकरण स्थापना सवलत ● सुधारीत/ खास डिझाईन केलेलं वाहन सवलत |
● घसारा परतफेड ● सौजन्य/ भाड्याची कार ● दैनिक भत्ता ● रिटर्न टु इनवॉइस ● काच, प्लॅस्टिक, फायबर आणि रबरी भागांची दुरूस्ती ● एनसीबी संरक्षण कव्हर ● वैयक्तिक सामानाचं नुकसान ● की रीप्लेसमेंट ● आपत्कालीन परिवहन आणि हॉटेल खर्च ● इंजिन सिक्युअर ● कन्झ्युमेबल एक्स्पेन्सेस ● टायर सिक्युअर ● रोडसाईड असिस्टंस |
युनायटेड इंडिया कार विमा
युनायटेड इंडिया विमा कं. लिमि. ही पब्लिक सेक्टरमधली एक विमाकर्ता आहे जी खाजगी कार्ससाठी मोटार विमा पॉलिसीज देते. ही स्वतःच्या नुकसानाचं कव्हर, तृतीय-पक्ष दायित्वं कव्हर तसंच मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हर देते. स्वताःच्या नुकसानात कारच्या अॅक्ससरीजच्या हानी/ नुकसानाबरोबरच आग, अपघात, स्व-प्रज्वलन, चोरी, वीज पडणे, नैसर्गिक आपतीं आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारं तुमच्या कारचं कुठलंही नुकसान/ हानी समाविष्ट होतात.
युनायटेड इंडिया कार विमा ज्ञात आणि अज्ञात ड्रायव्हर्ससाठी वैयक्तिक अपघात कव्हर, इलेक्ट्रिकल/ एलेक्ट्रॉनिक फिटिंग्स कव्हर, फायबर ग्लास इंधन टाक्यांचं कव्हर आणि सीएनजी/ एलपीजी द्वि-इंधन किट कव्हर निवडून तुम्हाला तुमचं कव्हरेज वाढवायलाही परवानगी देते.
यूनायटेड इंडिया कार विमा भारतातील सर्वाधिक मूल्य दावा प्रमाण (आयसीआर) असलेल्या कंपन्यांमधील एक आहे.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● विंटेज कार सवलत ● ऑटोमोबाइल संघटना सदस्यत्व सवलत ● नो क्लेम बोनस ● चोरीविरोधी उपकरण स्थापना सवलत ● खास डिझाईन केलेलं/ सुधारित वाहन सवलत |
● सौजन्य कार ● वैद्यकीय खर्च |
युनिवर्सल सोम्पो कार विमा
युनिवर्सल सोम्पो जनरल विमा कं. लिमि. अव्यावसायिक कार्ससाठी व्यापक मोटार खाजगी कार विमा देते. ही दुखापत आणि मालमत्तेच्या नुकसानासाठी, तृतीय पक्ष कायदेशीर दायित्वं तसंच आग, चोरी, स्फोट, मानवनिर्मित आपत्तीं, स्व-प्रज्वलन आणि नैसर्गिक आपत्तींमुळे विमित कारला होणार्या हानी/ नुकसान ह्यांच्यासाठी व्यापक कव्हरेज देते. ही मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघाताचं कव्हरसुद्धा देते.
अॅक्ससरीजचं नुकसान, वाहनातील उपस्थितांना वैयक्तिक अपघात, पेड ड्रायव्हर/ क्लीनरप्रती कायदेशीर दायित्वें आणि तृतीय पक्ष मालमत्ता नुकसानीसाठी वाढलेली कायदेशीर दायित्वे हयासारखी वैकल्पिक कव्हर्सदेखील युनिवर्सल सोम्पो कार विम्याकडे उपलब्ध आहेत.
शिवाय, युनिवर्सल सोम्पो कार विमा सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या भारतातील खाजगी मोटार विमा कंपन्यांमध्ये एक आहे.
