• City & RTO
  • Car Brand
  • Car Model
  • Car Fuel Type
  • Car Variant
  • Registration Year
Find RTO Details By Registration Number
प्रक्रिया करीत आहे
    Other models
    Other variants
    Select your variant
    View all variants
      Secure
      We don’t spam
      Get RTO details
      Please wait..
      By clicking on “View Prices”, you agree to our Privacy Policy & Terms of Use
      Get Updates on WhatsApp
      City & RTO
      Address
      Pincode
      Contact No.

      We have found best plans for you!! Our advisor will get in touch with you soon.

      RTO महाराष्ट्र

      प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) महाराष्ट्र ही एक शासकीय संस्था आहे, जी महाराष्ट्रात धावणाऱ्या वाहनांसाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याची सुविधा पुरवते. केवळ आपल्या वाहनाचा नंबर प्रविष्ट करून, आपण RTO महाराष्ट्राची सविस्तर माहिती आणि कार्यालयाचा पत्ता मिळवू शकता.

      Read more

      महाराष्ट्रातील RTO कोडची यादी

      महाराष्ट्रामध्ये 51 हून अधिक RTO कार्यालये आहेत, जी राज्यातील वाहतुकीशी संबंधित सर्व कामकाज हाताळतात. खाली महाराष्ट्रातील RTO कार्यालयांची यादी आणि त्यांचे संबंधित RTO कोड दिले आहेत.

      महाराष्ट्रातील RTO मधून परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे मिळवावे?

      RTO महाराष्ट्राकडून तुमच्या वाहनासाठी परमनंट RC मिळवण्यासाठी या सूचनांचे पालन करा:

      • फॉर्म 20 भरा आणि आपल्या वाहनाच्या परमनंट रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करा
      • जर आपण वाहनाचे टेंपररी रजिस्ट्रेशन केले असेल, तर ते टेंपररी रजिस्ट्रेशन एक्सपायर होण्यापूर्वी अप्लाय करा
      • जर रजिस्ट्रेशनमध्ये हायपोथिकेशनचा समावेश असेल, तर हायपोथिकेशन संबंधीच्या तरतुदी पहा
      • आता रजिस्ट्रेशन नंबरचा प्रकार निश्चित करा
      • स्मार्ट कार्डशी संबंधित आवश्यकतांची खात्री करा
      • योग्य शुल्क भरा
      • केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार आवश्यक असलेला कर भरा

      महाराष्ट्रातील RTO मध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) रिन्यू कसे करावे?

      मोटार वाहनाचा वापर अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी, वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक्सपायर झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत ते रिन्यू करणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील RTO मध्ये तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट खालीलप्रमाणे रिन्यू करू शकता:

      • RTO ऑफिसकडे RC रिन्यूअलसाठी अर्ज करण्यासाठी 'फॉर्म 25' भरा
      • सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करा
      • वाहनाचे काही कर थकीत असल्यास, ते भरा
      • केंद्रीय मोटार नियमांनुसार निर्धारित केलेली योग्य रिन्यूअल फी भरा

      रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्युअलसाठी आवश्यक कागदपत्रे

      महाराष्ट्रामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खाली नमूद केली आहेत:

      • फॉर्म 25 मध्ये अॅप्लीकेशन
      • पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
      • R.C. बुक
      • फिटनेस सर्टिफिकेट
      • रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
      • अप-टू-डेट रोड टॅक्स भरल्याचा पुरावा
      • इन्शुरन्स सर्टिफिकेट
      • PAN कार्डची प्रत किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 (लागू असेल त्याप्रमाणे)
      • चेसिस आणि इंजिनची पेन्सिल प्रिंट
      • मालकाच्या स्वाक्षरीची ओळख

      ओनरशिप ट्रान्सफरसाठी आवश्यक कागदपत्रे

      महाराष्ट्र RTO अंतर्गत वाहनाच्या ट्रान्सफर ऑफ ओनरशिपसाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक असेल:

