शुन्य अवमूल्यन कार विमा

शुन्य अवमूल्यन योजनेमध्ये विमाधारकाला विमा काढलेल्या कारच्या नुकसानाची पूर्ण पैसे मिळतात. विम्यामध्ये सर्वसाधारणपणे बदललेल्या किंवा नुकसान झालेल्या कारच्या भागाचे अवमूल्यन मूल्य वजा केले जाते, पण 'शुन्य अवमूल्य' मध्ये प्रत्येकाला कारच्या त्या भागाची पूर्ण किंमत मिळण्यासाठी दावा करू शकता.

Read more2 मिनिटांत कार विमा नूतनीकरण करा

कागदपत्रांची आवश्यकता नाही
किंमती पहा
प्रक्रिया करीत आहे
कार विमा खरेदी करा
२०७२/रुपये वर्षासाठी फक्त*
 • 80%* पर्यंत वाचवा

 • 20+ विमा कंपन्यांची तुलना करा

 • 25 लाख + कार विमा

**1000 सीसी पेक्षा कमी कारसाठी टीपी किंमतआयआरडीएआयने मंजूर केलेल्या विमा योजनेनुसार सर्व बचत विमाधारकांद्वारे पुरविल्या जातात मानक अटी व शर्ती लागू.

सहसा, हा नियम 5 वर्षांच्या आतील वाहनांना लागू होतो. पॉलिसीच्या कालावधी दरम्यान दोनदा याचा लाभ घेता येतो.

शुन्य अवमूल्यन म्हणजे काय?

शुन्य अवमूल्यन चा अर्थ - जर तुमच्याकडे शुन्य अवमूल्यन पॉलिसी असेल तर तुम्ही अपघातामध्ये झालेल्या कारच्या नुकसानाच्या पूर्ण किमतीवर दावा करू शकता. नुकसान झालेल्या कारच्या भागाच्या किमतीमधून त्याचे अवमूल्यन मूल्य वजा केले जाणार नाही. त्यामुळे, तुमच्या मोठ्या रक्कमेमध्ये बचत होते.

तुम्ही 'शुन्य अवमूल्यन' कार विमा का घेतला पाहिजे?

तुम्ही अलीकडेच कार खरेदी केली असेल किंवा तुलनेने नवीन कार असेल तर शून्य घसरण असलेल्या कार विमा पॉलिसीची निवड करणे योग्य ठरेल. किंवा खालील कारणांसाठी -

 • लक्झरीकार मालक असल्यास
 • नवीनचालक असल्यास
 • अपघातग्रस्तभागातून कार चालविणार असल्यास
 • कारचेस्पेअर पार्ट महागडे असल्यास
 • तुमच्याखिशाला कमी खर्च देण्याची इच्छा असल्यास

शुन्य अवमूल्यन कार विम्याचे फायदे?

 • कारच्याभागांचे होणारे अवमूल्यन ग्राह्य न धरल्यामुळे तुमच्या खिशातून होणारा खर्च हा जवळजवळ शून्य होतो, म्हणूनच याला शून्य डेप्रिसिएशन विमा असे म्हटले जाते.
 • हेआर्थिक नुकसानापासून संरक्षण करते आणि दुरुस्तीची किंवा बदलीच्या भागाच्या संपूर्ण रकमेची भरपाई करते.

शुन्य अवमूल्यन विरुद्ध सर्वसमावेशक कव्हरेज

शुन्य अवमूल्यन कार विमा पॉलिसी आणि सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी मधील मूलभूत फरक दाखविणारा तक्ता -

वैशिष्ट्ये

झिरो डेप्रिसिएशन

सर्वसमावेशक विमा

प्रिमियम

अधिक

कमी

क्लेमची रक्कम

डेप्रिसिएशन मुल्य वजा न करता संपूर्ण रक्कम मिळते

आयडीव्हीमधून कारच्या त्या भागाचे डेप्रिसिएशन मुल्य वजा केले जाते

कारचे वय

5 वर्षांपर्यंत

15 वर्षांपर्यंत

स्वतःचे खर्च

क्लेम करताना विमाधारकावर कमी ताण येतो

विमाधारकाला काही खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो

प्लास्टिकचे भाग आणि त्यांच्या दुरुस्तीची रक्कम

जास्तीतजास्त कव्हर

तुलनात्मक कमी कव्हर

शुन्य अवमूल्यन कार विमा कसा ठरवला जातो?