वैशिष्ठ्ये |
ऍड-ऑन कव्हर्स |
● नो क्लेम बोनस ● चोरीविरोधी उपकरण स्थापना सवलत ● ऐच्छिक जादा सवलत ● खास डिझाईन केलेलं/ सुधारित वाहन सवलत |
● शून्य घसारा कव्हर ● दैनिक रोख भत्ता ● रिटर्न टु इनवॉइस ● अपघातात रुग्णालयात दाखल करण्याचं कलम ● रोडसाईड असिस्टंस ● की रीप्लेसमेंट ● कंझ्युमेबल्सचा खर्च ● हायड्रोस्टीक लॉक कव्हर ● सुरक्षित टोविंग ● एनसीबी संरक्षक ● इंजिन संरक्षक |
अस्वीकृती:* पॉलिसी बाजार कुठल्याही विशिष्ट विमाकर्त्याला किंवा विमाकर्त्याने देऊ केलेल्या विमा उत्पादनाला मान्यता देत नाही, रेट करत नाही किंवा शिफारस करत नाही. आयसीआर घेण्यात आला आहे
भारतात उत्तम कार विमा पॉलिसी निवडताना विचारात घ्यायचे महत्वाचे मुद्दे:
उत्तम कार विमा पॉलिसी खरेदी करताना, तुम्ही पुढील मुख्य मुद्द्यांचा विचार केला पाहिजे:
विमाकर्त्यांने दिलेल्या प्रमुख वैशिष्ट्यांची तुलना करा:
तुम्ही निवडलेल्या सर्व मोटार विमा पॉलिसीज एकाच प्रकारचं कव्हरेज देतात का ह्याचं विश्लेषण करण्यासाठी त्यांची तुलना करा. तुमच्या विमा योजनेत कारच्या बाबतीतले सर्व महत्वाचे घटक (जसं की स्वतःच्या नुकसानाचं कव्हर) समाविष्ट असायला हवेत आणि वैयक्तिक अपघातासाठीचं तसंच तृतीय पक्षाला झालेल्या दुखापतीसाठीचं कव्हरेज तुम्हाला द्यायला हवं.
भारतातील सर्वोत्कृष्ट कार विमा पॉलिसीचा भाग महणून अॅड-ऑन राइडर्सचं परीक्षण करा:
सर्व अॅड-ऑन राइडर्सकडे पुरेसं लक्ष देण्याचा सल्ला नेहेमी दिला जातो ज्यामुळे तुम्ही जास्त फायद्यांसह भारतातील उत्तम कार विमा पॉलिसी निवडू शकता. तुमच्या सोयीसाठी, आम्ही खाली काही महत्वाच्या मोटार विमा राइडर्सची सूची दिलेली आहे.
इंजिन कव्हर:
हे कव्हर कार इंजिनच्या नुकसानामुळे झालेल्या अतिरिक्त खर्चापासून तुमचा बचाव करून संरक्षणाचं एक अतिरिक्त कवच देतं.
तृतीय-पक्ष दायित्व कव्हरेज:
तृतीय-पक्ष दायित्व कव्हरेज कुठलीही शारीरिक दुखापत, मृत्यू, तृतीय-पक्षाच्या कारच्या नुकसान दुरुस्तीचा खर्च हयांमुळे उद्भवू शकणार्या कुठल्याही आर्थिक दायित्वापासून मालकाच्या संरक्षणाची हमी देतं.
रोडसाईड असिस्टंस कव्हर:
इंजिनात बिघाड किंवा अपघात किंवा तुमच्या कारचा टायर पंक्चर झाल्यामुळे जर तुम्ही रस्त्यात अडकलात, तर तुम्हाला रोडसाइड असिस्टंस मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ह्याच्यामुळे तुमच्या विमाकर्त्याला कॉल करून तुम्हाला पाहिजे तिथे कार मेकॅनिक पाठवण्याची विनंती करणं तुम्हाला शक्य होईल.
शून्य घसारा कव्हर:
जेंव्हा तुम्ही तुमच्या कार विमा पॉलिसील शून्य घसारा कव्हर जोडण्याचा निर्णय घेता, तेंव्हा विमा कंपनी कारच्या प्रतिस्थापित भागांवरील घसारा माफ करते. ह्यामुळे असं सूचित होतं की तुम्ही दाव्याची अधिक रक्कम मिळवण्यासाठी पात्र आहात.