      • फॉर्म 29 - विक्रेत्याची घोषणा (2 प्रती)
      • फॉर्म 30 - खरेदीदाराची घोषणा
      • फॉर्म 28 - (तीन प्रती)
      • फॉर्म 31
      • ओरिजिनल RC बुक
      • इन्शुरन्स सर्टिफिकेट
      • PUC सर्टिफिकेट
      • ओळख आणि पत्त्याचा पुरावा
      • टॅक्स सर्टिफिकेट
      • संबंधित ट्रान्सफर फी

      महाराष्ट्रामध्ये व्हेहिकल रजिस्ट्रेशन शुल्क

      महाराष्ट्रामध्ये वाहनाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तुम्हाला विविध वाहनांसाठी खालील शुल्क भरावे लागेल:

      • टू-व्हीलर्स: रु. 300
      • फोर व्हीलर्स: रु. 600
      • अवजड मालवाहू वाहन: Rs. 1500
      • माध्यम मालवाहू वाहन: Rs. 1,000

      रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या डुप्लीकेट कॉपीसाठी, वाहनाच्या प्रकारानुसार रजिस्ट्रेशन फीच्या 50% शुल्क आकारले जाईल.

      महाराष्ट्रामध्ये RC स्टेट्स कसे जाणून घ्यावे?

      महाराष्ट्रामध्ये तुमच्या वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी, खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे पालन करा:

      • परिवहन वेबसाईटला भेट द्या
      • होम पेजवरून, ऑनलाइन सर्व्हिसेस ड्रॉपडाऊनवर क्लिक करा
      • या ड्रॉपडाउनमधून "व्हेहिकल-रिलेटेड सर्व्हिसेस" निवडा
      • आता, तुमचे राज्य "महाराष्ट्र" निवडा
      • प्रोसिड वर क्लिक करा
      • तुमच्या वाहनाचे RTO निवडा
      • दिलेल्या पर्यायांमधून, "नो युअर अॅप्लीकेशन स्टेट्स" हा पर्याय निवडा
      • तुमचा अॅप्लीकेशन नंबर एंटर करा
      • सबमिट वर क्लिक करा
      • पुढील विंडोवर तुमच्या वाहनाचे RC स्टेट्स डिस्प्ले होईल.

      महाराष्ट्रामध्ये वाहनाच्या मालकाचे तपशील कसे तपासावेत?

      जर तुम्हाला महाराष्ट्रातील वाहन मालकाचे तपशील तपासायचे असतील, तर तुम्ही खालील पायऱ्यांचे पालन करू शकता:

      • परिवहन सेवा संकेतस्थळाला भेट द्या
      • 'इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस' या ड्रॉपडाऊनमधून "नो युअर व्हेहिकल डिटेल्स" हा पर्याय निवडा
      • तुमचा मोबाईल नंबर आणि व्हेरीफिकेशन कोड वापरून लॉग-इन करा
      • जर तुमचे खाते नसेल, तर तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने नवीन खाते तयार करा
      • OTP एंटर करा आणि "व्हेरिफाय" बटणावर क्लिक करा
      • व्हेरीफिकेशन पूर्ण होताच, वाहनाचे तपशील, मालकाची माहिती, RC आणि मोटर इन्शुरन्स यांची माहिती प्रदर्शित होईल.

      विविध वाहनांसाठी महाराष्ट्रातील रोड टॅक्स

      महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या मोटार वाहनांसाठीचा रोड टॅक्स खालीलप्रमाणे आहे:

      कारच्या किमतीनुसार नवीन कारच्या रजिस्ट्रेशनवरील रोड टॅक्स:

      कारची किंमत रोड टॅक्स
      किंमत 10 लाखांपेक्षा कमी CNG: 7%
      पेट्रोल: 11%
      डिझेल: 13%
      10 लाख - 20 लाख पेट्रोल: 12%
      डिझेल: 14%
      20 लाख पेक्षा जास्त पेट्रोल: 13%
      डिझेल: 15%

      जर गाडी कंपनीच्या नावाने खरेदी केली असेल, तर रोड टॅक्स गाडीच्या किमतीच्या 20% असेल.

