विमित घोषित मूल्य (आयडीव्ही)

विमित घोषित मूल्य (आयडीव्ही) ही विमाधारकाद्वारे निश्चित केलेली जास्तीत जास्त रक्कम असते जी चोरीच्या किंवा वाहनाच्या एकूण नुकसानीवर दिली जाते. मूलतः, आयडीव्ही हे वाहनाचे सध्याचे बाजार मूल्य आहे. जर वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले, तर विमाकर्ता पॉलिसीधारकास जी भरपाई देईल त्याला आयडीव्ही म्हणतात.

Read more


कार विम्यावर 85%* पर्यंत तुलना करा आणि बचत करा
CARBannerTextNew
प्रक्रिया करीत आहे
Other options
कार विमा मिळवा फक्त
2094 / वर्ष# पासून सुरू करा
  • 2 मिनिटांत पॉलिसीचे नूतनीकरण करा*

  • 20+ विमा कंपन्यांची तुलना करा

  • 51 लाख + कार विमा

**1000 सीसी पेक्षा कमी कारसाठी टीपी किंमतआयआरडीएआयने मंजूर केलेल्या विमा योजनेनुसार सर्व बचत विमाधारकांद्वारे पुरविल्या जातात मानक अटी व शर्ती लागू.

उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किमतीमधून घासारा वजा करून आयडीव्हीची गणना केली जाते. आयडीव्हीमधून नोंदणी आणि विमाखर्च वगळला जातो. जर कारखान्यात न बसवलेल्या उपकरणांचा विमा हवा असेल तर त्यांची आयडीव्ही स्वतंत्रपणे अतिरिक्त किमतीवर काढली जाते.

कारची आयडीव्ही निश्चित करण्यासाठी घसारा परिशिष्ट

पुढील तक्ता कारची आयडीव्ही निश्चित करण्यासाठी वापरले जाणारे घसारा परिशिष्ट दर्शवतो:

वाहनाचे वय

आयडीव्ही समायोजित करण्यासाठी घासारा %

6 महिन्यापेक्षा जास्त नाही

5%

6 महिन्यापेक्षा जास्त पण 1 वर्षापेक्षा जास्त नाही

15%

1 वर्षापेक्षा जास्त पण 2 वर्षापेक्षा जास्त नाही

20%

2 वर्षांपेक्षा जास्त पण 3 वर्षापेक्षा जास्त नाही

30%

3 वर्षांपेक्षा जास्त पण 4 वर्षांपेक्षा जास्त नाही

40%

4 वर्षांपेक्षा जास्त पण 5 वर्षांपेक्षा जास्त नाही

50%

5 वर्षांहून जुन्या वाहनांच्या आयडीव्हीची गणना विमाकर्ता आणि विमाधारकातील परस्पर कराराद्वारे केली जाते. घसार्‍याऐवजी जुन्या कार्सची आयडीव्ही सर्वेक्षणकर्ते आणि कारविक्रेते इत्यादींनी वाहनाच्या स्थितीचे मूल्यांकन करून काढली जाते.

आयडीव्ही कॅलक्युलेटर

आयडीव्ही कॅलक्युलेटर हे एक ऑनलाइन साधन आहे जे कारचे बाजार मूल्य निश्चित करतं तसंच तुमच्या कारविम्यासाठी तुम्ही किती रक्कम आदर्श प्रिमियम म्हणून भरावी ह्याचा अंदाज काढतं. तुमच्या कारची योग्य आयडीव्ही काढण्यासाठी हा तुमच्या कारचं वय किंवा घसारा लक्षात घेतो.

कारविम्याअंतर्गत जे सर्वात महत्वाचे कॅलक्युलेटर आहेत त्यातला हा एक आहे कारण नुकसान आणि चोरीच्या क्लेमची भरपाई मिळतेवेळी त्यांना किती रक्कम मिळेल हे निश्चित करायला हा कॅलक्युलेटर कार मालकांना मदत करतो.

आयडीव्हीची गणना कशी करावी?