वैयक्तिक अपघाताचं कव्हर:
वैयक्तिक अपघाताचं कव्हरेज ज्यांच्यामुळे शारीरिक इजा होऊ शकेल, किंवा अपघाती मृत्यू ओढवू शकेल, किंवा एखादी व्यक्ती रस्त्यावरील अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्णताः अपंग होऊ शकेल अशा अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांपासून वाहन मालकाला आर्थिक संरक्षणाची हमी देतं.
कार विमाकर्त्यांच्या परीक्षणाचा विचार करा:
तुमच्या विस्तारीत कुटुंबातल्या सदस्यांना आणि मित्रांना त्यांच्या कुठल्याही विशिष्ठ मोटार विमा कंपनीबरोबरच्या त्यांच्या अनुभवाबद्दल निश्चित विचारा. थेट तुमच्या प्रियजनांकडून येणारा अभिप्राय तुम्हाला त्या कंपनीची ग्राहक सहाय्य आणि दावा प्रक्रिया कशी चालते हयाबद्दल अधिक चांगली आंतर्दृष्टी देईल. त्यामुळे तुम्हाला माहितीवर आधारित निवड करण्यास मदत मिळेल.
लवचिक कार विमा कव्हरेजसाठी पर्याय:
भारतात सर्वोत्तम कार विमा पॉलिसी खरेदी करताना, लवचिक कव्हरेज नेहमीच महत्वाचं असतं. ग्राहक आधार भिन्न असल्याने, ‘सर्वांनाच योग्य ठरणारी’ अश्याप्रकारची पॉलिसी नसते. विशिष्ठ विमा गरजांप्रमाणे तुम्ही कार विमा पॉलिसी निवडली पाहिजे. तो विमा प्रदाता, जो फ्लेक्सी कव्हरेज सुविधा देतो, त्याला इतर गरजांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जर विमा प्रदाता आधीच अस्तित्वात असलेलं पॅकेज तुमच्या गरजां आणि आवश्यकतांनुसार तयार करून तुम्हाला देत असेल, तर तुम्ही हे सकारात्मक चिन्ह विचारात घ्यायला हवं.
विमा प्रिमियमची ऑनलाइन तुलना करा:
इंटरनेटवर तथाकथित महान सौद्यांचा पूर आलेला आहे. त्यांना बळी पडू नका; ते सापळ्यांशिवाय दुसरं काहीही असू शकत नाहीत. जेंव्हा तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढता आणि इंटरनेटवर शोधता तेंव्हा तुम्हाला एखादा नीटनेटका सौदा मिळू शकतो.
इंटरनेटवर कार विमा योजनांची तुलना करताना, खालील मुद्दे लक्षात ठेवा:
- वेगवेगळ्या विमा प्रदात्यांनी देऊ केलेल्या निरनिराळ्या विमा योजनांची तुलना करा.
- ह्याची खात्री करून घ्या की तुलना करणारी साईट निश्चित आयडीव्हीवर (विमित घोषित मूल्य) प्रिमियमची गणना करते आहे.
- कमीत कमी 3 ऑनलाइन विमा तुलना साईट्सवर विम्याच्या प्रिमियमची तुलना करा.
तुमच्या कार विमा प्रिमियमवर प्रभाव टाकणारे घटक:
विमाप्रदाता जेवढ्या जोखमी स्वीकारतो त्यावर कार विमा प्रिमियम ठरवणारे घटक अवलंबून असतात. हे घटक खालीलप्रमाणे वर्गीकृत केलेले आहेत:
कारशी संबंधित जोखमी:
तुमच्या कारचं मॉडेल, क्युबिक क्षमता, आणि इंधन प्रकार इत्यादी. काही मापदंड आहेत जे तुमच्या कार विम्याचा प्रिमियम ठरवतात. व्यावसायिक कार्स आणि एसयूव्ही, म्हणजे स्पोर्ट्स यूटिलिटि वेहीकल्स ह्यासारख्या काही कार्सना, अनेकदा जास्त प्रिमियम्सची गरज असते कारण ह्या कार्सवर विमा प्रदात्यांकडे मोठ्या प्रमाणात दावे येतात. सामान्यतः डीझेल कार्सचा प्रिमियम पेट्रोल वाहनापेक्षा 10-15% जास्त असतो.