      टू व्हीलरसाठीच्या रोड टॅक्समध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

      वाहनाच्या इंजिनची क्षमता एक-वेळ टॅक्स (किमतीच्या %)
      99 cc पर्यंत 10%
      100 cc ते 299 cc 11%
      300 cc पेक्षा जास्त 12%

      महाराष्ट्र रोड टॅक्स ऑनलाईन कसा भरावा?

      महाराष्ट्रामध्ये ऑनलाइन रोड टॅक्स भरण्यासाठीचे स्टेप बाय स्टेप गाईड येथे दिले आहे:

      • परिवहन सेवा वेबसाइटला भेट द्या
      • ऑनलाइन सर्व्हिसेस या ड्रॉपडाऊनमधून "व्हेहिकल रिलेटेड सर्व्हिसेस" हा पर्याय निवडा
      • आता यादीमधून राज्य महाराष्ट्र निवडा
      • पुढील पेजवर, ज्या RTO कार्यालयात तुमचे वाहन रजिस्टर्ड आहे, ते RTO निवडा
      • प्रोसिड वर क्लिक करा
      • सेवांच्या यादीमधून "पे टॅक्स" हा पर्याय निवडा
      • रोड टॅक्सचे ऑनलाइन पेमेंट करा
      • पेमेंटची रिसीट डाउनलोड करा.

      महाराष्ट्र रोड टॅक्सच्या नॉन-पेमेंटसाठी दंड

      जर तुम्ही महाराष्ट्राचा रोड टॅक्स भरण्यात कसूर केली, तर तुम्हाला मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. पहिल्यांदाच चूक करणाऱ्यांसाठी 300 रुपयांचा दंड आकारला जाईल. हा दंड वाढून, संबंधित श्रेणीसाठी लागू असलेल्या वन टाइम टॅक्स इतका होऊ शकतो.

      जर याची पुनरावृत्ती झाली, तर तुम्हाला एकदा भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरावी लागू शकते.

      महाराष्ट्रामध्ये हायपोथिकेशनची नोंद

      जर तुम्ही तुमचे वाहन हायपोथिकेशनवर खरेदी केले असेल, तर त्याची नोंद तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर करून घेणे आवश्यक आहे. तुमच्या वाहनाच्या RC मध्ये हायपोथिकेशनची नोंद करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

      • ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
      • फॉर्म 34 (यथायोग्य भरलेला आणि स्वाक्षरी केलेला) (2 प्रती)
      • वैध वाहन इन्शुरन्सची साक्षांकित प्रत
      • रजिस्टर्ड ओनरच्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत
      • वैध पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत
      • विहित शुल्क
      • PAN कार्डची साक्षांकित प्रत किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 (लागू असल्यास)
      • फायनान्सर कडून NOC

      महाराष्ट्रामध्ये हायपोथिकेशनची समाप्ती

      जेव्हा वाहनाच्या मालकाने आपले कर्ज पूर्णपणे फेडलेले असते, तेव्हा हायपोथिकेशन संपुष्टात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वाहनाचा संपूर्ण मालकी हक्क मालकाकडे येतो आणि वाहनाच्या RC वर कर्जदात्याच्या नावाऐवजी मालकाचे नाव नोंदवले जाते.

      महाराष्ट्रामध्ये हायपोथिकेशन संपुष्टात आणण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

      • बँक/वित्तसंस्थेकडून NOC
      • फॉर्म 35 च्या दोन प्रती (यथायोग्य भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या)
      • ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
      • ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत
      • वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीची प्रत
      • PUC ची प्रत
      • PAN कार्ड किंवा फॉर्म 60 आणि 61 (आवश्यक असल्यास)
      • मालकाच्या आधार कार्डची प्रत

      महाराष्ट्रामधील हायपोथिकेशन शुल्क

      महाराष्ट्रामध्ये हायपोथिकेशनची एंडोरसमेंट करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क खालीलप्रमाणे आहे:

      • मोटारसायकल: रु. 500
      • तीन-चाकी/हलके मोटार वाहन: रु. 1500
      • मध्यम आणि अवजड वाहन: रु. 3,000
      • हायपोथिकेशन काढून टाकण्यासाठी/रद्द करण्यासाठी रु. 100 इतके शुल्क आकारले जाते.

      महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करणे

      महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जर आपण आपल्या वाहनावर ही प्लेट लावली नसेल, तर मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी आपण त्यासाठी नक्की अर्ज करावा. चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने, अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह या प्लेटची सुरुवात करण्यात आली असून, यामुळे वाहनांच्या सुरक्षेत वाढ होते.

      महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी तुम्ही ऑनलाइन अॅप्लीकेशन कसे करू शकता, ते खालीलप्रमाणे आहे:

      • बुक माय HSRP च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
      • हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर हा पर्याय निवडा
      • पुढील पानावर, तुमचा चेसिस क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर आवश्यक माहिती यांसारखे तपशील भरा
      • कॅप्चा एंटर करा आणि पुढील पेजवर जा
      • तुमचे वाहन इंस्टॉलेशनसाठी तुम्ही नेऊ शकाल ते योग्य ठिकाण निवडा
      • आता, पुरवलेली इतर सर्व माहिती तपासून पहा
      • पेमेंट प्राप्त झाल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी पेमेंट रिसीट डाउनलोड करा.

      महाराष्ट्रामध्ये HSRP चे स्टेट्स ऑनलाइन तपासणे

      महाराष्ट्रामध्ये HSRP चे स्टेट्स तपासण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा:

      • बुक माय HSRP वेबसाईटला भेट द्या
      • होमपेजवर, "ट्रॅक युअर ऑर्डर" हा पर्याय निवडा
      • आता तुमचा ऑर्डर क्र., वाहन रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा निवडा
      • सर्च या पर्यायावर क्लिक करा
      • आता, महाराष्ट्रातील तुमच्या HSRP चे स्टेट्स डिस्प्ले होईल.

      महाराष्ट्रामध्ये कार इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्याबद्दलचे चलन

      महाराष्ट्रामध्ये वाहन चालवताना वैध कार इन्शुरन्स पॉलिसी बाळगणे ही एक अनिवार्य प्रक्रिया असून, प्रत्येकाने तिचे पालन करणे आवश्यक आहे. जर वाहन मालक महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना आपली अॅक्टीव्ह वाहन इन्शुरन्स पॉलिसी सादर करू शकला नाही, तर त्याला खालीलप्रमाणे वाहतूक दंड भरावा लागेल:

      उल्लंघन दंड
      इन्शुरन्स नसताना कार चालवणे (पहिल्या गुन्ह्यासाठी) रु. 2,000 आणि/किंवा 3 महिने कारावास, समाज सेवा
      इन्शुरन्स नसताना कार चालवणे (पुन्हा गुन्हा केल्यास) रु. 4,000 आणि/किंवा 3 महिने कारावास

      महाराष्ट्रामध्ये वाहन इन्शुरन्स कसा खरेदी करावा?

      भारतात, मोटार वाहन कायदा 1988 नुसार वाहन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे. यामध्ये थर्ड-पार्टी इन्शुरन्स अनिवार्य असला, तरी अधिक जास्त कव्हर मिळवण्यासाठी काँप्रीहेंसिव्ह कव्हर घेण्याची शिफारस केली जाते.