शुन्य अवमूल्यन विम्याची रक्कम काढताना खालील घटक लक्षात घेतले जातात.

 • रजिस्ट्रेशनकेलेले ठिकाण – दिल्ली, मुंबई, बंगळुर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता आणि पुणे अशा प्रमुख शहरांमध्ये जास्त प्रिमीयम आकारला जातो.
 • विम्याचीरक्कम किंवा विमाधारकाने घोषित केलेली रक्कम – विमा उतरवणार असलेल्या कारचे सध्याचे बाजार मूल्य, ज्यातून प्रिमियमची किंमत काढताना डेप्रिसिएशन वजा केले जाते.
 • इंजिनाचाप्रकार – जास्त क्युबिक कॅपॅसिटी असणाऱ्या कारला प्रिमीयम जास्त असतो, तर कमी क्युबिक कॅपॅसिटी असलेल्या कारचा प्रिमीयम कमी असतो.
 • कव्हरेजचाप्रकार – तुम्ही कोणत्या कव्हरेजचा पर्याय निवडता यावरही प्रिमीयमची किंमत अवलंबून असते.
 • अ‍ॅक्सेसरीजचीस्थापना - कार्बन एक्सेसरीज आणि अतिरिक्त वैशिष्ट्यांसाठी प्रीमियमची स्वतंत्रपणे गणना केली जाते.
 • सर्वसमावेशककार विम्याचा प्रिमियम हा थर्ड पार्टी कार विम्याच्या तुलनेने जास्त असतो.
 • कारचेवयही लक्षात घेतले जाते.
 • इंधनाचाप्रकार – गाडी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक अशा इंधनाच्या प्रकारावरही प्रिमीयम अवलंबून असतो.
 • ऍड- ऑन कव्हर, जसे की वैयक्तिक वस्तूंचे कव्हर, झिरो डेप्रिसिएशन कव्हर आदींवरही प्रिमीयमची किंमत अवलंबून असते.

कार विम्यामधील अवमूल्यन

विमाधारकाने जाहीर केलेले मूल्य (आयडीव्ही) हे कारचे बाजारमूल्य असते. हे जास्तीतजास्त मूल्य असते, जे विमा देणारी कंपनी कारची डेप्रिसिएशन मूल्य वजा केल्यानंतर ठरवते. आयडीव्ही ची रक्कम ही कारचे पूर्णपणे नुकसान झाल्यास किंवा कार चोरीला गेल्यासच गृहीत धरले जाते.

विमाधारकाने जाहीर केलेले मूल्य (आयडीव्ही) = (नवीन कारची नोंदणी केलेली मूळ किंमत – डेप्रिसिएशन) + (नोंदणीकृत किमतीतून वजा केलेली एक्सेसरीजची किंमत – डेप्रिसिएशन)

बदललेल्या भागांवरील कपात केले जाणारे दर

 • काचेच्यापार्टसाठी कोणतेही दर कपात केले जात नाहीत.
 • फायबरग्लासचेघटकांवर 30 टक्के कपात केले जातात.
 • रबर, नायलॉनकिंवा प्लास्टिकपासून बनलेले भाग जसे की, एअरबँग, टायर, ट्युब, बॅटरींसाठी 50 टक्के दरात कपात केली जाते.

इतर भागांवरील कपात करण्यात येणारे दर खालीलप्रमाणे -

वाहन वय

आयडीव्ही (%) समायोजित करण्यासाठी घसारा

सहा महिन्यांपेक्षा कमी

5

यांच्यातील 6 महिने आणि 1 वर्ष

15

यांच्यातील 1आणि 2 वर्षे

20

यांच्यातील 2आणि 3 वर्षे

30

यांच्यातील 3आणि 4 वर्षे

40

यांच्यातील 4आणि 5 वर्षे

50


आपण शुन्य अवमूल्यन कव्हर खरेदी न केल्यास भरपाईच्या रकमेतून डेप्रिसिएशन मूल्य वजा केले जाईल.

शुन्य अवमूल्यन कार विमा ऑनलाइन कसा खरेदी करावा?