स्थानाशी संबंधित जोखमी:
ह्या नोंदणीच्या क्षेत्रावर आधारित असतात. साधारणपणे, जर कारचा मालक शहरी भागात, दाट लोकसंख्येच्या भागात, किंवा महामार्गाजवळ रहात असेल, तर प्रिमियम्स जास्त असतात. जर ज्या भागात तुम्ही रहाता तिथे वाहनाची चोरी किवा नुकसान जास्त असेल, तर कार विमा प्रिमियम्स जास्त वाढतात.
कारच्या चालकाशी संबधित जोखमी:
चालकाचा व्यवसाय आणि वय लक्षात घेतलं जातं. जर कारचे अनेक ड्रायव्हर्स असतील, तर तुम्हाला जास्त प्रिमियम्स भरावे लागतील.
वाटाघाटी महत्वाची असते:
ज्यावेळी मोटार विमा घ्यायचा असतो, तुमच्या सध्याच्या विमा प्रदात्याशी बोलणी करा. जर तुम्ही एक जबाबदार चालक असाल आणि तुम्ही बरेच दावे केले नसाल किंवा बरेच अपघात दाखल केले नसाल, तर कोण जाणे तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकेल.
तुमच्या नो क्लेम बोनसचं (एनसीबी) संरक्षण करा:
जर तुम्ही एक जबाबदार ड्राइव्हर असाल, आणि तुम्ही कोणताही दावा दाखल केला नसाल, तर तुम्हाला नो क्लेम बोनसचा (एनसीबी) लाभ मिळतो. जर तुम्ही एक वर्षासाठी कुठल्याही वाहन विमा दाव्याची नोंदणी केली नाही, तर तुमचा कार विमाकर्ता तुम्हाला नो क्लेम बोनसचं बक्षीस देईल. ही सूट तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुमच्या विमा प्रिमियममधून वजा केली जाते. एक पर्याय म्हणून, तुम्ही एनसीबी निवडू शकता.
क्लेम सेटलमेंट रेशो (सीएसआर) पहा:
तुम्ही कार विमाकर्त्याबाबत अंतिम निर्णय घेताना, शेवटची पण क्षुल्लक नसलेली बाब म्हणजे, विमाकर्त्याच्या क्लेम सेटलमेंटच्या मागच्या रेकॉर्डचा विचार करा. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे ग्राहकांकडील दावे सेटल करण्यासाठी विमाकर्त्यांने घेतलेला वेळ. तो चांगला असेल तरच पुढे जा. जर सीएसआर चांगला नसेल तर भारतात सर्वोत्तम कार विमा पॉलिसी खरेदी करण्याचा विचारही करून नका. आयआरडीए ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर तुम्हाला विविध विमाकर्त्यांचे क्लेम सेटलमेंट रेशोज सहज मिळू शकतात.
भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपनी कशी निवडावी?
सर्वोत्तम कार विमा कंपनी निवडणं हे काही मोठं काम नाही. पण तुम्हाला तुमच्या कारसाठी कोणत्या प्रकारचं संरक्षण हवं आहे ह्याची तुम्हाला जाणीव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, इथे काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला भारतातील सर्वोत्तम कार विमा कंपनी निवडायला मदत करतील. त्या पुढीलप्रमाणे:
- कार विमा गरजांचं विश्लेषण– सर्वोत्तम विमा कंपनी निवडण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या कार विमा गरजांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. तुम्हाला हव्या असलेल्या कव्हरेजची पातळी तसंच तुम्ही खरेदी करू इच्छित असलेलं एखादं विशिष्ठ अॅड-ऑन्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही इच्छित असलेल्या विमित घोषित मूल्याबद्द्ल (आयडीव्ही) तुम्हाला स्पष्ट कल्पना असायला हवी. ह्याशिवाय, कमाल प्रिमियम जो एखाद्या पॉलिसीसाठी भरणं तुम्हाला परवडू शकेल त्याचीही तुम्हाला जाणीव असायला पाहिजे.