आयडीव्हीची गणना उत्पादकाने ठरवलेल्या विक्री किमतीच्या आधारे केली जाते आणि वाहनाच्या भागांवरील घसारा त्यामधून वजा केला जातो. वास्तविक विमित घोषित मूल्य काढण्याचं सूत्र खाली दिलं आहे:

विमित घोषित मूल्य = (कंपनीची सूचीबद्ध किंमत – घसारा मूल्य) + (वाहनांच्या अॅक्सेसरीजची किंमत – ह्या भागांचं घसारा मूल्य)

वर दिलेलं सूत्र म्हणजे कार खरेदी केल्यानंतर लावलेल्या अतिरिक्त सामानासह सुसज्ज असलेल्या नव्या कारची आयडीव्ही काढणं. जर तुमच्या कारमध्ये अश्या कुठल्याही अॅक्सेसरीज नसतील, तर आयडीव्ही काढणं सोपं असतं. तुम्ही ऑनलाइन आयडीव्ही कॅलक्युलेटर वापरुन तुमच्या विमित घोषित मूल्याची सहज गणना करू शकता. आणि त्याचं सूत्र खाली दिलं आहे:

आयडीव्ही = उत्पादकाची नोंदणीकृत किंमत – घसारा मूल्य

घसारा वरील तक्त्यानुसार लागू होईल.

उदाहरणार्थ – जर पॉलिसी खरेदीच्या वेळी तुमच्या कारचं मूल्य किंवा आयडीव्ही 5 लाख रुपये निश्चित केली गेली, तर संपूर्ण तोटा किंवा नुकसान झाल्यास विमाकर्ता जास्तीत जास्त 5 लाख एवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देईल. पॉलिसीच्या मुदतीत रचनात्मक संपूर्ण नुकसान झाल्यास किंवा कार चोरीला गेल्यासच केवळ तुम्हाला नुकसानभरपाई मिळणं बंधनकारक असेल.

कारसाठी आयडीव्हीची गणना करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

तुमच्या कारच्या आयडीव्हीचं काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेले मुद्दे विचारात घेत असल्याची खात्री करा-

  • तुमच्या कारचं मूल्य वास्तविक बाजार किंमतीमधून घसारा मूल्य वजा करून काढलं जातं. कोणत्याही परिस्थितीत, ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई आहे जी तुमच्या कारचं संपूर्ण नुकसान किंवा चोरी झाल्यास तुम्हाला मिळेल.
  • आयडीव्हीचं अचूक मूल्यांकन केल्यास तुम्हाला कमी प्रिमियम भरावा लागतो
  • फक्त प्रिमियम कमी करण्यासाठी तुमच्या कारची आयडीव्ही कमी करू नका, कारण ह्याचा अर्थ कमी दावा किंवा विवादित दावा.
  • योग्य आयडीव्हीची दाखवणे म्हणजे योग्य दावा
  • तुमच्या कार विमाप्रदात्याने निश्चित केलेल्या आयडीव्हीला सहमती देण्यापूर्वी तुम्ही संशोधन करा किंवा उत्पादकाकडे तपास करा.
  • तसंच, तुमच्या प्रिमियमचं मूल्यांकन करा आणि तुमच्या कारच्या आयडीव्हीच्या आधारे त्याचं योग्य मूल्यांकन केलं आहे की नाही ते तपासा.
  • तुम्हाला पुरेसं कव्हरेज मिळणं आणि तुम्ही विमित घोषित मूल्याबाबत समाधानी असणं महत्वाचं आहे कारण हा बर्‍याच पैशांचा मुद्दा असतो. इच्छित आयडीव्ही मिळवण्यासाठी तुम्ही बोलणीही करू शकता.
  • तुमच्या कार विमा योजनेचं नूतनीकरण करताना, ह्याची खात्री करून घ्या की प्रिमियमचा खर्च आयडीव्हीच्या आधारे ठरवला जाईल. जर आयडीव्हीच्या तुलनेत तुमच्या कारचं बाजार मूल्यं खूप जास्त असेल, तर ह्याचा अर्थ कमी किंमतीच्या कारच्या तुलनेत अवाजवी प्रिमियम.