ऑनलाइन शुन्य अवमूल्यन कार विमा खरेदी करणे हे तुलनेने खूपच सोपे आहे. त्याच्या काही सोप्या पायऱ्या इथे देत आहोत.

 • विमाकाढत असलेल्या गाडीचे मॉडेल आणि इतर माहिती ऑनलाइन फॉर्ममध्ये भरा.
 • शुन्यअवमूल्यन विमा पर्याय निवडा.
 • माहितीपुरविल्यानंतर तुम्हाला संभाव्य प्रिमियमची रक्कम कळेल.
 • तुमचेनाव, पत्ता, फोन नंबर आदी माहिती द्या.
 • त्यानंतरऑनलाइन पेमेंट करा आणि कार विमा खरेदी केल्याची प्रक्रिया पूर्ण करा.
 • पॉलिसीतिथून डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवरदेखील तुम्हाला पॉलिसीची प्रत मिळून जाईल.

शुन्य अवमूल्यन कार विमा ऑनलाइन कसा नूतनीकरण करावा?

कार विमा नूतनीकरण ही खूप सोपी आणि कमी कष्टाची प्रक्रिया असते, खासकरून ऑनलाइन पद्धतीने नूतनीकरण करताना.

 • नूतनीकरणतारखेचा रेकॉर्ड ठेवा - विमा उतरविणारी कंपनी साधारणपणे तुम्हाला एखादे रिन्यूवल करण्याचे रिमाइंडर मेलवर अथवा कॉल करून देत असते. विमाधारकास याची नोंद ठेवण्याची शिफारस केली जाते, जेणेकरून मुदतीच्या तारखेपूर्वी पॉलिसीचे नूतनीकरण केले जाईल.
 • पॉलिसीचीमाहिती भरा - शुन्य अवमूल्यन योजना नूतनीकरण करताना कोणत्याही कागदपत्रांची, चेकची वगैरे गरज नसते. पॉलिसी बाजार वेबसाइटवर पॉलिसी रिन्यूव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नूतनीकरण ही प्रक्रिया करता येते. फक्त नूतनीकरण करण्याची प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही नवे ग्राहक आहात की जुने ग्राहक यापैकी एक पर्याय निवडावा लागतो.
 • दिलेल्यासूचना पाळा - इतर गरजेचे माहिती देऊन फॉर्म भरा पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.
 • ऑनलाइनपेमेंट करा - डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करून तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता.
 • नूतनीकरण– विमाधारकाला त्याची पॉलिसी नूतनीकरण झाल्याची प्रत रजिस्टर मेल आयडीवर व फोन नंबरवर मिळेल.

शुन्य अवमूल्यन कार विम्याचा क्लेम स्टेटलमंट

क्लेम सेटलमेंटच्या वेळी, त्याचे अवमूल्यन वर दिलेल्या तक्त्याप्रमाणे राहील. वर उल्लेख केल्याप्रमाणे नायलॉन, प्लॅस्टीक, रबरचे भाग तसेच बॅटरीवर वस्तूंवरील 50 टक्के, तर फायबरच्या भागांवर 30 टक्के व लाकडी भागांवर 5 ते 10 टक्के अवमूल्यन राहील.

तुमच्याकडे बेसिक कार विमा असल्यास विमाधारकाला नुकसान झालेल्या भागाचे अवमूल्यन वजा करून उरलेली रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. यामध्ये शून्य अवमूल्यन सारखी सवलत मिळत नाही.

आता तुम्हाला शून्य अवमूल्यन कार विम्याचे महत्त्व कळले असेल. त्यामुळे यापुढे घेताना आपल्याला शून्य अवमूल्यन कार विमाच घ्यायचा आहे.

शून्य अवमूल्यन कार विमा प्रश्नोत्तरे

Written By: PolicyBazaar - Updated: 15 July 2021
Disclaimer: Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by an insurer.
Calculate your car IDV
IDV of your vehicle
Calculate IDV
Calculate Again

Note: This is your car’s recommended IDV as per IRDAI’s depreciation guidelines.asdfsad However, insurance companies allow you to modify this IDV within a certain range (this range varies from insurer to insurer). Higher the IDV, higher the premium you pay.Read More

Policybazaar lets you compare premium prices from 20+ Insurers!
Compare Prices