- मोटार विमा कंपनीची सत्यासत्यता –आता जेंव्हा तुम्हाला तुमच्या कार विमा गरजा माहिती आहेत, तुम्ही बाजारातील अस्सल मोटार विमा कंपन्या शोधल्या पाहिजेत. तुम्ही कार विमा कंपनीची सत्यासत्यता तिचा आयआरडीए नोंदणी क्रमांक शोधून तपासू शकता. आयआरडीए हे भारतातील विमा कंपन्यांसाठी एक नियामक प्राधिकरण आहे आणि ते फक्त अस्सल विमाप्रदात्यांनाच नोंदणी क्रमांक देतं.
- कंपनीची आर्थिक क्षमता - कार विमा कंपनीची सत्यासत्यता पडताळण्याबरोबरच, तुम्ही तिची आर्थिक स्थितिसुद्धा तपासली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कंपनीचं आर्थिक स्थैर्य समजण्यास आणि गरजेच्या वेळी ती कंपनी तुम्हाला दाव्याची रक्कम देण्याची शक्यता किती आहे हे ठरवण्यास मदत होईल. कंपनीच्या वार्षिक आर्थिक नोंदींवरून आणि तिचा सॉल्वन्सी रेशो बघून तुम्ही कंपनीचं आर्थिक स्थैर्य निर्धारित करू शकता.
- क्लेम सेटलेमेंट रेशो – पुढे जाण्यापूर्वी, तुम्ही कार विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो (सीएसआर) आणि इन्कर्ड क्लेम रेशो (आयसीआर) तपासणं आवश्यक आहे. सीएसआर म्हणजे विमा कंपनीने सेटल केलेल्या दाव्यांची एकूण टक्केवारी. दुसरीकडे, आयसीआर म्हणजे विमा कंपनीने जमा केलेल्या एकूण प्रिमियममधून तिने वापरलेल्या प्रिमियमची एकूण टक्केवारी. तुम्ही जास्त सीएसआर आणि आयसीआर असलेली कंपनी शोधयला हवी कारण त्या विमाकर्त्याकडून तुमचा क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी असल्याचं ते दर्शवतात.
- क्लेम सेटलमेंचा वेग – क्लेम रेशोजव्यतिरिक्त, तुम्ही क्लेम सेटलमेंटचा वेगही ठरवला पाहिजे. तुम्ही क्लेम सेटलमेंट वेग जास्त असलेल्या कंपनीकडे जायला पाहिजे कारण तो असं दर्शवतो की तो विमाकर्ता तुम्हाला दाव्याची रक्कम लवकरात लवकर देईल.
- विना रोकड गॅरेजचं जाळं – त्यांनंतर, कार विमा कंपनीकडे उपलब्ध असलेलं विना रोकड गॅरेजेसचं जाळं तुम्ही शोधायला हवं. विना रोकड गॅरेजेस विमा मंजूर केलेली कंपनीची गॅरेजेस असतात जिथे तुम्ही तुमची कार विना रोकड तत्वावर दुरुस्त करू शकता. विना रोकड गॅरेजचं मोठं जाळं असलेली कंपनी अधिक चांगली कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या शहरात किंवा जवळपास विना रोकड गॅरेज मिळण्याची शक्यता जास्त आहे हे सुनिश्चित होतं.
- ग्राहक सेवा -सर्वोत्तम मोटार विमाकर्ता निवडताना कार विमा कंपनीची ग्राहक सेवादेखील बघावी लागेल. किती सहजतेने तुम्ही विमाकर्त्याला संपर्क करून मदत मिळवू शकता हयाविषयीची कल्पना मिळवण्यास ग्राहक सेवेची माहिती ऊपयोगी ठरते. तुम्ही तीच कंपनी निवडली पाहिजे जी तिच्या ग्राहकांना अहोरात्र सेवा देते कारण तुम्ही त्यांना 24x7 संपर्क करू शकता.