      महाराष्ट्रामध्ये तुमच्या वाहनासाठी कार इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन कशी खरेदी करावी, याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

      • पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (Policybazaar.com) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
      • होमपेजवरुन ‘कार इन्शुरन्स’ हा पर्याय निवडा
      • आता तुमच्या कारचा नंबर एंटर करा, किंवा कारचा नंबर न टाकताच पुढे जा
      • RTO च्या यादीमधून तुमच्या संबंधित RTO ची निवड करा. तुमचे वाहन महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत असल्यामुळे, महाराष्ट्रातील संबंधित RTO निवडा
      • आता तुमच्या गाडीचे तपशील (जसे की कंपनी/मेक, मॉडेल, व्हेरिएंट इ.) निवडा आणि इन्शुरन्स कोट्स पाहण्यासाठी पुढे जा
      • आता तुम्हाला निवडण्यासाठी कार विम्याचे अनेक प्लॅन्स उपलब्ध दिसतील. तुम्हाला हवा असलेला प्लॅन आणि त्यासोबतचे अॅड ऑन्स निवडा
      • तुम्हाला सोयीस्कर वाटणाऱ्या पेमेंट पद्धतीचा वापर करून इन्शुरन्स प्रीमियम भरा
      • एकदा का तुम्ही प्रीमियम भरला, की तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी जारी केली जाईल. या पॉलिसीची सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्वरित तुमच्या ईमेल पत्त्यावर प्राप्त होईल.

      RTO बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

      आपल्या वाहनाच्या RC मध्ये पत्ता बदलण्यासाठी, आपल्याला फॉर्म 33, RC, वैध इन्शुरन्स सर्टिफिकेट, पत्त्याचा पुरावा, PUC सर्टिफिकेट, PAN ची साक्षांकित प्रत किंवा फॉर्म 60 आणि 61, चेसिस आणि इंजिनची पेन्सिल प्रिंट, मालकाच्या स्वाक्षरीची ओळख आणि विहित शुल्क सादर करावे लागेल.

      महाराष्ट्रामध्ये तुम्ही लर्नर्स लायसन्स ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे मिळवू शकता. यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अर्जाचा नमुना भरा आणि संबंधित कागदपत्रांसह तो महाराष्ट्रातील संबंधित RTO कार्यालयात सादर करा.

      जर तुमचे RC हरवले असेल, फाटले असेल किंवा खराब झाले असेल, तर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, मूळ RC जारी करणाऱ्या RTO कार्यालयाला लेखी माहिती द्या, फॉर्म 26 द्वारे डुप्लिकेट RC साठी अर्ज करा, इतर आवश्यक कागदपत्रे सादर करा आणि योग्य शुल्क भरा.

      रजिस्ट्रेशनचे डुप्लीकेट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्म 26, PUC सर्टिफिकेट, पोलीस सर्टिफिकेट, इन्शुरन्स सर्टिफिकेट, पत्त्याचा पुरावा, चलन क्लिअरन्स, टॅक्स क्लिअरन्स, PAN ची साक्षांकित प्रत, फॉर्म 60 आणि 61, RC हरवल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, चेसिस आणि इंजिनची पेन्सिल प्रिंट आणि मालकाच्या स्वाक्षरीची ओळख आवश्यक असेल.

      हो, तुम्ही Policybazaar.com वरून अवघ्या 2 मिनिटांत कार इन्शुरन्सची तुलना आणि रिन्युअल ऑनलाइन करू शकता.

      Save upto 91% on Car Insurance
      Disclaimer: The list mentioned is according to the alphabetical order of the insurance companies. Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by any insurer. This list of plans listed here comprise of insurance products offered by all the insurance partners of Policybazaar. For complete list of insurers in India refer to the Insurance Regulatory and Development Authority of India website www.irdai.gov.in

      #Rs 2094/- per annum is the price for third-party motor insurance for private cars (non-commercial) of not more than 1000cc

      *Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.

      +Savings are based on the maximum discount on own damage premium as offered by our insurer partners.

      ^Lowest Price Guaranteed is based on certifications shared by insurers with us. Policybazaar will facilitate price matching subject to the terms and conditions of select insurers.

      ##Claim Assurance Program: Pick-up and drop facility available in 1400+ select network garages. On-ground workshop team available in select workshops. Repair warranty on parts at the sole discretion of insurance companies. Dedicated Claims Manager. 24x7 Claim Assistance.

      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL
      Claude
      top