तुम्ही तुमच्या कारची आयडीव्ही ऑनलाइनही ठरवू शकता, पण हे प्रत्येक विमाकर्त्याप्रमाणे वेगवेगळं असेल. त्यामुळे तुमच्या कारचं नूतनीकरण करताना तुमची आयडीव्ही समायोजित करण्याची संधीही तुम्हाला मिळते, म्हणून तुम्ही ही संधी गमावणार नाही ह्याची काळजी घ्या.

कारची आयडीव्ही ठरवण्यात मदत करणारे घटक

तुमच्या कारच्या आयडीव्हीचा अंदाज बांधण्यासाठी खालील घटक आयडीव्ही कॅलकयूलेटरला मदत करतात. हे बघा:

  • कारचं वय– तुमच्या कारचं वय तुमच्या कारची आयडीव्ही निश्चित करण्यास मदत करणार्‍या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक आहे. तुमच्या कारचं वय जेवढं जास्त, तिची आयडीव्ही तेवढी कमी.
  • कारचा मेक आणि मॉडेल– कारचा मेक आणि मॉडेल हे ठरवण्यास मदत करतं की कार किती उच्च दर्जाची आहे आणि तिच्या दुरुस्तीसाठी किती खर्च होईल. उदाहरणार्थ, बीएमडब्ल्यू एक्स7ची आयडीव्ही जास्त खर्च आणि देखभालीमुळे हयुंदाई सँट्रोपेक्षा जास्त असेल.
  • प्रमाणित घसारा– हयाआधी तक्त्यात दर्शवलेलं घसारा परिशिष्ट तुमच्या कारच्या आयडीव्हीवर प्रभाव टाकतं. घसारा परिशिष्टात नमूद केलेल्या टक्केवारीच्या आधारावर तुमच्या कारच्या बाजारमूल्यावर घसारा आकारला जातो.
  • कारच्या नोंदणीचं शहर– ज्या शहरात तुमच्या कारची नोंदणी केली गेली आहे ते सुद्धा आयडीव्हीवर प्रभाव टाकतं. नवी दिल्लीसारख्या महानगरात नोंदणी झालेल्या आणि फिरणार्‍या कारची आयडीव्ही युपीमधील छोट्या गावात फिरणार्‍या कारच्या आयडीव्हीपेक्षा जास्त जोखमींचा सामना करायला लागू शकतो.

आयडीव्ही कार विमा प्रिमियमवर कसा प्रभाव पाडते?

तुमच्या कारची आयडीव्ही तुमच्या कार विमा प्रिमियमच्या समानुपाती असते. ह्याचा अर्थ आयडीव्हीचं मूल्य जेवढं जास्तं, तेवढा जास्त प्रिमियम तुम्हाला आकारला जाईल. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर जशी तुमच्या कारची आयडीव्ही कमी होईल, तशी तुमच्याद्वारे देय प्रिमियमची रक्कमही कमी होईल.

परंतु, फक्त तुमचा प्रिमियम कमी करण्यासाठी कमी आयडीव्ही निवडणं चांगलं नाही कारण त्यामुळे नुकसान होईल. कमी आयडीव्ही म्हणजे संपूर्ण नुकसान किंवा चोरीच्या दाव्यांच्याबाबतीत तुम्हाला भरपाईची रक्कम कमी मिळेल. संपूर्ण कल्पना अशी आहे की प्रिमियम म्हणून अवास्तव रक्कम न भरता तुमच्या कारच्या बाजार मूल्याच्या सर्वात जवळची आयडीव्ही मिळवणं.

कार विम्यात आयडीव्ही का महत्वाची आहे?

आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, आयडीव्ही ही तुमचे वाहन चोरी झाल्यास किंवा त्याचे संपूर्ण नुकसान झाल्यास मिळणारी रक्कम आहे. असा सल्ला देण्यात येतो की अशी आयडीव्ही घ्यावी जी कारच्या बाजार मूल्याच्या खर्चाच्या जवळ जाईल. आयडीव्ही कमी करण्यासाठी विमाकर्ता 5% ते 10% श्रेणी प्रदान करतात ज्यातून ग्राहक निवड करू शकतात. कमी आयडीव्हीमुळे कमी प्रिमियम मिळेल.