- ऑनलाइन तुलनां- तुमच्या विमा गरजा उत्तमरित्या पूर्ण करणारी कार विमा कंपनी शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग ऑनलाइन तुलनां आहे. जर तुम्ही निरनिराळ्या मोटार विमाकर्त्यांच्या कार विमा योजनांची ऑनलाइन तुलना केली, तर तुम्ही त्यांची कव्हरेज पातळी, प्रिमियमचा दर, तसंच देऊ केलेले लाभ ह्यांचं विश्लेषण करू शकाल. आदर्श विमा कंपनी अत्यंत उच्च प्रिमियम भरायला न लावता तुम्हाला जास्तीत जास्त कव्हरेज देईल.
- ग्राहकांची समीक्षा -निरनिराळ्या मोटार विमा कंपन्यांपैकी कुठलीही एक निवडण्यापूर्वी ग्राहकांची परीक्षणं तपासणं नेहेमीच चांगलं. त्या कंपनीबरोबर विम्याबाबतचा तुमचा अनुभव कश्या प्रकारचा असेल ह्याची कल्पना येण्यासाठी सध्याच्या आणि पूर्वीच्या ग्राहकांची परीक्षणं फायदेशीर ठरतील. तुम्ही ती कार विमा कंपनी निवडली पाहिजे जिची सकारात्मक ग्राहक परीक्षणं नकारात्मक परीक्षणांपेक्षा जास्त असतील.
सारांश
कार विमा पॉलिसी खरेदी करताना कंपनीच्या इन्कर्ड क्लेम रेशोबरोबर पॉलिसीची वैशिष्ठ्ये, विना रोकड दुरूस्ती करणार्या गॅरेजेसची संख्या, अॅड-ऑन कव्हर तपासणं महत्वाचं आहे. तुम्ही वर नमूद केलेल्या कार विमा कंपन्यामधून निवड करू शकता आणि नाममात्र प्रिमियमवर तुम्हाला जास्तीत जास्त कव्हरेजचा लाभ देईल असा भारतातील सर्वोत्तम मोटार विमा निवडू शकता.
एफएक्यूज
-
प्र1. कार विम्यासाठी भारतातील सर्वोत्तम कंपनी कोणती?
उत्तर: प्रत्येकासाठी एकच कार विमा कंपनी सर्वोत्तम असू शकत नाही. प्रत्येक कार मालकाच्या वैयक्तिक गरजा असतात आणि जी कंपनी त्याच्या आवश्यकता उत्तम प्रकारे पूर्ण करते ती त्याच्यासाठी सर्वोत्तम कार विमा कंपनी असेल. जर तुम्ही भारतातील सर्वात अव्वल कार विमा कंपनी शोधत असाल, तर तुम्ही कव्हरेज आणि लाभांच्या आधारे निरनिराळ्या मोटार विमा कंपन्यांची ऑनलाइन तुलना करणं आवश्यक आहे. त्याशिवाय, निरनिराळ्या विमाकर्त्यांसाठीच्या प्रिमियमचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही कार विमा कॅलक्युलेटरचाही वापर करू शकता आणि कमी दरात कमाल लाभ देणारी योजना निवडू शकता.
-
प्र2. कार विम्यासाठी तृतीय पक्ष प्रिमियम कसा काढतात?
उत्तर: आयआरडीए किंवा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण प्रत्येक वित्तीय वर्षी कार विम्यासाठी तृतीय पक्ष विमा निश्चित करतं. तो कारच्या इंजिन क्युबिक क्षमतेवर अवलंबून असतो.
-
प्र3. भारतात कार विमा खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?
उत्तर: भारतात कार विमा खरेदी करण्यासाठी कार मालकाकडे पुढील कागदपत्रं असणं आवश्यक आहे:
- कार विमा प्रस्ताव फॉर्म
- कारच्या आरसीच्या नोंदणी पत्राची प्रत
-
प्र4. जर मी माझ्या कार मधील सीएनजी बदलून एलपीजी केला तर मला माझ्या कार विमा कंपनीला त्याची माहिती द्यायची गरज आहे का?
उत्तर: होय. जर तुम्ही तुमच्या कारच्या इंधनाचा प्रकार सीएनजी बदलून एलपीजी केला, तर तुम्ही तुमच्या कार विमाकर्त्याला संपर्क केला पाहिजे आणि तुमच्या पॉलिसी दस्तऐवजातली माहीती अद्ययावत केली पाहिजे. हे महत्वाचं आहे कारण तुमच्या कारच्या इंधनाचा प्रकार हा तुमच्या कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमवर परिणाम करणार्या घटकांपैकी एक आहे.
-
प्र5: माझी कार विमा कंपनी बदलणं शक्य आहे का?
उत्तर: होय. जर तुम्ही तुमच्या सध्याच्या विमाकर्त्याबाबत समाधानी नसाल तर तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुम्ही तुमची सध्याची कार विमा कंपनी बदलू शकता.
-
प्र6: माझी कार विमा कंपनी मला कारच्या आयडीव्हीएवढी नुकसानभरपाई देईल का?
उत्तर: संपूर्ण नुकसानाच्या दाव्याच्या बाबतीत किंवा जर एकूण दुरुस्तीचा खर्च तुमच्या कारच्या आयडीव्हीपेक्षा जास्त असेल तर तुमची कार विमा कंपनी तुम्हाला तुमच्या कारच्या आयडीव्हीएवढी नुकसानभरपाई देईल.
-
प्र7: जर मी माझी कार विमा कंपनी बदलली तर माझ्या एनसीबीचं काय होईल?
उत्तर: जर तुम्ही तुमची कार विमा कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला, तर तुमचा नो क्लेम बोनस तुमच्या नवीन कार विमा पॉलिसीमध्ये हस्तांतरित केला जाईल. तथापि, पुढील नूतनीकरण होईपर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही.
-
प्र8: पार्शल क्लेम सेटलमेंट म्हणजे काय?
उत्तर: पार्शल क्लेम सेटलमेंट म्हणजे अशी परिस्थिती जेंव्हा मोटार विमा कंपनी पॉलिसीधारकाला दाव्याच्या रक्कमेचा काही भाग देते कारण दुरुस्तीचा खर्च कारच्या एकूण आयडीव्ही किंवा दाव्याच्या रकमेपेक्षा कमी असतो. असं सामान्यतः तेंव्हा घडतं जेंव्हा नुकसान झालेल्या कारची तपासणी कार विमा कंपनीने नेमलेल्या सर्वेक्षणकर्त्याकडून केली जाते जो असा अंदाज करतो की नुकसानाचा खर्च कारच्या एकूण आयडीव्हीएवढा नसणार.
-
प्र9: जर माझी कार विमा पॉलिसी संपली तर काय होईल?
उत्तर: जर तुमची कार विमा पॉलिसी संपली असेल, तर पॉलिसीचं नूतनीकरण करण्यासाठी तुमची मोटार विमा कंपनी तुम्हाला अतिरिक्त कालावधी देईल. जर तुम्ही तुमच्या पॉलिसीचं अतिरिक्त कालावधीतही नूतनीकरण नाही केलं, तर तुम्हाला नवीन कार विमा पॉलिसी खरेदी करावी लागेल आणि तुमच्या एनसीबीचंही नुकसान होईल.
-
प्र10: जर मी माझी कार विमा पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी तिचं नूतनीकरण केलं नाही तर मी माझा एनसीबी गमवेन का?
उत्तर: नाही. तुमच्या कार विमा पॉलिसीच्या समाप्ती तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस संरक्षित केला जाईल. जर तुम्ही ह्या 90 दिवसातही तुमच्या कार विमा पॉलिसीचं नूतनीकरण केलं नाही, तर तुम्ही तुमचा एनसीबी गमवाल.
Find similar car insurance quotes by body type
RTO Offices by State
Car Insurance
Plans start at
₹2,094*
Compare & Save
Up to 85%*
on Car Insurance