तुम्ही तुमच्या कारच्या आयडीव्हीची काळजी का करावी?

तुमच्या कारची आयडीव्ही कार विमा योजना खरेदी करतानाचा एक महत्वाचा पैलू आहे. तुमच्या कारसाठी भरपाईची कमाल रक्कम निश्चित करण्याव्यतिरिक्त, जेंव्हा तुमच्या कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमचा मुद्दा येतो तेंव्हाही ती महत्वपूर्ण ठरते.

तुमच्या कार विम्यासाठी तुम्ही प्रिमियमची जी रक्कम भरणार आहात त्यासाठी आयडीव्ही महत्वाची आहे. कारण आयडीव्ही तुमच्या कारचं सध्याचं बाजार मूल्य दर्शवते आणि क्लेम सेटलमेंटच्या वेळचं तुमच्या मोटार विमा कंपनीचं दायित्व दर्शवते. कमी आयडीव्ही म्हणजे विमाप्रदात्याचं कमी दायित्व आणि म्हणून, कमी प्रिमियम आकारला जातो आणि तसंच उलटही होतं. तथापि, इतर घटकदेखील आहेत, जसं की कव्हरचा प्रकार, भौगोलिक क्षेत्र, अॅड-ऑन कव्हर्स, इ. जे तुमच्या कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमची अंतिम रक्कम काढण्यासाठी मदत करतात.

इतकंच नाही, जेंव्हा तुम्ही तुमची कार विकण्याचा निर्णय घेता तेंव्हा तुमच्या कारची आयडीव्ही महत्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या कारची आयडीव्ही जास्त असेल, तर त्यामुळे तुम्हाला जास्त विक्री किंमत मिळेल. त्याचप्रमाणे, कमी आयडीव्हीमुळे तुमची कार कमी किंमतीला विकली जाईल. जरी इतर काही घटक आहेत, जसा की दाव्यांचा अनुभव, जे तुमच्या कारच्या विक्रीच्या किंमतीवर प्रभाव टाकतात, तुम्ही तुमच्या कारची आयडीव्ही निश्चित करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी.

जास्त/कमी आयडीव्हीचे फायदे आणि तोटे

कार विम्याअंतर्गत आयडीव्ही ठरवण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता बघा:

आयडीव्हीचं स्वरूप

फायदे

तोटे

जास्त आयडीव्ही

चोरी किंवा संपूर्ण नुकसानीच्या दाव्यांमध्ये जास्त नुकसानभरपाई दिली जाईल

प्रिमियम म्हणून जास्त रक्कम भरावी लागेल.

कमी आयडीव्ही

प्रिमियम म्हणून कमी रक्कम भरावी लागेल

चोरी किंवा संपूर्ण नुकसानीच्या दाव्यांची भरपाई देताना कमी नुकसानभरपाई दिली जाईल ज्यामुळे नुकसान होईल

निष्कर्ष

सरतेशेवटी, खरेदी आणि नूतनीकरण ह्या दोन्हीवेळी तुमच्या कारचा प्रिमियम ठरवताना विमित घोषित मूल्य महत्वाची भूमिका बाजवतं. योग्य आयडीव्हीचा उल्लेख करणं महत्वाचं आहे; अन्यथा, तुमच्या दाव्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल. तुम्हाला अनेक विमा प्रदात्यांकडून उत्तम सौदे मिळू शकतात आणि सर्वोत्तम संभाव्य पर्याय शोधायला देखील ते तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही सर्व संभाव्य पर्यायांची तुलना करू शकता आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ शकता. अश्याप्रकारे जास्त प्रिमियम खर्च भरण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल आणि तुमच्या कारसाठी तुम्हाला उत्कृष्ट मूल्य मिळू शकेल.

सामान्य प्रश्न

  • प्र1: नवीन कारसाठी आयडीव्ही काय असेल?

    उत्तर: खरं तर, नव्या कारचं विमित घोषित मूल्य त्या कारच्या इनवॉइस मुल्याच्या समतुल्य असावं. तथापि, नव्या कारच्या किंमतीतूनही घसारा वजा केला जातो कारण ती वापरासाठी विकली गेली आहे. साधारणपणे, नवीन कारमधून वजा केला जाणारा घसारा सुमारे 5% असतो आणि अश्याप्रकारे, नव्या कारची डीफॉल्ट मॅक्सिमम आयडीव्ही त्या कारच्या इनवॉइस मूल्याच्या 95% असते.

  • प्र२. शोरूमच्या बाहेर कारची आयडीव्ही किती असते?

    उत्तर. ज्याक्षणी नवीन कार शोरूममधून बाहेर पडते, आयडीव्हीचा अंदाज काढण्यासाठी घसारा विचारात घेतला जातो. कार विकत घेतल्यावर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत, बहुतेक मोटार विमा कंपन्या कारच्या पावतीवरच्या मूल्याच्या फक्त 5% घसारा आकारतात. म्हणूनच, शोरूमच्या बाहेरील कारची आयडीव्ही असेल कारचं एक्स-शोरूम मूल्य वजा 5 % घसारा म्हणजेच कारच्या पावतीवरच्या मूल्याच्या 95%.

  • प्र३. जास्त आयडीव्ही निवडणं शहाणपणाचं आहे का?

    उत्तर: तुम्ही जास्त आयडीव्ही निवडावी की कमी आयडीव्ही निवडावी हे तुमच्या कारचं वय आणि तिच्या स्थितीवर सर्वस्वी अवलंबून आहे. जर तुमची कार तुलनेने नवी असेल आणि चांगल्या स्थितीत असेल, तर जास्त आयडीव्ही निवडणं योग्य आहे. परंतु, जर तुमची कार पाच वर्षाहून जास्त जुनी असेल आणि फार चांगल्या स्थितीत नसेल तर जास्त आयडीव्ही टाळून कमी आयडीव्ही निवडणं चांगलं.

  • प्र४. कारची आयडीव्ही किती बदलू शकते?

    कार विम्याची आयडीव्ही कारचं घसारा मूल्य विचारात घेऊन ठरवली जाते. परंतु, मोटार विमा कंपन्या कार मालकांना ठरवलेली आयडीव्ही 15 % ने वाढवण्याची किंवा कमी करण्याची परवानगी देतात. म्हणजे घसार्‍याप्रमाणे तुमच्या कारची आयडीव्ही 5 लाख असेल, तर तुम्हाला 4,25,000 आणि 5,75,000 ह्याच्यामधली आयडीव्ही निवडण्याचं स्वातंत्र्य असतं.

  • प्र५. कोणती आयडीव्ही कारसाठी सर्वोत्तम असते?

    कार किंवा इतर कोणत्याही वाहनासाठी सर्वोत्तम आयडीव्ही ती असते जी कारच्या बाजार मूल्याच्या सर्वात जवळची असते.

  • प्र६. एका विमा कंपनीपासून दुसर्याची आयडीव्ही वेगळी का असते?

    उत्तर: एका विमा कंपनीपासून दुसर्‍या विमा कंपनीची तुमच्या कारची आयडीव्ही भिन्न असू शकते कारण कमी विमा प्रीमियम देऊन ग्राहक आकर्षित करण्यासाठी विमाकर्ते आयडीव्ही कमी करतात. कमी आयडीव्ही त्यांचं दायित्वदेखील कमी करते, ज्यायोगे दाव्याची भरपाई देताना कमी नुकसान भरपाई देणं त्यांना शक्य होतं.

  • प्र७. कारची आयडीव्ही दरवर्षी कमी का होते?

    कारची आयडीव्ही दरवर्षी कमी होते कारण कारचं बाजारमूल्य दरवर्षी कमी होतं. ह्याचं कारण आहे वय आणि वापरामुळे कारच्या मूल्यात झालेली घसरण.

Find similar car insurance quotes by body type

Hatchback Sedan SUV MUV
Disclaimer: Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by an insurer.
 Why buy from policybazaar